Category: मुंबई

Mumbai news

राहुल गांधीची आज मुंबईत प्रचारसभा

मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आज बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान…

लाडक्या बहिणींना वंचित ३५०० देणार !

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लाडक्या बहीण योजनेत उडी घेत आता ३५०० रुपये महीना देण्याची घोषणा करीत आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल,  बोगस आदिवासी दाखले रद्द…

मनसेचे सरकार कुणालाच काही फुकट देणार नाही- राज ठाकरे

लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल यवतमाळ : लाडक्या बहीणींना फुकटात कीती जास्तीत जास्त पैसे द्यायचे यावरून सर्वच पक्षात चढाओढ सुरु असताना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मात्र मनसेचे सरकार आल्यास या…

देवरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

शोभायात्रेसाठी पाचशे रुपये देऊन कार्यकर्ते आणल्याचा आरोप मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि वरळीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार केली…

उद्धव ठाकरेंनीही कोल्हापुरातून विधानसभेचे रणशिंग फुंकलं

ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशीच आहे,  गद्दारांना गाडणार म्हणजे गाडणारचं राधानगरी : एकीकडे महायुतीने आज कोल्हापूरातून प्रचाराचा नारळ फोडला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपल्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातूनच फोडला. ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख…

प्रचाराचा नारळ फुटला !

लाडक्या बहि‍णींना महिना २१००, वृध्दांना महिना २१००, शेतकऱ्यांना वर्षाला १५००० – एकनाथ शिंदेंच्या बंपर घोषणा कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथून आई अंबाबाईच्या आशीर्वादाने…

अबू आझमींचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जंगी स्वागत

 शाखेत बसून नागरिकांशी संवाद; शिवसैनिक प्रचार करणार मुंबई  : मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार व समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. यावेळी ते केवळ समाजवादी पार्टीचे…

साकिब मुलानीचे शानदार शतक

 कांगा लीग क्रिकेट स्पर्धा मस्कती सीसीचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मुंबई : एमसीए डॉ. एच. डी. कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत डी डिव्हिजनमध्ये मस्कती सीसीने दहीसर एससीवर  पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. त्यात साकिब मुलानीची (121 धावा) शतकी खेळी महत्वपूर्ण ठरली. दहिसर एससीने प्रथम फलंदाजी करताना आकाश मांगडे (110 धावा) आणि रुशील पारकरच्या (84 धावा) दमदार खेळीच्या जोरावर 5 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, मस्कती सीसीने 3 बाद 228 धावा करताना पहिल्या डावात आघाडी घेतली. साकिबने 121 धावांची चमकदार खेळी केली. सार्थ वाघेलाने 83 धावा करताना त्याला चांगली साथ दिली. सी डिव्हिजनमध्ये पांडुरंगवाडी सीसीने कोळी कंबाईन क्रिकेट इलेव्हनवर पहिल्या डावाच्या आघाडीवर मात केली. पांडुरंगवाडी सीसीने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 8 बाद 144 धावा केल्या. त्यानंतर अचूक गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला 64 धावांमध्ये गुंडाळून फॉलोऑन लादला. साईराज विनयगममूर्तीने (5/15) निम्मा संघ गारद करताना त्यात मोलाचा वाटा उचलला. संक्षिप्त धावफलक – सी डिव्हिजन: पांडुरंगवाडी सीसी – 8 बाद 144 (यश पै 36, चिन्मय केळकर 34; चिन्मय पाटील 3/53) वि. कोळी कंबाईन क्रिकेट इलेव्हन – सर्वबाद 64(साईराज विनयगममूर्ती 5/15) आणि फॉलोऑननंतर (4 बाद 58) सुमीत प्रजापती 4/19). निकाल: पांडुरंगवाडी सीसी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी. भटनागर स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन – 9 बाद 192 (पार्थ चंदन 74, जितेश राऊत 44; राजेश सोनी 4/37) वि. घाटकोपर जॉली जिमखाना – 155 सर्वबाद (राज जैन 32, प्रतीक म्हात्रे 32; रोहित यादव 6/37, पार्थ चंदन 37/3) ६६). निकाल: भटनागर स्पोर्ट्स पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी. डी डिव्हिजन: कांदिवली सीए – सर्वबाद १६१(फ्लिन पाटील ५८, पार्थ शहा ४८; सुमेध तारे ४/४१, आकाश माळी ३/२२) वि. वरळी एससी – बाद ६ बाद १६३(सुमेध तारे ३७, बबली शर्मा ३३). निकाल – वरळी एससी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी. अमर सीसी – सर्वबाद १३७(जयनेश पटेल ३१; पियुष कनोजिया ४/५१, ध्रुव गोठी ३/२१) वि. माझगाव सीसी – सर्वबाद १२८(आदित्य शेळके ५८; दिग्विजय सिंग ५/४३, सूरज सिंग ३/३६). निकाल – अमर सीसी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी. दहिसर एससी – 5 बाद 212 (आकाश मांगडे 110, रुशील पारकर 84) वि. मस्कती सीसी – 3 बाद 228 (साकिब मुलानी 121, सार्थ वाघेला 83). निकाल – मस्कती सीसी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी. सुपरस्टार एससी – सर्वबाद 113(सुदर्शन आचार्य 43, आर्य गायकवाड 4/26, भावेश पटेल 4/29) आणि 5 बाद 62 (रोहन तांबे 30; आर्य गायकवाड 3/12) वि. वेलिंग्टन सीसी – सर्वबाद 98(अनिलकुमार रोनकी/255 , सिमांत दुबे 4/52). निकाल – सुपरस्टार एससी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

