Category: होम

हिंदी व गणित विषयांकरिता सहाय्यक शिक्षक पदासाठी उमेदवारांनी अर्ज करावे- समाधान इंगळे

अशोक गायकवाड रायगड : सामाजिक न्याय विभागांतर्गत रायगड जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासीशाळा, जावळी, ता.माणगांव येथे शासकीय निवासी शाळा कार्यान्वीत आहे. येथे इयत्ता ६ वी ते १० वी साठी तात्पुरत्या स्वरुपात मासिका तत्वावर ६ महिने किंवा नियमित शिक्षक हजर होईपर्यंत हिंदी व गणित विषयांकरिता मासिक तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी (बायोडाटा, रिजूम) आवश्यक शैक्षणिक अर्हताचे कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण समाधान इंगळे यांनी केले आहे.* याकरिता सहाय्यक शिक्षक (मासिक तत्वावर) शैक्षणिक पात्रता-BA.B.Ed, विषय-हिंदी, आवश्यक पद संख्या ०१. सहाय्यक शिक्षक (मासिका तत्वावर), शैक्षणिक पात्रता-B.Sc. B.Ed, विषय-गणित, आवश्यक पद संख्या ०१.यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे : सदर पदावर घडयाळी तासाप्रमाणे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या मंजूर दरानुसार मानधन देय राहील. एकत्रित मानधना व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. उमेदवारांची निवड करताना अनुभव तसेच TET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्रधान्य देण्यात येईल. शैक्षणिक पात्रता,अनुभव इ.अहर्ता किमान असून,किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. सेवा प्रवेश नियम आणि शासनाकडून तदनंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. सदर पदे मानधन/तासिका तत्वावर असून,भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार,पदे कमी जास्ती करणे,भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे ,सदरील पदे कधीही कोणताही कारण न देता समाप्त करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड,अलिबागयांनी राखून ठेवलेले आहेत. पात्र व इछुक उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासी शाळा, जावळी, ता.माणगांव येथे लवकरात लवकर सादर करावेत.

अश्लील आणि विकृत सामग्रीचा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडला

 सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेल्या नवी दिल्ली : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी “सोशल मीडिया आणि ओटीटीवरील अश्लील आणि विकृत सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे” यासंदर्भात संसदेत नियम 377 अन्वये प्रस्ताव दाखल केला. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून म्हस्के यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खासदार नरेश म्हस्के यांनी आपला मुद्दा मांडताना म्हटले की,  सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या अश्लील सामुग्रीमुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेचे पावित्र्य बिघडवण्याबरोबरच समाजात असुरक्षित वातावरण निर्माण होत आहे. सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अश्लील आणि आक्षेपार्ह साहित्यापासून मुलांना दूर ठेवण्याची पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु कठोर कायदेशीर तरतुदी नसताना, ते चालवणाऱ्या कंपन्या भारतात प्रचंड नफा कमावत आहेत. अशी विकृत सामग्री देशाच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांवरही खोलवर आघात करत आहे. त्याचा प्रसार गुन्हेगारी आणि तरुणांमध्ये दिशाभूल करण्यास प्रोत्साहन देत आहे. पैसे कमावण्याच्या व्यवस्थेने ही एक घातक परिसंस्था बनवली आहे, ज्याला तोडण्यासाठी सरकारकडून कठोर कारवाईची गरज आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण नसल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. देशात घडणाऱ्या काही घटना, आंध्र प्रदेशातील ८ वर्षांच्या मुलीची शोकांतिका, डुंगरपूर आणि छत्तीसगडमधील घटना ही या विकृतीची उदाहरणे आहेत. हा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचा देश आहे, जिथे विनयशीलता आणि नैतिकतेला विशेष महत्त्व आहे. अश्लील साहित्याचा नागरिकांच्या मनावर, शरीरावर आणि आत्म्यावर खोलवर आणि घातक परिणाम होतो. एकीकडे सोशल मीडियावर मुबलक कंटेंट असताना दुसरीकडे अधिक व्ह्यूज आणि संपत्ती मिळवण्यासाठी अश्लील कंटेंटची संख्याही वाढत असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. केंद्र सरकारकडे बीएनएस कायदा, महिलांचे अशोभनीय प्रतिनिधीत्व कायदा, आयटी कायदा यांसारख्या सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करून कठोर तरतुदी जोडण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के केली. संसदीय स्थायी समितीने अशा संवेदनशील विषयावर विचार करून एकमत घडवून आणावे, जेणेकरून अशा साहित्याचा प्रसार रोखता येईल असे खासदार नरेश म्हस्के यांनी मत व्यक्त केले. 000

वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित‍ प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी

कल्याण : कल्याण आणि भांडुप परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित प्रकरणे तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालय स्तरावर…

श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’ यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याचे आमदार संजय केळकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’चे अध्यक्ष अभिजीत देवकाते – पाटील यांनी गुरुवारी  उपमुख्यमंत्री एकनाथ…

अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात जगत्पुरिया मुख्य अतिथी

संभाजीनगर : विख्यात कवी, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार डी. बी. जगत्पुरिया हे नागपूर येथे 28 व 29 डिसेंबरला होणार्‍या अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मानित होणार आहेत. कथाकार सुरेश…

 विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल -२५ सांस्कृतिक महोत्सव १० ते १३ जानेवारीपर्यंत ठाण्यात भरणार –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती ठाणे : विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल -२०२५ हा सांस्कृतिक महोत्सव १० ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान उपवन तलाव येथे संपन्न होणार आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित राहणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य आणि वाद्य यांचा अनोखा संगम अनुभवायास मिळणार आहे, अशी माहिती या फेस्टिव्हलचे चेअरमन, आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या दोन प्रमुख प्रवेशद्वारास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ नावे देण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना या फेस्टिव्हलमध्ये अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. फेस्टिव्हल यावर्षी आकर्षक आणि बहूरंगी स्वरुपात साजरा केला जाणार आहे. तरंग स्टेज, मुद्रा स्टेज, विरासत स्टेज असे विविध रंगमंच कलाविष्कारासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फेस्टिव्हलमध्ये स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन, खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स, कार्यशाळा, विविध मनोरंजनात्मक उपक्रम यांचा समावेश असणार आहे. पद्मश्री शुभा मुदगल, विदूषी आरती अंकलीकर टिकेकर, पंडित रितेश- रजनीश मिश्रा, संजू राठोड, अभिजित भट्टाचार्य, पंडित ब्रिज नारायण, केतकी माटेगावकर, पद्मश्री शाहीद परवेज, मिका सिंग, रणजित रजवाडा आदी मान्यवर गायक, वादक, विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये आपली कला सादर करणार आहेत. कुचिपुडी, भरतनाट्यम, ओडीसी,  मणिपूरी आदी शास्त्रीय नृत्यांबरोबरच विविध राज्यांतील लोकनृत्याचा आनंदही रसिक प्रेक्षकांना येथे घेता येणार आहे. महत्वाचे म्हणजे बदलत्या ठाण्याचा अनुभवही यावेळी घेता येणार आहे. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल हा ठाणेकरांसाठी महत्वाचा सांस्कृतिक सोहळा असून यंदा हा फेस्टिव्हल अधिक भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हल च्या माध्यमातून ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक गडद होईल. तसेच पर्यटकांचे आकर्षणही वाढेल. यामुळेच सर्व ठाणेकरांनी व पर्यटकांनी या फेस्टिव्हल मध्ये आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ००००

ठाण्यातील काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दि.१३/१२/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा ते शनिवार दि.१४/१२/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा पर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेऊन देखभाल,…

 म्हणींवर आधारित ११ बालनाट्य रंगभूमीवर

 एका वर्षात मुक्तछंद नाट्यसंस्थेचे यशस्वीरित्या सादरीकरण   ठाणे : मुक्तछंद नाट्यसंस्था बालरंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे आणि प्रयोगशील उपक्रम करणारी नाट्यसंस्था म्हणून ओळखली जाते. ‘मुक्तछंद नाट्यसंस्था’ बालरंगभूमीवर एक आगळा-वेगळा आणि बालनाट्य विश्वात पहिल्यांदाच घडणारा नावीन्यपूर्ण बालनाट्य प्रयोग म्हणजेच म्हणींवर आधारित बालनाट्यांची शृंखला घेऊन आली आहे. या म्हणींवर आधारित बालनाट्य सादर करण्याच्या संकल्पनेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. म्हणी सांगतात कहाणी या धर्तीवर आधारित ‘मुक्तछंद नाट्यसंस्था डिसेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या एका वर्षात संदीप गचांडे लिखित म्हणींवर आधारित एकूण ११ बालनाट्य सादर केली आहेत. पेरावे तसे उगवते, करावे तसे भरावे, गर्वाचे घर खाली, एका माळेचे मणी, अळी मिळी गुपचिळी, अति तिथे माती, नाचता येईना अंगण वाकडे, थेंबे थेंबे तळे साचे, इकडे आड तिकडे विहीर, लहान तोंडी मोठा घास आणि दुरून डोंगर साजरे अशी सादर केलेल्या ११ बालनाट्याची नावे आहेत. प्रत्येक ‘म्हण’ एक कहाणी सांगत असते आणि त्या कहाणीतून एक उपदेश म्हणा किंवा संदेश देत असते. आजच्या पिढीला म्हणींचे महत्व सांगून त्याची पुन्हा नव्याने ओळख पटवून देण्यासाठी तसेच त्यांना मराठी भाषेची गोडवी कळावी व ती लागावी या प्रांजळ उद्देशाने ‘मुक्तछंद नाट्यसंस्था’ म्हणींवर आधारित बालनाट्याची शृंखला (Series) सादर करीत आहे. मुक्तछंद नाट्यसंस्था अभिनय कार्यशाळा ठाणे, परळ आणि काळाचौकी शाखेतील शिबिरार्थ्यांनी बालक-पालक व प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात सदरचे प्रयोग सादर केले. म्हणींवर आधारित बालनाट्य सादर करण्याची शृंखला मुक्तछंद नाट्यसंस्था इथून पुढेही अशीच अविरत सुरु ठेवणार आहे, असे मत संस्थेचे संस्थापक व लेखक संदीप गचांडे यांनी व्यक्त केले आहे. 0000

 सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आयआयटी-मुंबईमार्फत होणार फेरआखणी

वाहतुकीच्या पुढील पाच वर्षांतील आव्हानांचा होणार अभ्यास   ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे २०१८मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेश वाहतूक आराखड्याची आताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे. आयआयटी, मुंबईच्या ‘जीआयएसई हब’च्या मदतीने फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. मूळ आराखडा सन २०१८चा मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. २०१०पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आले. २०१८मध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यात, मेट्रो मार्गांचे आरेखन, ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्प, ठाणे-मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, आनंद नगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग आदींबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते. महापालिका आयु्क्त सौरभ राव यांच्या दालनात, आयआयटी, मुंबईतील जीआयएसई हबचे प्रा. सुमीत सेन यांच्यासोबत यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे आणि भगवान शिंदे उपस्थित होते. वर्षभरात होणार फेरआखणी या आराखड्यातील तरतूदी आणि सद्यस्थिती तसेच भविष्यातील आव्हाने यांचा अभ्यास करून आराखड्याची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. २०१८मधील या आराखड्याची फेरमांडणी करून २०३०पर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी, आयआयटी, मुंबईतील ‘जीआयएसई हब’ या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीने पुढील वर्षभरात फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. फेरआखणीचा उद्देश शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याचा अभ्यास करणे, त्यात सुचवण्यात आलेल्या उपायांच्या अमलबजावणीचा आढावा घेणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते उपाय व सूचना करणे हा या फेरआखणीचा मुख्य उद्देश आहे. आयआयटी, मुंबईतील ‘जीआयएसई हब’मधील तज्ज्ञ आणि अभ्यासक हे उपलब्ध माहिती, नव्याने प्राप्त झालेल्या अत्याधुनिक मॉडेल्सच्या मदतीने ही फेरमांडणी करणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. याचा होणार अभ्यास ही फेरमांडणी करताना, त्यात वाहतुकीचे बदलेले पॅटर्न, शालेय बसेस तसेच इतर गाड्यांची वाढलेली वाहतूक, घनकचऱ्याची वाहतूक, बांधकामातील राडारोड्याची वाहतूक यामुळे वाहतुकीवर येणारा ताण याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच, सायकल ट्रॅक, केवळ पादचारी वाहतुकीसाठीची व्यवस्था यांचाही विचार केला जाणार आहे. ठाणे शहरालगत असलेल्या खाडीचा जल वाहतुकीसाठी कसा उपयोग करता येईल याबद्दल त्यात अभ्यास करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली आहे. मेट्रो, रेल्वेपर्यंत ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची रचना, पार्किंग व्यवस्था, तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीबाबत सूचना यांचाही या फेरमांडणीत अभ्यास करण्यात येणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद नोंदवणार ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने हा अभ्यास करण्यात येणार असून त्यासाठी गठीत करण्यात येणाऱ्या अभ्यास गटात, वाहतूक पोलीस, मेट्रो, एमएमआरडीए, रेल्वे, पर्यावरण विषयक तज्ज्ञ यांचाही सहभाग घेण्यात येईल, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, या फेरआखणीचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी नागरिकांचा प्रतिसादही जाणून घेण्यात येणार आहे. ००००

आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धा राकेश, विलास, अभिषेक, विशालची विजयीदौड

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्यीत कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धेत इंदू मिलचा राकेश कोचरेकर, एनटीसीचा विलास काळे, टाटा मिलचा अभिषेक कदम, पोद्दार मिलचा विशाल सागवेकर, आरएमएमएसचे हरीश देठे व ओमकार हडशी आदींनी विजयीदौड केली. प्रारंभापासून आघाडी घेत अचूक सोंगट्या टिपणाऱ्या राकेश कोचरेकरने इंदू मिलच्या तयलू जांबीचे आव्हान १०-४ असे संपुष्टात आणले आणि उद्घाटनीय लढत जिंकली. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व खजिनदार निवृत्ती देसाई यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. परेल येथील आरएमएमएस सभागृहात अप्रतिम फटक्यांची आतषबाजी करीत एनटीसीच्या विलास काळेने टाटा मिलच्या हरिहर यांना पुनरागमनाची संधीच दिली नाही. परिणामी विलास काळेने २५-४ असा विजय मिळवीत जोरदार आगेकूच केली. अन्य सामन्यात टाटा मिलच्या अभिषेक कदमने विनायक शिंदेचा १३-० असा, पोद्दार मिलच्या विशाल सागवेकरने किशोर पांचाळचा १३-४ असा, आरएमएमएसच्या हरीश देठेने इंदू मिलच्या गंगाराम गावडेचा २५-० असा तर आरएमएमएसच्या ओमकार हडशीने पोद्दार मिलच्या सुभाष घाडगेचा ११-४ असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, माजी प्रादेशिक संचालक प्रदिप मून, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ०००००