Category: महाराष्ट्र

Maharashtra News

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली

नवी दिल्ली- न्याय यापुढे आंधळा असणार नाही असा प्रतिकात्मक संदेश देत भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचुड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नव्या शिल्पात…

उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही

उरण : गेल्या अनेक महिन्यापासून उरण शहरातील सीसीटीव्ही बंद असून येत्या काही दिवसातच उरणकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या ३४ ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेला याचा फायदा होणार…

मिरा-भाईंदरमध्ये ६८ हजारांनी मतदार वाढले

भाईंदर : मेमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मिरा-भाईंदर मतदारसंघात मतदारांची संख्या तब्बल ६८ हजारांनी वाढली आहे. या मतदारसंघात आता पाच लाख सात हजार ५४२ मतदार झाले आहेत.…

माथेरानची राणी नोव्हेंबरमध्ये येणार रुळावर

माथेरान : सर्वानाच प्रतीक्षा असणारी नेरळ माथेरान दरम्यान धावणारी माथेरानची महाराणी अर्थातच मिनिट्रेन १ नोव्हेंबर पासून रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा असणारी ही…

सौरऊर्जेच्या प्रकाशाने उजळले काळाराम मंदिर

हरिभाऊ लाखे नाशिक : काळाराम मंदिराच्या आवारात सौरऊर्जेचा वापर करीत वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या ओवरीच्या वरील भागात सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या सीएसआरअंतर्गत साडेचौदा…

 रिक्षा संघटनेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली पश्चिमेत अभूतपूर्व वाहन कोंडी डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या चौक, रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत एकही वाहतूक पोलीस, सेवक तैनात नसल्याने पश्चिमेतील महत्वाचे रस्ते, चौक दररोज वाहन कोंडीत अडकत आहेत. या कोंडीचा सर्वाधिक फटका कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना बसत आहे. पश्चिमेत वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलीस तैनात केले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे. डोंबिवली पश्चिमेतील सर्वच रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यांचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरण झाले नाही. या रस्त्यांच्या दुतर्फा दुकानदार पदपथ अडवून आपले सामान ठेवतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता राहत नाही. रिक्षा, मोटारी, अवजड वाहने एकाचवेळी रस्त्यावरून धावत असल्याने या अरूंद रस्त्यावर कोंडी होते. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील कोल्हापुरे इस्टेट चौक दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत वाहन कोंडीत अडकलेला असतो. याच रस्त्यावरील प्रसाद स्नॅक्स दुकानाजवळील चौक कोंडीत अडकलेला असतो. याशिवाय घनश्याम गुप्ते रस्त्यावरील गोपी माॅल चौकाला कोंडीचा विळखा पडलेला असतो. कोल्हापुरे इस्टेट चौकातून गरीबाचापाडा, सुभाष रोड, गणेशनगर भागात जाणारी आणि रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने धावतात. प्रसाद स्नॅक्स दुकानाजवळील चौकात भागशाळा मैदान ते गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्त्याकडे जाणारी वाहने धावतात. गोपी माॅल चौकातून सम्राट चौक ते नवापाडा भागात जाणारी वाहने धावतात. संध्याकाळच्या वेळेत या चौकांमध्ये एकही वाहतूक पोलीस नसतो. त्यामुळे प्रत्येक वाहन चालक चढाओढीच्या स्पर्धेत वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. या चढाओढीत सर्व वाहने चौकांमध्ये अडकून पडतात. यावेळी परिसरातील रस्ते, गल्ल्या वाहनांंनी बजबजून जातात. डोंबिवली वाहतूक विभागाला या सर्व चौक आणि तेथील कोंडीची माहिती आहे. या भागात दररोज संध्याकाळी एकही वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक या भागात तैनात नसतो, असे रिक्षा चालक मालक संघटनेचे शेखर जोशी यांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसानंतर दिवाळी सण येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील पादचारी, वाहनांची संख्या वाढणार आहे. हा विचार करून डोंबिवली वाहतूक विभागाने डोंबिवली पश्चिमेतील वर्दळीच्या चौक, रस्ते भागात वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे. या मागणीचा विचार केला नाहीतर मात्र रिक्षा चालक आंदोलन करतील, असा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेने दिला आहे.

 कथोरेंविरूद्ध निष्ठावंतांची आघाडी ?

