गरज नव्या शैक्षणिक धोरणाची…
महाराष्ट्रात पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ हजार ४७१ जागांसाठी राज्यभरातून १७ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अनेक उच्चशिक्षितहीस असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण…
महाराष्ट्रात पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ हजार ४७१ जागांसाठी राज्यभरातून १७ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अनेक उच्चशिक्षितहीस असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण…
दिल्लीश्वरांचे पुन्हा शिक्कामोर्तब नवी दिल्ली: देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यावर आज दिल्लीश्वरांनी पुन्हा शिक्कामोर्तब केले. आगामी विधानसभा निवडणूक भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असून फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…
संजय शिरसाठांची भुजबळ तर, मिटकरींची भाजपाविरोधात बोंब स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस दिवसागणिक सार्वजनिक होऊ लागली आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवण्याच्या नादात पक्षाचे प्रमुख प्रवक्ते दुसऱ्या पक्षाविरोधात बोंब…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट मुंबई : रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खुशखबर आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना आता ग्रॅच्युईटी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रॅच्युईटीसाठी रिक्षा, टॅक्सी चालकांना फक्त वर्षाला 300 रुपये भरावे लागणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली…
११ जागांसाठी १२ जुलैला मतदान मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहि. विधानसभा सदस्यांमधून निवडून दिलेले विधान परिषदेतील ११ सदस्य…
मनोज जरांगेंचा सरकारला १३ जुलैचा अल्टीमेटम छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच घेणार आणि त्यासाठी सरकारला आम्ही १३ जुलैचा अल्टीमेटम दिला आहे असा अंतिम इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…
वडीगोद्री ( जालना) : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस असून दोघांनीही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकार ओबीसी आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे…
मुंबई : मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला . नुकत्याच…
नवी दिल्ली : शासित राज्ये पेपर लीकचे केंद्र बनले आहेत, पण पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर केला आहे. राहुल…
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईई -100 व नीट-100 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी इयत्ता 11 (विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास दाखला असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या घरात असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी. जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमुद केल्याप्रमाणे महिला 30 टक्के, दिव्यांग 5 टक्के, अनाथ 1 टक्के, वंचित 5 टक्के जागा आरक्षित असतील. प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 24 महिन्यांचा असणार आहे. प्रशिक्षण काळात 75 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000/- एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.5000/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30/06/2024 आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://jee-neet.barti.co.in/public/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.