Category: होम

महसूल सप्ताह नियोजनपूर्वक यशस्वी करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : महसूल विभागामार्फत१ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच विविध योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत. शासननिर्णयानुसार सर्व तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहाचे नियोजनपूर्वक व समन्वयाने यशस्वी आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिले. सप्ताहाच्या पूर्वतयारीची आढावाबैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, श्रीकांत गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, सहायक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ०१ ते ०७ ऑगस्ट  या कालावधीत राज्यभरात ‘महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहनिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, २ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, ३ ऑगस्ट रोजी ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, ४ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, ५ ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”, ६ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा” आणि ७ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 0000

७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना शासनाकडून मोफत वीज

मुंबई, दि. २९ : शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ शासनाने लागू केली आहे. आता ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. जागतिक हवामान…

पर्यटन विभागाचे आता एकच बोधचिन्ह व घोषवाक्य-गिरीश महाजन

मुंबई : पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्था पर्यटन विभागाच्या अधिनस्त असल्या तरी त्यांचे बोधचिन्ह, घोषवाक्य यामध्ये तफावत होती, ती आता दूर करण्यात आली आहे.…

13 ऑगस्टला कोकण विभागीय पेन्शन अदालत

नवी मुंबई : कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. या महिन्यातील विभागीय पेन्शन अदालत 13 ऑगस्टला सकाळी 11.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन…

अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

ठाणे : सध्याचे युग हे डिजीटलचे असून ठामपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजीटलच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमाची माहिती व्हावी व त्याचा वापर त्यांना अभ्यासासाठी व्हावा यासाठी अक्षयपात्र फाऊंडेशनच्यावतीने ठाणे महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या…

अर्नाळा नजीकच्या अनधिकृत रिसॉरेट्सवर महानगरपालिकेचा हातोडा

मुख्यमंत्री यांच्या निर्देशांची महानगरपालिकेकडून तातडीने अंमलबजावणी     मुंबई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉरेट्सवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्टस जमीनदोस्त करण्याचे निर्देश…

ठाणे मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी काढले १७७४ दावे निकाली

ठाणे : मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील १७७४ प्रलंबित दावे लोक अदालत मध्ये निकाली काढण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. के. फोकमारे आणि जेष्ठ विधीज्ञ सुनील रवानी यांच्या द्वीपॅनल ही कामगिरी…

महापालिका अधिकारी शैला लोखंडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभाग कार्यालय येथील प्रशासकीय अधिकारी शैला मधुकर लोखंडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा बुधवार 31 जुलै संध्याकाळी सहा वाजता, सावतामाळी भुवन हॉल, भायखळा स्टेशन पूर्व समोर, मुंबई…

महसूल सप्ताहामध्ये नागरिकांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत – रवींद्र चव्हाण

अशोक गायकवाड     पालघर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’, ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’, ‘मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना’ व इतर महत्त्वाच्या योजना राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना…

 शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून बंद

मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता     मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला शीव उड्डाणपूल गुरुवार, १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला जाणार आहे. हा उड्डाणपूल…