Category: होम

 पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा संशयास्पद मृत्यू

आंबेडकरी संघटनांची ठाण्यात जोरदार निदर्शने   अनिल ठाणेकर ठाणे : परभणी येथे डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली. परभणी येथे एका समाजकंटकांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती. तसेच, तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती. त्यानंतर सबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणी सोमनाथ सुर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली . पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आले असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, पीआरपीचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे , पीआरपीच्या महिलाध्यक्षा मीनाताई अलिंग, संदीप खांबे , प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी, सोमनाथ सुर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे. पोलिसी मारहानीमुळेच सोमनाथ दगावला आहे. याची चौकशी करून पोलीस अधीक्षक,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे; पुतळ्यावर दगडफेक करणार्यामागील मास्टर ऑफ माईंडचा शोध घ्यावा; अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,  असा इशारा दिला. तर, आबासाहेब चासकर यांनी, सोमनाथ  सुर्यवंशी याचा मृत्यू नसून खूनच झालेला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत. जर, सोमनाथच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर राज्यभर जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला.

ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस’ हे एक उत्तम व्यासपीठ – रुचेश जयवंशी

अशोक गायकवाड नवी मुंबई : ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. महालक्ष्मी सरस २०२४ प्रदर्शन व विक्रीचे भव्य उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई याठिकाणी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात ‘घे भरारी – मला पंख मिळाले’ या कार्यक्रमात सहभागी उमेद अभियानाच्या महिलांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उमेद अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी, श्रीमती मंजिरी टकले तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना चालना मिळावी, त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा आधार मिळावा, यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांना पाठिंबा द्यावा. असे अवाहान ही जयवंशी यांनी केले.या प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये हातमाग, कलाकुसर, हस्तकला, साड्या, कपडे, मसाले, सजावटीच्या वस्तू, तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचा समावेश आहे.तसेच, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी ७० भव्य स्टॉल्सचे फूड कोर्ट उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी आपल्या कौशल्याने साकारलेल्या उत्पादनांचा विशेष ठसा उमटवला आहे. नवी मुंबईतील नागरिकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. महालक्ष्मी सरस २०२४ हे प्रदर्शन फक्त विक्रीसाठी नाही तर ग्रामीण संस्कृतीचा आणि कलेचा अनुभव घेण्यासाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण वातानुकूलित व्यवस्थेमुळे खरेदीसाठी अतिशय सुखद वातावरण आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील महिलांनी आपल्या उत्पादनांसह सहभाग घेतला आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि ग्रामीण महिलांच्या यशाला प्रोत्साहन द्यावे.

सारे काही आलबेल नाही…!

सोमवारपासून नागुपरात आणखी एका हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होते आहे. पण हे नेहमीसारखे मजेचे आणि हुरडा पार्ट्यांचे, जंगल सफारींचे अधिवेशन नाही. हे थोडे गरम वातावरणात होणारे अधिवेशन आहे. त्यामुळेच सध्या जरी नागपुरात…

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे पोलादी व्यक्तीमत्व

गुजरात मधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ ला सरदार वल्लभभाई पटेल नावाचा लोहपुरुष जन्माला आला आणि भारतीय राजकारणात एक पोलादी व्यक्तीमत्व उदयास आले. कारण त्यांनी देशांच्या स्वतंत्र लढ्यासाठी व स्वातंत्र्य…

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज स्मृतिदिन. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी आणंद या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील झव्हेरिभाई यांनी…

हवामान परिषदेत तोंडाला पुन्हा पाने

बाकू येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदेत (कोप 29) विकसनशील देशाचे नुकसान टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या मदतीवर वाद झाला. परिषदेवर बहिष्कार टाकण्याची भाषा झाली. परिषदेचा कालावधी दोन दिवस वाढवण्यात आला. त्यातून जाहीर…

सेवाभावाने मंत्रिपदाची दुसरी इनिंग सुरू-  मंगल प्रभात लोढा

मुंबई : मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि सन्मानार्थ लोढा यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. पुन्हा एकदा मंत्री पदी निवड करून महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा अमित शाह जी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा जे पी नड्डा जी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीसजी यांचे, मंगल प्रभात लोढा यांनी याप्रसंगी आभार मानले आहेत.…

 उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य

 आमदार संजय उपाध्याय यांची ग्वाही   मुंबई : उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या भव्य पत्रकार भवनाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपणच करु, अशी निःसंदिग्ध ग्वाही बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी दिली.  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि बोरीवली मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने संजय उपाध्याय हे निवडून आले. संजय उपाध्याय यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्या आणि बोरीवली येथील पत्रकार नेहा पुरव यांनी भेट घेतली त्यावेळी बोरीवली येथे आमदारांनी पत्रकारांशी संवाद साधावा अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष आणि दैनिक भास्कर चे विशेष राजकीय प्रतिनिधी विनोदकुमार यादव यांना आमदार संजय उपाध्याय आणि पत्रकार यांच्या मध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली. बोरीवली पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये पत्रकारांसमवेत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी परखडपणे भूमिका मांडतांना सांगितले की, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वेळेत येण्याची गरज आहे. पत्रकारांना गृहीत धरण्यात येऊ नये. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वैद्य यांच्या नेतृत्वाखाली २०११ साली दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मालाड आणि मागाठाणे या सहा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ या क्षेत्रातील सर्व भाषिक पत्रकारांसाठी उत्तर मुंबई पत्रकार संघ स्थापन करण्यात आला. हा संघ नोंदणीकृत सुद्धा आहे. सुमारे दीडशे दोनशे पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहेत. या पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन उभारण्यात यावे. ही भव्य वास्तू सभागृह, समिती कक्ष, उपहारगृह, कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पत्रकारांसाठी वास्तव्य करण्याची व्यवस्था, बॅंक आदी सुविधांनी सुसज्ज असावी, अशी आमची मागणी आहे. डॉ. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असतांना राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. मुंबई शहर जिल्ह्यात मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर भव्य पत्रकार भवन आहे. मात्र मुंबई उपनगरात असे भवन नाही. उत्तर मुंबई पत्रकार संघाने तत्कालीन खासदार गोपाळ शेट्टी यांना या मागणीचे निवेदन दिले. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पत्र लिहून आमची मागणी पुढे रेटली. जागाही आहे. आता आपण पाठपुरावा करा. आपणच भूमिपूजन करा आणि उद्घाटन आपणच करा. याचा उपयोग लोकप्रतिनिधींनाच जास्त होऊ शकतो. आमदार संजय उपाध्याय यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन म्हणजे हॉटेल घेण्याचीही गरज भासणार नाही. त्या पत्रकार भवनातच आपण भेटून संवाद साधू शकतो, असे स्पष्ट केले. उपस्थित सर्व पत्रकारांनी या भूमिकेचे स्वागत केले. आमदार संजय उपाध्याय यांच्या धर्मपत्नी सौ. नीलम संजय उपाध्याय, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, निरंजन शेट्टी, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण वराडकर, कुनेश दवे, दीपक भातुसे, मनोहर कुंभेजकर, मयुर परीख, अभय मिश्रा, राजकुमार सिंह, दत्ताराम घुगे, नीलाबेन सोनी, श्याम कदम आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. 0000

 श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव श्रद्धेय भक्तीभावाने संपन्न

अक्कलकोट- ‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री.स्वामी समर्थ महाराज की जय’ च्या जय घोषात आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने…