Category: होम

शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती – अमोल यादव

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय  निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार २६ जून २०२४ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान होणार आहे.  या निवडणूकीच्या अनुषंगाने मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी श्रीमती. अंशु सिन्हा,भाप्रसे (एमएच:99) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती. सिन्हा यांचा दूरध्वनी क्रमांक 9920793676 असून त्यांचा ईमेल आयडी anshus72@yahoo.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय, पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत श्रीमती. सिन्हा यांच्यांशी संपर्क साधता येईल. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एन नवीन सोना, भाप्रसे (एमएच:2000) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  श्री. सोना यांचा दूरध्वनी क्रमांक 8591248668 असून त्यांचा ईमेल आयडी nawin.sona@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत श्री. सोना यांच्यांशी संपर्क साधता येईल.मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर, भाप्रसे (एमएच:2007) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. कल्याणकर यांचा दूरध्वनी क्रमांक 9324565110 असून त्यांचा ईमेल आयडी mahendrakalyankar@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत डॉ. कल्याणकर यांच्यांशी संपर्क साधता येईल.

आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील गायमुख चौपाटीजवळील विसर्जन घाट आणि दशक्रिया घाट या कामांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना कामासंबंधी सूचना दिल्या. यावेळी, ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र समन्वयक साजन कासार, विभाग प्रमुख रवि घरत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. मोहन भागवतांचे चिंतनीय विचार…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी काल नागपुरात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारोहात जे काही विचार व्यक्त केले ते या देशातील सर्वच सुजाण नागरिकांना विचार करायला लावणारे आहेत. देशात…

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची  लक्षणीय कामगिरी

 द.आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई : दक्षिण अफ्रिकेतील 86.6 किलोमीटर अंतराच्या जागतिक स्तरावरील मानाच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभागी होत निर्धारित वेळेच्या आधीच ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात अंतर पूर्ण करून नवी मुंबई शहराचा नावलौकिक जगभरात उंचावला आहे. कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील एक नामांकित स्पर्धा असून तब्बल 86.6 किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण करताना खेळाडूंचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी होऊन वेळेत स्पर्धा पूर्ण करणे हे प्रत्येक मॅरेथॉन धावणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरिता खेळाडू कठोर मेहनत घेत असतात. यावर्षी 9 जून रोजी ही 97 वी मॅरेथॉन डर्बन येथून सुरू होऊन पीटरमार्टिझबर्ग शहरात संपन्न झाली. यावर्षीची मॅरेथॉन अपरन अर्थात चढणीची होती. एक वर्ष डाऊन रन आणि एक वर्ष अपरन अशी कॉम्रेड मॅरेथॉन असते. यावर्षी 5923 फूट उंचीचे 86.6 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 74 हून अधिक देशातील 22 हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये 366 भारतीय स्पर्धकांचा समावेश होता. समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर असलेल्या हे अंतर पार करताना 20 ते 25 टेकड्या चढाव्या लागतात. ही स्पर्धा 12 तासांच्या आत पूर्ण करावी लागते. डॉ. कैलास शिंदे यांनी 11 तास 10 मिनिटे 56 सेकंदात हे अंतर पार करून आपली शारीरिक क्षमता सिध्द केलेली आहे. त्यासाठी मागील सहा महिन्यांपासून डॉ. कैलास शिंदे कसून सराव करत होते. प्रामुख्याने सुट्टीच्या दिवशी त्यांनी रात्री व पहाटे सराव करून मॅरेथॉनच्या अंतराचे व वेळेचे व्यवस्थित नियोजन केले. आफ्रिकेसारख्या देशात धावायचे असल्याने तेथील भौगोलिक परिस्थितीचाही विचार करून त्यांनी तशा प्रकारे सरावावर भर दिला. महत्त्वाचे म्हणजे आपल्या सरावाचा कोणताही परिणाम त्यांनी दैनंदिन कामकाजावर होऊ दिला नाही. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज त्यांनी आयुक्त म्हणून संपूर्ण क्षमतेने पाहिलेच शिवाय लोकसभा निवडणुकीची निरीक्षक म्हणून बिहारमध्ये जबाबदारी पार पाडत असतानासुद्धा धावण्याच्या सरावात खंड पडू दिला नाही. जगातील अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर समजल्या जाणा-या या जागतिक मॅरेथॉ़नमध्ये सहभागी होणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले असून गतवर्षीपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी आपली कामगिरी आणखी उंचावली आहे. आधी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक व त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी आणि अत्यंत व्यस्त दिनक्रमातही त्यांनी आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवला आहे. ध्येय पार करण्याची जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि योग्य नियोजन याच्या बळावर त्यांनी हे यश मिळविेले असून या जागतिक पातळीवरील कॉम्रेड मॅरेथॉनमधील यशाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व प्रशंसा करण्यात येत आहे.

एकीकडे झटका, दुसरीकडे इतिहास!

विश्लेषण अजय तिवारी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील निवडणुकांचे निकाल काँग्रेसला अडचणीत आणणारे ठरले. अरुणाचलमध्ये जनतेने नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचे आणि पेमा खांडू सरकारच्या आठ वर्षांच्या कार्याचे मूल्यमापन करून मतदान केले,…

स्वस्तिक संघाला विजेतेपद

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भाईंदर : येथे नुकत्याच  झालेल्या बालयोगी श्री सदानंद महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत  स्वस्तिक क्रीडा मंडळाने विजेतेपदाचा मान मिळवला. स्वस्तिकने‌ उपांत्यफेरी मध्ये ओवळी क्रीडा  मंडळाचा आरामात पराभव केला. तर  अंतिम सामन्यामध्ये त्यांनी…

अर्धवट रस्त्याच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी !

सलमान पठाण ठाणे : नुकत्याच मुंबई आणि ठाण्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं बघायला मिळालं. कापूरबावडी ते बाळकूम रोडवरील कोलशेतकडे जाणाऱ्या नाक्यावर मोठया  प्रमाणात पाणी साचले आहे.  अवघ्या १ तास पडलेल्या पावसातच  इथे पाणी साचलेले दिसले. या साचलेल्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात ट्राफिक  जामचा वाहनचालकाला त्रास होत आहे. गाडी चालवताना ड्रायव्हयर्सना योग्य ती खबरदारी घ्यावी लागत आहे.  महत्वाचं म्हणजे  याठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. आणि…

राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ धोरणावर हरकती पाठवा – डॉ.प्रशांत नारनवरे

अशोक गायकवाड रायगड : राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ धोरणाचा प्रारुप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत हरकती पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे,आयुक्त,महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश समिती गठीत करण्यात आली होती. या गठीत समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला असून त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. या बाल धोरण व कृती आराखडा यामध्ये आवश्यक बाबी,सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा-२०२२ च्या संदर्भाने नागरिकांच्या हरकती व सुचना दिनांक ३० जून २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत महिला व बालविकास आयुक्तालय,२८ राणीचा बाग, जुन्या सर्कीट हाऊस जवळ, पुणे-०१ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.om या इमेलवर पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे,आयुक्त,महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे. 0000

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती

अशोक गायकवाड* नवीमुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर, भाप्रसे (एमएच:२००७) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कल्याणकर यांचा दूरध्वनी क्रमांक ९३२४५६५११० असून त्यांचा ईमेल आयडी mahendrakalyankar@gmail.com…

उल्हासनगरच्या नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा

उल्हासनगर :  उल्हासनगर येथील नागरिकाना गेल्या चार ते पाच दिवसापासुन दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिवळ्या रंगाचे असुन नागरिक हे पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रध्न उभा ठाकला आहे.…