Category: होम

इमारतीचे छत कोसळून वडील-मुलाचा मृत्यू

मुंबई: पहिल्याच पावसात विक्रोळी येथे रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून त्यात वडील-मुलाचा मृत्यू झाला. याबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहेत. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे रविवारी रात्री ही घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीजवळ नागेश रेड्डी (३८) हे सुरक्षारक्षकाचे काम करत होते. रविवारी रात्रीही ते नेहमीप्रमाणे कामावर असताना त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा रोहित रेड्डी तेथे गेला होता. त्याचवेळी जोरात पाऊस आल्याने दोघेही तेथील छज्जाखाली उभे होते. त्याचवेळी अचानक छज्जाचा काही भाग दोघांच्या अंगावर कोसळला. काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, दोघाना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. शासनाने घटनेची तत्काळ दखल घेत संबंधित विकासकावर कारवाई करावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

लोकसभेवर निवडून येऊनही नारायण राणे यांना डच्चू

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून येऊनही केंद्रीय मंत्रिमंडळातून नारायण राणे यांना वगळण्यात आले. अडीच वर्षांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत राणे फारसा प्रभाव पाडू न शकल्यानेच त्यांना डच्चू देण्यात आल्याचे…

महावितरणाच्या नवीन सबस्टेशन उभारणीसाठी मंजूर निधी वर्ग करण्याचे काम मार्गी लावणार-संजय केळकर

ठाणे : महावितरणाच्या नवीन सबस्टेशन उभारणीसाठी मंजूर निधी झालेला त्वरित संबंधित विभागाला वर्ग करावा यासाठी पाॅवर हाऊस कार्यालयातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आ. संजय केळकर यांची भेट घेतली. आ. संजय केळकर यांनी याबाबत संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले. ठाण्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल येथील जागेवर महावितरणाच्या नवीन सबस्टेशन उभारणी संदर्भात निधी मंजूर झालेला आहे तो त्वरित संबंधित विभागाला वर्ग करावा जेणे करून पुढील कामात सुलभता येईल व काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल या करिता पाॅवर हाऊस कार्यालयातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आ. केळकर यांची भेट घेतली. यावेळी ठाण्यात सबस्टेशन मिळण्याकरिता अधिकाऱ्यांनी विनंती केली. आ. संजय केळकर यांनी याबाबत संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी, महावितरणचे अधिकारी श्री. म्हसणे व श्री. सावरकर यावेळी उपस्थित होते.

विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक हे उद्दीष्ट  ठेवून संघटन मजबूत करा-आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक लढविणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त करुया, हाच संकल्प आपण घेऊया, अशी सदिच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस फक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आनंद परांजपे म्हणाले की, लोकसभा निवडणूक निकालाच्या निमित्ताने कुठेही हताश न होता विधानसभा निवडणुकीसाठी संघटन अधिक बळकट करणे आणि जास्तीत जास्त ताकदीने येणारी विधानसभेची निवडणूक लढणे हे उद्दीष्ट कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. तसेच येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यानी पक्षाचे संघटन शेवटच्या बुथपर्यंत नेण्याचे काम केले पाहिजे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आपण सर्व कार्यकर्त्यांनी करुया, हाच संकल्प आपण घेऊया हीच सदिच्छा सगळ्यांना देतो, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. वनिताताई गोतपागर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. संदेश पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री. प्रभाकर सावंत, श्री. रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य श्री. नितीन पाटील, विधानसभा अध्यक्ष श्री. विजय भामरे, श्री. अजित सावंत, श्री. निलेश कदम, ब्लॉक अध्यक्ष श्री. प्रविण खताळ, श्री. शंकर कोळेकर, श्री. समीर शेख, वॉर्ड अध्यक्ष श्री. साई प्रभू, श्री. रामचंद्र सकपाळ, श्री. सौरभ धुमाळ, महिला पदाधिकारी सौ. मायाताई केसरकर, युवक पदाधिकारी श्री. दिपक पाटील, विद्यार्थी सेल चे पदाधिकारी, अल्पसंख्यांक सेल चे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. हुसेन सर आणि इतर  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नॅप फाऊंडेशचे स्नेहसंमेलन ठाण्यात संपन्न

पालिवाल समाजातील मान्यवरांचा सन्मान एनीग्लो आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधन उत्पादनांचे लाँचिंग ठाणे : ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या नॅप फाऊंडेशच्या वतीने रविवारी उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पालिवाल समाजातील ज्येष्ठ उद्योजक आणि तरुण उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नॅप फाऊंडेशच्या संस्थापक अध्यक्षा निकीता पालिवाल यांच्या `दादीकी पोटली’ मधून निर्मिती झालेल्या एनीग्लो आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन उत्पादनांचे मान्यवरांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. महेश भवन, कासारवडवली, ठाणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला देशभरातून संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार संजय केळकर, डिम्पी बजाज (नागपुर युवती अध्यक्ष भाजपा), श्रीमती शर्मिला, श्री. यशपाल (राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य) श्री. मोहन, श्री.उमेश, श्री. आलोक, श्रीमती सीमा, श्री.दिनेश, श्रीमती अंजना, श्री.राहुल आदी मान्यवर उपस्थित हाते. ज्येष्ठ उद्योजक श्री. बाबूलाल (कोटा) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. नव उद्योजक पुरस्काराने राशि पालीवाल (चंडीगढ), गोपाल (वर्धा), जया (फतहनगर), मयूर भट्ट (भावनगर, गुजरात), भावना (दिल्ली) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिला सक्षमीकरण्याच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून नॅप फाऊंडेशच्या माध्यमातून दादीकी पोटली उपक्रमांतर्गत आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने बनविण्यात आली आहेत. त्याचे लाँचिंग आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जागतिक नेत्रदान दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार आज १० जून, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करणारे सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ. रामचंद्र लक्ष्मण…

वीस हजार रिअल इस्टेट ब्रोकर्सची नोंदणी स्थगित

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट रेग्युलेटरने (महारेरा) वीस हजार रिअल इस्टेट ब्रोकर्सची नोंदणी स्थगित केली. त्यामुळे राज्यातील नोंदणीकृत एजंटची संख्या केवळ 13 हजारांवर आली आहे. नियामकाने 2017 मध्ये मालमत्ता व्यवहारांसाठी मध्यस्थांची नोंदणी…

बंदरामधील खासगी-सार्वजनिक भागीदारीचा हिस्सा ऐशी टक्के करणार

बंदरांमधील सार्वजनिक-खासगी भागीदारीचा (पीपीपी) हिस्सा 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या उद्देशाने सरकार 2024-25 या आर्थिक वर्षात दहा हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे बंदर मुद्रीकरण शोधणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की बंदरे,…

अखंड तेवाव्यात नेत्रज्योती

दृष्टीदान दिन उर्मिला राजोपाध्ये हे जग सुंदर आहे. मात्र ते दाखवणारे डोळेच अधू असतील, क्षतीग्रस्त असतील तर बाहेर लख्ख उजेड असूनही व्यक्तीच्या आयुष्यात अंधाराची पोकळीच भरुन उरते. अनेकांच्या आयुष्याला वेढून…