Category: होम

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी दोन उमेवारांचे अर्ज

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या 20 मे 2024 रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री राजन बाबुराव विचारे व ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत 21 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. यात अपक्ष 10, दिल्ली जनता पार्टी 3, लोकराज्य पक्ष 1, हिंदू समाज पार्टी 3, धर्मवीर आनंद दिघे साहेब विचार आणि सेवा मंच 1,बहुजन समाज पार्टी 2, भारतीय राष्ट्रवादी पार्टी 1 आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.

जगदगुरू शंकराचार्यांच्याहस्ते ‘शंकरालयम’येथे महाकुंभाभिषेकम सोहळ्याचे आयोजन

मुंबई : चेंबुरच्या  हरिहरपुत्र भजन समाज (रजि) संचलित ‘शंकरालयम’ येथे येत्या १ मे रोजी तृतीय जीर्णोद्वार महाकुंभाभिषेकम सोहळा आयोजित केला आहे. हा महाकुंभाभिषेकम आद्य जगद्‌गुरु बदरी शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री…

नद्या आ वासताहेत…

पर्यावरण मिलिंद बेंडाळे प्रत्येक नदी समाजासाठी, देशासाठी आणि पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाची असली, तरी मोठ्या नद्यांपेक्षा लहान नद्यांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. छोट्या नद्यांना जोडूनच मोठ्या नद्या तयार होतात. लहान…

पंतप्रधानांच्या भाषणाचा अन्वयार्थ…

भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी एकत्रित आलेली इंडिया आघाडी जर यदाकदाचित सत्तेत आलीच तर ते दर वर्षाला एक पंतप्रधान बदलतील आणि जर ही आघाडी पाच वर्षे सत्तेत टिकली तर देशाला…

मान्सूनचा सुखद सांगावा

मागील काही वर्षात दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याने सुखद धक्का दिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज बळीराजासाठी सुखावणारा आहे. कारण यावर्षी सरासरीच्या…

हवामानबदल आणि जागतिक तणावामुळे महागाई वाढण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेने आपल्या मासिक अहवालात हवामानातील बदल आणि जागतिक तणावाला महागाई कमी होण्याचा सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे की या उन्हाळी हंगामात कमाल…

दादांना ‘सोसायटीत’ जायची वेळ आली- पवार

कोल्हापूर : आताचे अजितदादा हे भाजपाचे दादा आहेत. आमच्या सोबत असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यभर प्रचार सभा घ्यायचे, पण आता कुठं बसले आहेत, तर बारामतीत सोसायटीमध्ये प्रचार करत बसले आहेत?. अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवारांवर…

ठाकरे गटाच्या मढवींना पोलीस कोठडी

ठाणे : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एम के मढवी आणि अनिल मोरे यांना खंडणी विरोधी पथकाकडून त्यांना अटक करण्यात…

मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही?- पवार

नगर : ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणूका हे लोक घेत नाहीत.  सध्या घटनेबाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झालीये. या देशाची घटना बदलण्याची गरज असल्याचे हे लोक सांगतात. त्यासाठी मोदींना अधिक अधिकार देण्याची…