Category: होम

एसटीची ‘दिवाळी’

नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मुंबई : एरव्ही तोट्यात असणाऱ्या एसटीला एन दिवाळीत विक्रमी ९४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसीटची दिवाळी जोरात असल्याची चर्चा आगारात रंगली होती. सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे…

आठवणी बाळासाहेबांच्या…

दादर येथील नियोजित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरे यांनी भेट देत या स्मारकाच्या कामाची त्यांनी पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

ना’राज’

‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’ – छगन भुजबळ मी बाळासाहेबांचा शिवसैनिक- तानाजी सावंत आज प्रमोद महाजनांची आठवण येते- सुधीर मुनगंटीवार मुंबई : महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर महायुतीत आनंदाची लाट उसळायच्याएवेजी नाराजीची…

भय, भूक आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र व्हावा!

राज्यात भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांचे महायुती सरकार विक्रमी बहुमताने स्थापन झाले. आजवर कोणत्याच सरकारला मिळाले नाही इतके विक्रमी बहुमत…

झारखंडमध्ये महाशक्तीला तडाखा

महाराष्ट्रात आदिवासी, दलितांनी महाविकास आघाडीला साथ दिली नसली तरी झारखंडमध्ये मात्र दिली. येथे ‌‘कटेंगे तो बटेंगे‌’पासून रोहिंग्यांपर्यंतच्या अनेक मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. समान…

अधिकारात्मक दृष्टीकोन हरपला

  जाकिरभाई गेले, यावर विश्‍वास बसणे कठीण आहे. त्यांना मी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ओळखतो. प्रथम ऐकले तेव्हा त्यांचे वय अवघ्या पाच वर्षांचे होते आणि तेव्हा मी आठ वर्षांचा होतो.…

 रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात Slug – 300 ज्येष्ठ नागरिक आणि 270 मुलांनी शर्यत पूर्ण केली; मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी पॅरा-धावपटूंना कृत्रिम पाय देण्यासाठी वापरण्यात येणार मुंबई-  भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या रुनवाल रिअल्टी यांनी प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रनवाल 25 आवर्स लाइफ, मानपाडा, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात केले. “ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स” या थीमवर वर आधारित या स्पर्धेमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी मजेत धावण्याचा तसेच 1 किमी कौटुंबिक धाव अशा शर्यतींचा समावेश होता. 3000 हून अधिक धावपटू आणि 30 पॅरा-अॅथलीट्स यांनी आरोग्य, समावेशकता आणि सकारात्मक बदल या सामूहिक ध्येयासाठी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.…

एका संवेदनशील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची रहस्यमय कादंबरी ‘कोब्रा’

ठाणे : निवृत्त पोलिस सहाय्यक आयुक्त व्यंकट पाटील लिखित आणि संधिकाल प्रकाशनाच्यावतीने ‘कोब्रा’ या कांदबरीचे प्रकाशन सोहळा ठाणे मराठी ग्रंथ संग्रहलाय येथे संपन्न झाला. यावेळी ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे…

Heading – बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा                                                 

 सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून…

‘महिला आयोग आपल्या दारी’

सिंधुदुर्गात १९ डिसेंबरला जनसुनावणी…! सिंधुदुर्गनगरी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी हा एक अत्यावश्यक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीबाबतची जनसुनावणी येत्या१९ डिसेंबरला जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे या तक्रारी ऐकून सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यातील या जन सुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या तक्रारी मांडल्यानंतर त्यांच्या तक्रारीचे लगेचच निवारण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठकही घेण्यात येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रारी करणे,सुनावणीच्या तारखेला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे बरंचदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊनच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रत्नागिरीत १८ डिसेंबरला आयोगाच्या वतीने अशाच प्रकारचा उपक्रम बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी हाती घेण्यात आला आहे.