Category: होम

जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’कॉफी टेबल बुक, हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच उपयुक्त-उदय सामंत

अशोक गायकवाड रत्नागिरी :जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही प्रशासन यंत्रणा गतिमान असेल. जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’कॉफी टेबल बुक, हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे. जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक, अभ्यासक यांनाही फायदेशीर ठरणार आहे, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील विकासाची वाटचाल दाखविणाऱ्या ‘जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी झालेली विकास कामे यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. ड्रोनच्या उत्तम नजरेतून टिपलेली दृश्यं आणि क्यु आर कोडच्या माध्यमातून चित्रीकरण देखील मोबाईलवर पाहता येणार आहे. हे या कॉफी टेबल बुकचे वैशिष्ट्य आहे. जिल्हा रत्नागिरी विकास पर्व निर्मितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष परिश्रम घेतले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. अशा शुभेच्छा देऊन पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही प्रशासन यंत्रणा गतिमान असेल. हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे. जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक, अभ्यासक यांनाही फायदेशीर ठरणार आहे. या पुस्तकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत नवी मुंबईतील

 सर्व शाळांमध्ये आरोग्याच्या जपणुकीसाठी सॅनिटरी नॅपकीनविषयी जनजागृती नवी मुंबई :‘स्वच्छता ही सेवा 2024’ मोहिमेअंतर्गत 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या पंधरवडयात स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून विविध उपक्रमांतून स्वच्छतेचा संस्कार रूजविण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांचा व्यापक प्रमाणात सहभाग घेऊन त्यांच्यामध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेची जाणीव जागृती करण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवितानाच वैयक्तिक स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसह महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 25 सप्टेंबर रोजी ‘सॅनेटरी नॅपकीन जनजागृती’ उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकीन वापरणेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन त्यात किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये सॅनेटरी नॅपकीनबाबत जनजागृती करण्यात आली. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविणे तसेच वापरून झालेल्या सॅनटरी नॅपकीनची पर्यावरणपूरक पध्दतीने सुरक्षित विल्हेवाट लावणे याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सुसंवाद साधला. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता ठेवणे तसेच आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाकरिता तसेच वैयक्तिक आरोग्याकरिता सॅनेटरी नॅपकीनचा वापर होणे आवश्यक असल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यादृष्टीने प्रत्येक शाळेत उपलब्ध असलेल्या सॅनेटरी मशिनचा वापर करण्याची पध्दती विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली. त्याचप्रमाणे वापरून झालेल्या सॅनेटरी नॅपकिन्समुळे जंतूसंसर्ग व त्वचेचे रोग होऊ नयेत याकरिता तसेच सॅनेटरी नॅपकिन्सच्या कच-यामुळे पर्यावरणास हानी पोहचते हे लक्षात घेऊन या कच-याची सुरक्षित रितीने योग्यप्रकारे विल्हेवाट मशीनव्दारे करण्याबाबतही मार्गदर्शन देण्यात आले. काही शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकीनचे वाटपही करण्यात आले. काही शाळांमध्ये याप्रसंगी पालक महिलाही उपस्थित होत्या. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकीन वापर व वापरानंतर त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट याबाबत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेअंतर्गत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली व ही सवय स्वत:च्या आरोग्य जपणूकीसाठी कायमस्वरूपी अंगिकारावी असे मार्गदर्शन करण्यात आले.

आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकारी संघटना करणार कामबंद आंदोलन

ठाणे : आदिवासी विकास विभागातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिला आहे. आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत गेल्या दोन वर्षापासून…

रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी जनता दरबार – गोविंद बोडके

अशोक गायकवाड पालघर:पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी नागरिकांना केले आहे. सोमवार ३० सप्टेंबरला दुपारी १२:३० वाजता अपर जिल्हाधिकारी यांचे दालन क्र. १०९, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

विजयादशमीनिमित्त `वुमेन बाईक रॅली’ सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे – क्रेडाई एमसीएचआय, आशर, रास रंग, ब्युटी ऑन बाईक, अर्चना मनेरा फाउंडेशन, आणि टॅग(मिस/मिसेस ठाणे) या संस्थांच्या विद्यमाने विजयादशमीनिमित्त `वुमेन बाईक रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. `नारी तू नारायणी,…

एमजेएससी कॅरम स्पर्धेत रेहान शेख विजेता 

मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सी फेस म्युनिसिपल स्कूलचा रेहान शेख विजेता ठरला. अचूक फटकेबाज खेळासह…

क्षयरोग नियंत्रणाकरिता नमुंमपा आरोग्य विभागाची व्यापक जनजागृती

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये क्षयरोग आजाराचा प्रसार रोखणेसाठी, मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाने, आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले असता सदर शिबीरांकरीता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. भेटी दिलेल्या…

 शिवसेना महाविजय संवाद महाराष्ट्र दौऱ्या’ला आजपासून प्रारंभ

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल ठाणेकर ठाणे : राज्य सरकारने केलेली विकास कामे तसेच विविध लोककल्याणकारी योजना राज्यातील खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवसेना महाविजय संवाद दौऱ्या’चे आयोजन २८ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. याबाबतची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी  दिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सोशल मीडिया राज्यप्रमपुख राहुल कनाल, महिला आघाडी संघटना अध्यक्षा मीना कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला भिवंडी ग्रामीण विधानसभेपासून सुरुवात होत आहे. दररोज सहा विधानसभांला भेट देणार आहोत. पहिला टप्पात मुंबईतील विधानसभांना भेट देणार आहोत.  यामध्ये बैठका,मेळावे आणि शाखाभेट आदींचा समावेश असणार आहे, सदर दौरा तीन टप्प्यात होणार आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दरम्यान मुंबई, मुंबई उपनगरमधील विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात येणार आहे तर १३ ऑक्टोबर ते  १६ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात हा दौरा होणार आहे. या दौऱ्यांतर्गंत युवकांशी संवाद साधून युवा संघटन मजबूत करून पक्ष संघटन वाढविण्यावर भर देण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत ती सर्व कामे लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. संघटनात्मक ताकद कशाप्रकारे वाढेल यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या वतीने मीना कांबळी त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दौरे करण्यात येतील. लाडकी बहीण संपर्क अभियान दरम्यान गाठीभेटी, मेळावे, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना,अन्नपूर्णा योजना याचा आढावा घेण्यात येईल. सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या अध्यक्षतेखाली सोशल मीडिया, वॉररुम आदींचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती पुर्वेश सरनाईक यांनी दिली. ०००००

जागतिक रेबीज दिनानिमित्त २८ सप्टेंबर रोजी अँटी रेबीज लसीकरण शिबीर-रोहन घुगे

ठाणे : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जागतिक रेबीज दिनानिमित्त अँटी रेबीज लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुवैद्यकीय दवाखान्यात २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा सीमाभागातील नाक्यावर होणार तपासणी – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हा प्रशासनाने आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय आयोजित आंतर जिल्हा बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी कायमस्वरुपी चेकपोस्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेकपोस्टची स्थापना करणे आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यानी या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे असे यावेळी निश्चित करण्यात आले. निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यासाठी प्रभावी उपाययोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी शेजारच्या राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली. ग्रामीण भागात तसेच सागरी मार्गाने होणाया वाहतुकीची प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नमूद केले.सहभागी सर्व जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणूक आचार संहिता काळात केलेल्या उपाययोजना आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती सादर केली. यावेळी सीमाभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. 0000