घणसोलीत मृतदेहांना ‘मरणयातना’ !
रमेश औताडे मुंबई- जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली ही सुरेश भटांची गाजलेली गजल… पण भटांच्या गझलेत मरणानंतर सुटका होत होती, येथे घणसोलीत मेल्यानंतरही मृतदेहाच्या वाट्याला मरणयातना येत असल्याबद्दल नागरिकांत संताप…
रमेश औताडे मुंबई- जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली ही सुरेश भटांची गाजलेली गजल… पण भटांच्या गझलेत मरणानंतर सुटका होत होती, येथे घणसोलीत मेल्यानंतरही मृतदेहाच्या वाट्याला मरणयातना येत असल्याबद्दल नागरिकांत संताप…
अनिल ठाणेकर ठाणे : सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवानगी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येईल. हा कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील, असे जिल्हा कळविले आहे.तरी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहे. संबंधित एक खिडकी कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या परवानग्या पुढीलप्रमाणे- कार्यक्षेत्र- ठाणे जिल्हा, वाहन परवाना- १.नोंदणीकृत राजकीय पक्ष, २.नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी. परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (लोकसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना : उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६. चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८. वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, वाहन परवाना- उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष), ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १.संबंधित जागा मालक यांची संमती, २.स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३.पोलीस विभाग.कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ- कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. एकापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघातील मिरवणूक/रॅलीच्या परवानगीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र अर्ज करण्यात यावा, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.कार्यक्षेत्र-लोकसभा मतदारसंघ- स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ – स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी कक्षातील सक्षम पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र.कार्यक्षेत्र-ठाणे जिल्हा- हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवाना, परवानगी देणारे अधिकारी – अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आदी सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.
नवी मुंबई : बदलत्या काळात आता निवृत्ती शब्दाचा अर्थही बदललेला असून आज निवृत्ती म्हणजे केवळ एका टप्प्यातून आपले दुस-या टप्प्यात स्थलांतर आहे. त्यामुळे जीवनाच्या या पुढच्या टप्प्यातही आपण कृतीशील राहून…
ठाणे : जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेने समाज रत्न पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित केले. कल्याण पश्चिम येथील मराठा मंदिर सभागृहात न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्यावतीने…
प्रवासी समितीचा प्रशासनाला सवाल रमेश औताडे मुंबई : भारतीय सैन्य दलानंतर भारतीय रेल्वेला अर्थसंकल्पात सर्वात जास्त आर्थिक तरतूद केली जाते. मात्र रेल्वेची सेवा ही प्रवाशांची आहे की कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे. ज्या ठिकाणी त्या कामाची दुरुस्ती करण्याची गरज नसताना ती कामे करोडो रुपयांची टेंडर काढून केली जात आहेत. पिण्याचे पाणी नसणे, अस्वच्छ प्रसाधनगृह, बंद पंखे, बसण्यास अपुरी बाकडी, अशी अनेक प्रकारची गैरसोय असल्याने प्रवासी सेवा सुविधा पासून वंचित राहत आहेत. प्रवाशांची चूक काय ? ते मोफत प्रवास करतात का ? असे अनेक सवाल करत प्रवासी समिती चे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल मोरे यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत पत्रव्यवहार करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. रेल्वे डब्यातील स्वच्छता, बंद असलेले पंखे, दरवाजाच्या तुटलेल्या कड्या, जॅम झालेल्या खिडक्या, भिकारी, तृतीय पंथी यांनी डब्यात सुरू केलेला मनमानी व्यवसाय, मोबाईल चोर, अस्वच्छ मुतारी, रेल्वे स्थानकातील बंद असलेले पंखे, अर्धी अक्षरे गायब झालेली इंडिकेटर्स, बसायला अपुरी बाकडी, जी आहेत त्यावर भिकारी व गर्दुल्ले यांनी केलेले अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याची पाणपोई बंद असल्यामुळे विकतचे पाणी घ्यावे लागते. अशा अनेक प्रकारे गैरसोईचा सामना करत मजबुरीने घामाच्या धारांनी ओलेचिंब झालेले प्रवासी संतप्त होत नाराजी व्यक्त करत आहेत. ज्या ठिकाणी गरज नसताना दुरुस्तीची कामे काढली जातात. जसे की , नवीन लाद्या मोठ्या ड्रिल मशीन ने काढणे, या लाद्या नवीन असताना कांत्रादराला या लाद्या चेंज करायला सांगण्यापेक्षा ज्या कंत्राटदाराने पंखे, पाणी, स्वच्छता याची टेंडर भरून सेवा देण्याचे मान्य केले असताना ते बडे कंत्राटदार रेल्वे अधिकाऱ्यांचे का ऐकत नाहीत ? प्रवाशी फुकट प्रवास करतात का ? असे अनेक सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी पत्रव्यवहार करून रेल्वे प्रशासनाला विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद झालेले आहे. त्या ठिकाणी वारांगना, फेरीवाले, भिकारी, पान तंबाखू गुटखा विक्री होत आहे, अनधिकृत पणे बोगस फेरीवाल्यांनी मूळ रस्ता, फुटपाथ अडवले आहेत. स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, होमगार्ड, सुरक्षा महामंडळ रक्षक, आरपीएफ जवान, पालिका विजिलांस डिपार्टमेंट, रेल्वे दक्षता पथक, इतर सर्व यंत्रणा यांना वेतन भत्ते, वेतन आयोग, बोनस, पेन्शन इतर सेवा सुविधा कर्तव्य पार पाडत नसतानाही का दिल्या जातात? असे अनेक सवाल प्रवासी व प्रवासी संघटना करत आहेत.
