Category: महाराष्ट्र

Maharashtra News

कर्जत, अकोल्यात मनसेला उमेदवारांकडूनच दगाफटका

मनसैनिकांचे अकोल्यात खळखट्टयाक; पक्षाचीच शाखा फोडली अकोला : विधानसभा निवडणुकांसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे जीवाचे रान करीत असतानाच मनसेच्या कर्जत आणि अकोल्यातील उमेदवारांनी स्वपक्षाशीच दगाफटका केल्याने मनसैनिकात जबरदस्त संतापाची लाट उसळली असून…

 ऐन दिवाळीत नाशिककरांचा विमान प्रवास महागला;

तिकीट दरांत तिपटीने वाढ,   नाशिक : दिवाळी सुट्ट्यांमुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडत असून, त्यामुळे ऐन सणासुदीत विमानप्रवासाचे दर अक्षरशः गगनाला भिडल्याचे चित्र आहे. नाशिकहून सुटणाऱ्या बहुतांश विमानांच्या भाडेदरात तिपटीने वाढ झाली आहे. विशेषतः एरवी पाच ते सहा हजारांपर्यंत असणारे नाशिक-गोवा विमानाचे भाडे तब्बल सोळा हजारांपलीकडे गेले आहे. डिसेंबर व जानेवारी हे दोन महिनेही पर्यटनासाठी उत्तम मानले जातात. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिने सर्वच प्रवासी भाड्याचे दर वाढलेले असतात. यंदा नाशिक विमानतळावरून देशांतर्गत आठ ठिकाणी सेवा सुरू असल्याने लोकांची विमानसेवेला पसंती लाभत आहे. या वर्षी दिवाळीत विधानसभा निवडणुकीची धामधूम असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या आहेत. अनेकांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर पर्यटनाचे नियोजन आखल्याने त्यांना वाढीव दराचा फटका बसला आहे. विमानसेवेचे दर प्रवासाच्या तारखेवर अवलंबून असतात. सध्या ऐनवेळी पुढील आठवड्याच्या विमानाचे बुकिंग करावयाचे झाल्यास दर तिपटीने वाढलेले दिसत आहेत. एरवी चार ते सात हजारांदरम्यान असलेले दर दहा ते सोळा हजारांपर्यंत गेले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाकडे कल नाशिककरांकडून यंदा केरळ, गोवा, राजस्थान, कर्नाटक या राज्यांसह आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे. त्यात थायलंड, मलेशिया, बाली, श्रीलंका या जवळच्या देशांत जाण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. कोट पुढील पंधरा दिवस विमानभाड्याचे दर दुप्पट वा दरवर्षीच घडते. त्यामुळे आधी बुकिंग करणे योग्य ठरते. यंदा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोक पर्यटनाला बाहेर पडू शकतात. त्यामुळे या वर्षी पर्यटनाचा मोसम लांबू शकतो. – सागर वाघचौरे, अध्यक्ष, तान पाच नोव्हेंबरसाठी विमानप्रवासाचे दर नाशिक ते नवी दिल्ली: ९,२०३ रुपये नाशिक ते जयपूर : ११,४६३ रुपये नाशिक ते हैदराबाद : १४,४५८ रुपये नाशिक ते अहमदाबाद : ७,४६३ रुपये नाशिक ते नागपूर : ८,३३२ रुपये नाशिक ते गोवा : १६,६०५ रुपये नाशिक ते इंदूर : ४,५३२ रुपये नाशिक ते बेंगळुरू : ७,५१६ रुपये

महायुतीत भाजपच्या कमळावर आरपीआय आठवलेंचा उमेदवार;

आठवले गटात मोठी अस्वस्थता स्वाती घोसाळकर मुंबई : भाजपाने आठवले गटाला तिकीट जरी दिले असले तरी पक्षाचे अस्तित्व मान्य न करता भाजपाच्या कमळावर निवडणूक लढविण्यास सांगितल्यामुळे आरपीआय आठवले गटात अस्वस्थता आहे. त्यात…

महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका!

मोदींच्या ८ तर अमित शाहांच्या २० सभा मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी आता प्रचारसभांचा धडाका उडणार आहे. स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ तर गृहमंत्री अमित शाहांच्या २० सभा होणार आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित…

“एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही- मनोज जरांगे

जालना – महाराष्ट्रात एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे उद्या दलित, मुस्लीम आणि मराठा समीकरणाबाबत बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीनंतर कोणते मतदारसंघ लढायचे, कोणते उमेदवार द्यायचे, काय समीकरण जुळवायचं ते चर्चेत ठरेल. आज कुणाला पाठिंबा नाही, कुणाला उमेदवार…

क्षण एक निवांत दिवाळीचा…

सुप्रसिद्ध रांगोळीकार पंकज पाटील, शैलेंद्र पाटील, करण, अभिनय यांनी दीपावलीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांच्या  संपूर्ण कुटुंबीयांची रांगोळी हुबेहुब चितारीत केली. आपलेच प्रतिबिंब रांगोळीत पाहून हरखून गेलेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

भाजपाचे राजकारण लोकशाही विरोधी

  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील कार्यालयामध्ये महाराष्ट्र काँग्रेस तर्फे आज “भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती” हे बुकलेट आणि “यंदा पंजा” हे प्रचारगीत महाराष्ट्राचे प्रभारी आ. श्री. रमेश चेन्निथला यांच्या…

४० वर्षांनंतर देवळालीत मशालीवर निवडणूक

बबनराव घोलप यांनी लढवला होता किल्ला नाशिक रोड : चाळीस वर्षांपूर्वी रोपटे असलेल्या शिवसेनेचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी मुंबई ठाणे पाठोपाठ शिवसेनेने नाशिकमध्ये विधानसभेची निवडणूक लढविली होती. १९८५ मध्ये बबनराव घोलप यांनी देवळाली मतदारसंघात शिवसेनेकडून मशाल निशाणीवर निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा तब्बल ४० वर्षांनंतर शिवसेनेकडून योगेश घोलप हे मशाल निशाणीवर नशीब आजमावत आहे. १९६६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मुंबई ठाणेनंतर नाशिक जिल्ह्यात देवळालीगाव व भगूरमध्ये शिवसेनेची १९ जून १९६८ मध्ये स्थापना करण्यात आली. नाशिक रोड देवळालीगाव, भगुर भागातूनच शिवसेना नाशिक जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रात व औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये फोफावू लागली. शिवसेनेने मुंबई, ठाणे भागातील काही मतदार संघासोबत नाशिक व देवळाली विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. १९८५ मध्ये पहिले जिल्हाप्रमुख (कै.) केशवराव थोरात यांनी नाशिक, तर राखीव देवळाली मतदारसंघातून बबनराव घोलप यांनी निवडणूक लढविली होती. नाशिक शहरात शिवसेनेने लढविलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांना २,७०० व घोलप यांना ३,२०० च्या आसपास मतदान झाले होते. शिवसेनेच्या घोलप यांनी चाळीस वर्षांपूर्वी लढविलेल्या पहिल्या निवडणुकीत मशाल निशाणी घेतली होती. पहिल्या निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढवताना घोलप यांचा पराभव झाला असला, तरी १९९०च्या निवडणुकीत शिवसेनेकडून घोलप विजयी झाल्यानंतर सलग २५ वर्षे आमदार म्हणून निवडून आले. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर घोलप यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपदही मिळाले. त्यानंतर, धनुष्यबाण चिन्हावरच घोलप सतत निवडून आले. अपवाद फक्त १९९९ मधील निवडणुकीचा. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांमुळे शिवसेनेने उमेदवारी न देता घोलप यांना पुरस्कृत केले होते. त्यामुळे घोलप यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली होती. त्यावेळी विमान चिन्हावर ते निवडून आले होते. दहा वर्षांपूर्वी घोलप यांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी घातल्यानंतर त्यांचे पुत्र योगेश हे २०१४ मध्ये शिवसेनेकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत पडली फूट अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर न्यायालयीन लढाईत शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी ही शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आली. त्यामुळे तब्बल ४० वर्षांनंतर घोलप यांचे पुत्र योगेश हे पुन्हा मशाल निवडणुकीवर निवडणुकीला सामोरे जात आहे.

माथेरानच्या राजकारणाची मदार विधानसभेच्या निवडणुकीवर अवलंबून

माथेरान : माथेरान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये अपेक्षित आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार आपल्या पक्षाला निवडणूक निधी देणार या आशेवर इथली राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्यासाठीच महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील आपापल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते निवडणूक फंड निधी मिळविण्यासाठी आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जोमाने कामाला लागलेले दिसत आहेत.जवळपास ३९०० मतदार असलेली छोटीशी नगरपरिषद असून प्रत्येक वार्डामध्ये जेमतेम 200 ते 250 च्या आसपास मतदारांची संख्या आहे. त्यामुळे अनेकदा पैशाच्या जोरावर अकार्यक्षम उमेदवार सुद्धा अगदी सहज निवडून येतात. राज्यातील राजकारणाने सुद्धा खालची पातळी गाठलेली आहे. पक्षनिष्ठा,नीतिमूल्य, नैतिक जबाबदारी या सर्वांना तिलांजली देऊन जो तो स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करून स्वतःचा लाभ उठवत आहे. तीच परिस्थिती मागील काही वर्षांपासून माथेरानचे सुज्ञ मतदार सुद्धा अनुभवत आहेत. हौसे, नवसे, आणि गवशे यांना पक्षात प्रथमता प्राधान्य दिले जात आहे. सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्यांदा विरोधकांची कामे जलदगतीने केली जात जातात आणि कार्यकर्त्याला आशेवर टांगत ठेवणे ही इथली वस्तूस्थिती आहे. ज्यांना गावामध्ये राजकीय दृष्ट्या काही एक काडीमात्र स्थान नाही त्याचप्रमाणे अशा लोकांमुळे पक्षाला राजकीय फटका मिळू शकतो अशांना गोंजारल्यास आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हम करे सो कायदा ही भूमिका अवलंबिल्यास आगामी नगरपरिषद निवडणुकीत याचा मोठा फटका त्या त्या पक्षांना मिळणार आहे. मागील काळात लोकप्रतिनिधींनी आपसातील मतभेदांमुळे पक्षांतर करून काही प्रमाणात आर्थिक लाभ घेतला होता हे मतदार विसरलेले नाहीत. ज्या लोकप्रतिनिधींना आपली अमूल्य मते देऊन अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा राजकीय द्वेष ओढावला होता असे मतदार यावेळी गप्प बसणार नाहीत. लोकप्रतिनिधी जर अवाढव्य रक्कम घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करत असतात तर आपण सुद्धा यांना निवडून देण्यासाठी मतांचा मोबदला का घेऊ नये असाही प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावीच लागणार आहे. ही झळ सोसण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज भासणार असल्याने काही करून त्यांना विधानसभेच्या उमेदवाराला आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. तेव्हाच कुठे विजयी उमेदवार  निवडणुकीसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतो. निवडणुकीत लढाई देण्यासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे केवळ पक्षाच्या निधीवर अवलंबून ज्यांनी ज्यांनी अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे त्यांची कोंडी होऊ नये यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणे क्रमप्राप्त आहे.

धाराशिव, सोलापूर, सांगली दोन्ही गटात उपांत्य फेरीत

सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा : पुणे व ठाणेही उपांत्य फेरीत लढतील धाराशिव : सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो…