Category: होम

– डॉ. साद काझी आणि रवींद्र लाखे यांचा गौरव

– कल्याण-भूषण व कल्याण-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कल्याण : कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, ‘कल्याण सिटीझन फोरम’ आयोजित, “कल्याण-भूषण” आणि “कल्याण-रत्न” पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी…

‘ईव्हीएम हटाव-देश बचाव, बॅलेट-पेपर लाव’ बैठकीत मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड यांची उपस्थिती

अनिल ठाणेकर ठाणे : भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, ‘ईव्हीएम हटाव-देश बचाव, बॅलेट-पेपर लाव’ या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील,  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, २६ जानेवारी-२०२४ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन राजन राजे यांनी केले. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षाया’चे अध्यक्ष राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते फिरोज मियठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे, मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते.

 जिल्ह्यातला पारा घसरला

 बदलापुरात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद   बदलापूर: सोमवार हा मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद खाजगी हवामान अभ्यासाकांनी केली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास बदलापुरात १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर शेजारच्या अंबरनाथमध्ये ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान १२ अंश सेल्सिअस होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बदलापूर शहरात १०.४ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदवले गेले. खाजगी हवामान अभ्यासात अभिजीत मोडक यांनी त्यांच्या केंद्रात ही नोंद नोंदवली. बदलापूर शहराच्या एका बाजूला टाहुलीची डोंगर रांग तर दुसऱ्या बाजूला उल्हास नदी आहे. शहरात मोठ्या संख्येने झाडे आहेत. त्यामुळे शहरात जिल्ह्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद दरवर्षी होत असते. यंदा सोमवारी आतापर्यंतच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. बदलापूर शेजारच्या अंबरनाथ शहरात ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. उल्हासनगर शहरात १२.५ अंश सेल्सिअस, कल्याण शहरात १२.८ अंश सेल्सिअस, डोंबिवली शहरात १२ अंश सेल्सिअस तर ठाणे शहरात १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली

शेकडो लीटर पाण्याची नासाडी   कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले. कल्याण पूर्व भागाला या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळतात या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी बंद केला. जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर साचले होते. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीतून पाण्याचे कारंजे उडत असल्याने वाहन चालकांना या भागातून वाहने चालविताना काळजी घ्यावी लागत होती. अनेक वाहन चालकांनी जलवाहिनीजवळ आपली वाहने उभी करून उडणाऱ्या पाण्याद्वारे आपली वाहने धुऊन घेतली. उल्हास नदी पात्रातून उचललेले पाणी बारावे जलशुध्दीकरणात आणले जाते. तेथून हे पाणी जलवााहिनीव्दारे पत्रीपूल भागात रेल्वे मार्गाखालून कल्याण पूर्व भागात पुरवठा केले जाते. ही जलवाहिनी सोमवारी सकाळी ९० फुटी रस्त्यावरील मोहन सृष्टी येथे फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी फुकट गेले. परिसरातील जागरूक नागरिकांनी ही माहिती तात्काळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. ही जलवाहिनी फुटल्यामुळे कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. नागरिकांनी घरातील उपलब्ध पाणी एक दिवस जपून वापरण्याचे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी केले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू केले होते. दुपारपर्यंत हे काम पूर्ण करून या जलवाहिनीतील पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. या जलवाहिनीच्या परिसरात राहणारे काही रहिवासी जलवाहिनीतून पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर भांडी घेऊन पाणी भरण्यासाठी आले होते. जलवाहिनीतील पाण्याच्या अति उच्चदाबामुळे जलवाहिनी फुटली असण्याचा प्राथमिक अंदाज अधिकारी वर्तवत आहेत. दुरुस्ती करत असताना जलवाहिनी फुटण्याचे खरे कारण समजून येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. कोट ९० फुटी रस्त्यावर पत्रीपुल भागात जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. ही जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन कल्याण पूर्व भागाचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. अशोक घोडे (कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग) ०००००

माथेरानमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न

माथेरान : नेहमीच्या शाळेच्या अभ्यास क्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर स्कुल, नगरपालिका प्राथमिक शाळा सेंट झेव्हीयर स्कुल आणि अंगणवाडी शाळेतील मुलांना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन…

जगातील पहिले सुवर्ण स्वरमंडल पनवेलमध्ये

पनवेल : शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे,…

 सिंगापूर विद्यापाठीतील विद्यार्थ्यांची नमुंमपा भेट

शाश्वत भविष्याकरिता माहिती व ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी नवी मुंबई : नॅशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देत महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि भारतातील एका आधुनिक…

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना संरक्षण द्या – नरेश म्हस्के

नवी दिल्ली : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात विरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात जोरदार आवाज उठविला. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश…

डॉ. रवींद्र थत्ते यांचे गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित व्याख्यान

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित डॉ. रवींद्र थत्ते यांचे `तत्वज्ञान सोपे आहे’  हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै. वासुदेव आणि नलिनी परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…