Category: होम

उथळसर प्रभाग समिती कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम

ठाणे : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी.कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा असे आवाहान…

शांतीनगर परिसरात स्वीपच्या माध्यमातून मतदान जनजागृती

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ज्या…

विविध स्पर्धांच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती

ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 4 मध्ये ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांमार्फतही जनजागृती केली जात आहे. 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील घोलाई नगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 4 मध्ये निवडणुक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध  स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही निवडणुकीचे महत्व कळावे व त्यांनी त्यांच्या माध्यमातून घरातील पालक, शेजारी, मित्रपरिवार यांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे यासाठी शाळा क्र. 4 मध्ये चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “वोट फॉर बेटर इंडिया, आपले मत अमूल्य आहे, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा”अशा प्रकारची घोषवाक्य विद्यार्थ्यांनी लिहून मतदानाचा संदेश दिला. तसेच चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून मतदानाबाबतची जनजागृती विद्यार्थ्यांनी केली. या स्पर्धांबरोबरच परिसरात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विविध मंडळांच्या भेटी घेवून नागरिकांशी संवाद साधला. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वीपचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. 00000

मतदान जनजागृतीसाठी कोपरी पाचपाखाडीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन

ठाणे,दि.19(जिमाका):- विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढावी किंबहुना नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्याच्या दृष्टीने 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघतील शाळा क्र. 38 येथे महिला पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. स्वीपच्या माध्यमातून…

 योगेश त्रिवेदी यांचा वाढदिवस आधार वृद्धाश्रम येथे साजरा

वयोवृद्धांनी साजरा केला आनंद सोहळा   मुंबई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांच्या निधनानंतर या परिसरात मरगळ झटकून सामाजिक कार्यक्रमात खंड पडू नये म्हणून कंबर कसून उपनगरचा राजाच्या पदाधिकाऱ्यांनी पुनश्च हरि ओम म्हणत सुरुवात केली. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील उपनगराचा राजा या विजय वैद्य यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने वैद्य यांचे सुमारे पन्नास वर्षांचे निकटवर्तीय ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांच्या वाढदिवसानिमित्त आधार वृद्धाश्रम, दौलत नगर बोरीवली पूर्व येथे सुमारे शंभरहून अधिक वयोवृद्धांनी आनंद सोहळा साजरा केला. शिवसेना उपविभाग संघटक सौ रेखा बोऱ्हाडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या आनंद सोहोळ्यात योगेश वसंत त्रिवेदी आणि सौ. माया योगेश त्रिवेदी आणि उपनगरचा राजा च्या कार्यकर्त्यांनी अल्पोपहार तसेच फळे वितरित केली. वयोवृद्धांनी गाणी सादर केली. मिलिंद कोळवणकर, राजन सावंत, मनीषा परब, रुपाला भाटिया, मिथिलेश सावंत, विक्रांत पाटील, हेमाल ठक्कर, भावना ठक्कर, जिगर भाटिया, कु. प्रथम हेमाल ठक्कर आदी कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 श्री मावळी मंडळ खेळाडू चमकले

आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत ठाणे – 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला कर्मवीर भाऊराव पाटिल महाविद्यालय वाशी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ठाणे विभाग  खो खो स्पर्धेमध्ये आपल्या श्री मावळी मंडळ संस्थेतील पुरुष गटातील खेळाडू आयुष राव ह्याने ज्ञानसाधना महाविद्यालयतर्फे प्रतिनिधित्व करीत तृतीय क्रमांक पटकावला, महिला गटात सानिया मोरे हिने जोशी बेडेकर महाविद्यालय तर्फे प्रतिनिधित्व करीत द्वितीय पारितोषिक पटकावले तर पुरुष गटातील खेळाडु शुभम जाधव, देवेश देशमुख आणि प्रज्वल महाडिक ह्यांनी सुद्धा जोशी बेडेकर महाविद्यालयतर्फे प्रतिनिधित्व करून द्वितीय पारितोषिक पटकावले असून मुंबई विभागाकरिता देवेश देशमुख आणि शुभम जाधव ह्यांची निवड करण्यात आली आहे.

 आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे

८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर-कीर्ती शेडगे   रत्नागिरी : अशोक गायकवाड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य १२.२४ लिटर, रसायन १५०५ लिटर असा एकूण रुपये ८८ हजार २५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑकटोबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाने १ ऑक्टोबर ते दि. १४ ऑक्टोबर या कालवधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ८० गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु २०३२ लिटर, देशी मद्य १३.६८ लिटर, विदेशी मद्य ९.०० लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य २०५.६५ लिटर, रसायन ३११५० लिटर, प्लॅस्टिकचे बॅरल, कॅन व काचेचे ग्लास असा एकूण रुपये १५ लाख ४४ हजार ४१० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरुन प्रवाशी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्द अशी कारवाई येथून पुढेही सुरु राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमांक- ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती शेडगे यांनी केले आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी / खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल. 0000

 किनाऱ्यावरील मच्छिमार बोटींवर नियंत्रणासाठी मनाई आदेश – किशन जावळे

रायगड : अशोक गायकवाड* निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्र मार्गे दारु, पैसा, अंमली पदार्थ व मतदारांना प्रलोभण देण्यासाठी मुफ्त वस्तू (Free bees) यांचा वाहतूक होणार नाही यासाठी व कोणतेही गैरप्रकार टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावरील मच्छिमार तसेच अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.* भारत निवडणूक आयोगाने दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने, रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांतील निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्र मार्गे दारु, पैसा, अंमली पदार्थ व मतदारांना प्रलोभण देण्यासाठी मुफ्त वस्तू (Free bees) यांचा वाहतूक होणार नाही यासाठी व कोणतेही गैरप्रकार टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावरील मच्छिमार तसेच अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर येणाऱ्या सर्व बोर्टीनी अधिसूचित केलेल्या ठिकाणीच सदर बोर्टीचे अवागमन करावे. सदर बोटींनी अधिसूचित केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी आपल्या बोटींचे अवागमन केल्यास, सदर बोट जप्त करुन, कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये सागरी सुरक्षा पोलीस दल यांनी आपली गस्त तीनपटीने वाढवावी. या कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. मत्स्यविभाग रायगड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दल यांनी विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील समुद्रातील आपली गस्त वाढवावी. या कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. जिल्ह्यातील समुद्र किनारा असणाऱ्या गावांच्या संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने समुद्र किनारा विभागातील संबंधित तलाठी, बिट मार्शल, ग्रामसेवकआणि कोतवाल यांची सनियंत्रण समिती गठीत करुन, समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये कोणताही गैरप्रकारहोणार नाही याची दक्षता घ्यावी व सदर कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. 0000

