Category: होम

मातीचा किल्ला बनविणे ही स्पर्धा कोरम मॉल येथे संपन्न

ठाणे : किल्लेकर समूह, वयम, सेवा सहयोग, कोरम मॉल, यांच्या सौजन्यशील उपक्रम कोरम मॉल येथेच आयोजित करण्यात आले होते. मातीचा किल्ला बनविणे ही स्पर्धा कोरम मॉल मध्ये आयोजन करण्यात आले…

 3000 पेक्षा अधिक धावपटू ठाण्याच्या रस्त्यांवर उत्साहाने धावले

 रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात 300 ज्येष्ठ नागरिक आणि 270 मुलांनी शर्यत पूर्ण केली; मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी पॅरा-धावपटूंना कृत्रिम पाय देण्यासाठी वापरण्यात येणार   मुंबई-  भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या रुनवाल रिअल्टी यांनी प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रनवाल 25 आवर्स लाइफ, मानपाडा, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात केले. “ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स” या थीमवर वर आधारित या स्पर्धेमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी मजेत धावण्याचा तसेच 1 किमी कौटुंबिक धाव अशा शर्यतींचा समावेश होता. 3000 हून अधिक धावपटू आणि 30 पॅरा-अॅथलीट्स यांनी आरोग्य, समावेशकता आणि सकारात्मक बदल या सामूहिक ध्येयासाठी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. चिकाटीचा उत्सव साजरा करण्याबरोबरच, ही मॅरेथॉन सामाजिक उद्दिष्टाचे प्रतीक ठरली. या कार्यक्रमातून मिळणारा संपूर्ण निधी भारतातील पॅरा-अॅथलेटिक चॅम्पियन्सना कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे रुनवाल रिअल्टीने जिद्द, सामर्थ्य आणि सकारात्मक बदल घडवण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. ह्युमेबल फाउंडेशनच्या पाठिंब्यामुळे या कार्यक्रमाचे योगदान अधिक व्यापक झाले असून, समाज अधिक समावेशक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.…

परळ येथे युवा क्रीडा महोत्सव २०२४ ला सुरुवात

ठाणे : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु) ने भविष्यवादी व्हिजन अंतर्गत २०२४ मध्ये सुरू झालेला “युवा क्रीडा महोत्सव” आयोजित करण्याचा १० वर्षांचा जुना वारसा सुरू ठेवला आहे.…

एका संवेदनशील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची रहस्यमय कादंबरी ‘कोब्रा’

  ठाणे : निवृत्त पोलिस सहाय्यक आयुक्त व्यंकट पाटील लिखित आणि संधिकाल प्रकाशनाच्यावतीने ‘कोब्रा’ या कांदबरीचे प्रकाशन सोहळा ठाणे मराठी ग्रंथ संग्रहलाय येथे संपन्न झाला. यावेळी ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष…

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जवळपास १९ कोटींची तडजोड रक्कम वसूल – अमोल शिंदे

अशोक गायकवाड रायगड : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे. त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी २० लाख ३३ हजार ११७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ५२ हजार ९०१ वादपूर्व प्रकरणे व ९ हजार ८१४ प्रलंबित अशी एकूण ६२ हजार ७१५ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९ हजार २९० वादपूर्व प्रकरणे व २ हजार ३२७ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटवून निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी २० लाख ३३ हजार ११७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात १० जोडप्यांचा (पाली-१, पेण-१, रोहा-१, महाड-३, पनवेल-१, खालापूर-२, अलिबाग-१) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ४८ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना ५ कोटी ६६ लाख २८ हजार इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा जिल्हा न्यायाधीश क. २,एन. के. मणेर व पॅनलवरील न्यायाधिशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्ह्यातील विविध न्यायालयांत २८ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली. या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

 बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा    

 सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून हे पंधरा हजार कर्मचारी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कोविड काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना कामावर जाण्यायेण्यास जीवावर उदार होऊन मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांनी सेवा दिली. त्याबद्दल प्रोत्साहन म्हणून प्रति दिन तीनशे रुपये विशेष भत्ता घोषित केला होता. परंतु उपक्रमाने गेल्या चार-पाच वर्षांत बेस्ट कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्यापासून वंचित ठेवले आहे. विधानपरिषद आमदार प्रसाद लाड पुढाकार घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 जुलै 2024 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये मोठा गाजावाजा करून एका समारंभात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्री अनिल डिग्गीकर यांच्याकडे 78 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता. परंतु अजूनही बेस्ट कामगारांना कोविड भत्त्याचे वाटप झालेले नाही. त्यामुळे बेस्ट कामगारांची फसवणूक  झाल्याची भावना कामगारांमध्ये पसरली आहे. अशा प्रकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा बेस्ट कामगारांमध्ये मलीन होत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते श्री महेश दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. 000

 ‘महिला आयोग आपल्या दारी’

 सिंधुदुर्गात १९ डिसेंबरला जनसुनावणी…!   सिंधुदुर्गनगरी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी हा एक अत्यावश्यक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीबाबतची जनसुनावणी येत्या१९ डिसेंबरला जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे या तक्रारी ऐकून सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यातील या जन सुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या तक्रारी मांडल्यानंतर त्यांच्या तक्रारीचे लगेचच निवारण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठकही घेण्यात येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रारी करणे,सुनावणीच्या तारखेला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे बरंचदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊनच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रत्नागिरीत १८ डिसेंबरला आयोगाच्या वतीने अशाच प्रकारचा उपक्रम बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी हाती घेण्यात आला आहे.

ओम साईश्वर, शिवनेरी, श्री समर्थची विजयी सलामी  

 किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५ ला आज माटुंग्यात सुरुवात झाली. स्पर्धेचे आयोजन ॐ…

मातीचा किल्ला बनविणे ही स्पर्धा कोरम मॉल येथे संपन्न

ठाणे : किल्लेकर समूह, वयम, सेवा सहयोग, कोरम मॉल, यांच्या सौजन्यशील उपक्रम कोरम मॉल येथेच आयोजित करण्यात आले होते. मातीचा किल्ला बनविणे ही स्पर्धा कोरम मॉल मध्ये आयोजन करण्यात आले…

परळ येथे युवा क्रीडा महोत्सव २०२४ ला सुरुवात

ठाणे : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु) ने भविष्यवादी व्हिजन अंतर्गत २०२४ मध्ये सुरू झालेला “युवा क्रीडा महोत्सव” आयोजित करण्याचा १० वर्षांचा जुना वारसा सुरू ठेवला आहे.…