Category: होम

मतदान साहित्य पोहोचले मतदान केंद्रांवर !

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील भिवंडी, कल्याण,  ठाणे या तीनही लोकसभा मतदारसंघातील कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राधर पोहचले आहेत. मतदान साहित्य वाटप आणि ते मतदान केंद्रांवर घेऊन जाणे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तम असे नियोजन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना* बजावता येणार मतदानाचा हक्क – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील २३ भिवंडी, २४ कल्याण व २५ ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण ६६०४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.  या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात आले आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघ   – एकूण मतदार – २०८७६०४ (पुरुष मतदार-११२९७१४, महिला मतदार- ९५७१९१, तृतीय पंथी मतदार-३३९, सेवा मतदार-३६०). भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68). शहापूर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39). भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16) भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14) कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140). मुरबाड विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83). कल्याण लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579). अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).…

‘वोट जिहाद’ला ‘वोट यज्ञ’ने चोख उत्तर देणार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडीत इशारा भिवंडी : लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून `वोट जिहाद’ घडविले जात आहे. त्याला `वोट यज्ञ’ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त `वोट’ एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्ये `समिधा’ म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजुरफाटा येथे आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अनुसुचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष व श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, भाजपाचे आमदार महेश चौघुले, निरंजन डावखरे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनोज काटेकर, भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, मनसेचे मनोज गुळवी आदींसह महायुतीचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी मतदान करा, असे कोणी सांगत असेल, त्यांना `जो मोदी का नही, वो हमारे काम का नही’, असे उत्तर द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाभारतातील लढाईचा संदर्भ देत इंडी आघाडीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे असे कौरव जमा झाले असून, या लढाईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पांडवांकडून शस्त्राने नव्हे तर `वोट’ ने उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. यंदाची निवडणूक ही जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा निवडीची आहे, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले भिवंडी शहराचा २०१४ पासून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व भाजपाचे आमदार महेश चौघुले यांच्याकडून विकास केला जात आहे. एकेकाळी भिवंडी हा अप्रगत भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, येथील नागरिकांनी भाजपाला मत दिल्यामुळे भिवंडी शहराचा चेहरामोहरा बदलला, असे प्रतिपादन श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्यामा-श्याम सत्संग समितीचा भिवंडीत कपिल पाटील यांना पाठिंबा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये भिवंडीतील अग्रगण्य श्यामा-श्याम सत्संग समितीने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच गेल्या दहा वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या कार्याबद्दल आनंद व्यक्त करून मला पाठिंबा दिला. या वेळी समितीचे अध्यक्ष श्यामबाबू गुप्ता, उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, महासचिव सत्यनारायण लोहिया, सचिव प्रशांत धुमाळ, खजिनदार भरत शहा यांच्यासह समितीचे सत्संगी उपस्थित होते. चौकट फडणवीसांच्या ११५ व्या सभेने भिवंडीत प्रचाराचा समारोप देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत देशभरासह महाराष्ट्रात ११५ सभा घेतल्या. भिवंडीतील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारावेळी झालेल्या सभेत श्री. फडणवीस यांनी ही माहिती दिली. तसेच राज्यात महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.

भिवंडीतील मतदान केंद्रावर होणार आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन

महिला, युवा, दिव्यांग या नाविन्यपूर्ण मतदान केंद्रावर होणार मतदान – अशोक शिनगारे अनिल ठाणेकर ठाणे: २० मे रोजी होत असलेल्या लोकसभा २०२४ निवडणुकांसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मेहनत घेत असून महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्र एकसारखी असावीत यासाठी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी १ या प्रमाणे १८ केंद्रे सखी मतदान केंद्रे, १८ युवा मतदान केंद्रे, १७ दिव्यांग केंद्रे व काही मतदान केंद्रे हे आगरी –कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारी करण्यात येणार आहे. महिला मतदान केंद्रावर संपूर्ण पथक हे  महिलांचे असणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष,तीन मतदान अधिकारी, शिपाई म्हणून महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी थीम गुलाबी रंग ठरविण्यात आली आहे. यामध्ये महिला मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व महिला कर्मचारी यांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत. युवा मतदान केंद्रावर सर्व युवा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी पिवळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुध, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी पिवळया रंगाचे वस्त्र (टिशर्ट/शर्ट) परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या युवा यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, अभिनेता यांचे फोटो लावण्यात येणार आहेत,ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये १७ मतदान केंद्रांवर दिव्यांग कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी फिक्कट निळा/आकाशी रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी फिक्कट निळा/आकाशी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्र, अभिनेता, लेखक यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. भिवंडी ग्रामिण मतदार संघामधील सारंग या गावातील मतदान केंद्र क्र.३२१ हे विशेष (युनिक) मतदान केंद्र असणार आहे. हे मतदान केंद्र ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीने सजविण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणा-या टोपल्या, बोट, रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी हे पारंपारीक कोळी वेशभुषेत असतील. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केले आहे.

सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांचा तिरुपती येथे संगीत भजनाचा कार्यक्रम

अशोक गायकवाड अलिबाग :रोहा तालुक्यातील दापोली गावचे रहिवासी व अलिबाग येथे वास्तव्यास असलेले, सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम २७ मे ला दुपारी आंध्र प्रदेशातील ‘ तिरुपती तिरुमाला देवस्थान’ येथे सादर होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. तिरुपती देवस्थान तर्फे प्रायोजित या भजनाचे थेट प्रक्षेपण ‘एस व्ही बी सी’ या चॅनेल वर ” नाद निराजमन ‘ या कार्यक्रमातून दुपारी ठीक ३:१० ते ४:३० वा. पर्यंत सादर होणार आहे.जेष्ठ भजन गायक पं. हरिश्चंद्र बुवा लोणारकर यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित संगितबद्ध केलेल्या विविध भजन रचना या कार्यक्रमात सादर केल्या जातील. समर्थ बुवांना हार्मोनियम वर साथ नरेशबुवा कडू, तबला साथ जगदीश पाटील-लोणारकर करतील . तरुण , होतकरू कलाकार विराज म्हात्रे ( मानी ) हे पखवाज वर साथसंगत करतील. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. अनेक प्रतिष्ठित देवस्थान ठिकाणी या मंडळाने भजन सेवा सादर केल्या आहेत. श्रीविठ्ठल रखुमाई देवस्थान पंढरपूर, श्री अंबाबाई देवस्थान कोल्हापूर, श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, ख्वाजा हजरत मोईनउद्दीन चिस्ती दर्गा अजमेर- राजस्थान, श्री अगस्ती आश्रम अकोले, महर्षी चांगदेव देवस्थान पुणतांबा, ई. चा समावेश आहे. तिरुपती देवस्थान मध्ये कार्यक्रम सादर करण्याची ही सहावी वेळ असून मुख्य रंगमंचा वर तिसऱ्यांदा मिळालेल्या या भजन संधी बद्दल वायशेत येथील श्री. गंगादेवी भजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी देवस्थान चे आभार व्यक्त केले आहेत व अधिकाधिक भजन रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

मतदार कामगार अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे निर्देश मुंबई,  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या…

