चायनिज वर पिझ्झा भारी
चायनिज वर पिझ्झा भारी स्वाती घोसाळकर मुंबई : भारतात चायनिज फुडवर मक्तेदारी असणारे नेपाळी आणि जगभरात पिझ्झावर मक्तेदारी असणारे इटली आज वानखेडेवर आमनेसामने आले. पण दिवसमावळतीला अखेर चायनिज फुडवर पिझ्झा भारी पडला.…
चायनिज वर पिझ्झा भारी स्वाती घोसाळकर मुंबई : भारतात चायनिज फुडवर मक्तेदारी असणारे नेपाळी आणि जगभरात पिझ्झावर मक्तेदारी असणारे इटली आज वानखेडेवर आमनेसामने आले. पण दिवसमावळतीला अखेर चायनिज फुडवर पिझ्झा भारी पडला.…
अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ? राजधानी दिल्लीतून रोहीत पवरांचे खळबळजनक आरोप सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि माध्यम सल्लागर नरेश अरोरांवर संशय अरोरांचे माध्यम सल्लागाराचे कंत्राट दादा रद्द करणार…
आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम व योजना राबवण्यास सुरुवात केली…
जवाहरबाग अग्निशमन केंद्र पुनर्विकासाच्या कामामुळे बंद! भाजपा नगरसेविका नम्रता कोळी यांनी वेधले लक्ष ठाणे : शहरातील सर्वात जुन्या जवाहरबाग अग्निशमन केंद्राचा कारभार सध्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे. तर शहरातील महत्त्वाची व गर्दीची ठिकाणे लक्षात घेऊन दादोजी कोंडदेव स्टेडियच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वात जुने अग्निशमन केंद्र म्हणून जवाहरबाग येथील अग्निशमन केंद्राची नोंद आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपासून अवघ्या ५०० ते ७०० मीटर अंतरावर केंद्राची जागा आहे. ठाणे रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, ठाणे शहर पोलिस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, जुनी बाजारपेठ, जांभळी नाका होलसेल मार्केट, शाळा व महाविद्यालये आहेत. या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास काही मिनिटांतच जवाहरबाग केंद्रातून अग्निशमन दलाची गाडी पोचत होती. त्यामुळे तत्काळ मदत कार्याबरोबरच आगीवर नियंत्रण मिळवता येत होते. दुर्घटनेची व्याप्ती पाहून अग्निशमन दलाचे जवान अन्य केंद्रातूनही कुमक बोलत असत. मात्र, केंद्राच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे आता जवाहरबाग केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे तत्काळ मदतकार्यात अडचणी येत आहेत, याकडे नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापालिका आयुक्त व मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी महागिरीतील दाभोळकरवाडी येथे आग लागल्यानंतर कळवा येथून अग्निशमन दलाला बोलाविण्याची वेळ आली. सुदैवाने आग आटोक्यात आल्यामुळे मोठी हानी टळली. या पार्श्वभूमीवर भविष्यातील आपत्तीतील संभाव्य हानी टाळण्यासाठी जवाहरबाग अग्निशमन केंद्र तात्पुरत्या स्वरुपात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गेट क्र. १ जवळ सुरू ठेवावे. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या ठेवाव्यात, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.
महागिरी कोळीवाडा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोळी समाजाची संस्कृती व खाद्यपदार्थांची ओळख ठाणे: कोळी समाजाची परंपरा, संस्कृती आणि खाद्यपदार्थांची ओळख करून देणाऱ्या कोळी महोत्सवाला यंदा सलग १४ व्या वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात हजारो नागरिकांनी सहभागी होण्याचा आनंद लुटला. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. महागिरी कोळीवाडा कोळी समाजाच्या उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. कोळी समाजाच्या परंपरा जपण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या महोत्सवाला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, भाजपाचे शहर सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, संजय तरे यांच्यासह मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या महोत्सवात स्थानिक कलावंतांना कलांचा आविष्कार सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. तसेच खवय्यांना कोळी समाजातील पारंपरिक रुचकर खाद्यपदार्थांची मेजवानी मिळाली.
शिवमंदिर स्मशानभूमी पुनर्बांधणीसाठी राहणार बंद कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली (पूर्व) विभागातील दत्तनगर येथील शिवमंदिर स्मशानभुमी (मोक्षधाम) ही जुनी स्मशानभुमी तोडून तेथे आधुनिक पध्दतीच्या नविन स्मशानभूमी प्रकल्पास महापालिकेने मंजुरी देऊन सन २०२४ मध्ये कार्यादेश प्रदान केलेला आहे. या स्मशानभुमीची पुर्नबांधणी करण्यासाठी, जुनी स्मशानभुमी तोडण्याचे काम रविवार १५ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शिवमंदिर स्मशानभुमीमध्ये फक्त गॅस शवदाहिनी सुरु राहिल, उर्वरित स्मशानभुमी संपुर्णपणे बंद राहील. तरी नागरीकांनी अंत्यविधीसाठी डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा स्मशानभुमी, डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली स्मशानभुमी, कल्याण रोड, आणि म्हसोबा चौक स्मशानभुमी, ठाकुर्ली या स्मशानभुमींचा वापर करुन, महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
३० वे समर्थ खो-खो शिबीर दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष! मुंबई: दादरच्या क्रीडांगणावर पुन्हा एकदा जोश, जिद्द आणि जाज्वल्य परंपरेचा संगम रंगणार आहे! भारतातील अग्रगण्य क्रीडा संस्था असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरने शतकोत्तर वर्षात पदार्पण करताना क्रीडाप्रेमींसाठी आणली आहे खास मेजवानी, ३० वे समर्थ खो-खो शिबीर! खो-खोच्या मैदानावर शिस्त, चपळता आणि संघभावनेचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी यंदाही खेळाडूंना मिळणार आहे. परंपरेचा वारसा आणि गौरवशाली कामगिरी श्री समर्थ व्यायाम मंदिर ही केवळ संस्था नसून भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी पर्व आहे. खो-खो क्षेत्रातील नामांकित संघ म्हणून समर्थची देशभरात ओळख आहे. संस्थेतील खेळाडू व प्रशिक्षकांनी पद्मश्री पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, क्रीडा संघटक शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, वीर अभिमन्यू पुरस्कार अशा मानाच्या सन्मानांनी गौरव प्राप्त केला आहे. या तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो शिबिराचे आयोजन व वेळापत्रक ३० वे समर्थ खो-खो शिबीर हे मंगळवार १७ ते गुरुवार २६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. समर्थ क्रीडा भवन पटांगण, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (पश्चिम), मुंबई येथे हे शिबीर सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत शिबिरार्थ्यांना संस्थेचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरार्थींना प्रामुख्याने खो खो, लंगडी, शरीरतापन, सूर्यनमस्कार, आसन इत्यादी शिकवले जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील समर्थचे अनुभवी खेळाडू शिबिरार्थींना थेट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच खो खो सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.
