विधानसभा स्वबळावर राज ठाकरेंचा एल्गार
स्वाती घोसाळकर मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी एकला चलो रेचा नारी दिलाय. निवडणूकीत कोणाशीही आघाडी नाही आणि युती करणार नसून येणारी विधानसभा स्वबाळवर लढविणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…
Mumbai news
स्वाती घोसाळकर मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी एकला चलो रेचा नारी दिलाय. निवडणूकीत कोणाशीही आघाडी नाही आणि युती करणार नसून येणारी विधानसभा स्वबाळवर लढविणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पण्यांना उत आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून राज ठाकरेंनी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली आहे. गोरेगाव येथे नेस्कोत आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध घटनांवर भाष्य करत शरद पवार यांच्यावरही टीका केली. निवडणुकीसाठा जागा वाटपाची चर्चा सुरू असताना प्रत्येकवेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार. अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली”, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “कालचा दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, इथून अफजल आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पाचं वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करून दाखवली. मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही. कोण निवडून आला, कोणाला मतदान केलं, सध्या ते काय करतात अशा पद्धतीने महाराष्ट्रात मी पाहिलंच नाही. मला कळेच ना काय सुरूय?” “शरद पवार सांगत आहेत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि मी आता अजित पवारांबद्दल बोलतच होतो. आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहिती नाही. भाजपा यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपात यायच्या ८ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते की ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकू. पण जेलमध्ये टाकण्याएवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय?”असा प्रश्नही राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेा विचारला. शरद पवार नास्तिक आहेत “मी ठाण्यातील सभेत म्हटलं होतं की शरद पवार नास्तिक आहेत. देवधर्म काही पाळत नाहीत. आजपर्यंत पाळला नाही. त्यांच्या मुलीने लोकसभेतच सांगितलं आहे, की माझेवडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सर्व बाहेर बोलल्यानंतर पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागलेत. पण हे हात जोडणंदेखील खोटं आहे.” तर महाराष्ट्र बरबाद होत जाणार सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही? गद्दारी करणारा प्रत्येकजण तुम्हाला का आवडतो? आमदार फोडाफोडी करायचे, राजकारण तापवायचं. एका पक्षाबरोबर निवडणूक लढवायची, विचारांची प्रतारणा करून दुसऱ्याबरोबर सत्तेत बसायचं, हेच आपण पाच वर्षे पाहतोय. सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा की फोडाफोडीचं राजकारण करणारी असली माणसं पाहिजेत? आज जर महाराष्ट्रातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार महाराष्ट्रात”, असंही राज ठाकरे म्हणाले. ०००००
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, उलवे नोड, खोपोली, कर्जत व वाशिवली / रसायनी या विभागात 40 सर्वसाधारण व 37 वातानुकूलीत अशा एकूण 77 विविध बसमार्गांवर प्रवासी सेवा देण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या “महिला सशक्तीकरण” या अभियानाच्या संकल्पनेतून व महिला सन्मानार्थ नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून महिलांसाठी उपक्रमाच्या बसेसधून प्रवास करतांना तिकीट दरात 50% सवलत देण्याच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक नमुंमपा यांनी मंजूरी दिलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्यानुसार महिलांना नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50% सवलत दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे. सद्यस्थितीत नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन दोन लाखाहून अधिक प्रवाशी प्रवास करीत असून त्यामध्ये साधारणतः 40% महिला प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या अंदाजित 80,000 महिला प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. तरी महिलांनी या प्रवास सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेले आहे.
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे विधानसभा शाखा क्रमांक १२ च्या विद्यमाने प्रथम ती, जागर स्त्री शक्तीचा! योग नवदुर्गा दर्शनाचा अशा अभिनव सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा शुभारंभ शिवसेना सचिव आमदार श्री मिलिंद नार्वेकर यांच्या शुभहस्ते मागाठाणे बोरिवलीत करण्यात आला. या प्रसंगी उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या सौ संजना घाडी,माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक सुजाता शिंगाडे, विधानसभा प्रमख अशोक म्हामुणकर, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर, संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, युवा विभाग अधिकारी विजय रांजणे,समन्वयक रोहिणी चोगले, शाखाप्रमुख अशोक परब, अमित मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे यांनी केले. संयोजन शुभदा शिंदे, सारीका झोरे, सचिन मोरे, शुभदा सावंत, योगेश देसाई, माधुरी खानविलकर यांनी केले. 00000
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबई : महाराष्ट्र भर दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमांना दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरवात होत असते. मुंबई जवळील बेलापूरच्या किल्यावर श्री वाघजाई माता सांस्कृतिक क्रिडा मंडळ,प्रभादेवी आणि शिव भक्तांच्या वतीने शिवप्रतिमा,शस्त्र पूजन व शिव मंदिराला दसरातोरण बांधून या कार्याची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी मुंबईच्या एवढ्या जवळ असूनही किल्ल्याची झालेली दुरावस्त पाहता किल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असून लवकरच या ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान,शिव प्रारंभ प्रतिष्ठान,मावळे आम्ही स्वराज्याचे,या संस्था व रोहित देशमुख, जयवंत निकम,राज मोरे,अमोल कदम,अजित कारके, किरण भोसले,कुलदीप धुमाळ,सुरज कदम आणि मोठया संख्येने शिव प्रेमी मावळे उपस्थित होते. ००००००००००००००
रमेश औताडे मुंबई /सर्वोच्च न्यायालयाने अंध विद्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालय किंवा विद्यापीठ या ठिकाणी त्यांना उपयुक्त असणाऱ्या सोयी सुविधा मिळण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व पॉलिसी केली आहे. मात्र त्याचा विसर शाळा महाविद्यालय व विद्यापीठाला पडला असल्याने अंध विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सरकारने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय व संबंधित शिक्षण यंत्रणा विद्यापीठ या ठिकाणी अंध विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा साठी संबंधित आस्थापना व प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी अंध विद्यार्थ्यांनी केली आहे. रेल्वे बस विमानतळ आदी ठिकाणी अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत मार्गदर्शक सूचना व मार्गिका यंत्रणा बसवल्या असतात. मात्र अनेक ठिकाणी आर्थिक कारणामुळे त्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अंध व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होतात व अपघात होण्याची शक्यता अधिक असते अनेक ठिकाणी अपघातही झालेले आहेत. आर्थिक कारण देत अंध व्यक्तींच्या सोयीसुविधा कडे दुर्लक्ष करणारे सरकार कंत्रांटदाराकडून इतर बिनकामाचा व गरज नसलेला विकास सुरू असताना त्या वेळी कंत्राट दाराला आर्थिक कारण का दिले जात नाही ? असा सवाल अंध विद्यार्थी करत आहेत. दृष्टी असलेल्या समाजातील अन्यायग्रस्तांनी आंदोलनाचे अस्त्र उपसून आंदोलन सुरू केले आहे. त्यांना सरकार न्याय देऊ शकत नाही. मग आम्ही आंदोलन केले तर आम्हाला सरकार न्याय देईल का ? असा सवाल अंध विद्यार्थी करत आहेत.