नरेश म्हस्के यांचा विश्वास ठाणे : कार्यकर्ते हे साहजिकच संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांना वाईट वाटणारच. परंतु ही महायुती असल्याने ही परिस्थिती निवळेल आणि सर्वजण एकत्र कामाला लागतील आणि महायुतीचा धर्म पाळला जाईल असा विश्वास ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. म्हस्के हे गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले आदी नेते मंडळी उपस्थित होते. आपण नाईक यांचा आर्शिवाद घेण्यासाठी गेलो होतो, त्यांच्यासह संदीप नाईक, सागर यांनाही भेटलो असल्याचे म्हस्के म्हणाले. मात्र कार्यकर्त्यांशी कुठल्याही भेटागाठी झालेल्या नाहीत. कार्यकर्त्यांची कुठे बैठक झाली याची माहिती नसल्याचेही ते म्हणाले. मी लहाणपणापासून नाईक यांना भेटत होतो. त्यावेळी देखील ते कौतुक करीत होते. आजही गणेश नाईक यांनी मला आर्शिवाद दिला आहे. काही चिंता करायची गरज नाही, नवी मुंबईतून लीड मिळेल, सर्व काही मी पाहीन काही अडचण असेल तर मला सांग अशा पध्दतीने त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असल्याचेही त्यांनी सांगितले. मी साधारण, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. लोकांमधला कार्यकर्ता आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिलेली आहे. त्या संधीचे मी सोने करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांना शक्ती प्रदर्शनाच्या मुद्यावर छेडले असता, आम्हाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, जी आमची शक्ती आहे, ती या ठिकाणी दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अशोक गायकवाड अलिबाग : मे महिन्यात तापमान अधिक असण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर आरोग्य विभागाकडून आरोग्य पथकाची…
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून गौरवोद्गार डोंबिवली – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत डोंगराएवढी कामे केली असून शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच गुण तुमच्यात आले असून ‘खाण तशी माती’ याचे हे उदाहरण असल्याचे गौरवोद्गार मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काढले. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाळा नांदगावकर बोलत होते. तर शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा डीएनए एकच असून मनसेने दिलेल्या पाठींब्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले. डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचेच उमेदवार असल्याचे समजून काम करा, असे आवाहन यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. आपली महायुती लोकसभेप्रमाणेच विधानसभा आणि महापालिका यातही कायम राहिल्यास महाराष्ट्राला अपेक्षित असलेले चित्र नक्कीच दिसू शकेल, असा विश्वासही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. धर्मवीर आनंद दिघे आणि राजसाहेब ठाकरे यांचे वेगळे नाते होते. तसेच नाते आज राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे असून ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदींजींचे हात बळकट करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. तसेच ४ जून रोजी ज्यावेळेस कल्याण लोकसभेचा निकाल लागेल, त्यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांचाही त्यात तितकाच वाटा असेल, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले. ‘एक ठाकरे धनुष्यबाणाला, तर दुसरे ठाकरे पंजाला मत देणार!’ यावेळी बोलताना ज्या विचारांमुळे शिवसेना वाढली, ते विचार सत्ता आणि खुर्चीसाठी विकण्याचे काम शिल्लक सेनेच्या नेत्यांनी केल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. जे लोक सावरकरांना शिव्या देतात, त्यांचे शिवतीर्थावर स्वागत करण्याची नामुष्की यांच्यावर आल्याचे सांगत आज एक ठाकरे धनुष्यबाणाला, तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मत देणार असल्याची घणाघाती टीकाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. कोरोनामध्ये राज्याला नेत्याची गरज होती, तेव्हा हे घरात बसून घोटाळे करत असल्याचे सांगत यांच्याकडे ‘सिम्पथी’ नव्हे, तर फक्त संपत्ती असल्याचा टोला खासदार शिंदे यांनी लगावला. या मेळाव्याला मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहाराध्यक्ष राहुल कामत, ग्रामीण अध्यक्ष मनोज घरत यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, तसेच मनसेचे कल्याण लोकसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ‘एकीकडे हिऱ्यापोटी गारगोटी.. दुसरीकडे खाण तशी माती!’ या मेळाव्यात बोलताना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुण दिसत असून हे गुण सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये दिसत नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरेंना त्यांनी टोला लगावला. हाच धागा पकडून एकीकडे हिऱ्यापोटी गारगोटी, दुसरीकडे खाण तशी माती, असा टोला उद्धव ठाकरेंनाही त्यांनी नाव न घेता लगावला. ‘डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचे उमेदवार आहेत, असे समजून काम करा!’ दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचेच उमेदवार आहेत, असे समजून काम करा, असे आवाहन यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी केले. आपण सर्वांनी जोमाने काम करायचे असून आपले काम ४ जून रोजी मतपेटीतून दिसले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.
माथेरान : भारतमातेला पारतंत्र्याच्या श्रुंखलेतुन मुक्ती मिळविण्यासाठी जवळपास एकशेतीस शुरवीरानी आपल्या प्राणांची आहुती दिल्यामुळेच आज सर्वच भारतवासीय मुक्तपणे वावरताना दिसत आहेत्.परंतु ज्या ज्या वीरांनी या भुमीला दास्यमुक्त करण्यासाठी आपल्या संसारावर…
मुंबई: ठाणे- मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पथकर (टोल)चा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाचही नाक्यांवरून गोळा केलेली माहिती सहा महिन्यांनंतरही जाहीर करण्यात मनसेकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीला बसताच ठाकरे आणि त्यांच्या…