 कपिल पाटलांच्या नेतृत्वात मेळावा, कथोरेंना अप्रत्यक्ष आव्हान देण्याची खेळी बदलापूरः मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना आता भाजपातून उघड आव्हान दिले जात असून मुरबाडमध्ये नुकताच निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कपिल पाटील यांनी किसन कथोरेंना नाव न घेता भाजप सोडून अपक्ष लढा आणि ताकद दाखवा असे थेट आव्हान दिले. विशेष म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघातून एकेकाळी कथोरे यांच्या भाजप प्रवेशासाठी आघाडीवर असलेले पदाधिकारीही यात मंचावर बसून होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपात जुन्या जाणत्यांची वेगळी फळी उभारून कथोरेंना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची चर्चा आहे. दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये तत्कालिन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या शासकीय बंगल्यावर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी कथोरे यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी फळी भाजपात आली. कथोरे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी तात्काळ स्विकारले. मात्र कालांतराने भाजपातील जुने पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात आलेले पदाधिकारी असे दोन गट अनेकदा दिसून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात उघड दुफळी दिसली. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पराभवानंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघातही पाटील समर्थक आणि कथोरे समर्थक असे गट दिसले. पाटील यांनी कथोरे यांच्यावर वेळोवेळी हल्ले चढवले आहेत. त्यातच रविवारी मुरबाडमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वात निष्ठावंतांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम पातकर, संघ आणि भाजपचे निष्ठावंत समजले जाणारे शरद म्हात्रे, आण्णा कुलकर्णी यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. किसन कथोर विरूद्ध कपिल पाटील संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होत असतानाच झालेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. लोकसभेला काही जणांनी पक्षविरोधी काम केले. आता केंद्र सरकारकडून मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय काही लोक घेत आहेत. त्यांना उत्तर दिले पाहिजे असे पाटील यावेळी म्हणाले. आधी काही लोक बोलायचे माझ्या मतदारसंघात काम शिल्लक राहिली नाहीत. मग आता कसली भूमीपूजन करत आहात, असा सवालही पाटील यांनी अप्रत्यक्षपणे कथोरे यांना विचारला. निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्याला भाजपची भूमिका मांडू न देणाऱ्यांना थांबवल पाहिजे. भाजपची ताकद बाजूला करून तुम्ही अपक्ष लढून दाखवा, असे थेट आव्हानच पाटील यांनी कथोरे यांना दिले. तसेच मतदारसंघात निष्ठावंतावर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत विधानसभेत कथोरे यांना पाटील यांनी इशाराच दिला दिला. या निष्ठावंतांच्या मेळाव्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोट मेळाव्याच्या बॅनरवर असलेल्या निष्ठावंत शब्दामुळे मेळाव्याला गेलो. पक्षातील जुन्या, निष्ठावंतांना बाजूला सारण्यात आले आहे हे खरे आहे. ही कृतघ्नता आहे. आम्हाला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे भावना मांडण्यासाठी मेळाव्यात होतो. शरद म्हात्रे, जुने भाजप पदाधिकारी, बदलापूर. कोट अपक्ष लढण्याचा प्रश्नच येत नाही. मला पक्षच विधानसेभेचे तिकीट देत आहे तर मी का अपक्ष लढू. किसन कथोरे, आमदार, मुरबाड. 0000

बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार

 कोअर कमिटीत निर्णय नालासोपारा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजणार असल्याने लक्षात घेऊन मंगळवारी बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक विरार येथे पार पडली. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सहा जागांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी असा आग्रह कोअर कमिटीतील पदाधिकारी यांनी केला आहे. सर्वच पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरू केली असून पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी पालघर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पालघर जिल्ह्यातील सहा जागाचा आढावा घेण्यात आला. बहुजन विकास आघाडी जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा स्वबळावर लढणार असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश पाटील, जेष्ठ नेते मुकेश सावे , माजी उपमहापौर उमेश नाईक, माजी महापौर रुपेश जाधव, अजय खोकाणी, जितूभाई शहा, माजी खासदार बळीराम जाधव, माजी सभापती प्रफुल साने, पंकज ठाकूर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नारायण मानकर यांनी सांगितले की, ही पहिली सभा पालघर जिल्ह्यासाठी झाली असून या पुढील बैठका राज्यातील कोकण, सोलापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे मुंबई, मराठवाडा आदी भागांतील कोअर कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्तेशी बोलून होणार आहे. दरम्यान, बविआ राज्यात जवळपास ५० विधानसभेच्या जागा लढणार आहे. यावेळी पत्रकारांनी बविआचे जेष्ठ नेते व कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशा बाबतीतला प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी स्पष्ट केले की, याबाबत अद्याप पक्षापर्यंत कुठलीही अधिकृतपणे माहिती आलेली नाही. त्यामुळे जर तरच्या गोष्टीवर उत्तर देणे सयुक्तिक ठरणार नाही त्यानिमित्ताने या विषयावर अधिक चर्चा झाली नाही.  

