आता तरी शांत व्हाल का ?
महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल एक महिन्या पूर्वी लागल्या पासून काँग्रेस पक्षाची घालमेल सुरु ईहे. त्यांना निवडणुकीतील पराभवाचीच अपेक्षा होती. तसे सर्वेक्षण काँग्रेस नेत्यांच्या हाती मतदानाच्या महिनाभर आधी आलेले होते. कदाचित…
महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल एक महिन्या पूर्वी लागल्या पासून काँग्रेस पक्षाची घालमेल सुरु ईहे. त्यांना निवडणुकीतील पराभवाचीच अपेक्षा होती. तसे सर्वेक्षण काँग्रेस नेत्यांच्या हाती मतदानाच्या महिनाभर आधी आलेले होते. कदाचित…
१३५ सार्वजनिक वाचनालय सज्ज ठाणे : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील १०० आणि पालघरमधील ३५ सार्वजनिक वाचनालय सज्ज झाली असून सर्व ग्रंथसंपदा एकत्रित करणे, वाचनालयाचे सुशोभीकरण करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे याची तयारी सर्व जिल्हा ग्रंथालय विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. तर ठाणे आणि पालघर येथील १०० वर्षाहून अधिक जुने असलेल्या ६ सार्वजनिक ग्रंथालयांचा यात सर्वाधिक प्रचार – प्रसार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यातील वाचकांना तब्बल २ लाखांहून अधिक पूस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्याला मोठी साहित्यसंपदा लाभली आहे. अनेक नामवंत लेखक, साहित्यिक, शास्त्रज्ञ, सिने दिग्दर्शक यांची मोठी मांदियाळी ठाणे तसेच जवळच्या पालघर जिल्ह्यात आहे. यामध्ये सर्वात मोठा येथील सार्वजनिक ग्रंथालयांचा आणि येथील ग्रंथसंपदेचा देखील आहे. याच वाचन संस्कृतीचा प्रचार – प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून नियमित स्वरूपात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या उपक्रमांना सर्वच वयोगटातील वाचकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही लाभतो. याच पार्श्वभूमीवर आता शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नववर्षाच्या मुहूर्तावर १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” व्यापक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये ठाणे आणि पालघर येथील १३५ सार्वजनिक वाचनालये सज्ज झाली आहेत. ‘‘शतायू” वाचनालयांचा सहभाग मोलाचा ठाणे जिल्ह्यात ठाणे नगर वाचन मंदिर ठाणे, सार्वजनिक वाचनालय, कल्याण, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे, वाचन मंदिर, भिवंडी तर पालघर जिल्ह्यातील महात्मागांधी सार्वजनिक वाचनालय, वाडा आणि यशवंत राजे सार्वजनिक वाचनालय, जवाहर या वाचनालयांना शंभरहुन अधिक वर्षांचा सुवर्ण इतिहास आहे. अनेक दुर्मिळ आणि वाचनीय ग्रंथसंपदा याठिकाणी उपलब्ध आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या माध्यमातून येथील ग्रंथसंपदा वाचकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे या सुवर्ण इतिहास लाभलेल्या शतायू ग्रंथालयाची माहिती देखील वाचकांपर्यत पोहचणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शासनमान्य १३५ सार्वजनिक वाचनालय आहेत. येथे दोन लाखांहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तर २ लाखांहून अधिक नियमित वाचक नोंदणी आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना परिपत्रक देण्यात आले असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या वाचनालयात त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे परीक्षण करण्याची स्पर्धा देखील ठेवण्यात आली आहे. यातील उत्तम परीक्षण लेखनाला २६ जानेवारी रोजी पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. तसेच निबंध स्पर्धा, सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा यांसारखे अनेक उपक्रम या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. कोट वाचन संस्कृती वाढावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि वाचकांना अनेक दुर्मिळ आणि त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची उपलब्धता करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा ग्रंथालय विभाग आणि सर्व सार्वजनिक वाचनालयांमध्ये तयारी सुरु आहे. सर्व वाचकांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवावा. – प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ठाणे
कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदी काठच्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची आहेत. या कामासाठी कल्याण, डोंबिवली,…
– प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे आवाहन ठाणे : बदलत्या काळात नव्या पिढीवर आपल्या समृद्ध धार्मिक संस्कृती व विचारांचे संस्कार करण्यात पालक अयशस्वी होत आहेत, अशी खंत व्यक्त करीत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मोबाईलचा गैरवापर, दारू आणि जुगारात शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, याकडे त्यांनी पालकांचे लक्ष वेधले. पालकांनी वेळीच सतर्क होऊन आपली भविष्यातील पिढी वाचवावी, असे आवाहन इंदुरीकर यांनी केले. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथे सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महायज्ञाच्या सातव्या दिवशी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. या वेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. या वेळी भाजपाचे आमदार संजय केळकर यांचा इंदुरीकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन पिढी स्वार्थ व पैसा यामध्ये गुरफटली जात आहे. शाळांमधील ४० टक्के विद्यार्थी ऑनलाईन रमी खेळत आहेत. तर १० टक्के तरुण शेअर बाजाराच्या आहारी गेले आहेत. घरांघरांमधून शुभंकरोती व देवापुढे दिवा लावणे हे बंद झाले. परिणामी नव्या पिढीला संस्काराची ओळख होत नाही, हे दुर्देवी आहे, याकडे कीर्तनकार इंदुरीकर यांनी लक्ष वेधले. जगात वारकरी सांप्रदाय हा एकमेव असून, त्यात राव-रंक, वय, उंची किंवा आधारकार्ड-पॅनकार्ड असा फरक केला जात नाही. केवळ विठ्ठल नामस्मरण केल्यावर सर्व सुख मिळते. श्री विठ्ठलाचे स्मरण करतानाच आयुष्यातील वेळ न घालविता रात्रंदिवस कष्ट केल्यास तुम्ही सुखी व्हाल, असा सल्ला इंदुरीकर यांनी दिला. उपवास करुन देव भेटत नाही. पण वैज्ञानिक दृष्टीने आठवड्यातील एक दिवस उपवास केल्यास पचनशक्तीला आराम मिळेल. आपण करीत असलेले कर्म हीज पूजा असे मानून प्रत्येक व्यक्तीने नीतीने वागावे. चांगले वागून समाजाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन इंदुरीकर यांनी केले. सध्या घराबाहेर हॉटेल-धाब्यांवर जेवण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात ६० टक्के नागरिक घरी शिजविलेले अन्न खात नाहीत. आहार चांगला नसल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक व्यक्तीने काम, क्रोध आणि रोगावर नियंत्रण ठेवून जगावे, असा सल्ला श्री. इंदुरीकर यांनी दिला.
ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात पडसाद उमटले आहेत. बुधवारी कोपरी भागातील आनंदनगर मधील भीमसैनिकांनी…
शेतकरी महिलांचे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणणार – डॉ. अशोक ढवळे अनिल ठाणेकर ठाणे: शेतकरी महिलांचे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेने पुढाकार घेतला असून शेतकरी महिलांच्या हक्क व अधिकारांचा उद्घोष करण्यासाठी नाशिक येथे २६ डिसेंबरला राज्यस्तरीय शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे या परिषदेचे उद्घाटन करणार असून महिला शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने लावून धरणाऱ्या मकाम या संघटनेच्या नेत्या सीमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे परिषदेला विशेष मार्गदर्शन करणार आहेत. किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष जे. पी. गावीत, सीटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या नसीमा शेख, प्राची हातिवलेकर, शेतमजूर युनियनच्या सरिता शर्मा, एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेचे नेते रोहिदास जाधव, सोमनाथ निर्मळ, डी.वाय.एफ.आय. संघटनेचे नेते दत्ता चव्हाण, नंदू हाडळ परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. शेतीमध्ये अपार कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेच्या पुढाकाराने नाशिक येथे २६ डिसेंबर रोजी शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. शेती प्रश्नांची चर्चा करत असताना सरकारच्या धोरणामुळे विदारक बनलेले कृषी अरिष्ट, शेतीमालाचा वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला रास्त भावाची मागणी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी विषयांची नेहमीच चर्चा होते. मात्र शेतीमध्ये सर्वाधिक कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांच्या प्रश्नांवर फारशी चर्चा होत नाही. शेत जमिनीवर व राहत्या घरांवर महिला शेतकऱ्यांचा मालकी हक्क, महिला शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त दाम, मोफत श्रमाला श्रम म्हणून मान्यता व त्याचा रास्त मोबदला, महिलांवरील अन्याय व अत्याचार, महिला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान व संशोधनाची आवश्यकता, व्यसन, हुंडा, बालविवाह, धार्मिक व जातीय शोषण व भेदभाव, स्वच्छतागृहाचा हक्क इत्यादी अनेक प्रश्न दुर्लक्षित केले जातात.महिला शेतकऱ्यांच्या विविध समस्या, प्रश्न व हक्कांची या परिषदेत चर्चा होणार असून महिला शेतकऱ्यांच्या हक्क व मागण्यांची एक सनद या परिषदेमध्ये संमत करण्यात येणार आहे. परिषदेनंतर राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये या सनदेचे वाचन करणारे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. किसान सभेच्या पुढाकाराने होत असलेल्या या परिषदेमध्ये ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या विविध संघटनांमधील महिला नेतृत्वांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जनवादी महिला संघटना, सीटू ही कामगार संघटना, शेतमजूर युनियन, एस.एफ.आय. व डी.वाय.एफ.आय. या विद्यार्थी व युवक संघटना सहकार्य करत असून या संघटनांचे ग्रामीण भागात कार्यरत असलेले महिला नेतृत्व या परिषदेमध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी दिली.
