Category: होम

 बंदर व गोदी कामगारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळे यश

गोदी कामगार वेतनकरारास केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची मंजुरी अनिल ठाणेकर ठाणे : भारतातील बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन  करार २७  सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे संपन्न झाला असून, या वेतन कराराला केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मंजुरी दिली असल्याचे मंत्रालयाचे सचिव सुजित कुमार यांनी लेखी आदेशाने कळविले आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. तर बंदर व गोदी कामगारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळे हे यश प्राप्त झाले आहे, असे मत ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी व्यक्त केले. झालेल्या वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित करण्यासाठी भारतातील प्रमुख बंदारांमध्ये सर्व कामगार संघटनांनी एकजुटीने आंदोलन केले.  मुंबई बंदरात ५ व १० डिसेंबर २०२४  रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड  एम्प्लॉईज असोसिएशन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, शोअर अँड  फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन,  मुंबई पोर्ट  प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समिती,  मुंबई पोर्ट ट्रस्ट  एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन,  यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई बंदरातील सेवेत असलेले  कामगार,  सेवानिवृत्त कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी आंबेडकर भवन आणि  मुंबई  पोर्ट  प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र  निदर्शने केली होती. भारतातील मान्यताप्राप्त सहा गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आणि बंदर व गोदी कामगारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळे हे यश प्राप्त झाले आहे, असे मत ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स ) जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी व्यक्त केले. ००००

रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या घटली

अनिल ठाणेकर ठाणे : कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने, समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ८८ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार २३ होती तर नोव्हेंबर २०२४ रोजी अखेर (तीव्र कुपोषित) सॅम २२ तर मध्यम कुपोषित (मॅम) ६२ कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम १ हजार ६४७ अंगणवाडीतील ८३ हजार ४२७ बालकांसाठी राबवण्यात येत आहे. तसेच दत्तक पालक योजना, पालकसभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ठ आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबई सारख्या नामांकित संस्थाचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडीओ मार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे. गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते. तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात. त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व सहा महिन्यांनंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून गरोदर व स्तनदा मातांना बाळंतवीडा, कुपोषित मुलांना पोषकवडी, स्तनदा मातांना पाळणा इ. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर विविध स्वंयसेवी संस्था (उदा.स्नेहा फाऊंडेशन, अन्नदा फाऊंडेशन इ.) च्या मदतीने डोळखांब/ शहापूर प्रकल्पातील कुपोषित बालकासाठी कामकाज करण्यात येत आहे. परिणामी प्रतीवर्ष कुपोषीत बालकांमध्ये सुधारणा टक्केवारीत वाढ होत आहे. चौकट जिल्ह्यातील मागील तीन महिन्यातील कुपोषित बालकांची संख्या : सप्टेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ८८ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार २३, ऑक्टोबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ७६ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार ९, नोव्हेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ६६ तर मध्यम कुपोषित (मॅम) ९६१ आहेत.

प्रा.  डॉ प्रमोद वानखडे यांची मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : १३७ वर्ष उच्चतंत्र शिक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या माटूंगा मुंबई  येथील व्हीजेटीआय  या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बहुजन कामगारांच्या न्याय हक्कासाठी  मागील ३० वर्षांपासून लढणाऱ्या व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा डॉ प्रमोद वानखडे…

 आयकर, रिझर्व्ह बँक उपांत्य फेरीत

 कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धा महिला गटात शिरोडकर, शिवशक्तीची आगेकूच   मुंबई –  राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात जोरदार विजयांसह डॉ. शिरोडकर, शिवशक्ती, विश्वशांती आणि स्वामी समर्थ या संघांनी उपांत्य फेरी गाठली तर पुरूषांच्या व्यावसायिक गटात आयकर विरुद्ध श्री स्वामी समर्थ, रिझर्व्ह बँक विरुद्ध रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब (आरबीएससी) अशा उपांत्य लढती रंगतील. पुरुषांच्या अ गटात विजय क्लब- लायन्स स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाऊंडेशन – जय भारत यांच्यात अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी संघर्ष होईल. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने (आरएमएमएस)  कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना.म.जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या कबड्डी महोत्सवात महिलांच्या गटात बलाढ्य शिवशक्ती महिला संघाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा ४३-७ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. विश्वशांतीनेही जिजामाता स्पोर्ट्स क्लबवर ४३-१० अशी सहज मात करीत अंतिम चार संघात आपले नाव पक्के केले. आता डॉ.शिरोडकर- स्वामी समर्थ आणि विश्वशांती- शिवशक्ती अशा तुल्यबळ उपांत्य लढती रंगतील. पुरूषांच्या व्यावसायिक गटात आरबीएससीने ओमकार, आर्यन ढवळे आणि सागर जगताप यांच्या वेगवान चढायांच्या जोरावर गंधेकर इलेक्ट्रिकलचा ४४-२० असा फडशा पाडला. तसेच रिझर्व्ह बँकेनेही ओमकार थोटे आणि संग्राम साळुंखे यांच्या तूफानी चढायांमुळे रुबी कन्स्ट्रक्शनचे आव्हान ३४-२३ असे संपुष्टात आणले. श्री स्वामी समर्थने सीबीसी संघाचा ३२-१६ असा सहज पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आयकरने बीपीसीएलचा ३७-३२ असा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला. पुरूषांच्या स्थानिक गटात विजय क्लबसमोर अंकूर स्पोर्ट्स क्लबचे काहीएक चालले नाही. विजयने एकतर्फी सामन्यात ४२-२८ असा विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. लायन्स स्पोर्ट्स क्लबने हर्ष मोरे आणि राज आचार्य यांच्या चढायांच्या बळावर गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचा २८-२६ असा पराभव केला. गुड मॉर्निंगकडून साहिल राणे आणि शार्दुल पाटील यांनी संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. तसेच जय भारतने उपांत्य फेरीत धडक मारताना बंड्या मारुतीचे आव्हान २९-१७ असे मोडीत काढले तर एसएसजी आणि श्रीराम क्रीडा मंडळ यांच्यातला थरार ३०-२७ अशा अवस्थेत संपला. अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धां उपाध्यक्ष क्रीडा प्रमुख सुनिल बोरकर यांच्या आयोजनाखाली पार पडणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे‌ सहकार्य लाभत आहे. 00000

मिताली म्हात्रेचे नाबाद शतक

अर्जुन मढवी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा   ठाणे : मिताली म्हात्रेची नाबाद शतकी खेळी आणि मिताली गोवेकरच्या नियंत्रित गोलंदाजीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबचा ७० धावांनी पराभव करत पदापर्णालाच डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. एमआयजी क्रिकेट क्लबने २३९ धावांचे लक्ष्य दिल्यावर प्रतिस्पर्धी संघाला १६३ धावांवर रोखत विजय साकारला. एमआयजी क्रिकेट क्लबच्या धावसंख्येत मितालीच्या जोडीने गार्गी वारंग आणि वैभवी राजाने मोलाचे योगदान दिले. मितालीने १०६ चेंडूत १२ चौकार मारत १०८ धावांची बहुमूल्य खेळी केली. गार्गीने नाबाद ४७ आणि वैष्णवी राजाने ४० धावा केल्या. वैष्णवी पोतदार आणि निवेदी जैतपालने प्रत्येकी दोन बळी मिळवले. सलोनी कुष्टे आणि निव्या आंब्रेने राजावाडी क्रिकेट क्लबला चांगली सुरुवात करुन दिली. पण इतर फलंदाज ढेपाळल्यामुळे राजावाडी क्रिकेट क्लबची स्पर्धेतील वाटचाल उपांत्य फेरीत संपुष्टात आली. सलोनी कुष्टेने ३१, निव्या आंब्रेने २३ आणि अंजली केसरकरने नाबाद १७ धावा केल्या. मिताली गोवेकरने तीन, स्वाती स्वेनने दोन, आर्या सुकाळे, महेक मिस्त्री आणि मिताली म्हात्रेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. संक्षिप्त धावफलक : ४० षटकात  ४ बाद २३९ ( मिताली म्हात्रे नाबाद १०८, गार्गी वारंग नाबाद ४७, वैभवी राजा ४०, वैष्णवी पोतदार ८-२६-२, निवेदी जैतपाल ७-२२-२) विजयी विरुद्ध राजावाडी क्रिकेट क्लब : सलोनी कुष्टे ३१, निव्या आंब्रे २३, अंजली केसरकर नाबाद १७, मिताली गोवेकर ६-२५-३, स्वाती स्वेन ८-३१-२, आर्या सुकाळे ६-२८-१, महेक मिस्त्री ६-२२-१, मिताली म्हात्रे ५-१-१५-१.) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : मिताली म्हात्रे (एम आय जी क्रिकेट क्लब). 00000

अद्वैत कचराजचे बळींचे सप्तक

गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा ठाणे : लेग स्पिनर अद्वैत कचराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलने एस एम शेट्टी स्कुलचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. प्रतिस्पर्ध्यांना अवघ्या २३ धावांत गुंडाळल्यावर श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलने चार षटकात २४ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या एस एम शेट्टी स्कुलचा एकाही फलंदाजाला अद्वैत कचराजच्या माऱ्यासमोर वैयक्तिक पाच धावांचा पल्ला पार करता आला नाही. अद्वैतने चार निर्धाव षटकांसह १० धावांत सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वीर धुमाळने दोन धावांत ३ बळी मिळवले. श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलच्या मिहीर नाईक आणि निर्मित धुरीने  संघाचे कुठलेही नुकसान होऊ न देता २४ धावासह दुसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले. मिहिरने नाबाद १४ आणि निर्मितने नाबाद ३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : एस.एम.शेट्टी स्कुल : १५ षटकात सर्वबाद २३ ( अंश हडवळे ५, अद्वैत कचराज ८-४-१०-७, वीर धुमाळ १-०-२-३) पराभूत विरुद्ध श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुल : ३.४ षटकात बिनबाद २४ (मिहीर नाईक नाबाद १४, निर्मित धुरी नाबाद ४). 0000

मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!

