महात्मा जोतीराव फुले
भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई…
भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई…
राज्याचे सध्याचे काळजीवाहू आणि राज्याचे २० वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फार मोठे राजकीय पाऊल उचलताना भाजपाच्या, म्हणजेच देवेन्द्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त केला आहे. फडणवीसांना या पदाची कांक्षा…
मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बिमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उद्या पासुन २८, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी बिमानगर एज्युकेशन सोसायटी शाळा, एलआयसी कॉलनी, शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४००१०३ येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, नागपूर या ८ विभागातील १९२ खेळाडू, १६ मार्गदर्शक, व्यवस्थापक, ३० पंच व अधिकारी, २५ स्वयंसेवक असा एकूण २६३ जणांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धेची पूर्व तयारी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर आणि मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रथमच मुंबई उपनगर जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातून या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे कौशल्य, कसब पाहण्याची संधी मुंबईतील क्रीडा प्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांनी केले आहे. 0000
वारकरी संप्रदाय कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नाही आषाढीला पंढरपूरच्या दिशेने सर्व संतांच्या दिंड्या निघतात. तेव्हा जात-धर्म, गरीब-श्रीमंत, स्री- पुरुष असा कोणताही भेद उरत नाही. सर्वजन एकाच पातळीवर आलेले दिसतात.…
सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी स्पर्धा मुंबई : सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी मुलांचे सामने झाले. स्पर्धेतील दोन्ही उपांत्यफेरीत उत्कंठावर्धक लढती पाहायला मिळाल्या. या सामन्यांमधून सरस्वती मंदिर हायस्कूल आणि श्री गणेश विद्यालय यांनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले. पहिला उपांत्य फेरी सामना: पहिल्या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा ३०-११ असा एक डाव व १९ गुणांनी पराभव केला. सरस्वती कडून प्रभावी खेळ: या सामन्यात सरस्वतीकडून हर्ष प्रजापती (१ मिनिटे संरक्षण व आक्रमणात ४ गडी), शिवम झा (आक्रमणात ४ गडी) व श्रेयस जावळे (आक्रमणात ३ गुण) यांनी केलेल्या खेळामुळे सरस्वती मंदिर हायस्कूलचा संघ अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. तर पराभूत अहिल्या विद्या मंदिरच्या विश्वेश गुलगुले (आक्रमणात ५ गुण), मुझम्मील शाह (आक्रमणात ३ गुण) यांनी केलेली खेळी त्यांना पराभवापासून वाचवू शकली नाही. दुसरा उपांत्य फेरी सामना: दुसऱ्या सामन्यात श्री गणेश विद्यालयाने वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलचा ३३-२२ असा एक डाव व ११ गुणांनी पराभव केला. श्री गणेश कडून उत्कृष्ट खेळ: या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या मानस पोस्टरे (२:३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात १ गुण), संयम धाडवे (आक्रमणात ७ गुण), अमेय मोहिते (आक्रमणात ६ गुण) यांनी विजयात मोठी कामगिरी करत श्री गणेश विद्यालयाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले तर पराभूत वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलच्या प्रविण गुप्ता (आक्रमणात ३ गुण), ऋषी ठाकूर (आक्रमणात २ गुण) यांनी चांगला खेळ केला पण त्यांना इतरांची साथ लाभली नाही त्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ०००००
मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात मुंबई – दुर्गंधीमुळे कांजूर मार्ग येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरातून सातत्याने होत आहे. मात्र, नव्या डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेचा पर्याय मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग ग्राऊंड बंद करणे तूर्तास अशक्य असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले. या डम्पिंग ग्राऊंडचा करार २०२७ मध्ये संपत आहे. त्यामुळे हा करार संपण्यापूर्वी नव्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. गोराई भागातील डम्पिंग ग्राऊंड काही वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली असून तेही लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. सध्या त्या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबवण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. मात्र, हा प्रकल्प अजून कागदावरच आहे. याच डम्पिंग ग्राऊंडच्या एका भागात धारावीतील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी फक्त कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर पालिकेची भिस्त आहे. त्याव्यतिरिक्त विविध भागात कचरा संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्या-त्या भागातील कचऱ्यावर या केंद्रांवर प्रक्रिया केली जात आहे. या सगळ्या भागातील कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाऊ नये, स्थानिक स्तरावरच कचऱ्याची विल्हेवाट लागावी असा पालिकेच्या घनकचरा विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात कचरा संकलन केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. बंदीसाठी न्यायालयात धाव कांजूर डम्पिंग ग्राऊंडविषयी स्थानिक पातळीवर प्रचंड असंतोष आहे. हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी कायम आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद व्हावे यासाठी विक्रोळी विकास मंच न्यायालयात गेला आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी दिले होते. मात्र, या डम्पिंग ग्राऊंडच्या कराराची मुदत २०२७ सालापर्यंत आहे. तत्पूर्वी ते बंद होण्याची शक्यता नाही. कराराचे नूतनीकरण करून दिले जाणार नाही, असेही आश्वासन राजकीय पक्षांनी दिले आहे. जागेची चाचपणी सुरू डम्पिंग ग्राऊंडसाठी पालिका नव्या जागेचा शोध घेत आहे. तळोजा येथील जागेचा पर्याय निवडण्यात आला होता. मात्र मुंबईतील कचरा तेथे आणण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे हा पर्याय जवळपास बारगळला आहे. आता अंबरनाथ येथील जागेच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे.
कुमार व मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा अलिगड : महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाने 43व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केला आहे. बाद फेरीत महाराष्ट्राच्या मुली छत्तीसगडबरोबर तर मुले कोल्हापूरबरोबर लढतील. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात भरतसिंग वसावेने (2.10 मि. 4 गुण) व आशिश गौतम (2.40, 1.40 मिनिटे व 4 गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राच्या मुलांनी पुद्देचरीवर 39-24 असा एक डाव राखून 15 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. जितेंद्र वसावे व सोत्या वळवी यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी 8 गडी बाद करीत त्यांना साथ दिली. पुद्देचरीकडून स्टेफनन 6 गडी बाद केले. महाराष्ट्राच्या मुलींच्या शेवटच्या साखळी सामन्यात यजमान उत्तरप्रदेशचा 28-5 असा एक डाव 23 गुणांनी धुव्वा उडविला. स्नेहा लामकाने (3.40 मिनिटे नाबाद संरक्षण), प्रतीक्षा बिराजदार (3.10 मि. व 6 गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उत्तरप्रदेशच्या मानसीने (1.30 मिनिटे व 2 गुण) अष्टपैलू खेळी करीत लढत दिली. बाद फेरीचे सामने: मुलींचे: महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड मुलांचे: महाराष्ट्र विरुद्ध कोल्हापूर कोल्हापूर व विदर्भ संघांचा सुध्दा बाद फेरीत प्रवेश कोल्हापूरच्या मुले व मुली आणि विदर्भच्या मुले व मुलींच्या संघानेही बाद फेरी गाठली आहे. मुलीमध्ये कोल्हापूर विरुद्ध विदर्भ आणि मुलांमध्ये कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र आणि विदर्भ विरुद्ध ओडीसा असे बाद फेरीचे सामने होतील.
नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामांस नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांविरोधात अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…
ठाणे : बालविवाह ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविवाहविरोधी जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. 27 नोव्हेंबर हा बालविवाह प्रतिबंध दिन म्हणून विविध उपक्रमाद्वारे या प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबविले जाते. जिल्ह्यातील हे अभियान ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सेवा संस्था/महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (डॉ. कैलास सत्यर्थी फाऊंडेशन संलग्न भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. बालविवाह या अनिष्ट प्रथेविरुध्द जिल्ह्यात 27 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संस्थेचे अशोक पवार, देवय्या आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिनगारे यांनी बालविवाह ही अनिष्ट प्रथा संपविण्यासाठी जाणीवजागृती महत्त्वाची असून जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. तसेच समाजातील सर्व अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्याची गरज अधोरेखित केली. सुर्यवंशी यांनीही बालविवाह प्रथेमुळे समाजात होत असल्याच्या दुष्परिणाम सांगून ही प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी समाजात विशेषतः ग्रामीण भागात प्रचार प्रसिद्धी आवश्यक असल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी यासह ग्रामीण भागात चित्ररथाद्वारे बालविवाह प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
स्मारकाला संविधान दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ज्ञान हिच शक्ती या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित स्मारक म्हणून देशभरात ज्ञान केंद्र म्हणून नावाजले जात आहे. लक्षावधी देशी परदेशी पर्यटकांनी या ठिकाणी भेट देत येथील अद्ययावत समृध्द ग्रंथालय तसेच बाबासाहेबांचे जीवनचरित्र उलगडणारे छायाचित्र दालन व इतर सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. या वर्षीचा संविधान दिन हा अमृत महोत्सवी विशेष असल्याने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मारकास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच स्मारकातील सभागृहात संविधान उद्देशिकेच्या एकत्रित समुह वाचनाचा विशेष उपक्रम सेक्टर 15 ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील 280 विद्यार्थी व 10 शिक्षक यांच्या समवेत राबविण्यात आला. या प्रसंगी उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या समवेत शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच स्मारकातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानातील उद्देशिकेचे समुह वाचन केले. स्मारकातील ऑडिओ व्हिज्युअल ग्रंथालयात विशेष संविधान कक्ष निर्मिती करण्यात आली असून त्याठिकाणी संविधानाच्या मूळ प्रतिची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्या कक्षामध्ये संविधानाशी संबधीत पुस्तके उपलब्ध् करुन देण्यात आली आहेत. जेणे करुन संविधान अभ्यासकांना संविधानाविषयी सखोल अभ्यास करता येईल तसेच संविधान जाणून घेण्याची इच्छा असणा-या वाचकांना संविधान विषयक सांगोपांग माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध् होउु शकेल. संविधान दिनी 1200 हून अधिक पर्यटकांनी स्मारकाला भेट दिलेली असून ग्रंथालयातील स्वतंत्र संविधान कक्ष पाहून व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे स्मारकातील विविध सुविधांचीही प्रशंसा केली आहे. ००००