Category: होम

आदेशाची अंमलबजावणीत न झाल्यास ‘आव्हान याचिका’

धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांचा ठामपा आयुक्तांना इशारा !   ठाणे, मासुंदा तलावाभोवती कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यासंदर्भातील, ठाणे सत्र न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास, ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात ‘आव्हान याचिका’ दाखल करावी लागेल, असा इशारा धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना दिला आहे. ठाणे शहरातील काही जागृत नागरिकांनी, वर्ष-१९९७ मध्ये मासुंदा तलावाला पडलेल्या समाजकंटकांच्या विळख्याबाबत, ठाणे सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सदर खटला ठाण्यातील सुप्रसिद्ध वकील प्रशांत पंचाक्षरी यांनी लढला होता. त्यावर, १९ डिसेंबर १९९८ रोजी, न्या. व्ही.डी. देशमुख यांनी, मासुंदा तलावाभोवती सहा महिन्यांच्या आत, कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यात यावेत, याबाबतचा आदेश, ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिला होता. तसा ठरावदेखील ठाणे महापालिकेच्या तत्कालीन महासभेत संमत करण्यात आला होता. मात्र न्यायालयीन आदेशाकडे २६ वर्षानंतरही महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचे नागरिकीकरण प्रचंड वाढल्यामुळे, ठाणे शहर मोठ्याप्रमाणात फोफावले. परिणामी, ठाण्यात झपाट्याने विकासकामे सुरु झाली, जी अद्यापही सुरुच आहेत. यामुळे आपसूकच सोयी-सुविधांच्या बाबतीत प्रशासनावर ताण पडून, मूळ ठाणे शहरातील महत्त्वाच्या बाबींकडे ठाणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले. शेजारच्या तरण तलावातील पाणी, मासुंदा तलावात सोडले जात असल्याने ते दुषित तर होतेच, त्याचबरोबर जेल तलावाच्या शेजारील पाण्याच्या टाकीतील पाणीदेखील, त्याच तलावात सोडले जाते. शिवाय घोसाळे तलावाच्या काठावर काही अर्धनग्न अवस्थेतील नागरिक झोपलेले असतात. अस्वच्छतेसोबतच आता, तलाव परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्यामुळे, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फक्त मासुंदा तलावच नव्हे तर ठाणे शहरातील इतरही तलाव धोकादायक अवस्थेत आहेत. मासुंदा तलावाची गर्दुल्ल्यांपासून सुटका होणे हे गरजेचे आहेच; पण, त्याचसोबत तलावाची जैवविविधता जपण्यासाठी देखील, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत. मासुंदा तलावाचा परिसर हा, स्वच्छ रहावा यासाठी, आतापर्यंत अनेकदा तलावाचे सुशोभिकरण करण्यात येऊन, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. यामुळे मासुंदा तलावाभोवती कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यासंदर्भातील, ठाणे सत्र न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास, नाईलाजास्तव ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात ‘आव्हान याचिका’ दाखल करावी लागेल, असा इशारा नितीन देशपांडे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. ०००००

 कोट्यावधींची संपत्ती गिळंकृत करण्यासाठी अनैतिक संबंधातून शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांचा झाला खून !

