Category: मुंबई

Mumbai news

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

मुंबई : जिल्हा क्रीडा परिषद, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड आणि पोलिस मुख्यालय, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथे  आयोजित करण्यात आलेल्या  मुंबई विभाग अंतर्गत शालेय कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील मल्लांनी ४ सुवर्ण व ५ कांस्य पदकांची कमाई केली. त्यांच्या ओम जाधव, मनस्वी राऊत, कोमल पटेल, डॉली गुप्ताने सुवर्ण पदक   पटकावली. तर कविता राजभर, स्नेहा गुप्ता, सुप्रिया‌ गुप्ता, शिवांश जालुई आणि आर्दश‌ शिंदे यांनी कांस्य पदके‌ मिळविली. प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या पैलवानांची निवड राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेकरिता करण्यात आली आहे. पदक विजेत्यांना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. श्री गणेश आखाड्यातर्फे सर्व पदक विजेत्यांचे खास अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना   पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सुनिता चव्हाण यांच्या क्रीडा कार्याचा झाला गौरव

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे आतापर्यंत यशस्वीपणे साकारलेल्या ९९ बुध्दिबळ स्पर्धा, ४१ कबड्डी स्पर्धा, ८६ क्रिकेट स्पर्धा, ६५ कॅरम स्पर्धा, २२ शरीरसौष्ठव स्पर्धा, २१ व्यायाम स्पर्धा, ७ खोखो स्पर्धा, ४१ क्रीडा प्रशिक्षण शिबीर आदी उपक्रमामध्ये क्रीडाप्रेमींचा मोलाचा वाटा होता. त्यामध्ये उपक्रमा अनुषंगाने बॅकस्टेज सांभाळणाऱ्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांच्या कार्याचा सहभाग देखील महत्वाचा होता. म्हणूनच आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुनिता चव्हाण यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीचे औचित्य साधून नुकताच माजी नगरपाल व लायन्स डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सुवर्ण गौरवचिन्ह प्रदान करून क्रीडा कार्याचा सन्मान करण्यात आला. नुकतीच पार पडलेली राज्य स्तरावरील शालेय ६० मुलींची मोफत कॅरम स्पर्धा ही सुनिता चव्हाण यांच्या क्रीडा कार्याची पोचपावती ठरली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मागील तीन महिन्यात झालेल्या पाचपैकी  तीन शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत काही तांत्रिक अडचणींमुळे फक्त मुलांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे स्पर्धांपासून वंचित झालेल्या ३१ मुलींनी स्पर्धेसाठी जोरदार मागणी केली. परिणामी कार्यालयीन कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय खेळ करणाऱ्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांनी स्वतःच्या आईच्या स्मरणार्थ आयडियलमार्फत फक्त मुलींसाठी क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई कडवे स्मृती विनाशुल्क कॅरम स्पर्धा आयोजित केली. त्यांच्या सक्रीय मार्गदर्शनामुळे आरएमएमएस सहकार्यीत राष्ट्रीय स्तर गाजविणाऱ्या राज्यातील सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ६० मुलींच्या सहभागाने यशस्वी झालेली आंतर शालेय मुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा रंगली. परेल येथील स्पर्धेमध्ये सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल-पुण्याच्या तनया पाटीलने अंतिम विजेतेपद तर आर.बी. शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा कदमने अंतिम उपविजेतेपद पटकाविले. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात आले. केवळ मुलींसाठी चँम्पियन कॅरम सेटवर मोफत स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्यातील पालक-शिक्षक वर्ग, खेळाडू यांनी सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक करीत मुलींच्या स्पर्धेचे सातत्य राखण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कॅन्सरग्रस्तांना अन्नदान वाटप

मुंबई, : –  मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण मध्य-मुंबई जिल्हाध्यक्ष समाजरत्न डॉ. सिद्धार्थदादा टी.कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त चांदिवली तालुकाध्यक्ष सुरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली टाटा कॅन्सर हॉस्पिटलजवळ अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. याशिवाय कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला, यावेळी चांदिवली राष्ट्रवादी परिवाराचे प्रशांत बारामती (जिल्हाप्रमुख सामाजिक विभाग), अस्लम शेख जिल्हा सचिव, संतोष गवळी (162 प्रभाग अध्यक्ष) डॉ. ) सचिन वाकोडे (तालुका अध्यक्ष सामाजिक), आलोक राय युवक समाजसेवक आणि आनंद मार्ग युनिव्हर्सल रिलीफ टीम च्या दीदी सहित मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 00000

