Category: होम

विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत;

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती ठाणे : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली ३० लाख रुपयांची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विनोद कांबळी यांच्या भेटीसाठी प्रताप सरनाईक गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, यापुढे त्यांच्यावर ठाण्यातील तीन रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. १५ दिवसांपूर्वी भिवंडी येथील आकृती रुग्णालयातील डाॅक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळी हे डॉक्टर आणि माध्यमांसोबत संवादही साधताना दिसतात. कांबळी यांना चालताना त्रास होत होता. तसेच इतरही अनेक आजार त्यांना होते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच डॉ.  श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विनोद कांबळी यांना जेव्हा-जेव्हा उपचाराची गरज पडेल. त्यावेळेस, गंगुबाई संभाजी शिंदे, इंदिराबाई बाबूराव सरनाईक आणि आकृती रुग्णालय हे तीन रुग्णालय विनोद कांबळी यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मोफत उपलब्ध असतील. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार विनोद कांबळी यांची भेट घेतली. डॉ.  श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे. त्यांच्या बँक खात्यात चार ते पाच लाख जमा झाले आहेत आणि आणखी २० लाख असे एकूण ३० लाख रुपये विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केले जातील. आम्ही अजूनही मदतीसाठी आवाहन केले आहे. ते देखील त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होतील असे सरनाईक यांनी सांगितले.

विनोद कांबळी यांना डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांची मदत

अनिल ठाणेकर क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना प्रकृती अस्वास्थ्यतेच्या कारणास्तव कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लक्ष रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.

‘मेकिंग द डिफरन्स’ संस्थेच्या संजीवनी प्रकल्पाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राला विविध वस्तू

ठाणे : ठाणे ग्रामीण भागातील आदिवासी, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित व्हावी यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ आणि पीपीएफएएस म्यूचुअल फंड कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मेकिंग द डिफरन्स संस्थेच्या मदतीतून संजीवनी…

Heading- जहाजावरील क्षेपणास्त्राच्या हल्ल्यातील सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत

– सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब – मिलिंद कांदळगावकर अनिल ठाणेकर ठाणे : यमनजवळ यंदा झालेल्या एका भीषण घटनेनंतर एसा स्टार जहाजावरील सर्व भारतीय सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत.आपल्या सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणणे ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे, असे नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (नूसी)चे  जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. ५ डिसेंबर २०२४ रोजी या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता, ज्यामुळे रेड सी प्रदेशातील तणाव वाढल्याचे दिसून आले. सागरी कामगारांना यशस्वीरीत्या  सुरक्षितपणे आणल्याचे  श्रेय नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (नूसी) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार महासंघ (आयटीएफ) यांच्या नेतृत्वाखालील धाडसी व्यवस्थापकीय प्रयत्नांना जाते. या संस्थांनी सागरी कामगारांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम केले.  आपल्या सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणले, ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे,” असे  नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय समुद्री सहकार्याच्या प्रभावीपणे केलेल्या कार्याचे हे यशस्वी उदाहरण आहे. यमन किनाऱ्याजवळील जहाज वाहतुकीच्या मार्गांवर वाढत्या हल्ल्यांपैकी एसा स्टारवरील   हा एक भीषण हल्ला होता. या घटनेमुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसंबंधीचा धोका निर्माण झाला आहे..मुंबईच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर परतणाऱ्या सागरी कामगारांचे त्यांच्या कुटुंबियांनी भावनिक स्वागत केले. त्याठिकाणी वैद्यकीय पथक तत्पर होते, परंतु प्राथमिक अहवालांनुसार  सर्व कामगारांची प्रकृती चांगली असून ते सुरक्षित  आहेत. सागरी कामगार संघटनां  आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे  सागरी कामगारांना मुंबईत सुरक्षितपणे  परत आणून कामगारांच्या हक्कांचे व सुरक्षिततेचे रक्षण करण्यामध्ये  महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच, संकटग्रस्त समुद्री मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सावधगिरी व आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे.  किनाऱ्यावर सुरक्षित आलेल्या सागरी कामगारांच्या कुटुंबियांनी परत आणण्यासाठी  सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आभार मानले.आमच्या प्रिय व्यक्तींना सुरक्षितपणे घरी परत आणले. हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे, असे एका कुटुंबीयाने सांगितले. या कठीण काळात नुसी व आयटीएफ कडून मिळालेला पाठिंबा अनमोल होता.या घटनेनंतर, विशेषत: समुद्री संघर्षग्रस्त भागांमध्ये  सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी पुन्हा एकदा सुरक्षेची मागणी वाढली आहे. व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी समुद्री प्राधिकरणे सद्यपरिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती मिलिंद कांदळगावकर यांनी दिली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांच्या शुभहस्ते, अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन…

राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षणासाठी जनतेने सहकार्य करावे – सुप्रिया रॉय

अशोक गायकवाड नवी मुंबई : ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची माहिती गोळा केली जाणार आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेने सहकार्य करावे’, असे आवाहन राष्ट्रीय…

राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे यावर भर – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जबाबदारी दिले त्यांचे मी आभार व्यक्त करतो. राज्याच्या जनतेला अधिक चांगल्या आणि सोयीस्कर परिवहन सेवा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. वाहतुकीच्या सुरक्षिततेला अधिक मजबूती देणे, सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सुलभ आणि आधुनिक बनवणे.  तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने परिवहन क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबवत राज्याचा विकास अधिक वेगाने करूया. आपला विश्वास हीच माझी ऊर्जा आहे आणि त्याचा योग्य वापर करून जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, असे मत महाराष्ट्र राज्याचा परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी पदभार स्वीकारताना व्यक्त केले.यावेळी. मंत्रालयात पदभार स्वीकारताना येथील अपर मुख्य सचिव संजय सेठी व परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या सह इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने सरनाईक यांचे स्वागत केले.

नवा डाव सुरू होताना…

ताज्या निकालांनी उडवून दिलेली रणधुमाळी काहीशी शमल्यानंतर आता नव्या सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल औत्सुक्य असणे स्वाभाविक आहे. आज राज्यापुढे अनेक कळीचे प्रश्न असून त्यांची तड कशी लावली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार…