Category: होम

अरविंद केजरीवाल देशद्रोही- अजय माकन

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीम्हणून एकत्र लढलेले आप आणि काँग्रेसमध्ये दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने शा‍ब्दिक चकमक पहायला मिळत आहे. काँग्रेसनेही आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे…

ठाणे जिल्ह्याचे पाणी ‘पेटणार’ ?

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न पेटणार आहे. ठाणे जिल्ह्यातील पाणी महागणार असल्याच्या बातम्यांनी सामाजिक संघटनांसह राजकीय संघटनांनीही रस्त्यावर उतरून विरोध करण्याची तयारी दर्शविली आहे. नवी मुंबईसह जवळपास सर्वच शहरांना बारवी धरणातून…

राज्यात गारपीटसह पावसाचा अंदाज

मुंबई : येत्या २७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व…

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळले

 ४२ प्रवाशांचा मृत्यू० २५ प्रवाशांना वाचवण्यात यश   अझरबैझान : कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कझाकिस्तानच्या आपत्ती मंत्रालयाने दिलेल्या…

विकृत विशालला गुन्ह्यात पत्नीसह मित्राने दिली साथ कल्याण अल्वयीन मुलीवरील अत्याचार

कल्याण – कल्याण पूर्वेकडील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करणाऱ्या विकृत विशाल गवळीला या गुन्ह्यात त्याची पत्नी आणि मित्रानेही साथ दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक…

मुंबई पोर्ट ट्रस्टची कामगार महिला उपासमारीने मेली माणूसकीला काळीमा फासणारी घटना रमेश औताडे

मुंबई : मुंबईत माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जगभरात नावाजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील सफाई कंत्राटदार कामगारांना तीन तीन महिने पगार देत नसल्याने सफाई कामगारांची उपासमार होत होती. या कामगारामधील एक…

२५ वर्षात स्वस्त वीज, गरीबांना २० लाख घरे !

स्लग- महाराष्ट्राचा रोडमॅप ठरला स्लग- महाराष्ट्राचा रोडमॅप ठरला नागपूर : राज्य सरकारने उर्जा विभागाचा पुढील २५ वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. पुढील तीन वर्षात वीजेचे दर कमी करण्यात येतील. पंतप्रधान आवास ग्रामीण प्लस योजनेंतर्गत यंदा राज्यात गरीबांना २० लाख पक्की घरे दिली जातील. तर पुढील पाच वर्षांत सर्वांना पक्की घरे देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रेस क्लब येथे झालेल्या मीट द प्रेस कार्यक्रमात केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यासाठी राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. नागपूरकरांना अभिमान वाटेल असे काम करण्याचा प्रयत्न आहे. लोककल्याणकारी योजनांचा बोजा अर्थसंकल्पात येतो. मात्र या सर्व गोष्टींचे नियोजन सरकारने केले आहे, तीन वर्षांत उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर स्वस्त व्हावेत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी गृहनिर्माण योजनांच्या अटी शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी मान्य केली आहे. लाभार्थीने १० टक्के निधी जमा करण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांना सहज घरे मिळू शकणार आहेत. राज्य सरकार आता २० लाख गरीबांना हक्काची घरे देणार आहे. यासोबतच या घरांमध्ये सोलर रूफ टॉप बसवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे घरकुलधारकांना मोफत वीजही मिळत राहील. राज्यात सहा नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. हे प्रकल्प मोठे बदल घडवून आणतील आणि ‘जनरेशन प्रोजेक्ट’ ठरतील. विदर्भातील १० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ७ जिल्ह्यांना…

अटलजींनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही… राज ठाकरे

आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी. स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या…

मामीनेच काढला मामाचा काटा

पुणे : पुण्यातील हायप्रोफाईल मर्डरचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची रहस्यमयरित्या मर्डर करण्यात आली होती. ही मर्डर दुसरीतिसरी कुणी केली नसुन या मामाच्या पत्नीनेच म्हणजेच…

कल्याण ग्रामीणच्या आमदारांचा ‘ऑन द स्पॉट’ पंचनामा

 आमदार आपल्या भेटीला! शेकडो ग्रामस्थांसह रहिवाशांच्या तक्रारींचा निपटारा डोंबिवली : आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाद्वारे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी तक्रारींचा निपटारा करताना ऑन द स्पॉट पंचनामा करून शेकडो ग्रामस्थांसह रहिवाशांना दिलासा दिला आहे. ज्या विभागाशी संबंधित तक्रार असेल त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आमदार मोरे यांनी हजरजबाबीपणा दाखवून दिला. ‘आमदार आपल्या भेटीला’! डोंबिवली शहर शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने आयोजित ‘आमदार आपल्या भेटीला’! या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांसह रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत मध्यवर्ती शाखेत पार पडला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांना भेटण्यासाठी 100 हून अधिक नागरिकांनी खासगी, तसेच सार्वजनिक अर्थात सामाजिक समस्या मांडल्या. यावेळी डोंबिवली शहर, नेतीवली विभाग, एमआयडीसी विभाग, दिवा शहर, 14 गावे, 27 गावे, शिळफाटा विभाग, आदी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक समस्यांमध्ये बस सेवा, रखडलेली शासकीय कामे, अर्थ साह्य, वैद्यकीय सेवा, पाणी समस्या आणि शैक्षणिक समस्येसह नोकरी संदर्भात प्रश्न मांडले. तर खासगी समस्यांमध्ये आर्थिक फसवणूक, शिफारसपत्र, शासकीय योजनांचा लाभ मिळविणे, यांसारख्या प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी ग्रामस्थांसह रहिवाशांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देताना आमदार राजेश मोरे यांनी शासनाच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून अनेक समस्यांचे निराकरण केले. पोलिस, तहसीलदार कार्यालय, महानगरपालिका, रेशनिंग कार्यालय, शैक्षणिक विभाग यांसह विविध शासकीय यंत्रणांशी संवाद साधून तक्रारदारांच्या कामांना गती दिली. नवी दिशा, नवी आशा कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनीही गर्दी केली. पहिल्याच कार्यक्रमात अनेक प्रश्न मार्गी लागल्याने तक्रारदारांमध्ये समाधान दिसून आले. आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेने व संवेदनशीलतेने उपस्थित नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.