– डॉ. अशोक करंजकर यांची उचलबांगडी हरिभाऊ लाखे नाशिक : भूसंपादनात विशिष्ट विकसकांना् झुकते माप, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काही निविदा आणि वारंवार सुट्टीवर असणे अशा कार्यशैलीने चर्चेत राहिलेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची अखेर शासनाने उचलबांगडी केली. त्यांच्या जागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाली आहे. २२ जुलै २०२३ रोजी त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. ते अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. प्राधान्यक्रम बाजूला ठेवत प्रशासनाने राबविलेली भूसंपादन प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. काही विकसकांना महापालिकेने झुकते माप देत सुमारे ६२ कोेटी रुपये दिले. ही बाब उघड झाल्यानंतर मागील महायुती सरकारच्या काळात भाजप आमदारांनी याची चौकशी करून आयुक्तांची बदली करण्याची मागणी केली होती. कुठल्याही विषयावरून गदारोळ उडाला की, डॉ. करंजकर हे सुट्टीवर निघून जात असत. असे अनेकदा घडले. शेतकऱ्यांना डावलून विकसकांना मोबदला दिल्याने शेतकऱ्यांनी महापालिका मुख्यालयात गोंधळ घातला होता. विधीमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात भाजप आमदारांनी वादग्रस्त भूसंपादन व निविदा प्रक्रियांबाबत तक्रारी केल्या होत्या. अधिवेशन काळात आयुक्त डॉ. करंजकर हे सुट्टीवर निघून गेले होते. करंजकर यांच्या निष्क्रियतेविषयी लोकप्रतिनिधींसह सर्वच नाराज होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने डॉ. करंजकर यांची बदली केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मनपा आयुक्तपदी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने त्यांना दिले आहेत.
अशोक गायकवाड अंबरनाथ : अंबरनाथ मधील गोल्डमॅन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचे अंबरनाथ शहर माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक, अजय जाधव यांना विविध संस्था संघटनेच्या वतीने रविवारी,(दि.२२) रोजी भावपूर्ण आदरांजली वाहन्यात आली. अध्यक्षस्थानी दत्ता सरवदे होते. दिवंगत अजय जाधव हे अंबरनाथ मधील गोल्ड मॅन म्हणून ओळखले जात होते. दलित पँथर ते रिपब्लिकन चळवळीत ते कार्यरत होते. पुण्यानुमोदन कार्यक्रमात प्रारंभी ब्रम्हदेश येथील भन्ते प्रियदर्शी आणि बुद्धगया येथील भन्ते बौद्धरत्न यांनी धार्मिक कार्यक्रम आटोपला. बौद्धाचार्य मोरे यांनी प्रवचन दिले. या प्रसंगी झालेल्या आदरांजली सभेत भारतीय बौद्धमहासभा राज्य शाखेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर बर्वे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहर सचिव, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, अंबरनाथचे माजी उप नगराध्यक्ष वाघमारे, नासिक विभागातील सरपंच अर्जुन डांगळे, कवी दादा पगारे, वसंत जाधव, मनोज दोंदे, फारूक शेख आदिची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. शोकसभेला माजी नगरसेवक नासिर कुंजाली, आर. पी. आय अंबरनाथ शाखेचे सचिव दिलीप जाधव, ऑर्डनन्स चतुर्थी श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते बी बी मडीखांबे, जयभीम सोसायटीचे प्रतिनिधी सुनील अधांगळे, महिला कार्यकर्त्या रोशनी शेख, निर्मला घोक्षे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते उद्योजक यश जाधव यांनी केले होते तर सूत्रसंचालन डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी केले.
उल्हासनगर : : गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या प्रलंबित मागण्या होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. 10,20,30 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना सेवा लाभ दयावा, अनुकंम्पा तत्वावर असलेल्या कामगारांना न्याय दयावा, सर्वच संर्वगाच्या पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती बाबत त्वरित निर्णय घेणे, नियमबाह्य कारभार सोपवण्यात आलेल्या अधिकारी वर्गाबाबत खुलासा करणे, सफाई कामगार यांना मोफत घरे नावावर करणे, कत्राटी कामगारांची पगारवाढ करणे आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच 30 डिसेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही तर खळ खट्याक करण्यात येणार असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात अध्यक्ष दिलीप थोरात यांच्यासह सचिन साठे, अनिल देवकर, रमेश वाघेला, राजेश मकवान, हरेष बेहनवाल, अजय गायकवाड, समाधान निकम, नितू बोरकर, प्रमिला खाबायतकर, शांताराम शेळके आदी सहभागी झाले होते.
पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे. उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे. Slug – पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे. उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे.