Category: होम

विधानसभेसाठी लोकराज्य पार्टीच्या  16 उमेदवारांची पहिली यादी जाहिर

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी लोकराज्य पार्टीची 16 उमेदवारांची पहिली यादी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात आली. लोकराज्य  पार्टीचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. नरेंद्र पाटील – 172 अणुशक्ती नगर, मुंबई; निल शिवडीकर – 183 शिवडी, मुंबई; कमलेश पोखरे – 173 चेंबूर, मुंबई; संजीवनी वैती. – 155 मुलुंड, मुंबई; बाबुकुमार कांबळे – 147 कोपरी पंचपाखाडी; सुनील विश्वकर्मा – 146 ओवळा माजिवडा; जालिंदर सिनलकर – 148 ठाणे शहर, धीरज मोरे – 118 सटाणा; हेमंत कोळी – 190 उरण; अॅड.  विलास निकुम – 2 शहादा, नंदुरबार (ST); सुभाष बाविस्कर – 105 कन्नड, संभाजी नगर (औरंगाबाद); रवींद्र जाधव – 111 गंगापूर, संभाजी नगर (औरंगाबाद); भूपेंद्र गवते – 150 ऐरोली, नवी मुंबई; सौ. ज्योती गायकवाड-पवार – 174 कुर्ला, मुंबई (SC); सौ. संगीत जामनेकर – 37 बडनेरा, अमरावती आणि विशाल बगाळे – 39 तिवसा, अमरावती अशी त्यांची नावे आहेत. राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती-जमातींचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकराज्य  पार्टी चे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक यांची सामाजिक मोट बांधून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या 50 विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींचे प्रचंड संख्याबळ असेल अश्या निवडक 40 ते 50 विधानसभा मतदारसंघांतून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व अनुसूचित जातीजमातींसह इतर मागासवर्गीय बहूजनांचे प्राबल्य  असलेल्या सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी सामंजस्याने संघटितपणे निर्णय घेऊन “एकमेव उमेदवार उभा करून तो भरघोस मतांनी निवडून आणणे” हा लोकराज्य पार्टीचा ध्यास आहे, अशी माहीती लोकराज्य पक्षाचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठाकरेंकडे इनकमिंग सुरुच

भाजपचे कुर्ला विधानसभा महामंत्री स्वप्निल चंद्रकांत येरुणकर आणि ॲड. राणी स्वप्निल येरुणकर ह्यांनी त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

मर्जिया पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

अनिल ठाणेकर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक , सांस्कृतिक कार्यात आघाडीवर असलेल्या अन् नागरी समस्यांच्या निपटार्यासाठी लढणाऱ्या मर्झिया शानू पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड  यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी  मा. विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण, शमीम खान हे देखील उपस्थित होते. मर्झिया शानू पठाण या गेल्या काही वर्षांपासून सबंध ठाणे शहरात लढाऊ कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. पाणी, कचरा, आरोग्य, महिला अत्याचार आदी प्रश्नांवर त्या सातत्यपूर्ण लढा उभारत आल्या आहेत. मधल्या काळात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मुंब्रा आणि ठाणे शहरातील अनेक समस्यांचा निपटारा झाला होता. उच्चशिक्षित असलेल्या मर्झिया पठाण यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन शासनाशी संघर्ष करीत आहेतच; शिवाय, विद्यार्थी आणि तरूणांमध्ये संविधानाप्रति जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमही आयोजित केले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीवकुमार झा यांनी मर्झिया पठाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली.  आज शरद पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र दिले. दरम्यान, यावेळेस मुंब्रा, कौसा, ठाणे , आदी भागातील अनेक तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.

वाझेला जामीन मंजूर, तरीही मुक्काम जेलमध्येच

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर…

प्रताप सरनाईक यांनी कुटुंबियांसमवेत घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कुलस्वामिनी  तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेतले. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सर्व आमदार तिकीट आणि आपल्या उमेदवारीसाठी धावपळ करत आहेत. परंतु यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. जनसेवेचे हे अखंड व्रत यापुढे अविरत सुरू राहो तसेच सर्व आव्हान पेलण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवनी आई चरणी केली. यावेळी त्यांची पत्नी परिषा सरनाईक आणि मुलगा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक तसेच सुना, नातवंड असा संपूर्ण सरनाईक परिवार सोबत होता. ़०००००

अनिल देशमुखांची ‘स्फोटक डायरी’ !

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्याविरोधात झालेल्या षडयंत्राचा गौप्यस्फोट करण्यासाठी पुस्तकाची निवड केली आहे. अनिल देशमुख लिखीत “डायरी ऑफ होम मिनिस्टर” हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर असून त्यात अनेक…

मुबईत शिवसेना, नागपूरमध्ये कांग्रेस ;

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला मुंबई :  काँग्रेस  नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर महाविकास आघाडीतील तणाव निवळला आहे. मुंबईत शिवसेनेला तर नागपुरात काँग्रेसला झुकते माप मिळेल या निकषावर तडजोड झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. थोरात…

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्ती करु नका !’

धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांची राज्याचे मुख निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे मागणी   अनिल ठाणेकर ठाणे :‘आगामी विधानसभा निवडणुकांच्या कामकाजासाठी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कर्मचाऱ्यांची, नियुक्ती करण्यात येऊ…

दहावीत दांडी गुल झाली तरी टेन्शन नाय

प्रशांत शिंदे मुंबई : दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुषखबर आहे. आता दहावीत सायन्स किंवा गणितात तुमची दांडी गुल झाली तरी टेन्शन घ्यायची गरज नाय…. अकरावीत तुम्हाल प्रवेश मिळू शकतो…राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार…

अमित ठाकरे माहीममधून, तर देशपांडे वरळीतून ‘मनसे’ लढणार

स्वाती घोसाळकर मुंबई : आणखिन एक ठाकरे अखेर निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहिम विधानसभा मतदार संघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे निवडणूक लढविणार आहे. विशेष म्हणजे मनसेने आज…