Category: मुंबई

Mumbai news

अनियमित पाणी पुरवठ्यामुळे लाडक्या बहिणींकडून संताप

डोंबिवली एमआयडीसीसह ग्रामीण पट्ट्यात पाणी टंचाई डोंबिवली : निवडणुका झाल्या…मतदान झालं…विषय संपला…आता पाण्यासाठी झगडावे आम्हालाच लागणार, अशी परिस्थिती डोंबिवली एमआयडीसीसह ग्रामीण पट्ट्यात निर्माण झाली आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पाण्याचे वितरण पुरेशा दाबाने सुरू होते. मात्र प्रचार संपून मतदान पाणी वितरणावर परिणाम झाला. सद्या पाण्याचा दाब कमी केल्याने गरजेपुरते देखिल पाणी मिळेनासे झाले आहे. परिणामी रहिवाशांत, विशेषतः गृहिणींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात रहिवाशांनी समाज माध्यमांवर आपला रोष व्यक्त करताना प्रशासनासह राजकारणी आणि लोकप्रतिनिधींचा खरपूस समाचार घेतला आहे. मतांपुरते मतलबी असल्याचा आरोप करत नेत्या/पुढाऱ्यांना जबाबदार धरले आहे. एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असते. सदर गळती थांबविण्यासाठी एमआयडीसीकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. शिवाय लाईनला छिद्रे पाडून त्याद्वारे पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यावर उपायोजना करण्यात एमआयडीसी प्रशासनाला अपयश येत आहे. निवडणुकीत सर्व राजकिय पक्षांनी पाणी पुरवठ्या संदर्भातील योजनांची अंमलबजावणी आम्ही कशी केली आणि पुढे सर्वांना मुबलक पाणी मिळणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची पूर्तता होईल तेव्हा होईल. पण आत्तापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी गृहिणींकडून करण्यात येत असल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले. निवासी आणि औद्योगिक परिसरात काही वर्षांपूर्वी मुबलक पाणी उपलब्ध असायचे. आता मात्र आमचे पाणी अन्यत्र ठिकाणी वळविले आहे का ? जर पाणी पुरवठा करण्याची क्षमता नसेल तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या महुमजली इमारतींना परवानगी देता कामा नये, याकडे मिलापनगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा महाडिक यांनी शासन/प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ००००

सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!

– सहज आठवण करून द्यावी म्हटलं, बाकी काही नाही! मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून एक्झिट पोल बाजूला ठेवत बहुमत मिळवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, नक्की काय होणार याचे उत्तर मात्र शनिवारी सकाळी दहावाजेपर्यंतच मिळणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. समविचारी पक्षांना आणि निवडून येण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांना सोबत घेण्यासाठी दोन्हीकडून फोनाफोनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या निकालानंतर काय स्थिती असेल याबाबत चांगलीच उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, निकालापूर्वीच एकमेकांना डिवचण्याचा देखील उद्योग सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांचे जुने वक्तव्य समोर आणलं असून त्या वक्तव्यावरून त्यांना सहज आठवण करून द्यावी, असं म्हटलं आहे. बाकी काही नाही असे म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन असं म्हटलं होतं. याच वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी आठवण ट्विट करून दिली आहे. त्यामुळे निकालापूर्वीच सुषमा अंधारे यांनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीकडून रणनीती आखण्यास सुरुवात दरम्यान, राज्यामध्ये एक्झिट पोलमध्ये बरीच संभ्रमावस्था असली तरी महायुतीला कौल दिला आहे. मात्र. यामध्ये शिंदे यांच्या अपेक्षेनुसार जागा येत नसल्याचे चित्र एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. दुसरीकडे अजित पवार गटालाही अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे. एक्झिट पोलमध्ये काही जरी असले तरी महाविकास आघाडीकडून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर तातडीने मुंबईला येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

अहिल्यानगर शहरात प्रथमच होणार सायकालिंग स्पर्धा

राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा अहमदनगर : सायकलिंगचे शहर अशी ओळख प्राप्त करत असलेल्या अहिल्यानगर शहरात सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कॅम) यांच्या मान्यतेने आणिअहमदनगर सायकलिंग क्लबच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनगर प्रथमच अहिल्यानगरीमध्ये ५व्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २५ आणि २६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान करत आहे. पाथर्डी – अहिल्यानगर मार्गावरील चांदबीबी महाल बायपास लिंक रोडवर (चांदबीबी महाल ते वाळुंज) सुमारे १० किमी मार्गावर या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेमधून पुरी (ओरिसा) येथे ७ ते १० डिसेंबर दरम्यान होत असलेल्या २९व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे. या ५व्या महाराष्ट्र राज्य राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा युथ (१२ ते १४ वर्षे), सब ज्युनिअर (१५ आणि १६ वर्षे), ज्युनिअर (१७ आणि १८ वर्षे) या वयोगट मुले आणि मुलींसाठी तसेच ईलीट पुरुष व महिला (१९ वर्ष आणि त्यापुढील) आणि २३ वर्षाखालील पुरुष (मेन अंडर२३ वयोगट) अशा एकूण नऊ वयोगटात होतील. इंडीव्युजल टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट / रोड रेस अशा दोन प्रकारात स्पर्धक आपले कसब पणाला लावतील. या राज्य आणि राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमधून खेळाडू नोक-यांसाठी पात्र ठरत असतात, शासनाच्या इतर सर्व सवलती केवळ या स्पर्धेमधील कामगिरीवरुनच सायकलपट्टूंना मिळत असतात, नोक-या असणा-या खेळाडूंना बढती / पगारवाढ या स्पर्धेमधील कामगिरीवरुन ठरत असते म्हणून सायकलपट्टूंच्या दृष्टीने या स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण आहेत. सूर्या थात्तू, प्रणव कांबळे,  मानसी महाजन, मणाली रत्नोजी, आभा सोमण (सर्व पुणे), तेजस धांडे (नागपूर), प्राजक्ता सुर्यवंशी, येगेश्वरी कदम (दोघी सांगली), मुस्तफा पत्रावाला (मुंबई), आकांक्षा म्हेत्रे (जळगांव), प्रणीता सोमण, राज कारंडे, अपूर्वा गोरे (अहिल्यानगर), पूजा दाणोले (कोल्हापूर), अदिती डोंगरे, वीरेंद्रसिंह पाटील, हरीश डोंबाळे, समरजीत थोरबोले, ऋतिका शेजुळ (सर्व पुणे क्रीडा प्रबोधिनी) आदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपट्टूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी मा. गौरव फिरोदीया यांच्या अध्यक्षतेखाली सीएफआयचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, कॅमचे सचिव प्रा. संजय साठे, अहमदनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. साईनाथ थोरात, कॅमचे खजिनदार भिकन अंबे, मेहेर तिवारी यांची समिती काम करत असून तांत्रिक जबाबदारी आंतरराष्ट्रीय पंच सुदाम रोकडे, धरमेंदर लांबा आणि श्रीमती दीपाली पाटील सांभाळत आहेत.

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात मतांमध्ये हेराफेरी

मिरा-ईन्दर : 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मात्र याच दरम्यान काँग्रेसने 145 पैकी 5 बूथावर…

बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने जवळपास २०० जागांवर उमेदवार उभे केले होते. यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे आदी अनेक मनसे नेत्यांना संधी देण्यात आली. यापैकी…

अमेरिकेत अदाणींविरोधात अटक वॉरंट

सौर ऊर्जा वितरणाचे कंत्राट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप न्युयॉर्क : भारताच्या उद्योगजगतात भुकंप झाला आहे. भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणींच्याविरोधात भ्रष्ट्राचार प्रकरणात अमेरिकेत अटक वॉरंट…

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी २१ नोव्हेंबर हा महाराष्ट्रात हुतात्मा दिनम्हणून साजरा केला जातो. मुंबईतील हुतात्मा स्मारकास भेट देऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून…

मुख्यमंत्री आमचा असेल – बच्चू कडू

मुंबई : राज्यात आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही,मुख्यमंत्री आमच्या तिसऱ्या आघाडीचा असेल असे विधान प्रहार जनशक्‍ती पक्षाचे नेते बच्‍चू कडू यांनी केले आहे. “माझ्या अचलपूर मतदारसंघात भाजपनं खालच्या पातळीवर प्रचार केला. काँग्रेस आणि…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गयानातील सर्वोच्च अशा ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ या पुरस्काराने गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी सन्मान केला.

महायुतीला १४० तर, मविआला १३८ जागा

स्लग- मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अंदाज स्पर्धेत महायुतीला १४० तर, मविआला १३८ जागा मुंबई, :  मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालासाठी अंदाज वर्तवा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबईतील…