हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रामदास आठवले यांचा वाढदिवस कर्जतमध्ये उत्साहात साजरा !
अशोक गायकवाड कर्जत : महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अन्याय अत्याचाराविरोधात दंड थोपटून आवाज उठवून सर्वसामान्य बहुजन वर्गाला ” पँथर ” स्टाईल ने न्याय देऊन आपला सामाजिक बांधिलकीचा पगडा ” संघर्षनायक ” म्हणून ओळख निर्माण करणारे तसेच तमाम दलित – शोषित, वंचित बहुजन समाजाचे नेते, संघर्ष योद्धा रामदास आठवले यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रि.पा.इं. कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप करून राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिपाइंचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळीच रिपाइंच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा जयघोष केला, त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजिप शाळा किरवली येथे शाळेत केक कापून व विद्यार्थ्यांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला . दरवर्षी होत असलेल्या या रिपाइंच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, ” शिक्षण हे ज्ञानरुपी तिसरा डोळा आहे” जो ज्ञान प्राशन करतो, तो गुरगुरल्या शिवाय रहात नाही, हि शिकवण विश्वरत्न बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांची असल्याने शिक्षण घेणाऱ्या देशाच्या भावी पिढीस सक्षम बनविण्यासाठी व आपणही या समाजाचे काही देणे आहोत, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे रिपाइंचे कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी सांगितले, तर किरवली शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेला कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास ती केली जाईल असे आश्वासन दिले.दरम्यान कर्जत तालुक्यांतील विविध भागात मोठमोठे फलक लावुन व विविध स्तुत्य उपक्रम – राबवून रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मुख्याध्यापिकामती प्रियांका प्रदीप हरवंदे, उपशिक्षिका चित्रा किशोर पाटील, वैशाली रुपेश पाटील,शिक्षक आकाराम तुकाराम पाटील, राजेंद्र सोपान रुपवनकर, ह. भ . प. प्रभाकर गोविंद बडेकर यांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले, यावेळी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच पुढील भविष्यासाठी शाळेला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आरपी आय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या समवेत, कर्जत तालुका संपर्कप्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, कर्जत तालुका सचिव अशोक दत्तु गायकवाड, तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे, खजिनदार विकास गायकवाड, कर्जत तालुका प्रसिद्धीप्रमुख विजय गायकवाड, उमरोली रा. जि.प वार्ड अध्यक्ष अमर गायकवाड, सावेळे पंचायत समिती वार्ड अध्यक्ष अमर जाधव, नेरळ शहर कार्याध्यक्ष हरिश्चंद्र सदावर्ते, मंजुळा किशोर गायकवाड, राधिका रविंद्र गायकवाड, योगिनी हिरामण गायकवाड, रेखा देवराम गायकवाड, रेखा चंद्रकांत जाधव, निशा प्रमोद लवांडे , अस्मिता जितेंद्र गायकवाड, शुभांगी महेंद्र भालेराव, कविता राजेश गायकवाड, शामिली सतीश गायकवाड, ज्योती हरिचंद्र रोकडे, कांचन उमेश भालेराव, अनुजा रुपेश रोकडे, शारदा सुखदेव भालेराव त्याचप्रमाणे आर पी आय चे असंख्य कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000
