Category: होम

सेल्फीची मस्ती अंगाशी.. बोरणे घाटात युवती कोसळली खोल दरीत..थरारक रेस्क्यू ऑपरेशनद्वारे जवानांनी दिले जीवदान !

सातारा : जिल्ह्यातील ठोसेघर-सज्जनगड परिसरात बोरणेि घाटात एक तरुणी सेल्फी काढत असताना दरीत कोसळली होती. या तरुणीला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने बाहेर काढले. ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात आज…

मुसळधार पावसात कल्याणमधील आधारवाडी, गांधारे रोड परिसरात तीव्र पाणी टंचाई;

महागड्या टँकरच्या पाण्यावर रहिवासी अवलंबून   कल्याण : मुसळधार पाऊस सुरू असताना कल्याण पश्चिमेतील नवीन कल्याण म्हणून विकसित झालेल्या आधारवाडी, गांधारे रोड, वसंती व्हॅली परिसरात गेल्या दहा दिवसांपासून कमी दाबाने…

ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेचा खोळंबा

कल्याण : ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने खोळंबा झाला आहे आणि ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल…

रिक्षाचालकांकडून आकसापोटी राजकीय आरोप : संजय वाघुले

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असून, वाहतूक पोलिस व आरटीओच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. रेल्वे स्टेशनच्या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे दोन…

माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

ठाणे : श्री संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच माळी समाज स्नेह संमेलन एनकेटी हॉल, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा…

संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली बेक केमिकलमध्ये १५ हजारापर्यंत पगारवाढीचा करार

अनिल ठाणेकर     ठाणे : जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली बेक केमिकल प्रा. लि., एम.आय.डी.सी., धाटाव, रोहा या कंपनीतीलकामगारांना रुपये १२,०००/- ते १५,०००/- एवढा भरघोस पगारवाढीचा…

रामशेठ ठाकूर व आ. प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक वसा जपला-रवीशेठ पाटील*

अशोक गायकवाड     पनवेल : आपल्या खिशातील पैसे खर्च करून समाजोपयोगी कामे करणारे मोजकीच आहेत मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे…

माविआचा जागावाटपासाठीचा मुहुर्त ठरला

 २० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे मुंबईत येणार स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभेसाठी अवघे तीन महिने शिल्लक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही या निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यात मविआने मात्र…

बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार ७२ जणांचा मृत्यू,१०० हून अधिक जखमी

ढाका : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसक घटनेत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेही या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.  पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी अहसहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले होते. मात्र, यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. याशिवाय काही आंदोलनकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह या भागातील काही कार्यालय आणि आस्थापनांवरही हल्ले केले. विशेष म्हणजे काही आंदोलक लाठ्या-काठ्या घेऊन शाहबाग चौकात जमले, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर आता बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यूची घोषणा केली आहे. तसेच इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर भारत सरकारने बांगलादेशमधील भारतीयांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी केला आहे. बांगलादेशमधील भारतीय नागरिकांना कोणतीही मदत हवी असल्यास +88-01313076402 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन भारतीय दुतावासाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सरकारी नोकऱ्यांसाठी असलेल्या आरक्षणाची पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केले होते. यावेळीसुद्धा बांगलादेशमधील विविध भागात हिंसासाचाराच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये जवळपास २०० जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हा आरक्षणासंदर्भातील सरकारचा निर्णय रद्द केला होता.