Category: होम

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरने यांना झारखंडज उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १३ जून रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर…

महाराष्ट्रात चार महिन्यांत ८३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई: एकीकडे राज्य सरकारकडून महाराष्ट्रात वेगाने विकास होत असल्याचे दावे केले जात असले तरी ग्रामीण भागात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात  राज्यात ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेय. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत…

कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, या योजनांसाठी कुठून आणणार?

खडसेंचा अजित पवरांना सवाल मुंबई : भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्यास…

हा अर्थसंकल्प ‘थापां’चा महापुर- उद्धव ठाकरे

मुंबई – निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असेच अर्थसंकल्पाचे वर्णन करावे…

थापांचा नाही, मायबापांचा अर्थसंकल्प – फडणवीस

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यूत्तर देत शेतकरी, महिला, युवा मागासवर्गीय अशा सर्व घटचकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही म्हणतो की हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प…

‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’

माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची टीका मुंबई  :- आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत पाटील…

महाराष्ट्रात घोषणांचा ‘अर्थ’पुर्ण पाऊस

० मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये ० मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत ० महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’ ० वारकरी बांधवांसाठी…

राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी नकोच

मुंबई, ता. २७ : राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी सुरू करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, अशी भूमिका रिक्षा संघटनांनी घेतली आहे. परिवहनेतर संवर्गातील वाहनांची (दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी) मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनांचे नियमन करण्यासाठी त्यांना एग्रीगेटर म्हणून महाराष्ट्रात सेवा बजावता यावी, यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालाला सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीच्या अन्य सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते. अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना समितीच्या अहवालात होती. मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरी भागातही बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा झाला आहे; पण त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी वाहतुकीला मोठा फटका बसणार आहे.

 ठाणे महापालिकेत पोकळी वाढली

महापालिकेच्या सेवेतून ६२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त ठाणे : ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढतांनाच दिसत आहे. मे महिन्यात ११२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा ६२ अधिकारी, कर्मचाºयांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका दिवसेंदिवस रिती होत असल्याचेच चित्र या निमित्ताने दिसत आहे. यात उपायुक्त, शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्याध्यापिका, लिपीक, प्राथमिक शाळेचे शिक्षक आदींचा यात समावेश आहे. महापालिका शाळांमध्ये आधीच मुख्याध्यापकांची कमतरता आहे. शिक्षकांची देखील वानवा भासत आहे. त्यात सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होतांना दिसत नाही. ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २३ जणांची भर पडली. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानंतर आता मे महिन्यात तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर आता जून महिन्यात तब्बल ६२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. दर महिना कर्मचाऱ्यांची ही संख्या वाढतच जात आहे. त्यात आता शहर विकास विभागातील कार्यकारी अभियंता सेवा निवृत्त झाले आहेत. मागील महिन्यात देखील एक कार्यकारी अभियंता सेवा निवृत्त झाले होते. त्यात पुन्हा एकाची भर पडली आहे. समाज विकास विभागाचे उपायुक्त, वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यालयीन अधिक्षक, कार्यालयीन उपअधिक्षक, दोन मुख्याध्यापिका सिस्टर इनचार्ज, वरीष्ठ लिपिक, दोन लिपीक, वरीष्ठ लेखापरिक्षक, प्रस्ताविका, प्राथमिक शिक्षका ११, चालक यंत्रचालक, वाहन चालक, जमादार, आरक्षक, बालवाडी आया, माळी बिगारी, बिगारी, सफाई कामगार आदींचा त्यात समावेश आहे. मागील काही वर्षापासून महापालिका शाळांमध्ये शिक्षक तसेच मुख्याध्यापकांची संख्या कमी आहे. महापालिकेने तासिका शिक्षक घेतले असले तरी देखील ते पूर्ण क्षमतेने हजर होत नसल्याने शिक्षकांची पोकळी दिसून येत आहे. त्यातही मुख्याध्यापकांची संख्या देखील आता घटत चालली आहे. दुसरीकडे शिक्षक नसल्याने मुख्याध्यापकांना देखील विद्यार्थ्यांना शिकवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही पोकळी केव्हा भरुन निघणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कातकरीवाडीत रस्त्यासाठी कपिल पाटील यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

मुरबाड : धसईनजीकच्या ओजिवले येथील कातकरीवाडीपर्यंत पोचण्यासाठी रस्ता तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे आज केली आहे. कातकरीवाडीतील महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून आणले जात असल्याच्या वृत्ताची तातडीने दखल घेत, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याबरोबर संपर्क साधला. तसेच या वाडीपर्यंत जिल्हा नियोजन विकास निधी किंवा जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्ता तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली. मुरबाड तालुक्यातील ओजिवली येथील कातकरीवाडीमध्ये ५० हून अधिक नागरिक राहतात. मुख्य गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या या वाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी बांबूला बांधलेल्या कपड्याच्या झोळीतून रुग्णालयात आणले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तातडीने दखल घेतली. जिल्हा नियोजन समिती वा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कातकरीवाडीमध्ये जाण्यासाठी डांबरी रस्त्याला मंजुरी द्यावी, या संदर्भात तातडीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने प्रस्ताव तयार करावा, अशी विनंती कपिल पाटील यांनी केली. 000000