Category: होम

रशिया-युक्रेन युद्ध थांबवणारे मोदी पेपरफुटी थांबवू शकत नाही

राहुल गांधींची खोचक टीका नवी दिल्ली : देशात विश्वगुरू म्हणून स्वताची प्रतिमा निर्माण करणारे, रशिया – युक्रेन युद्ध थांबवल्याची वल्गना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोखो युवकांचे भविष्य ठरविणारी नीट…

ईडीला न्यायालयाचा दणका, अरविंद केजरीवालांना जामीन

नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज ईडीला दणका देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये नियमित जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याआधी…

महायुतीत शिमगा सुरुच

रामदास कदमांचा भाजपाला इशारा, १०० जागा द्या, नाही तर २८८ लढू ! मुंबई: होळी संपली असली तरी महायुतीत अजुनही जोरदार शिमगा सुरु आहे. कधी राष्ट्रवादी तर कधी शिंदेंच्या शिवसेनेतले नेते भाजपाविरोधात…

नैराश्य घालवण्याचा एक नवा मार्ग…

काहीतरी नवीन… श्याम तारे नैराश्य ज्यांना सतावते त्याचे जीवन कठीण होते आणि त्यातून मार्ग म्हणजे मनोविकार तज्ञ यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधे घेत राहणे हा एकच असतो. नैराश्य कोणत्याही कारणाने…

आंतरराष्ट्रीय योग दिन

आज २१ जून, आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत २१ जून हा दिवस…

कसे आहेत तुमचे खासदार?

अर्थनगरीतून ॲड. शिवाजी कराळे निवडणुकांमध्ये उभ्या राहणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करता धनदांडगे आणि बाहुबली उमेदवारांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येते. खेरीज त्यांची संपत्ती, मालमत्ताही सातत्याने वाढताना दिसत आहे. राजकीय, सामाजिक…

नाना पटोले यांच्या कृत्याचा पनवेलमध्ये जाहीर निषेध

पनवेल : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय धनगर समाजातील एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकूमशाही आहे याची प्रचिती आली आहे. नाना पटोले यांची नेहमीच दादागिरी सर्व राज्याला सर्वश्रुत आहे, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांनी केल्याला कृत्याचा पनवेलमध्ये आज भाजपच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पनवेल भाजपच्या कार्यालयाजवळ महिला मोर्चा व युवा मोर्चाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जाहीर निषेध निदर्शनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सीता पाटील, नीता माळी, मोनिका महानवर, वृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री वावेकर, संध्या शारबिद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, दिपक शिंदे, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, रोहित जगताप, सुहासिनी केकाणे, विद्या तामखेडे, खारघर महिला महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, स्वप्निल खबाले ,वैभव भगत, राजेश कराळे, अतुल बडगुजर, मधुकर उरणकर, उपेंद्र मराठे, शोभा सातपुते, अनिता रणदिवे, कोमल कोळी, मयूर कदम, विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो मात्र नाना पटोले यांनी चक्क आपले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले. या कृत्याचे पडसाद राज्यभर उमटत असताना नाना पटोले यांनी त्या कार्यकर्त्याने फक्त पायावर पाणी ओतले आणि मी पाय धुतले अशी सारवासारव केली मात्र प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये कार्यकर्ता पाय धूत असल्याचे स्पष्ट झाले असताना नाना पटोले तोंडघशी पडले. त्यामुळे त्यांच्या या खोट्या वृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आल्या. 00000

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा. वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. टाटा सामाजिक संस्थेने प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. 00000

पालघरमध्ये जोर”धार”

पालघर : पालघर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. उपनगरीय गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या, तर काही ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग पाण्याने भरल्याने येण्या-जाण्याचा मार्गही बंद झाला होता. केळवे रोड रेल्वे स्थानक मार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक बंद होती. पालघरमध्ये बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी पावसाने उघडीप दिल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. पालघर परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १३० मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ४५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे काही काळ रस्त्यावर पाणी आले. सकाळच्या वेळी काही ठिकाणची वाहतूक बंद होती. केळवे रोड परिसरात पुलाखालून जोरदार पाणी वाहत होते. उमरोळी येथे रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी शिरल्याने येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले, तर काहींना दांडी मारावी लागल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. बोईसर रेल्वे स्थानकात पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्याने रेल्वे वाहतूक मंदगतीने सुरू होती.

राज्‍यातील घरकामगरांना न्याय द्यावा!

दादरमधील हक्‍क सभेत हजारो घरकामगारांची उपस्‍थिती   धारावी : राज्यातील लाखो घरेलु कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मंगळवारी झालेल्‍या हक्‍क सभेत करण्यात आली. राज्यातील १२०० घरकामगार, प्रतिनिधींची यावेळी उपस्‍थिती होती.घरकामगारांना सामाजिक न्याय, संरक्षण, आरोग्य विमा आणि सन्मानाचे निवृत्तीवेतन मिळावे, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ कायद्यांतर्गत सुधारणा, घोषित योजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीय घरकामगार चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने या हक्क सभेचे नियाेजन करण्यात आले होते. घरकामगार हक्क सभेला राज्य मानव अधिकार आयोगाचे (स्टेट ह्युमन कमिशन) एम. ए. सयीद, राज्य महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त विजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मागण्यांसंदर्भात राज्य सरकारला शिफारस व सूचना करण्याचे आश्वासन दिले असल्याचे राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी सांगितले. 0000