Category: होम

रोटरीचा दिव्यांगांना मदतीचा हाथ 

  ठाणे : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या वतीने रोटरी दिव्यांग सेंटर कल्याण संचालित ऑटोसच्या सहकार्याने दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तींचे एक शिबिर रविवारी ठाण्यात संपन्न झाले. त्यात दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप घेण्यात आले. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण अध्यक्ष बिजू उन्निथन, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ अध्यक्ष मेधा जोशी, सचिव रमेश मोरे, सचिव अमोल नाले, प्रकल्प प्रमुख प्रफुल  क्षिरसागर, प्रकल्प प्रमुख देवयानी वेद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. रोटरी क्लब सामाजिक भावनेतून गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवित आहे. नौपाडा येथील सरस्वती शाळेच्या आवारात हे शिबिर संपन्न झाले. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतून  52 दिव्यांगांनी नोंदणी केली होती. 40 दिव्यांग या शिबिरास उपस्थित होते. तज्ञ व्यक्तिंनी या दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप घेतले. सरस्वती विद्यालयात 27 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी शिबिराला उपस्थिती लावत रोटरीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते जलपूजन कार्यक्रम संपन्न

 राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात माजी महसुलमंत्री स्व.शांताराम बापू घोलप यांच्या कार्यकाळात झालेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पांमुळे तालुक्यात पिण्यासाठी व पिकांना पाण्याची उपलब्धता झाली, आणि त्यानंतर पुढे शेतकरी हा भाजीपाला पिक घेवुन स्वयंपूर्ण होवु लागला परिणामी मधल्या काळात शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झाली. सद्यस्थितीत शेतकऱ्यांसाठी १२ महिने पाण्याची आवश्यकता असताना पाणी योग्य नियोजनामुळे पाणी फक्त १० महिनेच उपलब्ध असते त्यामुळे शेतीतून पुढील दोन महिन्यात नफ्याचे उत्पन्न घेणे अडचणीचे ठरत असल्यामुळेच मुरबाड तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पुढील पाच वर्षात  “शेतीसाठी पाणी” हाच अजेंडा चालवण्यात येणार असल्याचे मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले. मुरबाड तालुक्यातील पवाळे, पाडाळे, धसई व फांगलोशी लघु पाटबंधारे प्रकल्पांवर जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड तालुका कॉंग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले व यावेळी किसान कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस जयवंत पवार, तालुका समन्वयक काळुराम विशे, तालुका पदाधिकारी अंकुश धुमाळ, विभागप्रमुख दिपक आलम तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणुन  फनाडे, शिवाजी पवार, धनाजी पवार, अविनाश घोरड, विष्णू मुरबाडे, जनार्दन गोंडाबे आदीं मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, किसानचे तालुका उपाध्यक्ष चिंतामण पष्टे, खोपिवली विभागप्रमुख वसंत कराळे, युवक तालुका उपाध्यक्ष विपुल सुरोशे, जिल्हा पदाधिकारी पांडुरंग शिद, भगवान पवार, मुरबाडे आदींनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे पौरोहित्य उदय मंडलिक यांनी केले. जलपूजन हा उपक्रम तालुक्यासाठी नवीन असुन आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मान दिल्याबद्दल कॉंग्रेस कमिटी व चेतनसिंह पवार यांचे आभार यावेळी जनार्दन गोडांबे यांनी मांडले.

विमान, रेल्वेत बाँम्बची बोंबाबोंब !

मुंबई : मुंबईहून उड्डाण केलेल्या तीन विमानांमध्ये तर मुंबईहून रवाना झालेल्या एका ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एअर इंडियाचे पहिले विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होते. माहिती मिळताच विमान दिल्लीकडे वळवण्यात…

मारेकऱ्यांना बाबा सिद्दीकींसोबतच झिशानचाही गेम करायचा होता

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशानचाही गेम करायचा होता अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. बाबा सिद्दीकी…

धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे !

शिंदे सरकारकडून धोरण जाहीर मुंबई : धारावी पुनर्विकासातील पात्र तसेच अपात्र आणि बहुमजल्यांवरील सर्वच झोपडीवासीयांना घरे देण्याचे धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये आतापर्यंत १ जानेवारी २०११ नंतरचे…

अभिनेते अतुल परचुरेचं निधन

मुंबई : आपल्या अभिनयाने अवघ्या कलारसिकांच्या हृदयावर राज्य करणारा… खळाळून हसवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे  यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल परचुरेनी आयुष्याच्या रंगमंचावरून अखेर एक्झिट घेतली. गेली काही वर्षे त्यांची…

पाणी प्रश्नी नाशिक महापालिकेवर महिलांची शहर बसमधून धडक

प्रवेशद्वारावर हंडे आपटून निषेध हरिभाऊ लाखे नाशिक : नवीन नाशिक, खुटवडनगर भागात एक-दोन महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी सिटीलिंक बस घेऊन थेट…

विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीमुळेच भाजपा युती सरकारकडून मुंबईतील टोल माफी–वर्षा गायकवाड

टोलमाफी जाहीर केल्याने लाडक्या टोल कंत्राटदारांना किती मलई मिळणार? मुंबई : मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती…

रोटरीचा दिव्यांगांना मदतीचा हाथ 

ठाणे : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या वतीने रोटरी दिव्यांग सेंटर कल्याण संचालित ऑटोसच्या सहकार्याने दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार…