Category: मुंबई

Mumbai news

संजय मधुकर मुळे यांचा ‘स्पीकर ऑफ द इयर’ म्हणून गौरव

मुंबई : द एक्सलंसीआयकॉनिक अवॉर्ड  आणि फाव अँड फेअर्स यांच्यातर्फ़े  आयोजित  कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक  संजय मधुकर मुळे यांचा “बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर” पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. मुंबई येथे  वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते अरबाज खान यांनी  संजय मुळे यांचा पुरस्कार देऊन गौरव केला.  मुळे यांनी “नॅशनल इकॉनॉमिक ग्रोथ थ्रु इनडिव्ह्युज्वल  कॉन्ट्रब्युशन” या विषयावर आपले विचार मांडले होते. या भाषणास बेस्ट स्पीच तर स्पीकर ऑफ द इयर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. यापूर्वी द एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्डतर्फे मुळे यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर  नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार,  एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

‘१०८ रुग्णवाहिका’ आता ॲपद्वारे दारात

पत्ता सांगण्याचीही आवश्यकता नाही मुंबई : जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली, रस्त्यामध्ये अपघात झाला की नागरिकांकडून तातडीने १०८ क्रमांकावर संपर्क साधत रुग्णवाहिका बोलविण्यात येते. मात्र बऱ्याचदा ही रुग्णवाहिका कुठपर्यंत पोहोचली हे…

आतषबाजीत मुक्या प्राण्यांची फरपट

दिवाळीच्या चार दिवसांत ३१ प्राणी व पक्षी जखमी मुंबई : दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी लहानथोरांना आनंद देते, मात्र त्यातून निघणाऱ्या धूर आणि आवाजाने जिथे माणसांनाही असह्य त्रास होतो, तिथे प्राणी-पक्षी अपवाद…

महाविनाश आघाडी विरोधात आरोपपत्रांची मालिका !

विकासद्रोही, राज्यद्रोही, धर्मद्रोही, जनताद्रोही नेत्यांना धडा शिकवा –  अतुल भातखळकर अनिल ठाणेकर मुंबई : विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर पहिले पाऊल टाकणाऱ्या महाराष्ट्राला तब्बल दहा वर्षे मागे नेऊन विकासाची वाट रोखणारे महाविकास…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या  वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विविध संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम केंद्राच्या वा.…

 महाराष्ट्राची कबड्डी लीग मे महिन्यात!

सचिव बाबुराव चांदेरे यांची घोषणा   मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने पुढील वर्षी मे महिन्यात महाराष्ट्राची कबड्डी लीग घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी दिली. पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवार, दि. २३ ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत या विषयावर धोरणात्मक चर्चा करून मंजुरी घेण्यात आली. याबाबत चांदेरे यांनी सांगितले की, “लीगकरिता पुरुष आणि महिलांचे असे एकूण १६ संघ तयार करण्यात येतील. यासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया राबवण्यात येईल. राज्यातील प्रो कबड्डी लीग खेळलेल्या खेळाडूंचाही या लीगमध्ये समावेश असेल. इतर राज्यातील (बाहेरील राज्यातील) एका खेळाडूस प्रत्येक संघात स्थान देण्यात येईल. राज्यातील पुणे आणि मुंबई या दोन शहरांत ही स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धा साधारणत: पुढील वर्षाच्या मे महिन्यात घेण्याचा संघटनेचा मानस आहे. लीगचे नियम आणि अटी लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत.” चांदेरे पुढे म्हणाले की, “यापुढे खाजगी संस्थांना कबड्डी लीग घेण्यासाठी राज्यात परवानगी देण्यात येणार नाही.