सागर शिवाजीराव जोंधळे यांची पोलीसांकडील तक्रारीत कारवाईची मागणी अनिल ठाणेकर   ठाणे : गीता खरे व चार साथीदारांनी मिळून शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची कोट्यवधींची संपत्ती गिळंकृत करण्यासाठी आणि अनैतिक संबंधांतून खून केल्याची तक्रार शिवाजीराव जोंधळे यांचे सुपुत्र सागर शिवाजीराव जोंधळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे, डोंबिवली (पश्चिम) येथे दाखल केली आहे. हत्या करण्यापूर्वी  शिवाजीराव जोंथळे यांना, कथीत ब्लु फील्म व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच उपचारात ढिलाई करुन त्यांचा गीता खरे, वर्षा प्रीतम देशमुख,  प्रीतम अनिल देशमुख, हर्षकुमार राजेश खरे, स्नेहा हर्षकुमार खरे यांनी मिळून शारिरीक व मानसिक छळ केल्याचाही आरोप सागर शिवाजीराव जोंधळे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. डोंबिवली, कल्याण, आसनगाव परिसरात व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाॅलिटेक्निकल काॅलेज उघडून कमर्शियल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांचे नुकतेच यकृताच्या कर्करोगाने मृत्यु झाला होता. पण आता हा मृत्यु नैसर्गिक नसून त्यांचा गीता खरे व त्यांचे चार साथीदार वर्षा प्रीतम देशमुख,  प्रीतम अनिल देशमुख, हर्षकुमार राजेश खरे, स्नेहा हर्षकुमार खरे यांनी मिळून हत्या केल्याची तक्रार पोलीस उपायुक्तांकडे सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दाखल केल्याने शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्युप्रकरणात नवीनच ट्विस्ट आला आहे. सागर शिवाजीराव जोंधळे आपल्या तक्रारीत म्हणतात की, शिवाजीराव जोंथळे यांचा विवाह वैशाली जोंधळे यांच्याशी झाला. त्यांना सागर, देवेंद्र, वैष्णवी व श्वेतांबरी अशी चार अपत्ये आहेत. सागर जोंधळे यांचे आजोबा सखाराम जोंधळे यांनी डोंबिवली येथे समर्थ समाज ट्रस्टच्या माध्यमाने शैक्षणिक संस्था सुरु केली. याचे कामकाज आपले वडील शिवाजीराव जोंधळे हे पहात होते. गीता खरे ही विवाहिता जोंधळे यांच्या संस्थेत शिक्षिका म्हणून  रुजू झाली. त्यावेळी त्यांना हर्षकुमार खरे नावाचे अपत्य होते. कालांतराने गीता खरे व शिवाजीराव जोंधळे यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले व या संबंधातुन त्यांना वर्षा देशमुख हे अपत्य झाले. अनैतिक संबंधामुळे शिवाजीराव यांची पत्नी व मुले आणि शिवाजीराव यांच्यात वादविवाद होऊन हे प्रकरण फौजदारी व दिवाणी न्यायालयात गेले. पण शिवाजीराव यांना यकृताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर वाद बाजुला ठेऊन पत्नी व मुलांनी शिवाजीरावांना नामवंत वैद्यकीय इस्पितळात दाखल करुन, शस्त्रक्रियेनंतर ओषधोपचार करुन काळजी घेतली.पण शिवाजीरावांचा उपचार सुरु असतानाच जबरदस्तीने डिस्चार्ज घेऊन गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी शिवाजीरावांना आपल्याकडे नेले आणि पत्नी व मुलांना भेटण्यास मज्जाव केला. याच काळात शिवाजीराव जोंधळे हे आजारपणामुळे मानसिक व शारीरिकदृष्ट्या विकलांग असल्याचा गैरफायदा घेऊन, त्यांची कथीत ब्लु फील्म व्हायरल करण्याची त्यांना धमकी देऊन शिवाजीराव यांच्याकडून आसनगाव व इतर ठिकाणच्या कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनींचे बनावट, बेकायदेशीर बश्रीसनत्रे व खरेदीखत करुन घेतले. तसेच प्रत्येकी २०० किलो सोन्याच्या वीटा, ५०० किलो चांदीच्या वीटा व चांदीचे देव, ७५ लाख रुपयांचे हिरे, १ कोटी रुपयांची घड्याळे, २५ लाख रुपयांचे महागातले पेन, ५ लाख रुपयांचे गाॅगल, १० ते १५ लाख  रुपयांच्या दारुच्या बाटल्या, २० ते २५ कोटी रुपयांची रोकड आदी करोडो रुपयांची संपत्ती गिळंकृत केली. गीता खरे व त्यांचे चार साथीदार आपल्या उपचाराबद्दल जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करीत असल्याचे शिवाजीराव हे सागर गोंधळे यांना सांगत असत. डाॅक्टरांनी शिवाजीरावांना यकृताचे प्रत्यारोपन करण्याचा सल्ला दिला होता. आणि यासाठी सागर जोंधळे यांनी यकृताचा काही भाग दान करण्याची तयारी दाखविली होती. यामुळे शिवाजीराव आनंदी झाले होते. तसेच सागर जोंधळे यांना आसनगाव येथील काॅलेजच्या विघ्नहर्ता ट्रस्टचे अध्यक्ष बनविण्याचे कबूल केले होते. मात्र हे सारे गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांना कळताच शिवाजीराव यांची करोडो रुपयांची संपत्ती गिळंकृत करता येणार नाही व आपले मनसुबे साध्य होणार नाहीत हे ओळखून डाॅक्टरांचा सल्ला न जुमानता, शिवाजीरावावर यकृत ट्रान्स्फर करण्याची शस्त्रक्रिया त्यांनी होऊ दिली नाही. तसेच उच्च दर्जाच्या रुग्णालयात दाखल न करता त्यांना घरी डांबून ठेवले आणि त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच कुटूंबिय, नातेवाईक व शाळेतील कर्मचारी यांनी शिवाजीराव यांना भेटू न देता शिवाजीरावांचा मृत्यु घडून यावा, असा सापळा रचला आणि गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी रचलेल्या कटाप्रमाणे अखेर उपचाराअभावी शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यु झाला. यामुळे गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची कोट्यवधींची संपत्ती गिळंकृत करण्यासाठी आणि अनैतिक संबंधांतून खून केल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे येथे सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दाखल केली आहे. गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांवर भा.द.वि. कलम ३०४, ३४७, ३८३, ३८४, ३८७, ४२० अन्वये व सह कलम ३४, १२० (ब) प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत त्यांनी केली आहे. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त झोन ३ कल्याण यांनाही या तक्रारीच्या प्रती पाठविलेल्या आहेत, अशी माहिती सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दिली आहे. 0000

