लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी ?
गोंदिया : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा झाले आहेत. मात्र, राज्य सरकारच्या योजनेवरुन…
Maharashtra News
गोंदिया : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा झाले आहेत. मात्र, राज्य सरकारच्या योजनेवरुन…
आदिवासी क्षेत्रातील सेवा आणि कोविड काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका…
भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांच्याकडून स्वागत मुरबाड : तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीतील सदस्य व गावातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार उपस्थित होते. माजी आमदार गोटीरामभाऊ पवार व शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांना खापरी ग्रामपंचायतीत पदाधिकारी व ग्रामस्थांकडून कायम साथ देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून विकासकामे सुरू असून, ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी दिली. खापरी, कामतपाडा, वैतागवाडी कामतपाडावाडी भागात झालेल्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी असताना सुभाष पवार यांनी पुढाकार घेतला होता, याचा आवर्जून उल्लेख उपसरपंच सुरेश भांगरथ यांनी केला. तसेच खापरी येथील अरुण सीताराम राऊत, पांडुरंग राऊत, कपिल राऊत यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांचे भाजपामधून शिवसेनेत स्वागत केले. या वेळी सरपंच दीपक कवटे, संतोष देशमुख, अरुण (बंडू) पवार, महेश पवार, भाई देशमुख, नाना देशमुख, राजेश राऊत, चिंतामण वाघ, शंकर पारधी, अनिल भांगरथ, नेताजी भांगरथ, बुधाजी पारधी, संतोष वाघ, रघुनाथ हिलम, भालचंद्र लचका, योगेश भांगरथ, महेश भांगरथ, भूषण राऊत, कुणाल शिंदे, समीर पवार, गणेश बांगारा, दशरथ लचका, गणेश भला, अंकुश भांगरथ, सागर भांगरथ, काळुराम वाघ, प्रमोद लचका, पांडुरंग मुकणे, सचिन भांगरथ, सार्थक भांगरथ रोहित राऊत,प्रतीक राऊत,प्रशांत भांगरथ तुकाराम मुकणे संतोष भांगरथ कमलाकर भांगरथ, काशिनाथ पारधी, काशिनाथ मुकणे, सुनील फसाळे, संदेश पारधी, जगन मुकणे, सोमनाथ चवर, हिरामण हिरवा अशी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत.
अलिबाग (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी हनुमंत जैतु पाटील याची पोलिसांनी 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबूली देत नव्हता. कोणताही पुरावा सापडत नव्हता. त्यामुळे त्याला सोडून देण्याच्या तयारीत पोलीस होते. परंतु ज्या घरातून आरोपी निघाला होता; तेव्हा त्याच्या अंगात पांढरा शर्ट होता. सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळे टीशर्ट होते. टीशर्ट का बदलले हे सांगू शकला नाही. त्यानंतर त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. त्यामुळे हनुमंत हादरला आणि घराच्या हिस्स्यासाठी आपणच हे तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली त्याने दिली. त्याला अटक करण्यात आले आहे, अशी महिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील मदन पाटील, त्यांची सात महिन्यांची गरोदर असलेली पत्नी अनिषा उर्फ माधुरी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विनायक यांची डोक्यात धारधार शास्त्रांनी वार करून हत्या केली. तिघांचेही मृतदेह फेकण्यात आले होते. या प्रकरणात हत्येमागच्या सर्व शक्यता तपासण्यात आल्या. तपास करत असताना मदन पाटील आणि त्यांचा सख्खा भाऊ हनुमंत यांच्यात घराच्या हिस्स्यावरून वाद होते अशी महिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हनुमंत याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. ही हत्या झाली तेव्हा आपण पोशीर येथे मामाकडे रहायला गेलो होतो. तेथून कुठे गेलो नाही असे पोलिसांना त्यांनी सांगितले. त्याचे मामा देखील हनुमंत आमच्याचकडे होता असे सांगत होते. पोलीस त्याला सोडून देण्याच्या मानसिकतेत होते. त्याचवेळी त्याने रात्री सफेद शर्ट घातला होता आणि सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळा टीशर्ट होता, अशी माहिती मिळाली. टीशर्ट का बदलला. रात्री घातलेला पांढरा शर्ट कुठे आहे?असे प्रश्न विचारताच तो निरूत्तर झाला. त्याचवेळी पोशीर येथील शाळेच्या आवारतील सीसीटीव्ही फुटेजमधील त्याच्या हालचाली त्याला दाखवण्यात आला. तो हादरला आणि गुन्ह्याची कबुली दिली. चिकनपाडा येथील घराचा हिस्सा मिळावा व वेगळे रेशकार्ड काढून द्यावे अशी मागणी हनुमंत थोरला भाऊ मदन याच्याकडे अनेक वर्ष करत होता. यावरू काही वर्षापूर्वी दोन्ही भावांमध्ये भांडण झाली होती. आपला भाऊ आपल्याला घराचा हिस्सा देणार नाही याची खात्री झाल्यामुळे मदनची हत्या करण्याचे हनुमंतने ठरवले. त्यानुसार गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आपल्या पत्नीला माहेरी पाठवले. स्वतः पोशीर येथे मामाकडे राहण्यासाठी गेला. रात्री घरी मामाच्या घरी थांबला. मध्यरात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर तो उठून चालत चिकनपाडा येथे भावाच्या घरी गेला. दरवाजा उघडा असल्यामुळे सरळ घरात शिरला. त्याने कुर्हाडीने मदन, अनिषा व विनायक यांच्यावर वार केले. घरातील रक्ताचे डाग फुसले. तीघांचे मृतदेह घराशेजारच्या ओढ्यात फेकले. रक्ताने माखलेला आपला सफेद शर्ट फेकला व दुसरे टीशर्ट घालून तो पुन्हा पोशीर येथे मामाच्या घरी गेला व गणपतीसमोर जाऊन बसला. चिकनपाडा येथे तिहेरी हत्याकांड झाल्याची बातमी पोशीरमध्ये पोहचली. तरी जणू आपण काही केले नाही असे हनुमंत वावरत होता. भावाच्या हत्येमुळे तो दुःखी झाल्याचे नाटक करत होता. त्यामुळे हनुमंत रात्रभर घरातच होता असे मामांना देखील वाटत होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अटकला. हनुमंतनेच घराच्या हिस्स्यासाठी सख्खा भाऊ, गरोदर वहिनी आणि पुतण्याची हत्या केली हे उघड झाले तेव्हा सारेच हादरून गेले. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या पथकांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला. कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे पुढील तपास करत आहेत. ही पूर्वनियोजित हत्या आहे. यात एका गरोदर महिलेची हत्या झाली आहे. 11 वर्षाच्या लहान मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही क्रुरता लक्षात घेता आरोपी हनुमंत पाटील याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करून. हा खटला फास्टट्रॅकवर चालवाव अशी न्यायालयाला विनंती करणार आहोत, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. ००००
