Category: मुंबई

Mumbai news

एलआयसी-आयडियल बुध्दिबळ स्पर्धा

राघव, अहान, नील, आद्विक विजेते मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे बालदिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धेचे विविध वयोगटातील विजेतेपद मुलांमध्ये राघव संचेती, अहान जॉली, नील भंडारी, आद्विक अगरवाल यांनी तर मुलींमध्ये आध्या पाठक, आराध्या पुरो, अक्षा मंगलापल्ली, आर्या नाईक यांनी जिंकले. ७ वर्षाखालील गटात पाचव्या निर्णायक साखळी फेरीमध्ये राघव संचेतीने अपराजित शंतनू जोशीची (४ गुण) विजयी दौड रोखली आणि सर्वाधिक साखळी ४.५ गुणासह प्रथम स्थानावर झेप घेतली. परिणामी शंतनू जोशीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शर्विल मामळूस्करने (४ गुण) तृतीय, डेत्यन लोबोने (३.५ गुण) चौथा, तत्त्वा शेजवळने (३.५ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये आध्या पाठकने (४ गुण) प्रथम व निकिता संदीपने (३ गुण) द्वितीय क्रमांक मिळविला. ९ वर्षाखालील मुलांमध्ये अहान जॉलीने (४ गुण) प्रथम, कृषिव गालाने (३.५ गुण) द्वितीय, अगस्त्य गुरवने (३ गुण) तृतीय, कबीर पिंगेने (३ गुण) चौथा, मार्तंड गजणेने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आराध्या पुरोने (४.५ गुण) प्रथम, आराध्या कामतने (२.५ गुण) द्वितीय; ११ वर्षाखालील मुलांमध्ये नील भंडारीने (५ गुण) प्रथम, कविर मोदीने (४ गुण) द्वितीय, अनय भांगरेने (३ गुण) तृतीय, आर्यन झाने (३ गुण) चौथा, संकीत संघवीने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये अक्षा मंगलापल्लीने (३ गुण) प्रथम, सिम्रिता बुबनाने (२ गुण) द्वितीय आणि १३ वर्षाखालील मुलांमध्ये आद्विक अगरवालने (५ गुण) प्रथम, देवांश राठोडने (३ गुण) द्वितीय, फेरद्यन लोबोने (३ गुण) तृतीय, समर्थ साळगावकरने (३ गुण) चौथा, स्मित रेवस्करने (२.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आर्या नाईकने (४ गुण) प्रथम, शहाना कृष्णनने (३ गुण) द्वितीय पुरस्कार पटकाविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सेक्रेटरी राजन राणे, क्रीडाप्रेमी विलास डांगे व चंद्रकांत करंगुटकर, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

अभिषेक बजाज, राहुल सचदेवची आगेकूच

मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धा मुंबई, 10 नोव्हेंबर: मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेत सिक्स रेड तिसर्‍या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत मुंबईच्या अभिषेक बजाज आणि राहुल सचदेवने आगेकूच कायम ठेवली. एमएचसी बिलियर्ड्स…

अजित पवारांची चाय पे चर्चा… खराडी येथील चंदनवाडी येथे प्रचारादरम्यान अजित पवारांनी चायचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली…

महायुतीसाठी पैशांचे वाटप पोलिस व्हॅनमधून केले जातेय

अनिल परबांचा खळबळजनक आरोप मुंबई, दि. ०८ – (प्रतिनिधी)- कायदा आणि पैशांचा दुरुपयोग करून सरकार कोसळवली जात आहेत. पैशांचा जोर असाच राहीला तर येणाऱ्या काळात उद्योगपती अदाणीही पंतप्रधान झाल्यास आश्चर्य…

विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली

सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई   मुंबई : विनातिकीट प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत ८० कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. त्यातही दसरा, दिवाळीच्या काळात अनेक प्रवाशांनी गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिकीट तपासनीसांनी विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून एकट्या ऑक्टोबर महिन्यात १२ कोटी रुपयांची दंडवसुली केली. पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. लोकल, रेल्वेगाड्या, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट नसलेल्या प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथक सज्ज केले आहेत. तिकीट तपासनीसांच्या पथकांनी गेल्या सात महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून ८०.५६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मुंबई उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २६.६० कोटी रुपयांची दंडवसुली केली. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.०९ लाख विनातिकीट प्रवाशांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून १२.१० कोटी रुपये वसूल केले. याशिवाय, ऑक्टोबरमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये, फलाटावर ९३ हजार विनातिकीट प्रवाशांना शोधून ३.९० कोटी रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या सात महिन्यात धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी करून, ३४,८०० विनातिकीट आणि सामान्य लोकलचे तिकीट असलेल्या प्रवाशांना पकडून सुमारे १.१५ कोटींचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, प्रवाशांनी कायम योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का?

उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा   मुंबई : विकास आराखडा (डीपी) नियोजित रस्ता संरेखित करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर मग पालिका अधिकारी नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करतात, अशी विचारणा नुकतीच उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासानाला केली. महापालिका अधिकाऱ्यांना कशाचीच भीती राहिली नाही का ? अशी विचारणाही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असतानाही त्याचे पालन करण्याकडे उघडपणे दुर्लक्ष करण्यात येते, त्यांचे आदेश मनमानी पद्धतीने धुडकावून लावले जातात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची ही अशी वागणूक खपवून घेतली जावी का ? असा प्रश्न करून याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी सविस्तर प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले. विलेपार्ले (पश्चिम) येथील विकास आराखडा (डीपी) नियोजित रस्ता संरेखन प्रस्तावित आहे. परंतु, या रस्त्याच्या कामामुळे एका चर्चचे बांधकाम बाधित होणार असल्यामुळे रस्त्यांच्या संरेखनात बदल करण्याची मागणी ‘पेंटेकोस्टल मिशन सोसायटी’सह अन्य रहिवाशांनी केली होती. सुरुवातीला महापालिकेने लगतचा भूखंड याचिकाकर्त्यांना देऊ केला होता. परंतु, नंतर भूखंड वाटप करण्याची कायद्यात तरतूद नसल्याने पालिका प्रशानाने निर्णय फिरवला. त्या विरोधात याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी १६ मे रोजी महापालिका आयुक्तांना या प्रकरणाची योग्य ती तपासणी करून तात्काळ प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर, याचिकाकर्त्यानी १० ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांना आणखी एक निवेदन दिले. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग-१ च्या प्रधान सचिवांना प्रस्ताव-अ सादर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या प्राथमिक आदेशानंतर १४ महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या संबंधित आदेशाबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा दावा महापालिकेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. परंतु, याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे पुरावे न्यायालयात सादर केल्याकडे न्यायालयाने पालिकेच्या वकिलांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग-१ च्या प्रधान सचिवांना प्रस्ताव-अ सादर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या प्राथमिक आदेशानंतर १४ महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.

 वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या!

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश   मुंबई : हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. ही लस चार प्रकारच्या इन्फ्लूएंझापासून संरक्षण करत असल्याने या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. भारतात ऑगस्टपर्यंत १५ हजार जणांना इन्फ्लूएंझाची लागण झाली असून, यातील २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवाळ्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. साधारणपणे इन्फ्लूएंझाचा सर्वाधिक त्रास हा ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो. वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो. हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही लस घेण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये एच१एन१ इन्फ्लूएंझा विषाणू वाढत असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. लस कधी घ्यावी? इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये या लशीची किंमत नियंत्रित नसल्याने प्रति डोस १८०० ते २००० रुपये नागरिकांना मोजावे लागतात.

 बालदिनी क्रिएटीव्ह टच चित्रकला स्पर्धेचे आयोजन

टच संस्थेच्या वतीने राजेंद्र साळसकर मुंबई : ‘टच'(टर्निंग अपॉर्चुनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाईल्ड हेल्प) ही स्वयंसेवी संस्था १९९३- ९४ पासून ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या विकासासाठी महाराष्ट्रभर कार्यरत आहे. दुर्गम, डोंगराळ,…

विधानसभा निवडणुकीत मद्याचा महापूर

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य तस्करी, मद्यसाठ्याविरोधात मोहीम हाती घेतले होते. यामध्ये अवघ्या २३ दिवसांत पाच हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून साडेचार…

रीगन, शर्वेय, मुक्ता, अनन्या अंतिम फेरीत

 जेव्हीपीजी-टीएसटीटीए टेबलटेनिस स्पर्धा मुंबई,  8 नोव्हेंबर: द सबर्बन टेबलटेनिस असोसिएशनच्या (टीएसटीटीए) मान्यतेने जेव्हीपीजी-टीएसटीटीए फाईव्ह स्टार जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत रेगन अल्बुकर्क, शर्वेय सामंत तर मुक्ता दळी आणि अनन्या चांदेने अंतिम फेरीत धडक मारली. जेव्हीपीजी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत रीगनने विनीत दीपकचा ११-७, ११-७, ११-६, ११-६ असा पराभव केला. शर्वेया सामंतने युवराज यादववर ५-११, ११-६, ११-३, १४-१२, ११-६ असा विजय मिळवला. महिला एकेरीत मुक्ताविरुद्ध संपदा भिवंडकरवरने दुखापतीमुळे पहिल्या गेमनंतर माघार घेतली. त्यावेळी मुक्ता ही १-०(११-५) अशी आघाडीवर होती. अन्य लढतीत अनन्याने सिया हिंगोराण्यावर ११-८, ११-६, ११-८, ११-७ अशी मात केली. निकाल (उपांत्य फेरी) – 17 वर्षांखालील मुली: मायरा सांगलेकर विजयी वि. वैष्णवी जैस्वाल 11-7, 11-2, 11-1; निवा चौघुले विजयी वि. उर्वी चुरी 11-6, 8-11, 11-9, 11-13, 11-8. 17 वर्षांखालील मुले: अक्षांश साहू विजयी वि. झैन शेख 11-5, 13-11, 11-7; ध्रुव शहा विजयी वि. अर्णव क्षीरसागर 11-8, 10-12, 6-11, 13-11, 12-10. 19 वर्षांखालील मुली: अनन्या चांदे विजयी वि. श्रावणी लोके 6-11, 11-13, 11-4, 13-11, 11-8; उर्वी चुरी विजयी वि. मुक्ता दळवी 7-11, 11-5, 11-5, 11-7 .…