Category: होम

माथेरानची महाराणी मिनी ट्रेनच्या जन्माची कहाणी

माथेरान : ‘झुकझुक झुक आगीनगडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया’, या पंक्तीची आठवण करून देणारी माथेरान ची महाराणीची निवड जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणजेच युनेस्को मध्ये झाल्याने माथेरानला एक…

नवी महापालिका होईलही, पैशांचे सोंग कुठून आणणार?

ठाणे : अंबरनाथ व कुळगाव-दलापूर नगरपालिकांचे विसर्जन करून नवी महापालिका करण्याची मागणी शिंदेसेनेचे नेते वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली व मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. ठाणे जिल्ह्यातील…

‘सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन वेळेवर मिळालेच पाहिजे’

मेधा पाटकर यांचा आंदोलनाचा  इशारा ठाणे :सफाई कामगार हे शहराची साफसफाई करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात; मनोरुग्णालयातील सफाई कामगार तर रुग्णालयाच्या साफसफाई बरोबर मनोरूग्णांच्या सफाईचीही जबाबदारी उचलतात. त्यांच्या कामाचं महत्व जाणून त्यांना खरं तर कंत्राटी पद्धतीने कामावर न ठेवता कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यायला हवं पण या कामगारांना न्यायालयाने आदेश देऊनही किमान वेतन दिले जात नाही की मागील वेतनाची थकबाकी अजून दिली जात नाही, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर म्हणाल्या. ठाण्यातील शासकीय मनोरुग्णालयातील सफाई कामगार किमान वेतन मिळावं आणि वेतन थकबाकी मिळावी म्हणून १३ ऑगस्टपासून साखळी उपोषण करत आहेत. त्यांचे मनोबल वाढवून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मेधाताईंनी आंदोलन स्थळी भेट दिले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, कंत्राटदाराने कामगारांना वेळाच्या वेळी वेतन, भत्ते दिले नाहीत तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते कामगारांना देऊन कंत्राटदारांकडून वसूल केले पाहिजेत असा कायदा असताना इथे अधिकारी ते न करता कंत्राटदारावर सर्व सोपवतात. या कामगारांना अजून जुलै महिन्याचे वेतन दिलेले नाही. लवकरच कामगारांना न्याय नाही मिळाला तर साखळी उपोषणाचे रुपांतर बेमुदत उपोषणात होईल, असा इशाराही त्यांनी मनोरुग्णालयाच्या प्रशासनाला या वेळी दिला. यावेळी मेधाताईंनी महिलांना राखी बांधून या बंधनात आपण एकत्रितपणे राहून आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे असे सांगून त्यांना धीर दिला. सफाई कामगारांना जुलै महिन्याचे वेतन रूग्णालय प्रशासन अदा करेल, आजच्या आज वेतन साठी प्रस्ताव अतिरिक्त संचालक डॉ स्वप्निल लाळे यांना पाठवण्याचे आदेश उपसंचालक डॉ अशोक नंदापुरकर यांनी डॉ नेताजी मुळीक आणि सीएओ श्री लांजेवार व प्रशासकीय अधिकारी डॉ रानडे यांना दिले. प्रादेशिक मनोरुग्गणालयातर्फे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ अशोक नंदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक, CAO गजानन लांजेवार AO. डॉ. रानडे यांच्या आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या वतीने श्रमिक जनता संघ  युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर, उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ, महासचिव जगदीश खैरालिया, कार्यकारी सचिव अजय भोसले, कामगार प्रतिनिधी संघटक दिनानाथ देसले, अनिता कुमावत, सोनी चौहान, संजय सैदाणे , महेश निचिते आदी उपस्थित होते. यावेळी वागळे इस्टेट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री जगताप  उपस्थित होते. यावेळी सहा.संचालक डॉ चाकूरकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री पाटणकर ही उपस्थित होते. सदरच्या प्रस्तावावर मा. आरोग्य आयुक्त यांची मंजूरी घेऊन सोमवार पर्यंत वेतन अदा करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे अतिरिक्त संचालक डॉ स्वप्निल लाळे यांनी युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांना मोबाईल वर चर्चा करताना आश्वासन दिले आहे. मागील पाच वर्षाच्या थकीत किमान वेतनाच्या फरकाची रक्कम ९५ लाख सात हजार चारशे छत्तीस रूपये, बोनस पोटी थकीत रक्कम एकवीस लाख पन्नास हजार एकशे शहाण्णव रूपये आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम बारा लाख एकशे चौसष्ठ रूपये अशी एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजार सातशे शहाण्णव रूपये इतकी रक्कम सफाई कामगारांना देय असलेल्या रकमेचे मागणी पत्र यावेळी युनियन तर्फे उपसंचालक डॉ नंदापुरकर यांना सादर करण्यात आले. या बरोबरच इएसआयसी आणि अन्य सोयी सुविधा आदी इतर प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य अजित डफले, स्वराज अभियानचे सदस्य सुब्रोतो भट्टाचार्य, समता विचार प्रसारक संस्था मीनल उत्तूरकर, सुनिल दिवेकर, किसन सिंग बेदी, अनमोल साळवी, मोनाली सरोदे.श्रमिक जनता संघाचे कार्यकर्ते किसन गडगिळे आणि सामाजिक कार्यकर्ते शरद जोशी हे उपस्थित होते.

आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा 

ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी आणि आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या रॉट्रॅक्ट क्लब व एनसीसी कॅडेट्स यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांनी ठाण्यातील आनंद दिघे जिद्द स्कूल मधील विद्यार्थ्यां सोबत रक्षाबंधन…

उद्योजक विजय केळुसकर यांचे आकस्मिक निधन

 ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर जवळील रासायनिक कारखान्याचे मालक, पश्चिम उपनगरातील प्रथितयश उद्योजक विजय शंकर केळुसकर यांचे काल रात्री बोरीवली पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अनुराधा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काही काळापूर्वी त्यांच्या दोन्ही मुलांचे ऐन उमेदीच्या काळात निधन झाल्यामुळे केळुसकर परिवार दुखाच्या छायेतून बाहेर येत नाहीत तोवर कर्ते सवरते उद्योजक विजय केळुसकर काळाच्या पडद्याआड गेले. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील एकता विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपनगराचा राजा, मागाठाणे मित्र मंडळ तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य संचालित जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे ते खंदे समर्थक होते. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजय केळुसकर यांनी बोरीवली येथे येऊन आपला ठसा उमटविला होता. ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. काल सकाळी प्रकृती बरी वाटत नसल्याने स्वतःच चालत ते इस्पितळात गेले. त्यांना वैद्यकीय तपासण्या केल्या नंतर अती दक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रात्रीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे जय महाराष्ट्र नगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमित स्व. विजय केळुसकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व थरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

लाडक्या बहिणींना लखपती बनवायचे आहे –  देवेंद्र फडणवीस

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महायुती सरकारने ठरविले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलेला `लखपती दीदी’ बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारला लाडक्या बहिणींनाही लखपती बनवायचे आहे, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेचा ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता नोंदणीकृत बहिणींच्या खात्यातही जमा झाला. महायुती सरकारने ही राज्यातील बहि‍णींना दिलेली रक्षाबंधनाची ही भेट ठरली. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाने अंधेरी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील महिलांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लाभार्थी बहीणी ज्योती गिरी व रुपा केळकर यांनी श्री. फडणवीस यांच्याकडे भावना व्यक्त केल्या. त्यावेळी प्रत्येक महिलेला लखपती बनविण्याचे ध्येय ठेवले असून, आम्ही बहिणींना लखपती बनवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. भाजपा ठाणे व महिला मोर्चाच्या वतीने ठाण्यातील महाजनवाडी येथील सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शेकडो ठाणेकर बहि‍णींची उपस्थिती होती. या वेळी आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, माजी नगरसेवक संदीप लेले, सुनील हंडोरे, राजकुमार यादव, माजी नगरसेविका अर्चना मणेरा, कविता पाटील, कमल चौधरी, नम्रता कोळी, नंदा पाटील, मृणाल पेंडसे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजपाचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचे आर्थिक जीवन समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्न करीत आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले गेले. तर वार्षिक तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. लेक लाडकी योजनेतून मुलींना १८ वर्ष झाल्यावर १ लाख रुपये मिळणार आहेत. एस. टी. मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत आहे. लाडक्या बहिणींना भक्कम आधार दिला जात आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी ज्योती गिरी यांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त केली. संसार सांभाळू शकणारी स्त्री जगालाही सांभाळू शकते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महिलांचा गौरव केला. या कार्यक्रमाला शहरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाजनवाडी हॉल खच्चून भरला होता.

‘मंगळागौर’च्या खेळामध्ये रमल्या महिला!

भाजपा, विश्वास सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे : भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुणींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी देहभान विसरून पारंपरिक पद्धतीबरोबरच अभिनव कल्पना राबवून खेळ सादर करीत वयोवृद्धांची मने जिंकली. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार करीत काही गटांनी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, दीपा गावंड, जिल्हा सरचिटणीस डॉ. समीरा भारती, उपाध्यक्ष अनुराधा रोडे, सचिव माधुरी मेटांगे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सुनिता संजय वाघुले, सरचिटणीस रितू सिकॉन, शीतल कारंडे, प्रीती मणियार, नीता पाटील, वर्षा पाटील, तृप्ती जोशी, श्रुतिका मोरेकर, सुषमा ठाकुर, विद्या शिंदे, अर्चना पाटील, कांचन पाटील यांच्यासह यांच्यासह भाजपाच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत कांदिवली येथील कलादर्पण संस्थेने ५१ हजारांचे प्रथम बक्षीस व स्मृतीचिन्ह, पनवेल येथील सखी ग्रूपने द्वितीय क्रमांकासह २५ हजार व स्मृतिचिन्ह, अलिबाग येथील मनस्विनी मंगळागौर ग्रूपने दहा हजारांचे तृतीय आणि अंबरनाथ येथील जागर मंचने चौथ्या क्रमांकासह पाच हजारांचे बक्षीस व स्मृतीचिन्ह पटकावले. या स्पर्धेत माजिवडा येथील सृजन सख्या, सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील सखी मंगळागौर ग्रूप, पनवेल येथील नाच ग घुमा, राबोडी येथील जय महालक्ष्मी, ऐरोली येथील रुचिरा ग्रूपमधील महिला गटांना उत्तेजनार्थ बक्षीसाने गौरविण्यात आले. या स्पर्धेत नऊ बक्षिसे देण्यात आली. गडकरी रंगायतनमध्ये सकाळी सुरू झालेल्या या स्पर्धेला शेकडो महिलांनी गर्दी केली होती. त्यामुळे रंगायतनचा परिसर महिलांनी फुलून गेला होता. महिलांच्या एकेक…

‘काव्यातील नक्षत्र… काव्यवाचन आविष्कार’ हा कवितेचा थेटर कार्यक्रम उत्साह संपन्न

२५ वर्षांची नक्षत्राचं देणं काव्यमंचची यशस्वी व कौतुकास्पद वाटचाल-कृष्णकुमार गोयल पुणे : नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानीत’ काव्यातील नक्षत्र… काव्यवाचन आविष्कार’ या थिएटर शोचे…

बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण; राखी पौर्णिमा

आज श्रावण पौर्णिमा आजचा दिवस संपूर्ण देशात राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. राखी पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. बहीण भावाच्या पवित्र नात्याला बंधनात बांधणारा हा…