संत कृष्णदास महाराज सत्संगची दादरमध्ये कार्तिक एकादशीनिमित्त दिंडी सोहळा

मुंबई : संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबईच्या वतीने मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ या दिवशी कार्तिक एकादशी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही दिंडी दादर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल बाजार येथून सकाळी साडे आठ वाजता सुरू होईल व त्याची सांगता श्री. विठ्ठल मंदिर, रानडे रोड, दादर येथे होईल. भवसागरामध्ये अडकलेल्या सर्वच भक्त भाविकांना पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनास जाणे शक्य होत नाही. म्हणून संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबईच्या वतीने कार्तिकी एकादशीला भक्तांना दिंडीचा आनंदघेता यावा, यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी दुपारी लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते आणि जपानमधील पहिले मराठी आमदार योगेंद्र पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय कौटुंबिक वातावरणात उत्साहात संपन्न झाले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दर्पण दिवाळी अंक २०२४ चे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राला दर्जेदार दिवाळी अंकांची परंपरा आहे. ही परंपरा सातत्याने जपण्याचे कार्य मुंबई मराठी पत्रकार संघ अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहे. दिवाळी अंक प्रदर्शनात उत्तमोत्तम अंक आपल्याला इथे पहायला मिळतात, अशा शुभेच्छा यावेळी डॉ. प्रकाश खांडगे यांनी दिल्या. मुंबई मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दर्पण हा दीपावली विशेषांक सुद्धा अत्यंत दर्जेदार असल्याची प्रशंसा त्यांनी केली. योगेंद्र पुराणिक यांच्या निमित्ताने आपला पत्रकार दर्पण दिवाळी अंक आता थेट जपानमध्ये पोहोचणार असल्याने ही एक आनंददायक बाब आहे, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. प्रकाश सावंत आणि शैलेंद्र शिर्के हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य अनुक्रमे नवशक्ति आणि पुण्यनगरीचे संपादक झाले. ही पत्रकार संघाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. सर्वांनी या दोन्ही संपादकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. योगेंद्र पुराणिक यांनी या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के, प्रकाश सावंत, विश्वस्त राही भिडे यांनीही मनोगत व्यक्त केले. हे प्रदर्शन ९ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या कालावधीत साहित्यप्रेमींसाठी खुले असेल