नवी मुंबई महापालिकेस स्वतःचे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी प्राप्त नवी दिल्ली, दि. १० – नवी मुंबई महापालिकेचे ‘पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science)’ सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात National Medical Commission मार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै २०२४ रोजी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला यश आले राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांचेही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी यादृष्टीने सहकार्य लाभले. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर सकारात्मक परिणाम होत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science) सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाली असून ही नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात मिळालेली मौल्यवान आरोग्यपूर्ण भेट आहे.…
प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने पाच हजार चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल विधानसभा मतदारसंघाची आजमितीस लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाखांच्या आसपास असून आज झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून पनवेल व उरण तालुक्यांकडे पाहिले जाते. भविष्यात या परिसरात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या अजूनही मोठया प्रमाणात वाढणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मुलभूत गरजांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा पुरविणे हे शासन म्हणून आद्य कर्तव्य आहे. पनवेल परिसरामध्ये फक्त पनवेल येथील ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके’ हे एकमेव नाट्यगृह आहे, त्यामुळे पनवेल परिसरातील सर्व नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याकरिता मर्यादा येत आहेत. पनवेल विधानसभा अंतर्गत खारघर विभाग हा अत्यंत सुनियोजित पध्दतीने विकसित होत असलेला विभाग असून, त्या ठिकाणची लोकसंख्याही मोठया प्रमाणावर वाढत आहे. खारघर क्षेत्राची ओळख ही उत्तम शैक्षणिक केंद्र (Educational Hub) म्हणून असून सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स, उत्सव चौक तसेच अन्य धार्मिक प्रार्थनास्थळांमुळे एक वेगळी ओळख या परिसराची निर्माण झाली आहे. या परिसरात कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर रहात असून त्यांची मागणी व सांस्कृतिक गरज लक्षात घेता खारघरमध्ये एका नाटयगृहाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडापैकी ५००० चौ. मी.चा भूखंड नाट्यगृहाकरिता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. कोट- पनवेलला कला व सांस्कृतिक वारसा आहे. त्याच प्रमाणे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या खारघरमध्येही कलाप्रेमी आहेत. येथील नागरिकांची नाट्यगृह असावी अशी मागणी आहे. त्यानुसार सिडकोकडून भूखंडाची मागणी केली आहे. नाट्यगृहाची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्या अनुषंगाने सिडको आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. – आमदार प्रशांत ठाकूर
प्रताप सरनाईक यांची आयुक्त संजय काटकर यांच्याकडे मागणी अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना शासकिय घरे देण्यात यावीत अशी मागणी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली आहे. गेल्या १५ वर्षापासून मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ओवळा- माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आमदार असून माझ्या मतदारसंघातील अंदाजे ५० टक्के भाग हा मीरा-भाईंदर क्षेत्रात तर ५० टक्के भाग हा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना महानगरपालिकेची घरे देण्यात आली असून १०० हून अधिक पत्रकारांनी घराचा ताबाही घेतलेला आहे. तश्याच पध्दतीची योजना मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातही लागू करावी, अशी विनंती अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्र्याकडे, माझ्याकडे तसेच आयुक्त या नात्याने आपल्याकडेही केलेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील काही इमारतींमध्ये शासकिय कोट्यानुसार महानगरपालिकेला घरे मिळणार असून त्यापैकी ५० टक्के घरे पत्रकारांना व ५० टक्के घरे ही विस्थापितांना देण्यासाठी मी आपणाकडे विनंती केलेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना घरे देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यानुसार आपण सदरची घरे ही पत्रकारांना देण्यासंदर्भात शासनाकडून अभिप्राय मागवून ही घरे ठाणे शहराच्या धर्तीवर पत्रकारांना वितरीत करावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांना केली आहे.
जालना: मनोज जरांगे हे येत्या १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण २९ सप्टेंबरला…
अशोक गायकवाड नाशिक : आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापिठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. पालकमंत्री भुसे यांनी नार – पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल राधाकृष्णन यांचे आभार मानले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ, खासदार भगरे, आमदार दराडे, आमदार इस्माईल, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, आमदार खोसकर, आमदार पवार यांनी आपले जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत राज्यपाल महोदयांना माहिती दिली.