नवी मुंबई : श्रीगणशोत्सवाप्रमाणेच 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत उत्साहात संपन्न झालेल्या नवरात्रौत्सवातील विसर्जन सोहळा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेने केलेल्या योग्य नियोजनव्यवस्थेमध्ये सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला. महानगरपालिका क्षेत्रात 1437 घरगुती / सोसायटी मधील देवी मूर्ती विसर्जनाप्रमाणेच 171 सार्वजनिक देवी मूर्तींचे विसर्जन असे एकूण 1608 देवी मूर्तींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 112 घरगुती / सोसायटी व 20 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 71 घरगुती / सोसायटी व 29 सार्वजनिक, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 138 घरगुती / सोसायटी व 11 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 162 घरगुती / सोसायटी व 26 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 151 घरगुती / सोसायटी व 42 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 304 घरगुती / सोसायटी व 9 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 86 घरगुती / सोसायटी व 23 सार्वजनिक आणि दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 413 घरगुती / सोसायटी व 11 सार्वजनिक अशा एकूण 1437 घरगुती / सोसायटी व 171 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 1688 देवीमूर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे यातील 48 मूर्ती शाडूच्या होत्या. या माध्यमातून गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवातही पर्यावरणशील दृष्टिकोन जपण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांपैकी मुख्य 14 विसर्जन तलांवांमध्ये जलप्रदूषण टाळण्यासाठी गॅबीयन वॉलची रचना करण्यात आलेली असून त्याच क्षेत्रात भाविकांनी देवीमूर्ती विसर्जन करून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आवाहनानुसार जलाशयातील जैवविविधतेची जपणूक केली. सर्व 22 मुख्य विसर्जनस्थळांवर अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व श्री. शिरीष आरदवाड, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यासह विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच 200 हून अधिक स्वयंसेवक, लाईफगार्ड आणि अग्निशमन दलाचे जवान विसर्जन सोहळा सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी दक्ष होते. देवी / घटांच्या सुयोग्य विसर्जनासाठी श्रीगणेशोत्सवाप्रमाणेच तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आकाराने मोठ्या मूर्ती विसर्जित होतात अशा विसर्जन स्थळी फोर्कलिफ्टही ठेवण्यात आल्या होत्या. पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय सर्व 22 मुख्य विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्याची वाहतुक स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे करण्यात आली. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणाही सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. भाविकांच्या उत्तम सहकार्यामुळे नवरात्रौत्सव व देवी मूर्ती विसर्जन सोहळा शांततेत व सुव्यस्थितीत संपन्न झाला.
मुंबई:-नवोदित संघ, शिवमुद्रा प्रतिष्ठान यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. विशेष व्यावसायिक गटात गतविजेत्या भारत पेट्रोलियमसह इन्शोअर कोट, न्यू इंडिया एन्शो; रिझर्व्ह…
मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने १४ आणि १५ ऑक्टोबर या कालावधीत राज्य पंच उजळणी शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. दैवज्ञ भवन, कबाडे हॉस्पिटल, आकाशवाणी समोर, कोल्हापूर रोड, सांगली येथे हे दोन दिवसांचे शिबिर होईल. या शिबिरात नियमातील उजळणी बरोबरच पंचांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन व एकाग्रता यावर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन सोमवारी १४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता करण्यात येईल. या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व संलग्न जिल्हा संघटनेच्या पंचानी रविवारी सायंकाळी ७ नंतर शिबिरास्थळी उपस्थित रहावे असे राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना कळविले आहे. अधिक माहितीकरिता सांगली जिल्हा संघटनेचे सचिव नितीन शिंदे – 9922508833, किंवा अनिल माने – 9860053587 यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. 00000
कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धा मुंबई : द.आफ्रिका येथे सन सिटी या शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर१ (४० वर्षावरील पुरुष) या गटात 75 किलो वजनी गटात रायगडच्या “दिनेश हरिचंद्र पवार’यांनी सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिम मध्ये सराव करतात. यापूर्वी सुद्धा त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकली आहेत. दिनेश पवार यांच्या यशात त्यांच्या मातोश्री गीता हरिचंद्र पवार आणि पत्नी रेशमा दिनेश पवार यांचा देखील मोठा वाटा आहे. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष गिरीश वेदक यांनी पवार यांचे खास अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय प्रतापराव सरदेसाई यांचे सुद्धा मार्गदर्शन पवार यांना मिळाले. ००००