 महाराष्ट्र राज्य होमगार्ड्ची दिवाळी गोड

दुपटीने वाढ, प्रतिदिन १०८३ रुपये कर्तव्यभत्ता लागू हरिभाऊ लाखे नाशिक : महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांच्या प्रलंबित विनंतीला मंजुरी देत मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार होमगार्डला आता प्रतिदिन १ हजार ८३ रुपये कर्तव्यभत्ता लागू झाला आहे. तर, सर्व भत्ते मिळून होमगार्डला प्रतिदिन अठराशे रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये होमगार्डच्या मानधनवाढीचाही समावेश आहे. महाराष्ट्रात ६ डिसेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२४ पासून सुधारित भत्ता लागू झाल्याने नवरात्र उत्सवात पोलिसांसमवेत कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डला त्याचा लाभ होणार आहे. यासह दिवाळी व आगामी विधानसभा निवडणुकीतील बंदोबस्तातही सुधारित भत्त्यानुसार होमगार्डला मानधन दिले जाईल. तर, राज्यात गत महिन्यात ११ हजार २०७ गृहरक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने नवीन होमगार्डसाठी ही शुभवार्ता ठरली आहे. त्यानुसार, नाशिक शहरात १६१, इगतपुरीत चाळीस, सिन्नरमध्ये पन्नास आणि निफाडमध्ये तीस होमगार्डची निवड करण्यात आली. सध्या नाशिक जिल्ह्यात दीड हजारांपेक्षा जास्त होमगार्ड कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, होमगार्डला नियमित कर्तव्यावर बोलावण्यात येत नाही. महत्त्वाचा बंदोबस्त, सणोत्सव आणि निवडणुकीत होमगार्डला कर्तव्यावर नेमण्यात येते. यासह पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेकदा नाकाबंदी व इतर बंदोबस्तासाठी बोलावण्यात येते. त्यामुळे पोलिस भरतीसह इतर यंत्रणांत भरतीच्या प्रतीक्षेत असणारे उमेदवार सध्या होमगार्डचे कर्तव्य पार पाडत आहेत. या सर्वांसाठी प्रतिदिन अठराशे रुपयांचे मानधन महत्त्वपूर्ण व उमेद वाढविणारे ठरणार आहे. सन २०२४-२५ साठी ५५२ कोटी अतिरिक्त रक्कम मंजूर सन २०२५ पासून दरवर्षी ७९५ कोटींची तरतूद करण्यास मान्यता सन २००८ पासून १५० रुपये प्रतिदिन भत्ता; तत्पूर्वी ७५ रुपये प्रतिदिन सन २०१४ पासून ३०० रुपये प्रतिदिन भत्ता; सध्या ५७० रुपये प्रतिदिन होमगार्ड भत्ता सध्याचे दर सुधारित दर कर्तव्य ५७० रुपये प्रतिदिन १,०८३ रुपये प्रतिदिन उपहार १०० रुपये २०० रुपये कवायत ९० रुपये १८० रुपये खिसा ३५ रुपये १०० रुपये भोजन १०० रुपये २५० रुपये

तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते जलपूजन कार्यक्रम संपन्न

 राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात माजी महसुलमंत्री स्व.शांताराम बापू घोलप यांच्या कार्यकाळात झालेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पांमुळे तालुक्यात पिण्यासाठी व पिकांना पाण्याची उपलब्धता झाली, आणि त्यानंतर पुढे शेतकरी हा भाजीपाला पिक घेवुन स्वयंपूर्ण होवु लागला परिणामी मधल्या काळात शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झाली. सद्यस्थितीत शेतकऱ्यांसाठी १२ महिने पाण्याची आवश्यकता असताना पाणी योग्य नियोजनामुळे पाणी फक्त १० महिनेच उपलब्ध असते त्यामुळे शेतीतून पुढील दोन महिन्यात नफ्याचे उत्पन्न घेणे अडचणीचे ठरत असल्यामुळेच मुरबाड तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पुढील पाच वर्षात  “शेतीसाठी पाणी” हाच अजेंडा चालवण्यात येणार असल्याचे मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले. मुरबाड तालुक्यातील पवाळे, पाडाळे, धसई व फांगलोशी लघु पाटबंधारे प्रकल्पांवर जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड तालुका कॉंग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले व यावेळी किसान कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस जयवंत पवार, तालुका समन्वयक काळुराम विशे, तालुका पदाधिकारी अंकुश धुमाळ, विभागप्रमुख दिपक आलम तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणुन  फनाडे, शिवाजी पवार, धनाजी पवार, अविनाश घोरड, विष्णू मुरबाडे, जनार्दन गोंडाबे आदीं मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, किसानचे तालुका उपाध्यक्ष चिंतामण पष्टे, खोपिवली विभागप्रमुख वसंत कराळे, युवक तालुका उपाध्यक्ष विपुल सुरोशे, जिल्हा पदाधिकारी पांडुरंग शिद, भगवान पवार, मुरबाडे आदींनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे पौरोहित्य उदय मंडलिक यांनी केले. जलपूजन हा उपक्रम तालुक्यासाठी नवीन असुन आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मान दिल्याबद्दल कॉंग्रेस कमिटी व चेतनसिंह पवार यांचे आभार यावेळी जनार्दन गोडांबे यांनी मांडले.