सरकारच्या विरोधात

 महाविकास आघाडीचा पंचनामा मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीकडून महायुती सरकार विरोधात गद्दारांचा पंचनामा करणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.  महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (श प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया धुळे, संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर घणाघाती प्रहार केला. पटोले म्हणाले की, गद्दारांचा पंचनामा आम्ही केला आहे. अडीच वर्षात यांनी कसं सरकार चालवलं याचा पंचनामा यात करण्यात आला आहे. ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तेचं लोक आज सत्तेत आहेत. त्याच लोकांच्या भ्रष्टाचारामुळे छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही या घटनेची माफी मागितली नाही. काल तर बाबा सिद्धकी यांची हत्या करण्यात आली. सत्ता पक्षातील नेते देखील सुरक्षित नाहीत. स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे.असे पटोले म्हणाले. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हत्या प्रकरणाची अद्याप योग्य माहिती आमच्याकडे आलेली नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे तपासावर परिणाम होईल, असं काही बोलणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील जनता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभेच्या निकाल काहींनी मान्य केला नाही, तेव्हा लोकांनी बदल हवा आहे हे सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांचा पंचनाम आम्ही केला आहे. महाराष्ट्राबरोबर यांनी गद्दारी केली आहे. येत्या दीड महिन्यात हे सरकार घालवायला हवं. मुंबई हे असं शहर आहे तिथं २ पोलिस कमिशनर आहेत. जे जे लाडके आहेत त्यांना कमिशनर करा. पाच कमिशनर करा. माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी गद्दाराना सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढा आणि लोकांसाठी वापरा. ही जबाबदारी गृहमंत्री यांची आहे. मोठं मोठे सध्या होर्डिंग लावतात. देवेंद्रजी म्हणतात उद्या गाडी खाली कुत्र आल तरी म्हणाल गृहमंत्री जबाबदार आहे. आता यावर त्यांचं काय उत्तर आहे. सध्या केवळ कलाकार सोबत घेऊन मोठ्या जाहिराती सरकार करत आहे असे ठाकरे म्हणाले.

‘जिथे नाही सन्मान तिथे  करणार नाही मतदान’

रमेश औताडे मुंबई : लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मतदानाचे परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे. मात्र जिथे मतदारांचा सन्मान होत नाही तिथे आम्ही मतदानच करणार नाही असा इशारा आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा चे  राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिला. नागपूर येथे धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित मतदार परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. मतदारांनी आपल्या मतांचा अधिकार जर, जात, धर्म, परंपरागत  पक्ष,घराणेशाही यात अडकवून ठेवला तर लोकशाहीला ते घातक ठरते असे बागडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिक बांगर, प्रमुख पाहुणे रेखा राणगावकर होत्या. देवेंद्र बागडे, उद्धव तायडे, पौर्णिमा पाईकराव, डॉ सुधा जनबंधू, विकास काटे, नामदेवराव निकोसे, न्यायाधीश सुरेश घाटे, उत्कर्षा थुल, सुनिता गायकवाड,  दिलिप कदम, इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरातत्व अधिक्षक नामदेवराव निकोसे यांनी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संघर्ष निधी म्हणून पांच लाख एकावन्न हजार रुपये देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यावेळी अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे असे नारायण बागडे यांनी सांगितले. वैशाली तभाने यांनी मान्यवरांचे स्वागत, सूत्रसंचालन प्रा.रमेश, आभार प्रदर्शन मामासाहेब मेश्राम यांनी केले.

सरकारी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे अन्नत्याग

रमेश औताडे मुंबई / सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे खरिब व रब्बी हंगामात नोंदीचा गोंधळ झाल्याने धान पिकाचे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतकरी नेते लोकमित्र रमेश यशवंत हिंदुराव यांनी अन्नत्याग उपोषणाचा…

ळफाटा रस्ते बाधित पुन्हा बेमुदत उपोषणाच्या पवित्र्यात

०००००  दीड वर्षापासून रस्ते बाधितांना मोबदला देण्यास टाळाटाळ कल्याण – कल्याण शिळफाटा रस्ते बांधितांना गेल्या दीड वर्षापासून त्यांची रस्ते भूसंपादनातील भरपाईची रक्कम देण्यास शासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

दीप गचांडे यांना ‘ये गं ये गं परी’ बालनाट्यासाठी सर्वोत्कृष्ट लेखकाचा प्रथम पुरस्कार

मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत संदीप प्रभू गचांडे यांना ‘ये गं ये गं परी’ बालनाट्य लेखनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट लेखक…

४६ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रूपये विद्यावेतन-मंगलप्रभात लोढा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजपर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना आज डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य,…

विविध प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांगांचे आंदोलन

विविध प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांगांचे आंदोलन मुंबई : दिव्यांगाचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात यावा. न्यायालयीन कर्मचारी धर्तीवर दिव्यांग कर्मचारी/अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी. दिव्यांग वाहतुक…