सोळा जीव घेतल्यानंतरही रेल्वेला गांभीर्य नाही

रमेश औताडे मुंबई : रेल्वे परिसर व प्लॅटफॉर्म वर प्रवाशांची सुरक्षा करणे रेल्वेचे आद्य कर्तव्य आहे. मात्र याचा विसर पाडलेल्या रेल्वे प्रशासनाला कशाचे सोयरे सुतक नाही. 16 निष्पाप जीव रेल्वेने घेतले की पालिकेने घेतले की अजून कुणी घेतले यावर सध्या तज्ञ कमिटी तपास करत आहे. 16 जीव गेल्यानंतर रेल्वेने आपल्या हद्दीतील, फालातावरील अनधिकृत प्रकार नेस्तनाबूत करण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवायला पाहिजे होती मात्र तसे दिसत नाही.असे मत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी व्यक्त केले. रेल्वे स्टेशन तिकीट विंडो जवळ बंद पडलेले आरोग्य केंद्र व त्या बाजूला अनधिकृत फेरीवाले यांच्या मनमानी वास्तव्यामुळे प्रवाशी सुरक्षा धोक्यात आली आहे. रेल्वे प्लॉटफॉर्म वर जे खाद्यपदार्थ स्टॉल आहेत त्यांनी रेल्वे रुळ पासून स्टॉलचे अंतर किती असावे या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाही रेल्वेने केली नाही. त्या स्टॉल वरील अनधिकृत बांधकाम कोसळून दुर्घटना होऊन प्रवाशी जीव जाऊ शकतात. ब्रिजवर चिंचोळ्या जागेतून ये जा करताना प्रवाशी जखमी होऊ शकतात. रेल्वे ब्रीजवर असणारे फेरीवाले यांनाही अभय दिले जात आहे. भिकारी,गर्दुल्ले, नशा करणारे प्रवाशी, भुरटे चोर, यांच्यावर रेल्वे पोलीस, होमगार्ड, शहर पोलिस, यांचा वचक राहिला नाही.प्रवाशांना धक्काबुक्की करत तृतीयपंथी, चोरटे, गर्दुल्ले बिनबोभाट प्रवास करत आहेत. अनेक ठिकाणी नूतनीकरण सुरू आहे त्या ठिकाणी कंत्राटदार सुरक्षा पट्टी, रेड मार्किंग, सावध फ्लॅग गार्ड आदी कोणतीही काळजी न घेता मनमानी विकास कामे सुरू आहेत. रेल्वेत झिक झ्याक अवस्थेत असलेले पंखे, टुयब लाईट, गरम होऊन स्पार्क झाले तर आगाची दुर्घटना होऊन प्रवासी जीव धोक्यात येऊ शकतो. अनेक स्थानकात जंबो पंखे बंद अवस्थेत आहेत त्याची देखभाल कंत्राटदार करत नाही. अनेक ब्रीज वर फेरीवाले जागा अतिक्रमण करून बसले असल्याने गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ शकते.रेल्वे दरवाजे कडी कोयंडा तुटल्याने दरवाजे आदळतात त्याने अपघात होऊ शकतो. या व इतर अनेक प्रकारे रेल्वे सुरक्षा गंभीर आहे.प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत व फलाटावर उभे आहेत. त्यामुळे रेल्वेने या प्रकरणी गांभीर्ययाने लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर अजून जीव जातील व सखोल तपास समिती तपास करतच राहील.असे प्रवासी बोलत आहेत.

मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज २० मेला सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेदरम्यान मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. श्री. यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर बाहेर मोबाइल ठेऊन मतदान करण्यासाठी जावे लागेल, असे श्री. यादव यांनी सांगितले.

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

विकास धारियाची प्रथम मानांकित महम्मद घुफ्रानवर मात मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियाने स्पर्धेतील प्रथम मानांकित व विद्यमान एशियन चॅम्पियन  महम्मद घुफ्रानवर सरळ दोन सेटमध्ये २५-८, १६-७ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) वि वि सौरभ मते ( डी. के. सी. सी. ) २५-१, १८-१४ फहीम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( डी. के. सी. सी. ) ११-२२, २५-२०, २५-६ प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) वि वि संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ) १०-७, २५-१५ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि समिधा जाधव ( डी. के. सी. सी. ) २५-१२, २५-० वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) वि वि निलम घोडके ( पी. ओ. आर. सी. ) १५-२४, २५-७, १८-१६ रिंकी कुमारी ( पी. ओ. आर. सी. ) वि वि उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) २५-२१, १६-२१, २५-५ अंबिका हरिथ ( रिझर्व बँक ) वि वि सेजल लोखंडे ( डी. के. सी. सी. ) २२-१४, २३-११