 डॉ. डी. वाय. पाटील एसएचा निर्णायक विजय

 एमसीए कांगा लीग क्रिकेट स्पर्धा मुंबई : एमसीए डॉ. एच. डी. कांगा क्रिकेट लीग स्पर्धेच्या ‘ए’  डिव्हिजन सामन्यात डॉ. डी. वाय. पाटील एसएने परळ एससीवर निर्णायक विजय मिळवला. हिंदू जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात शनिवारी डॉ. डी. वाय. पाटील एसएने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ५ बाद १७९ धावांवर घोषित केला. प्रणव केला याने ६४ धावांची नाबाद खेळी करत त्यात मोलाचे योगदान दिले. हर्षल जाधवने ४६ धावा करताना त्याला चांगली साथ दिली. फलंदाजांनंतर गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना परळ एससीला पहिल्या डावात अवघ्या ५७ धावांवर गुंडाळताना त्यांच्यावर फॉलोऑन लादला. त्यानंतर दुसऱ्या डावात प्रतिस्पर्धी संघाला ७८ धावांत गारद करताना एक डाव आणि ४४ धावांनी विजय मिळवला. कर्श कोठारीने (५/२३ आणि ६/२२) सामन्यात ११ विकेट घेत डॉ. डी. वाय. पाटील एसएचा विजय आणखी सुकर केला. संक्षिप्त धावफलक (ए’  डिव्हिजन): डॉ. डी. वाय. पाटील एसए – 5 बाद 179 डाव घोषित(प्रणव केला 64*, हर्षल जाधव 46) वि. परळ एससी – पहिला डाव: सर्वबाद 57 (कर्श कोठारी 5/23, इक्बाल अब्दुल्ला 4/12) आणि दुसरा डाव  –  सर्वबाद 78(आशय दुबे 33, नमन झंवर 31; कर्श कोठारी 6/22, उमर खान 3/28). निकाल – डी. वाय. पाटील एसए एक डाव आणि ४४ धावांनी विजयी. पारसी जिमखाना – 8 बाद 249 (जय जैन 71, केविन आल्मेडा 66, अंगकिर्श रघुवंशी 41; विजय गोहिल 4/55, अथर्व कर्डिले 3/93) वि. अपोलो सीसी – 7 बाद 186 (ओंकार उंबरकर 51, करन शाह 43, स्वप्नील प्रधान 41, शुभम पुण्यर्थी ३०; शम्स मुलानी ६/७०). निकाल – सामना अनिर्णित. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया 3 बाद 275 (आकाश पारकर 104*, आकाश आनंद 100*) वि. कर्नाटक एसए – 6 बाद 121 (गौरिश जाधव 40*; ध्रुमिल मटकर 3/26). निकाल – सामना अनिर्णित. न्यू हिंद एससी – सर्वबाद 72(अथर्व भोसले 3/2, जुनेद खान 3/31) वि. पी. जे. हिंदू जिमखाना – 5 बाद 228 (सिद्धांत अधटराव 62, कौशिक चिखलीकर 56, गौतम वाघेला 53*; शंतनू कदम 3/57). निकाल – हिंदू जिमखाना पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी. शिवाजी पार्क जिमखाना – सर्वबाद 193(रझा मिर्झा 54; हिमांशू सिंग 5/50, विशाल दाभोळकर 4/60) वि. पार्कोफेन क्रिकेटर्स – 4 बाद 108 (प्रसाद पवार 32*). निकाल – सामना अनिर्णित. नॅशनल सीसी – 6 बाद 254 (सिद्धार्थ म्हात्रे 101*, भूषण तळवडेकर 51; योगेश पाटील 3/71) वि. मुंबई पोलीस जिमखाना – 4 बाद 136 (रोहित पोळ 62*, हर्ष आघाव 50*). निकाल – सामना अनिर्णित. व्हिक्टरी सीसी – 9 बाद 190 (सुवेद पारकर 35, जय बिस्ता 34, प्रग्नेश कानपिल्लेवार 33, हार्दिक तामोरे 31; हर्ष तन्ना 4/55) वि. एमआयजी क्रिकेट क्लब – 7 बाद 134 (गौरव जठार 44, वेदांत मुरकर 39; रॉयस्टन डायस 4/21). निकाल – सामना अनिर्णित.

 विशेष सुरक्षा तर पुरवली, पण त्यांचे ७ कोटी मात्र थकित!