 ३री राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

 घोरपडे, शेट्टे, ताकमोगे, तांबवेकर, सोमण, आरंडे, गुंजाळ यांना सुवर्णपदक   पुणे १९ ऑक्टोबर २०२४: सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा प्रबोधिनी सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३-या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संस्कार घोरपडे, सिद्धेश घोरपडे, साहील शेट्टे, मंगेश ताकमोगे, गायत्री तांबवेकर, आभा सोमण, सायली आरंडे, श्वेता गुंजाळ यांनी आपापल्या वयोगटात चमकदार कामगिरी करताना टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. आज या स्पर्धेचे उदघाटन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव, निगडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी, स्पर्धेचे मुख्य कॉमिशर सुदाम रोकडे, आंतरराष्ट्रीय पंच धर्मेंद्र लांबा, स्पर्धा संचालक दिपाली पाटील, मिलींद झोडगे, मिनाक्षी शिंदे, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार भिकन अंबे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव अभिजीत मोहिते आदी मान्यवर हजर होते. आज पावसामुळे काही काळ स्पर्धेत व्यतय आला. आज  सर्व वयोगटातील टाईम ट्रायल प्रकारामधील अंतिम स्पर्धा पार पडल्या. आज झालेल्या स्पर्धांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. टाईम ट्रायल :- युथ बॉईज ५०० मीटर्स – सुवर्ण – संस्कार घोरपडे (पुणे ३८.८९ से.), रौप्य – अर्नव गौंड (पुणे ४२.५२ से.) कांस्य – अनुज गौंड (पुणे – ४२.६२से). युथ गर्ल्स ५०० मी. – सुवर्ण – गायत्री तांबवेकर (पुणे – ४१.८९ से.), रौप्य – ज्ञानेश्वरी माने (पुणे ४१.८९ से.), कांस्य – मुग्धा कर्वे (पुणे – ४६.०२). सब ज्युनिअर बॉईज ५०० मी.  – सुवर्ण –  सिद्धेश घोरपडे (३६.२५ से), रौप्य – प्रणय चिनगुंडे (३९.६० दोघे क्रीडा प्रबोधिनी), कांस्य – संस्कार घोरपडे (पुणे ३९.७९ से), सब ज्यनिअर गर्ल्स ५०० मी. – सुवर्ण – आभा सोमण (४१.०१ से.) रौप्य – गायत्री तांबवेकर (४२.३० से.), कांस्य – श्रीवणी परीट (४४.८१ से. सर्व पुणे). ज्युनिअर:- मुले १००० मी. सुवर्ण – साहील शेट्टे (पुणे १.१३.६०), रौप्य – हरीश डोंबाळे (क्रीडा प्रबोधिनी पुणे १.१४.३१) कांस्य – सोहम पवार (पुणे १.१४.९४) मुली ५०० मी. – सुवर्ण – सायली आरंडे (कोल्हापूर ३९.७१ से.) रौप्य  – आभा सोमण (पुणे ४१.०३से) कांस्य – झायना पिरखान (पालघर ४१.७६ से). मेन ईलाईट (पुरुष खुला गट) १००० मी. – सुवर्ण – मंगेश ताकमोगे (१.१२.०३) रौप्य – वेदांत जाधव (१.१२.३७ दोघे पुणे) कांस्य – मंथन लाटे (ठाणे १.१३.२३) वुमेन ईलाईट (महिला खुला गट) – ५०० मी. – सुवर्ण – श्वेता गुंजाळ (पुणे ३९.८० से) रौप्य – सायली आरंडे (कोल्हापूर ४०.४८ से.) कांस्य – आदिती डोंगरे (क्रीडा प्रबोधिनी, पुणे ४१.८८ से) 0000

या ‘जन्मावर’… या ‘मरणावर’… शतदा प्रेम करावे- संदीप चव्हाण

मुंबई / रमेश औताडे सर्वांना परिचित असलेले गाणे  ‘या जन्मावर …या जगण्यावर … शतदा प्रेम करावे’ संपूर्ण जीवनाचे सार सांगून जाते हे गाणे. मात्र अवयव दान केले तर या ‘मरणावर’  शतदा प्रेम करावे असे आपल्या मृत्युनंतर जग बोलू लागेल. त्यासाठी अवयव दान चळवळ व्यापक करत ‘अवयवदान सैनिकांचे’  जाळे निर्माण करण्याची गरज आहे.  मुंबई मराठी पत्रकार संघ ‘ ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या अवयव दान संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करेल असे बित्तंबातमीचे संपादक आणि मुंबई  पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन मुंबई यांच्या वतीने अवयवदान आणि नेत्रदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. १४० कोटीच्या देशात मागील वर्षी फक्त १०२० जणांनी केले अवयव दान केले. खेदाची बाब जरी असली तरी अजूनही कोट्यवधी जनतेला अवयव दान म्हणजे काय हेच माहिती नाही. यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे असे ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या अवयव दान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक कुमार कदम, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, अजय वैद्य, हेमंत सामंत,जगदीश भोवड, आदी पत्रकार उपस्थित होते. फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन चे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, प्रशांत पागनीस, नागराज अय्यर, श्रीकांत कुलकर्णी यांनी त्यावेळी अवयव दान संदर्भात मार्गदर्शन केले. जेव्हा आपण अवयव दान करतो तेव्हा शरीर दान शक्य नसते आणि जेव्हा शरीर दान होते असे केल्याने शरीरातील अंतर्गत अवयवांचे दान करता येत नाही. मुळात शरीर दान आणि अवयवदान या दोन भिन्न गोष्टी आहेत. असे पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले.