Category: महाराष्ट्र

Maharashtra News

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भाजापाचे नेत वसंत देशमुखांना अटक

अहमदनगर: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजापाचे नेते वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी पातळी सोडून जयश्री थोरांतावर टिका केली…

आपलं तिकीटही फुकट, पाठिंबाही फुकट – जरांगे

जालना : मी किंवा माझ्या जवळचे कोणीही इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी पैसे मागत नाहीत. आपलं तिकीटही किंवा पाठिंबाही फुकट असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांनी व्यक्त केलं आहे. कुणीही पैशाचा व्यवहार करू नये…

 तिरंगी, चौरंगी लढती

जिल्ह्यातील १५ पैकी ११ मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी बहुतांश उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती पाहायला मिळणार असून, शहरातील ‘नाशिक मध्य’ मध्ये तिरंगी, नाशिक पूर्व, देवळालीत दुरंगी, तर नाशिक पश्चिममध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. प्रतिष्ठेच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळांविरोधात शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना रिंगणात उतरवल्याने या ठिकाणी दुरंगी लढत रंगणार आहे. पालकमंत्री दादा भुसेंच्या मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये सद्यःस्थितीत तिरंगी लढत असेल. नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरीतही तिरंगी लढतीची शक्यता आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा असून, त्यापैकी महायुतीकडून १३, तर महाविकास आघाडीकडून १२ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपकडून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणी आता फरांदे विरुद्ध उबाठाचे वसंत गिते असा सामना रंगणार आहे. नाशिक पूर्वमध्ये भाजपचे अॅड. राहुल ढिकले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गिते अशी दुरंगी लढत होणार आहे. नाशिक पश्चिममध्ये मात्र बहुरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी भाजपच्या सीमा हिरेंसमोर उबाठाचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील यांच्यासह भाजपमधील बंडखोरांचे आव्हान असेल. देवळालीत आता सरोज अहिरे विरुद्ध योगेश घोलप अशी दुरंगी लढत आहे. मालेगाव बाह्यमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर उबाठाचे अद्वय हिरे यांच्यासह अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचे आव्हान असेल. नांदगावमध्ये तिरंगी, तर दिंडोरीत झिरवाळ यांच्यासमोर उबाठाच्या सुनीता चारोस्कर आणि बंडखोर धनराज महालेंचे आव्हान आहे. जिल्ह्यात अशा आहेत लढती नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजप) वसंत गिते (शिवसेना उबाठा) डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस बंडखोर) नाशिक पूर्व अॅड. राहुल ढिकले (भाजप) गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट) नाशिक पश्चिम सीमा हिरे (भाजप) सुधाकर बडगुजर (शिवसेना उबाठा) दिनकर पाटील (मनसे) दशरथ पाटील (स्वराज्य) देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) योगेश घोलप (शिवसेना उबाठा) मालेगाव बाह्य दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) अद्वय हिरे (शिवसेना उबाठा) बंडूकाका बच्छाव (अपक्ष) सिन्नर अॅड. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट) उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) नांदगाव सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) गणेश धात्रक (शिवसेना उबाठा)…

चिपी-मुंबई विमानसेवा पूर्ववत सुरू करा..!

 माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी..! कुडाळ : चिपी( सिंधुदुर्ग) ते मुंबई ही ‘अलायन्स एअर ‘ कंपनीची विमान उड्डाणे नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी ऊबाठा शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किजरापू यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. राऊत यांनी निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या जिल्ह्याला  मोठ्या संख्येने भेट देतात.जिल्हात आर. सी. एस.(रुरल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस- उडान योजना )अंतर्गत दोन वर्षांपूर्वी चिपी विमानतळ सुरू झाले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’.या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ चिपी ‘ विमानतळाचा समावेश करण्यात आला, त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास सोपा झाला होता. तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांच्या कार्यकाळात तत्कालीन  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर २०२१ पासून चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यान ‘अलायन्स एअर ‘ची उड्डाणे सुरू झाली.याचा पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा झाला. मात्र २६ ऑक्टोबर पासून ही विमान सेवा( उड्डाणे) आम्ही बंद करत आहोत असे कंपनीने अलिकडेच जाहीर केले आहे. गेल्या तीन वर्षात पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या हवाई सेवेला देश-विदेशातील नियमित स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यानची उड्डाणे बंद करण्याचा ‘अलायन्स एअर’ कंपनीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे असे निवेदनात म्हटले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील पर्यटन व्यवसायावर याचा विपरीत आणि दूरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे या विषयाकडे आपण वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे आणि सार्वजनिक हितासाठी ‘अलायन्स एअर ‘ ला चिपी ते मुंबई दरम्यान नियमितपणे उड्डाणे सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

माथेरानमधील गरजवंतांना दिवाळी फराळाची भेट

माथेरान : सर्वांचा आवडती सण दिवाळी लवकरच येते असून हा सण साजरा करताना अनेकांची  आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी तसेच विधवा महिलांना तसेच अपंगांना हा सण साजरा करता यावा यासाठी येथील हॉटेल वे साईडचे मालक अब्बास अल्ली हुसेन पिरभोय यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव हैदर अब्बास अल्ली पिरभोय यांच्या हस्ते हॉटेल वे साईड इन मध्ये गरजवंतांना दिवाळीच्या फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये साखर, रवा,तेल, डालडा, बेसनपीठ या साहित्याचा समावेश आहे. अनेक गरजवंत विधवा महिलांनी याचा लाभ घेतला. अब्बास अली हुसेन पिरभोय गरजवंतांना साहित्याचे वाटप करत असतात.यावेळी अब्बास अल्ली हुसेन पिरभोय यांच्यासह हॉटेल व्यवस्थापक मेहमूद खान उपस्थित होते. माथेरान साठी काहीना काही सढळ हस्ते मदत करण्यासाठी अब्बास अल्ली यांचा सिंहाचा वाटा असतो. येथील दवाखान्यात पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची त्यांची इच्छा असून हे पर्यटनस्थळ पब्लिक प्लेस असल्यामुळे इंग्रजी भाषेवर युवा वर्गाचे प्रभुत्व असावे यासाठी लवकरच आपल्या हॉटेलमध्ये मोफत इंग्रजी स्पिकिंग कोर्स सुरू करणार आहेत.

‘खोक्या’नंतर आता ‘सोने’ जप्त

–138 कोटींच्या सोन्याने भरलेला ट्रक निवडणूक भरारी पथकाने पुण्यात पक़डला पुणे : गुरुवारी एकाच दिवशी बावन्न कोटींची रक्कम पकडणाऱ्या निवडणूक भरारी पथकाने आज चक्क १३८ कोटींचे सोने असलेला ट्रक पुण्यात जप्त केला. ५२…

५ वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या संपत्तीत फक्त ११ लाखांची वाढ

फडणवीसांचे नागपुरात शक्तीप्रदर्शन नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आज नागपूर दक्षिण या त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजापाचे नेते नितीन गडकरींसोबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही फडणवीस यांच्यासोबत होते.…

दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

हरिभाऊ लाखे नाशिक : दिवाळीला सोमवारपासून सुरूवात होणार असून या कालावधीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक राज्य परिवहन विभागाच्या वतीने पुणे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, बोरिवली, कसारा मार्गावर…

गलिच्छ राजकारणात नीतिमत्तेचा होतोय कडेलोट

माथेरान : मागील काही वर्षांपासून राजकारणाची परिभाषाच पूर्णपणे बदलून गेलेली आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड दिल्यावर ज्याप्रमाणे सर्वांगीण विकास होण्याची अपेक्षा असते. राजकारणाची तत्वे नीतिमूल्य जोपासताना समाजाला विकासाच्या प्रवाहात नेण्याचे महत्त्वपूर्ण…

विधानसभा निवडणूक ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत स्वाक्षरी मोहिम

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नमुंमपा मुख्यालयात लावण्यात आलेल्या ’20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूकीत मी मतदानाचा हक्क बजावणार आहे’ या स्वाक्षरी फलकावर नमुंमपा आयुक्त डॉ.…