Category: मुंबई

Mumbai news

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

१,०३२ गुन्हेगारी व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीस   कर्जत : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदारांनीदेखील शंभर…

मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा;

रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार   मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतदेखील संपुष्टात आली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष असला तरी…

भाजपाच्या १७ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतून मिळवलं तिकिट,

वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत!   मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. दिवाळी संपली की महाविकास आघाडी आणि महायुती दोहोंचे प्रचार सुरु होतील. या दरम्यान…

नाराज रवी राजांची काँग्रेसला सोडचिट्टी

मुंबई : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसचेया नाराज रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांना सायन कोळीवाडा या ठिकाणाहून उमेदवारी हवी होती. मात्र काँग्रेसने गणेश यादव…

प्रकाश आंबेडकरांवर आज ॲन्जिओप्लास्टी

छातीत दुखत असल्याने तातडीने केले हॉस्पिटलमध्ये दाखल मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर  यांना आज सकाळी अचानक  छातीत दुखत असल्याने तातडीने  हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आल्यामुळे वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र,…

दादांची आईसोबत दिवाळी…

माझ्या आणि आईच्या वतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक – युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक

मुंबई, :  अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अभिनंदन केले. काम्याने बुधवारी आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांचेसह राज्यपालांची…

मुंबई पोर्टच्या इंदिरा गोदीत अहमद काझी यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न

मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मरीन खात्यातील फर्स्ट क्लास मास्टर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष अहमद के. काझी ३१ ऑक्टोबरला मुंबई पोर्ट मधील ३६  वर्षाच्या निष्कलंक…

सिद्धार्थ कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘कार्याध्यक्ष’ पदी निवड

राजेंद्र साळसकर मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. सिद्धार्थ कांबळे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेत कार्यरत आहेत. त्यासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य आहे. अनेक सहकारी संस्थांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांचे कार्य पाहता त्यांची कार्याध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, आमदार शिवाजी गर्जे, प्रवक्ते संजय तटकरे  मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, संतोष धुवाळी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने सिद्धार्थ कांबळे यांच्यावर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 0000

 रिपब्लिकन एकता आघाडीची समन्वय समिती स्थापन

 महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र पक्षांपेक्षाही मत विभागणीवरच अधिक आहे, असे नमूद करत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ दिलेल्या काही छोट्या – मोठ्या आंबेडकरवादी संघटना आणि गटांनी यावेळीही  महाविकास आघाडीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे दलित संघटनांसोबत झालेल्या एका संयुक्त बैठकीत महविकास  आघाडीतर्फे ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांनी एका बैठकीत स्वागत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर,  ‘ रिपब्लिकन एकता आघाडी ‘ च्या मुंबईत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत प्रचारमध्ये  ‘ मविआ ‘ तील तीनही पक्षांशी संवाद, संपर्क राखण्यासाठी एक समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही बैठक आझाद मैदान येथील रिपब्लिकन पक्ष ( खोरिप)  कार्यालयात पार पडली. रिपब्लिकन एकता आघाडीच्या या समन्वय समितीमध्ये सुरेश केदारे ( दलित पँथर), मिलिंद सुर्वे ( पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र),  भाऊ निरभवणे (रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे), सागर संसारे ( स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष) रवी गरुड (दलित सेना ), मनोज बागुल ( रिपब्लिकन जनशक्ती), प्रकाश हिवाळे ( लोक मोर्चा), सतीश डोंगरे ( आंबेडकरवादी भारत मिशन), बंधुराज लोणे ( ज्येष्ठ पत्रकार) यांचा समावेश आहे. या समन्वय समितीमधील सदस्यांसहित या रिपब्लिकन एकता आघाडीच्या बैठकीला प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे, कॉ. सुबोध मोरे, मिलिंद पखाले ( नागपूर ), ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ,  भगवान गरुड (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), भागवत कांबळे ( रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे ), मंगेश पगारे ( पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), शिवाजी गायकवाड, अनिल लगाडे, शशिकांत हिरे, रामानंद पाला हे घटक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सत्तांतराला सर्वोच्च प्राधान्य या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेत सत्ता बदलाचे वारे जोरात वाहत असून  बौद्ध, दलित, आदिवासी हे समाजही त्याला अपवाद नाहीत. किंबहुना परिवर्तनाची सर्वाधिक गरज त्यांना आहे. त्यातच भाजपने ही निवडणूक केवळ सत्ता टिकवण्यासाठी नव्हे, तर राज्यसभेत बहुमत प्राप्त करण्यासाठी अधिक महत्वाची मानली आहे. कारण त्या बहुमता नंतरच भाजपला जाचक वाटत असलेले धर्मनिरपेक्ष राष्ट्र आणि संविधान याबाबत निर्णायक पावले उचलणे शक्य होणार आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने, आंबेडकरी चळवळीने यावेळी सत्तांतर घडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे काळाची गरज ठरली आहे, असे रिपब्लिकन एकता आघाडीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारणाची उभारणी ही केवळ निवडणूक काळातच करण्याची गोष्ट मुळीच नाही. ती गंभीरपणे करण्याची दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच निवडून येण्याची सर्वांगीण क्षमता आणि स्वतःसाठी मतदासंघांची बांधणी या गोष्टींच्या अभावामुळे आंबेडकरवादी पक्षांच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता दुरावली आहे. त्यातच ‘ स्वबळावर लढत ‘ आणि ‘ स्वतंत्र आघाड्यांची निर्मिती ‘ हे दोन्ही  पर्याय आंबेडकरवादी राजकारणासाठी आजवर नेहमीच निरुपयोगी ठरले आहेत, याकडे रिपब्लिकन एकता आघाडीने लक्ष वेधले आहे. 00000