श्री माँ विद्यालय तब्बल 281 धावांनी विजयी
8 वी एन. टी. केळकर 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा अथर्व गावडेच्या 104 धावा तर अद्विक मंडलिकने केले 7 गडी बाद ठाणे, दि. 25 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 48…
8 वी एन. टी. केळकर 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा अथर्व गावडेच्या 104 धावा तर अद्विक मंडलिकने केले 7 गडी बाद ठाणे, दि. 25 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 48…
वाशी – राज्यातील युवकांना चांगल्या नोकऱ्या आणि उपजीविकेच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे, मात्र या योजनेतून…
नवी मुंबई : नमुंमपा कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा / निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार व मागासवर्गीय घटकांतील इ.1ली ते महाविदयालयीन शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे…
कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा अलिगड : महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने ४३ व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सलामी दिली. अलिगड (उत्तर प्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सोमवारी सुरू झालेल्या या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कुमार व मुली गटांमध्ये प्रत्येकी ३० संघाने सहभाग घेतला आहे. सलामीच्या सामन्यात महाराष्ट्र मुलांच्या संघाने विदर्भावर ३७-२६ असा ११ गुण आणि ५ मिनिटे राखून दणदणीत विजय मिळविला. मुलींच्या गटात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर ४०-१२ असा १ डाव आणि २८ गुणांनी धुव्वा उडविला. मुलांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून विलास वळवीने २.४० मी. व १.३० मी. संरक्षण आणि आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. भरतसिंग वसावेने १.३० मिनिट संरक्षण करताना आक्रमणामध्ये २ गुणांची कमाई केली. कृष्णा बनसोडेने २.५९ मी. संरक्षण केले. आशिष गौतमने नाबाद २.१० आणि १.२० संरक्षण करताना आपल्या धारदार आक्रमणात ८ गुण टिपले. विदर्भ संघाकडून मोहित नेवरेने १.०० मी. संरक्षण केले. शैलेश कोरेटीने १.०० मी. संरक्षण करताना आक्रमणात ६ गुण मिळवले. मुलींच्या सामन्यात प्रतीक्षा बिराजदारने ३.३० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले. अश्विनी शिंदे हिनेही ३.३० मी. संरक्षण करून ४ गुणांची कमाई केली. सुषमा चौधरीने ३.२० मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये ४ गडी बाद केले. प्रणाली काळेने नाबाद १.१० मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये १० गुणांची कमाई केली. तन्वी भोसलेने २.४० मी. वेळ नोंदवली.मध्यप्रदेश संघाकडून अक्षरा मालिनी आणि लक्ष्मीने प्रत्येकी एक मिनिटे वेळ नोंदवली. मुलांच्या अन्य सामन्यात तामिळनाडूने चंदीगड वर एक डाव आणि ३४ गुणांनी विजय संपादन केला. आंध्र प्रदेशने मध्य भारतचा १६ गुणांनी पराभव केला. दिल्ली संघाने हिमाचल प्रदेशवर एक डाव आणि २१ गुणांनी मात केली. मुलींच्या गटात ओडिसाने मध्य भारतचा १ डाव २२ गुण राखून पराभव केला. राजस्थाने आंध्रप्रदेशवर एक डाव आणि १६ गुणांनी विजय संपादन केला.
राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा तांबवेकर आणि जमादार यांना सुवर्णपदक अहिल्यानगर-२४ नोव्हेंबर- सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनर डिस्ट्रीक्ट आयोजित ५व्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू सुर्या थात्तू (पुणे), मुस्तफा पत्रावाला (ठाणे), पूजा दानोले (कोल्हापूर), श्रावणी परीट (पुणे), मोक्ष सोनावने (नासीक), दानीश जमादार (नासीक), गायत्री तांबवेकर (पुणे) यांनी आपापल्या वयोटात सुवर्णपदक विजेती कामगिरी केली. अहिल्यानगर येथे आज सुरु झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत १९९ सायकलपट्टूंनी सहभाग घेतला. चाँदबीबी महाल बायपास मार्गावर विवध नऊ वयोगटात स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचा उदघाटन समारंभ अहिल्यानगरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अहमदनर सायकलिंग क्लबचे सर्वेसर्वा गौरव फिरोदीया यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी सायकलिंग फेडरेशन आफ इडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, स्पर्धेचे मुख्य पंच आणि सीएफआयचे निरीक्षक सुदाम रोकडे, मिहीर तिवारी, मुख्य तांत्रिक प्रमुख दिपाली पाटील, शिवछत्रपती प्रृरितोषीक सन्मानीत मिनाक्षी शिंदे, मिनाक्षी ठाकूर आदी मान्यवर हजर होते. आज झालेल्या सेपर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे- मेन ईलीट – ३८ किमी टायम ट्रायल सुवर्णपदक सुर्या थात्तू (पुणे ०.५०.२९.७९) , रौप्यपदक – चिन्मय केवलरमाणी (पुणे ०.५०.३५.७०), कांस्यपदक – सिध्देश पाटील (कोल्हापूर०.५३.००.५५), मेन अंडर २३ – ३८ किमी टाईम ट्रायल – सुर्णपदक मुस्तफा पत्रावाला (ठाणे ०.५२.५०.२६), विवाण सप्रू (मुबई ०.५३.२४.८९) कांस्यपदक – विरेंद्र सिंह पाटील (पुणे के पी ०.५३.३४.९८) ईलीट वुमेन – सुर्णपदक पूजा दानोले (कोल्हापूर ०.४७.१३.२०),रौप्यपदक – प्रणीता सोमण (अहिल्यानगर ४७.५६.०९), कांस्यपदक अपूर्वा गोरे (अहिल्यानगर ४९.५१.२३), सब ज्युनिअर बॉईज- १५ किमी टाईम ट्रायल सुवर्णपदक – मोक्ष सोनावने, (नासिक ०.२३.०८.१९), रौप्यपदक राज नारामण करमडे (अहिल्यानगर २३.३०.६१) कांस्यपदक – ओंकार गांधले (पुणे केपी -०.२३.४३.३८. सब ज्यनिअर गर्ल्स – १५ किमी टायम ट्रायल – सुवर्ण पदक – श्रावनी परीट (पुणे २६.०८.७४), रौप्यपदक – निम शुक्ला (मुंबई २६.४६.०२) कांस्यपदक मानसी महाजन (पुणे ०.२६.५२.५४) युथ बॉइज १० किमी टायम ट्रायल – सुवर्ण दानीश जमादार (सांगली ०.१७.११.३२) रौप्यपदक – संस्कार घोरपडे (पुणे ०.१७.१५.६९) कांस्य पदक अनुज गैड (पुणे ०१७.३९.८०) युथ गर्ल्स – १० किमी टायम ट्रायल सुवर्णपदक गायत्री तांबवेकर (पुणे ०.१९.१४.८६) रौप्यपदक – राजनंदीणी सोमवंशी (पुणे केपी ०.१९.५१.६३) कांस्यपदक अर्नवी सावंत (सातारा ०.२१.०४.६७) 00000
जालना : सरकारने बेईमानी करू नये. सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. जर आम्हाला दगा दिला तर मराठे छाताडावर बसतील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…
पुणे : “आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे त्यावर भाष्य करणार नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक…
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) उद्याोगपती गौतम अदानी आणि सागर अदानी यांना लाचखोरीप्रकरणी समन्स बजावले आहे. भारतामधील काही राज्यांमध्ये सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर (२,२०० कोटी रुपये) लाचेपोटी दिल्याचा अदानी यांच्यावर…