Category: मुंबई

Mumbai news

नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान करण्याविषयी जनजागृती

नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी होणा- निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने 150 व 151 विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीपचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त…

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर

मुंबई :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या तिसऱ्या यादीत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या आधी अजित पवार यांनी दोन याद्यांची घोषणा केली होती. त्यानुसार अजित पवार…

शरद पवारांच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील  उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता ९ उमेदवारांची तिसरी यादी शरद पवारांनी जाहीर केली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकूण ७६ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.  शनिवारी…

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भाजापाचे नेत वसंत देशमुखांना अटक

अहमदनगर: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजापाचे नेते वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी पातळी सोडून जयश्री थोरांतावर टिका केली…

आपलं तिकीटही फुकट, पाठिंबाही फुकट – जरांगे

जालना : मी किंवा माझ्या जवळचे कोणीही इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी पैसे मागत नाहीत. आपलं तिकीटही किंवा पाठिंबाही फुकट असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांनी व्यक्त केलं आहे. कुणीही पैशाचा व्यवहार करू नये…

कल्याण पुर्वेमध्ये ठाकरेंकडून निष्ठावंत सचिन बासरेंना तिकीट

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर कल्याण शहराचे पक्षप्रमुख निष्ठेने सांभाळणाऱ्या सचिन बासरे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. कल्याण पश्चिमेत महायुती व महाविकास आघाडीमध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे.…

वांद्रे रेल्वे स्थानकात ‘माणूसकी चिरडली’

चेंगराचेंगरीत  ९ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर मुंबई : मुंबईमधील रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा माणूसकी चिरडली गेली. यावेळी वांद्रे रेल्वे स्थानकात राखीव नसेलल्या जागा पटकावण्यासाठी भयंकर रेटारेटी झाली. आणि त्यानंतर…

आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीत देवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

निलेश राणे, मुरजी पटेल शिंदेंच्या शिवसेनेकडून दत्तक स्वाती घोसाळकर मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेची दुसरी यादी जाहिर करताना राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरेंच्या विरोधात…

मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटीची फसवणूक

मुंबई : एका डॉक्टर दाम्पत्याने मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबईच्या एन आर आय पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ४०६, ४२०, ३४ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार कल्पेश व्यास यांचे मालाड मध्ये वडीलोपार्जित मेडिकल स्टोअर्स आहे. 2013 मध्ये व्यास यांच्या बिल्डिंग मध्ये राहणारे कन्हैयालाल देराश्री यांनी त्यांचा मुलगा डॉ. धवल  देराश्री आणि त्यांची पत्नी डॉ. लता देराश्री वडील कन्हयालाल देराश्री यांचे नवी मुंबई सीवडुस येथे स्वतः मालकीचे मोठे सुयश हॉस्पीटल असल्याचे सांगितले. या हॉस्पीटलच्या जागेमध्ये एक मेडीकल आस्थापणा आहे. ते मेडिकल आस्थापणा चालवण्याचा परवाना घेतल्यास तुम्हाला आम्ही ते भाड्याने देऊ.  त्यामधुन तुम्हाला व्यवसाय चालु करता येईल असे त्यांनी सांगितले. देराश्री कुटुंबावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्या आस्थपणासाठी ४९ लाख रुपये बँक व्यवहाराने दिले. मेडिकल स्टोअर्स सुरू झाल्यावर या जोडप्याने ४८ लाख रुपयांची औषधे देखील खरेदी केली. तसेच ३० लाख रुपये उसने घेतले. या संपूर्ण व्यवहारात देराश्री कुटूंबियांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप व्यास यांनी केला आहे. तक्रारदाराला डॉक्टरांनी सेटलमेंटमध्ये दिलेला फ्लॅट सिटी बँकेकडे गहाण ठेवला होता. आजपर्यंत आरोपीने तक्रारदाराला कोणतीही रक्कम दिलेली नाही असे ॲड मित अशोक राजपोपट यांनी सांगितले. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. 0000

अग्निशमन यंत्रणेनेबाबत अजूनही अनेक शाळा महाविद्यालयात मनमानी कारभार

मुंबई :शाळा महाविद्यालय मधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याने तामिळनाडू येथे ९४ विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आग प्रतिबंध कायदा कठोर केला होता. प्रत्येक राज्याने त्याची अंमलबजावणी सुरू करा असे आदेश दिले होते. मात्र अजूनही अनेक शाळा महाविद्यालये मनमानी करत कायदा पाळत नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी चे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी सरकारकडे केली आहे. मुंबईतील वाळकेश्वर येथील गोपी बिर्ला मेमोरियल शाळेमध्ये अग्नी सुरक्षा यंत्राची अद्ययावत स्थिती नसल्याने मोठा वाद झाला होता. अग्निशामक विभागातील काही अधिकारी व शाळा मधील काही अधिकारी मनमानी कारभार करत मुलांच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोप अशोक कांबळे यांनी केला आहे. ही शाळा यश बिर्ला समूहाद्वारे चालवली जाते. शाळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगला मलबार हिल येथे आहे. विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालुन अग्नी सुरक्षा नियमाचे उल्लंघन करून मनमानी करण्याचा यांना अधिकार कोणी दिला ? असा सवाल अशोक कांबळे यांनी केला आहे. खाजगी अग्निशमन सुरक्षा यंत्रे पुरविणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरणे म्हणजे शाळेने जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. शाळेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून या समिती भीम आर्मी संघटनेचा विभागीय प्रतिनिधी घेण्यात यावा अशी मागणी अशोक कांबळे यांनी केली आहे.