विविध उपसमित्या जाहिर

अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी पुणे : येथे झालेल्या बैठकित महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहिर केली. सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधीना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये स्विकृत उपाध्यक्षपदी लातूरचे आमदार अभिमन्यू पवार, पालघरच्या सौ. ग्रीष्मा पाटील, पुण्यातील सौ. अश्विनी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पूणे येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकिला अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. चद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमीत्या जाहिर केल्या. या सर्व उपसमित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत. समित्या खालीलप्रमाणे : स्विकृत शासकीय परिषद सदस्य :- १) श्री जनार्दन शेळके, बीड , २) श्री नामदेव गोमारे, लातूर , ३) सौ प्राची वाईकर, पुणे , ४) सौ माधुरी कोळी, ठाणे , ५) श्रीम. सुजाता शानमे, धाराशिव, ६) श्रीम. प्रविता माने, रायगड कार्यालयीन सचिव : डॉ प्रशांत इनामदार, सांगली स्पर्धा समिती : १) संदीप तावडे, रत्नागिरी कार्यकारी अध्यक्ष, २) कमलाकर कोळी, ठाणे, सचिव, ३) रमेश नांदेडकर, नांदेड, सदस्य, ४) जगदीश दवणे, पालघर, सदस्य खेळाडू नोंदणी व तांत्रिक समिती १) प्रा. डॉ. नागनाथ गजमल, हिंगोली कार्यकारी, अध्यक्ष, २) डॉ. नरेंद्र कुंदर, मुंबई उपनगर, सचिव ३) आशिष पाटील, रायगड, सहसचिव, ४) निलेश परब, मुंबई, सदस्य, ५) सुरेंद्र विश्वकर्मा, मुंबई, सदस्य, ६) महेंद्र गाढवे, सातारा, सदस्य, ७) कृष्णा करंजळकर, रत्नागिरी, सदस्य, ८) प्रियांका चव्हाण, ठाणे, सदस्य, ९) श्वेता पाटेकर, मुंबई, सदस्या पंच मंडळ : 1) सुधाकर राऊळ, मुंबई, कार्यकारी अध्यक्ष, २) प्रशांत पाटणकर, मुंबई उपनगर, सचिव, ३) नानासाहेब झांबरे, पुणे, सहसचिव, ४) शरद व्हनकडे, सोलापूर, सदस्य, ५) संदेश आंब्रे, मुंबई उपनगरस, सदस्य, ६) डॉ. रफिक शेख , जालना, सदस्य, ७) किशोर पाटील, ठाणे, सदस्य ८) प्रभाकर काळे, धाराशिव, सदस्य, ९) संतोष सावंत, परभणी, सदस्य, १०) किरण वाघ, पुणे, सदस्य, ११) डॉ. सौ. रत्नराणी कोळी, लातूर, सदस्या निधी समिती : १) राजेंद्र महाले, धुळे, कार्यकारी अध्यक्ष, २) अनिल खोचरे, धाराशिव, सचिव, ३) सचिन मुळे, छ. संभाजीनगर, सदस्य, ४) डॉ. समीर शेख, सांगली, सदस्य, ५) बाळासाहेब जामकर, परभणी, सदस्य, ६) यतीन जाधव, रत्नागिरी, सदस्य, ७) डॉ. राजेश सुभेदार, मुंबई उपनगर, सदस्य, ८) सुर्यकांत ठाकूर, रायगड, सदस्य पुरस्कार छाननी समिती १) श्रीकांत ढेपे, सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष, २) जगदीश नानजकर, पुणे, सचिव, ३) निर्मल थोरात, अहमदनगर, सदस्य, ४) शिरीन गोडबोले, पुणे, सदस्य, ५) सौ. सुप्रिया गाढवे, धाराशिव, सदस्य प्रसिद्धी समिती : १) अजित संगवे, सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष, २) राजेश कळंबटे, रत्नागिरी, सचिव, ३) महेश विचारे, मुंबई, सदस्य, ४) भूषण कदम, पुणे, सदस्य, ५) संदीप बल्लाळ, पुणे, सदस्य, ६) दादासाहेब चोरमले, सातारा, सदस्य, ७) प्रेमचंद चौधरी, जळगाव, सदस्य, ८) गणेश माळवे, परभणी, सदस्य अनुशासन समिती :, १) श्रीरंग इनामदार, पुणे, कार्यकारी अध्यक्ष, २) अॅड. बालाजी सगर किल्लारीकर, छ. संभाजीनगर, सचिव, ३) अॅड. जयदीप वंशपायन, नाशिक, सदस्य, ४) संजीव ठाकूर-देसाई, मुंबई, सदस्य, ५) मनोज परदेशी, नंदुरबार, सदस्य महिला कल्याण समिती : १) सौ. सारिका काळे-खोत, धाराशिव, कार्यकारी अध्यक्षा, २) सौ राखी जोशी, पुणे, सचिव, ३) सौ. नेहा तपस्वी-ताडे, पुणे, सदस्या, ४) सौ. भाग्यश्री फडतरे, सातारा, सदस्या, ॲथलिट कमिशन : १) एजस शेख, मुंबई, कार्यकारी अध्यक्ष, २) सौ. रोहिणी आवारे, धाराशिव, सचिव, ३) सौ प्रियांका येळे, सातारा, सदस्या, ४) कु श्वेता गवळी, अहमदनगर, सदस्या, ५) श्री पराग आंबेकर, मुंबई, सदस्य, ६) श्री आशुतोष गायकैवारी, पुणे, सदस्य, ७) श्री युवराज जाधव, सांगली, सदस्य