पोलिसांच्या मेहनतीची सरकारलाच किंमत नाही मुंबई : अनेक व्हीआयपी व्यक्ती, संस्था, महत्त्वाच्या कारवाया, सरकारी कार्यक्रमांचा बंदोबस्त अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षेची मागणी केली जाते. शहराची सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असूनही मुंबई पोलीस प्रचंड ताण सहन करून ही सुरक्षा पुरवतात देखील. मात्र, खुद्द सरकारकडूनच मुंबई पोलीस विभागाच्या मेहनतीचा परतावा मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाद्वारे यासंदर्भातला खुलासा झाला आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडून वेगवेगळ्या कारवाया किंवा व्हीआयपी व्यक्तींसाठी पोलिसांकडून विशेष सुरक्षेची मागणी केली जाते. यामध्ये खुद्द राज्य सरकार किंवा त्यांच्या इतर विभागांच्या कार्यक्रम वा कारवायांना ही सुरक्षा पुरवली जाते. यासाठी पोलीस दलाकडून निश्चित अशा मूल्याची मागणी केली जाते. शासनानं निर्धारित केलेल्या निकषांनुसारच हे दर आकारले जातात. मात्र, गेल्या ७ वर्षांत मुंबई पोलिसांनी पुरवलेल्या अशाच विशेष सुरक्षेसाठीचे तब्बल ७ कोटी रुपये थकित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १४ शासकीय यंत्रणा, ७ कोटींची थकबाकी! माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, शासनाच्या एकूण १४ विभागांकडून या विशेष सुरक्षेसाठीचे तब्बल ७ कोटी १० लाख ६७ हजार २५२ रुपये थकित आहेत यामध्ये सर्वाधिक वाटा हा प्राप्तीकर विभागाचा असून त्यांच्या विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांसाठी ही विशेष सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय या यादीमध्ये मुंबई मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात MMRDA, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्टमधील जनरल स्टम्प ऑफिस अशा विविध शासकीय संस्थांचा समावेश आहे. प्राप्तीकर विभाग, सर्वात मोठा ‘डिफॉल्टर’! करचुकवेगिरीमुळे इतरांना डिफॉल्टर घोषित करणारा प्राप्तीकर विभागत मुंबई पोलिसांचा सर्वात मोठा ‘डिफॉल्टर’ ठरला आहे. कारण थकित ७ कोटींच्या रकमेपैकी एकट्या प्राप्तीकर विभागाचेच ४ कोटी ८५ लाख रुपये थकित आहेत. गेल्या सहा वर्षांत प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या वेगवेगळ्या छाप्यांसाठी पुरवलेल्या विशेष सुरक्षेचाही यात समावेश आहे. प्राप्तीकर विभागापाठोपाठ एमएमआरडीएकडे मुंबई पोलिसांचे १ कोटी ११ लाख रुपये थकित आहेत. २०१७ सालापासून या विभागाला पोलिसांनी पुरवलेल्या विशेष सुरक्षेचे हे पैसे आहेत. त्यानंतर आरबीआय तिसऱ्या क्रमांकावर असून RBI कडे मुंबई पोलिसांचे ४५ लाख ७१ हजार रुपये थकित आहेत. कशी असते सुरक्षा पुरवण्याची प्रक्रिया? एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या सर्व यंत्रणांना आधी विशेष सुरक्षेची मागणी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर ती विनंती पोलीस उपायुक्तांकडे पाठवली जाते. पोलीस आयुक्तांच्या वतीने नंतर पोलीस उपायुक्त त्या विनंती अर्जाची तपासणी करतात, चौकशी करतात आणि त्यातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारे ‘लोकल आर्म्स डिपार्टमेंट’ला संबंधित यंत्रणा वा व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले जातात.

बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश

गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी मुंबई : भाजपाचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी  हे बोरीवलीतून अपक्ष लढवण्यार ठाम होते. मात्र अखेर त्यांनी माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. किरीट सोमय्या आणि विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोपाळ शेट्टींनी उमेदवारी मागे घेतली आहे. माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीवर होती. कार्यकर्त्यांची काळजी पक्ष घेतो. मला अनेक नेते भेटायला आले. गोपाळ शेट्टी यांना काय करायचं ते करु दे अशी भूमिका पक्षाने घेतली नाही. त्यामुळे मी माघार घेतो आहे असं गोपाळ शेट्टींनी जाहीर केलं. बोरीवलीत भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यानंतर गोपाळ शेट्टींनी बंड करत काहीही झालं तरीही निवडणूक लढणारच असं म्हटलं होतं. मात्र आज ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. काय म्हणाले गोपाळ शेट्टी? “होय मी माघार घेत आहे. मी आमदार बनण्यासाठी लढत नाही आहे. मला दुसऱ्या पक्षांकडून देखील ऑफर्स आल्या होत्या . मात्र मला तसं करायचं नव्हतं . माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती. गोपाळ शेट्टी करतोय तर करु दे काय फरक पडतो? असं आमच्या पक्षात नाही . सर्व पक्षश्रेष्ठी मला भेटायला आले. माझं मत श्रेष्ठींपर्यंत बरोबर पोहचवण्यात मी यशस्वी ठरलो. बाहेरचा उमेदवार आणू नये असं मी मुळीच म्हणत नाही आहे . मात्र सातत्याने झाल्याने मला हे करावं लागलं. पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा असतो . पक्षाकडे आपल्या भावना मांडल्या आहेत.” असं गोपाळ शेट्टी  म्हणाले. लोकांना काय वाटेल ते मला माहीत नाही पक्षाला समजायला वेळ लागणार नाही असं नाही . लोकांना काय वाटेल मला माहिती नाही . पक्षाच्या नेत्यांवर नाराज नाही पण काही नेते आहेत ते असं करत असतात. नकळत होत असेल पण त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे. प्रत्येकवेळी निर्णय घेणारा माणूस एकच नसतो . मी अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करतो जे पक्षश्रेष्ठींचं ऐकतात . मी पक्ष नेतृत्वाचं ऐकतो तर ते देखील ऐकतील. असं गोपाळ शेट्टी म्हणाले आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही हे आधीही सांगितलं होतं-शेट्टी “मी अन्य पक्षात जाणार नाही, हे मी सांगितले होते. माझी लढाई एका विशिष्ट कार्यपद्धतीविरोधात आहे. भाजपा पक्ष कार्यकर्त्यांची खूप काळजी घेतो. मला आनंद आहे की, माझ्या पक्षातील नेत्यांनी संवाद साधला. त्यामुळे मी आता माघार घेतो. माझा मुद्दा पक्षश्रेष्ठींकडे पोहोचला आहे. सातत्याने बोरिवलीत अन्याय होतो, अशी चर्चा होती.” त्यामुळे मी हे पाऊल उचललं होतं. मी आता माघार घेत आहे असं गोपाळ शेट्टींनी जाहीर केलं.

मला लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक कट-महंत श्री रामगिरी महाराज

रमेश औताडे मुंबई : माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून अराजक मजविण्याचा जागतिक कट होता. मला कोणत्याही धर्माला, जातीला, पंथाला दुखवायचे नव्हते. आमच्या अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजाचा अध्यक्ष होता. मुस्लिम समाजाच्या पंगती उठत होत्या. त्यामुळे मी सर्व समाजाला घेऊन जात आहे. जे ग्रंथात लिहिले आहे तेच मी वक्तव्य केले. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशी माहिती महंत श्री रामगिरी महाराज यांनी सोमवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणेकडून सखोल तपास करून कारस्थान रचणाऱ्या धर्माध देशद्रोही आणि सत्तालोलुप राजकारण्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी सत्यपाल सिंह यांनी यावेळी केली. रामगिरी महाराज यांना जिहादच्या नावाखाली लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक पातळीवर कट रचला गेला होता आणि त्यात परकीय शक्तींबरोबरच देशातील धर्माध शक्ती आणि सत्तेच्या हव्यासाने पछाडलेले राजकीय पक्ष सहभागी होते. असा खुलासा भोपाळ येथील सोशल मीडिया रिसर्च सेंटर या संशोधन संस्थेने समाज माध्यमांच्या संदर्भात केलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाला असल्याचा दाखला देत रामगिरी महाराज यांची भूमिका योग्यच होती व आहे असे मत सत्यपाल सिंह यांनी यावेळी व्यक्त केले. ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या सुमारे दीड तास कालावधीच्या प्रवचनातील काही भागाचे संदर्भ वगळून तयार केलेल्या चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या हे योग्य नाही असे सांगत सिंह म्हणाले,  ‘गुस्ताख- ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा… यासारख्या घोषणा देत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये धर्माध लोकांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी दगडफेक करत राज्यात दंगकसदृश्य परिस्थिति निर्माण केली  तसेच काही धर्माध व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेऊन महंत श्री रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हे  दाखल करण्यात आले. हे योग आहे का ? असा सवाल सत्यपाल सिंह यांनी यावेळी केला.