Category: मुंबई

Mumbai news

संजय मधुकर मुळे यांचा ‘स्पीकर ऑफ द इयर’ म्हणून गौरव

मुंबई : द एक्सलंसीआयकॉनिक अवॉर्ड  आणि फाव अँड फेअर्स यांच्यातर्फ़े  आयोजित  कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक  संजय मधुकर मुळे यांचा “बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर” पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. मुंबई येथे  वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते अरबाज खान यांनी  संजय मुळे यांचा पुरस्कार देऊन गौरव केला.  मुळे यांनी “नॅशनल इकॉनॉमिक ग्रोथ थ्रु इनडिव्ह्युज्वल  कॉन्ट्रब्युशन” या विषयावर आपले विचार मांडले होते. या भाषणास बेस्ट स्पीच तर स्पीकर ऑफ द इयर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. यापूर्वी द एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्डतर्फे मुळे यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर  नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार,  एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मायेची दिवाळी – सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न !

मुंबई  : अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ व भटकी भूत बोरिवली मुंबई या दोन्ही सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच  जिल्हा परिषद कोतीमाळ तालुका जव्हार जिल्हा पालघर या शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबर मायेची दिवाळी…

महाराष्ट्रात एमआयएम 44 वरून अवघ्या 14 जागांवर

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. सत्ताधारी आणि विरोधकांपैकी कोणकोणते…

राज ठाकरेंच्या एका वक्तव्यामुळे अमित ठाकरेंची वाट बिकट,

मुख्यमंत्र्यांनी माहीम विधानसभेसाठी सदा सरवणकरांचे मन वळवण्याचे प्रयत्न सोडले?   मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महायुती एकमेकांना पुरक भूमिका घेणार, अशी चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे…

डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील डीजे, ढोलताशांच्या दणदणाटाने रहिवासी हैराण

डोंबिवली : उत्सवी रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर सण, उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजात डीजेवर गाणी, ढोलताशांचे वादन केले जाते. सण, उत्सव काळात होणाऱ्या या दणदणाटाने फडके रस्ता…

एमबीबीएस प्रवेशाबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आक्रमक

मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांना दिले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमानुसार झाले आहेत…

पालिका आयुक्तांची सफाई कामगारांसोबत दिवाळी, कामगारांच्या वसाहतीला सपत्नीक भेट

  मुंबई : महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिवाळीनिमित्त दादर येथील कासारवाडी परिसरातील महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला सपत्नीक सदिच्छा भेट दिली. मुंबईच्या दैनदिन स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या सफाई कर्मचारांचे आणि…

डोंबिवलीतील माणकोली पुलावर दिवाळीचा आखाडा

फटाके फोडण्यासाठी तरूणाईची गर्दी डोंबिवली : डोंबिवली शहर परिसरातील बहुतांशी तरूण दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठागाव येथील माणकोली पुलावर दररोज रात्रीच्या वेळेत गटाने येऊन फटाके फोडत आहेत. अनेक तरूण…

हितेंद्र ठाकूर यांची ‘शिट्टी’ गायब !

वसई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिल्या आहेत. या निवडणुकीत बहुजन…

फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन’नंतर आता अजित पवारांचं ‘येणार, येणार, येणारच’!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या असून जाहीर उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. माहीमसारख्या जागांवर युती किंवा आघाडीतल्या मित्रपक्षांमध्ये आपापसांतच मतभेदही दिसून येत आहेत. काही…