मुंबई : मुंबई महानगर परिसरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यात झालेली घट यामागे या घरांच्या वाढलेल्या किमती एक कारण असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरातील घरांच्या किमतीत गेल्या पाच…

कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : नाताळच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे किंवा नववर्ष गोव्याच्या किनारी, कोकणात, दक्षिण भारतात साजरा करण्याचे अनेकांचे नियोजन असते. सलग सुट्ट्यांच्या कालावधीतील गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण…

डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई

 नागरिकांनी व्यक्त केले समाधान   डोंबिवली : डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या हातगाडी चालक, रिक्षा चालक यांच्याविरुध्द रामनगर, विष्णुनगर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे डोंबिवली रेल्वे स्थानक भागात रिक्षा वाहनतळ सोडून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना चाप बसला आहे. पदपथ अडवून हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्री करणारे विक्रेते या कारवाईमुळे अस्वस्थ आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानक भागात अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर येऊन नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करतात. या रिक्षांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर भागात हा प्रकार नेहमीच प्रवाशांना पाहण्यास मिळतो. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार किरण फड आणि त्यांचे सहकारी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात गस्त घालत होते. ठाकुरवाडी भागात राहणाऱ्या एक रिक्षा चालकाने आपली रिक्षा डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभी केली होती. या रिक्षा चालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव बालाजी गार्डन भागात एक भंगार विक्रेता वर्दळीच्या रस्त्यावर भंगार सामानाची हातगाडी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होता. ही बाब रामनगर पोलीस ठाण्यातील गस्तीवरील हवालदार प्रसाद चोरमुले आणि सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी भंगार विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला. न्यू आयरेगाव साईबाबा मंदिराजवळ एक वडापाव विक्रेता वर्दळीच्या रस्त्यावर हातगाडी लावून उभा होता. हातगाडीवर सिलिंडरला जोडलेली शेगडी होती. विक्रेत्याने मानवी जीवितास धोक होईल अशा ठिकाणी सिलिंडर, शेगडी ठेवली म्हणून हवालदार सुभाष नलावडे यांनी वडापाव विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला. डोंबिवली रेल्वे स्थानकामुळे सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडर, शेगडीचा वापर करून चहा विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार वेणु कळसे यांनी गुन्हा दाखल केला. राजाजी रस्त्यावरील कुडाळ देशकर सभागृहाच्या बाजुला दुरुस्तीसाठीची वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा आणला म्हणून हवालदार वेणु कळसे यांनी कार्यशाळा चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. दत्तनगर चौकात हातगाडीवर सिलिंडरच्या माध्यमातून शेगडी पेटवून चायनिज पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी रस्ते, पदपथ अडविणाऱ्या, खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी ज्वालाग्रही सामान ठेवणाऱ्या विक्रेते, चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. 00000

 १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा

आमदार संजय केळकर व प्रेरणा संस्थेच्या वतीने अनिल ठाणेकर ठाणे : आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील १२ वी कॉमर्स व सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात १५, २२, २९ असे दर रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. सराव २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता पाच मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद ठेवून ईव्हीएमचा प्रतिकात्मक निषेध करा – राजन राजे हे १२ वे वर्ष आहे. ब्राम्हण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम, व महाराष्ट्र विद्यालय या दोन परीक्षा केंद्रावर सकाळीं ११ ते दुपारी २ या वेळेत बोर्ड पध्दतीने सराव परीक्षा पार पडणार आहेत. 8 तारखेला सायन्स चा फिजिक्स तर कॉमर्स चा इको पेपर असेल.१५ तारखेला केमेस्ट्री व बी. के. पेपर २२ तारखेला सायन्स चा मॅथ्स व ओ. सी. २९ तारखेला सायन्स चा बायोलाॅजी व कॉमर्स चा मॅथ्स असे पेपर होणार आहेत. विध्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी, सहजरीत्या व सोप्या पद्धतीने पेपर लिहता यावा, त्याचा सराव व्हावा या करिता ही सराव परीक्षा आयोजित केली जाते. ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे, मुख्य बोर्ड परीक्षा आधी चांगला सराव मिळणार आहे. असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. यावेळी प्रेरणा संस्थेचे पंढरीनाथ पवार, संतोष साळुंखे उपस्थित होते. यासाठी प्रेरणा संस्थेचे पंढरीनाथ पवार व संतोष साळुंखे यांच्याशी संपर्क करावा. पत्ता :- ठाणे भारत सहकारी बँक समोर, बाजी प्रभू देशपांडे रोड विष्णूनगर नौपाडा ठाणे. मोबाईल : ८०८२३७७७११, ९०२२०५६०६० वरील पत्यावर सराव परीक्षा फॉर्म मिळतील, असे सांगण्यात आले आहे. 00000