मतपत्रिकाद्वारे मतदान होणार असून कोकण पदवीधर मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेणे गरजेचे – किशन जावळे

  अशोक गायकवाड रायगड : कोकण विधान परिषद पदवीधर मतदान संघ निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत मतपत्रिका द्वारे मतदान होणार आहे. मतदारांनी या मतदानाची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे, या…

निरामय जीवनासाठी योग महत्वाचा – चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी : योग ही जीवन प्रणाली असून, ती अंगीकारली पाहिजे. निरामय जीवनासाठी योग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामध्ये सातत्य ठेवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि योग असोसिएशन यांच्या सहकार्याने शुक्रवारी,(दि.२१) जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक निवास यादव, स्काऊट गाईड संघटक रमाकांत डिंगणे आदी उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन योगदिनाचा प्रारंभ करण्यात आला. रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केले. राजेश आहिरे यांनी सूत्रसंचलन करत, उपस्थितांकडून योगासने करवून घेतली. ताडासन, भद्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, मंडुकासन, सशांकासन, मकरासन, शवासन या आसनांबरोबरच कपालभाती, अनुलोम विलोम, शीतली आदी प्राणायामचे प्रकारही उपस्थितांनी केले. सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेते स्वस्ती पावसकर, स्वरा मांडवकर, पूर्वा साळवी, आयुषी क्षेत्री, पियुषा पाटील, सोहम बंडबे, वंश शिंदे, वरद पवार, राधिका पेडणेकर, आदिती चव्हाण, रुबीना सय्यद, श्रावणी शिवगण, प्रणिता लवटे, सांची धनावडे, रत्नेश आडविरकर, विनायक डांगे, निखिल चव्हाण, संकेत शिंदे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. अ. दा. नाईक हायस्कूल, अ. के, देसाई हायस्कूल, स्काऊट गाईडचे विद्यार्थी आणि शिक्षक आजच्या योगदिनात सहभागी झाले होते. ००००

उत्तम आरोग्यासह विश्वशांती साठी योग आवश्यक : राज्यपाल रमेश बैस*

अशोक गायकवाड   मुंबई : योग ही भारताची जगाला अनमोल देणगी आहे. योगाच्या अमूर्त ठेव्याचे रक्षण करणे व त्याचा प्रचार – प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. शारीरिक, मानसिक…

डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्थलांंतरित आरक्षित तिकिटांचे केंद्र सज्ज

डोंबिवली : रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी या पुलाने बाधित होत असलेले फलाट क्रमांंक एकवरील जुने प्रवासी आरक्षित तिकिटांचे केंंद्र फलाटाच्या कल्याण…

शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ११ च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

ठाणे : शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज गोकुळ नगर येथील वर्धमान हॉल येथे सकाळी 9 ते…

ठाणे महापालिका व अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन उत्साहात साजरा

ठाणे, आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त्‍ ठाणे महानगरपालिका व अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपायुक्त मीनल पालांडे, ठाणे जिल्हा…

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळाच्यावतीने डोंबिवलीत व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रम साजरा

ठाणे : आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्राच्या वतीने डोंबिवलीतील नाना नानी पार्क, मानपाडा रोड या ठिकाणी व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात रा.वी. नेरुरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे…

जबाबदारी स्विकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – प्रा. वर्षा गायकवाड

नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन मुंबई : डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. नीट परीक्षेचा पेपऱ फुटल्याने देशभरातील २४ लाख…