चार काळे कामगार कायदे लादून, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा, केंद्र सरकारचा कुटील डाव – राजन राजे अनिल ठाणेकर ठाणे: अयोध्येत राम मंदिर बांधणारे; पण, कामगार-चळवळीला स्मशानभूमी दाखवणारे मोदी-शहा सरकार हे, श्रमिकांच्या विरोधात असून, कामगारांच्या जीवावर आणि त्यांच्या रक्ताघामाच्या लुटीवर, मस्तवाल झालेल्या धनदांडग्या-भांडवलदारी मालकशाहीचे तारणहार असलेल्या भारतीय जनता पक्षाला रान मोकळं सोडू नका… यातून केंद्र सरकारचा, श्रमिक वर्गाला उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला गेलाय!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी, ठाण्यात केला. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच ही निदर्शने करण्यात आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजन राजे यांनी यावेळी केले. एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार असून, काँग्रेसचे नेते व इंडिया-आघाडीचे अध्वर्यू राहुल गांधी यांनीदेखील या चार काळ्या कामगार कायद्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच, हे काळे कायदे रद्द करु, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभेत केले होते, त्याबद्दलही राजन राजे यांनी, आपल्या भाषणात राहुल गांधींचे जाहीर कौतुक करुन, त्यांचे आभार मानले. दरम्यान, आपल्या तडाखेबंद भाषणात राजे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. अहिल्यानगर येथील सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत बोलताना त्यांनी, कारखानदारांची बाजू घेत, “उद्योगजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून काढू” अशी भाषा वापरली होती. दावोस परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात कोट्यवधी डॉलर्सचे उद्योगधंदे आणण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच, मराठी कामगार देशोधडीला लागला, त्यांच्याच सरकारने कंत्राटीपद्धतीमुळे नोकऱ्या असुरक्षित केल्या, महाराष्ट्रातील उद्योग याच भाजपने राज्याबाहेर नेले आणि तेच मुख्यमंत्री, उद्योजकांची बाजू घेत, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतात, हे संतापजनक असल्याचा हल्लाबोल राजन राजे यांनी यावेळी केला. याप्रसंगी डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ही जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कॉ. शिशिर ढवळे, कॉ. उदय चौधरी, समाजवादी नेते जगदीश खैरालिया, संजय मंगला गोपाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, प्रवक्ते समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार तसेच, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
ठाण्यात घुमणार शिवशाहीचा जागर! जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टतर्फे भव्य ‘शिवजयंती उत्सव २०२६’ चे आयोजन ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यातील ‘जनस्वराज्य प्रतिष्ठान’ च्या वतीने गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती सोहळ्याचे अतिशय भव्य नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून ऐतिहासिक संस्कृती, समाजप्रबोधन आणि जनसेवा यांचा त्रिवेणी संगम ९० फिट रोड, पारसिक नगर, खारीगांव, कळवा येथे ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार निरंजन डावखरे आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर कृष्णा दादु पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल. मुख्य सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर उपस्थित राहणार असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. संदिप लेले (जिल्हाध्यक्ष, भाजपा), राजाराम साळवी (अध्यक्ष, आगरी सेना), दशरथ पाटील (उपनेते, शिवसेना) ,संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे (ज्येष्ठ नगरसेवक), विकास पाटील (नगरसेवक), अशोक भोईर (माजी उपमहापौर), सचिन मोरे (अध्यक्ष, के.बी.पी. कॉलेज) आणि विक्रम भोईर (सरचिटणीस, भाजपा) मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती लाभणार आहे. तसेच परिसरातील सर्व स्थानिक नगरसेवकांची देखील या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभणार आहे. शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात गायक नंदेश उमप यांचा ‘शिवगिते व पोवाड्यांचा नजराणा’. छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास पोवाड्यांच्या माध्यमातून जिवंत केला जाईल. तसेच, प्रा. विशाल गरुड यांचे ओघवते व्याख्यान तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल. शिवताल ढोल ताशा पथक (नाशिक) यांच्या कडकडाटात निघणारी मिरवणूक आणि वाद्यवादन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.. केवळ उत्सवच नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत जनस्वराज्य ही संस्था विविध उपक्रम राबवते आहेत. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. “हा उत्सव केवळ एक सोहळा नसून शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ठाणेकरांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील व त्यांचे विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.
ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा जलदगती निर्णय; आरोपीची निर्दोष मुक्तता ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील चौथे विशेष पोक्सो न्यायालय (मा. न्यायाधीश रुबी मालवणकर) यांनी विशेष सत्र प्रकरण क्र. ०९/२०२६…