Category: मुंबई

Mumbai news

आदित्य माहिमकर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये

रमेश औताडे मुंबई : सामाजिक कार्यकर्ते व युवा से युवा फौंडेशन या संस्थेचे अध्यक्ष आदित्य अरुण माहिमकर यांनी मंगळवारी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राजीव…

पत्रकार नितीन चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

मुंबई: ‘महाराष्ट्र टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण (५३) यांचे मंगळवारी पहाटे विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर विक्रोळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.…

आता महायुती, पण २०२९ला भाजपाचे एकला चलो रे!

 अमित शाहंच्या घोषणेने राजकीय भूकंप स्वाती घोसाळकर   मुंबई: महाराष्ट्रात यंदा सरकार येणार ते भाजपाप्रणीत महायुतीचेच, मात्र राज्यात 2029 सालच्या निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची असा २०२९ चा नारा भाजपचे नेते आणि केंद्रीय…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात ज्येष्ठांच्या उत्साही उपस्थितीत जल्लोषात संपन्न…

ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीची  निवड चाचणी ८ आणि ९ ऑक्टोबरला

मुंबई :  ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने येत्या ८ आणि ९ ऑक्टोबरला चर्चगेट येथील ओव्हल मैदानात १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.  १ सप्टेंबर २०१० नंतर आणि…

मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच  पोईसर जिमखाना, कांदिवली पश्चिम येथे पार पडली. या सभेमध्ये मुंबई उपनगरच्या १०० पेक्षा जास्त सभासदांचा  सहभाग होता. या सभेत मल्लखांब खेळाच्या व संघटनेच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी मल्लखांब खेळचे महत्व वाढवण्यावर विचारविनिमय केला आणि योग्य निर्णय घेतले. मल्लखांब खेळातील द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त  गणेश देवरुखकर , २री विश्व मल्लखांब स्पर्धेतील विजयी खेळाडू जान्हवी जाधव , अक्षय तरळ, उपविजेती रुपाली गंगावणे यांना सन्मानीत करण्यात आले. यावर्षीपासून, उपनगर संघटनेने कै. दत्ताराम दुदम (शिव छत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या स्मरणार्थ १४ वर्षांच्या वयोगटातील एक मुलगा (विराज आंब्रे.) व एक मुलगी (तन्वी दवणे.) यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यास  सुरुवात केली. या पुरस्कारासोबतच रोख ५,०००/- रुपये शिष्यवृत्ती ही देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ ॲड. प्रतिभाताई गिरकर (मा.नगरसेविका) यांच्या हस्ते करण्यात आले.…

 बांबू शेती ठरणार कल्पवृक्ष – पाशा पटेल

 पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी रमेश औताडे   मुंबई : ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवण्यासाठी बांबू चे झाड खूप महत्वाची भूमिका बजावणार असून बांबू आता कल्पवृक्ष ठरणार आहे. शेतकरी आत्महत्या व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही बांबू शेती फायद्याची ठरणार आहे अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शाश्वत आणि पर्यावरणस्नेही भविष्यातील गृहनिर्माण उपक्रमासाठी ग्रीन महाराष्ट्र साठी नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल (नरेडको), महाराष्ट्रा तर्फे भारतातील सर्वांत मोठ्या रियल इस्टेट प्रॉपर्टी एक्स्पो ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत जिओ बर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी  बांद्रा येथे करण्यात येत असून या मध्ये बांबू हरीत गृह प्रदर्शन होत असून हरित घरे कशी असतील हे जनतेला माहिती होईल.असे नरेडको महाराष्ट्र अध्यक्ष  प्रशांत शर्मा यांनी सांगितले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहकार्य करारावर (एमओयू) हस्ताक्षर करण्यात येणार आहे. नरेडको ने फिनिक्स फाऊन्डेशन संस्था या प्रसिध्द कृषीतज्ञ आणि पर्यावरणाशी सुसंगत पीक म्हणून बांबूचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणारे  पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखालील संस्थे बरोबर भागीदारी केली आहे. असे नरेडको चे उपाध्यक्ष  राजन बांदेलकर यांनी सांगितले. वातावरण बदलाशी मुकाबला करत असतांना रिअल इस्टेट क्षेत्र हे मोठे योगदान देत असते, कारण ते बांबू सारख्या वस्तूंचा उपयोग हा बांधकाम प्रकल्पांमध्ये परंपरागत गोष्टींच्या ऐवजी करु शकतात ज्यामुळे वातावरणावर सकारात्मक परिणाम होऊन तापमानाच्या समस्येवर उपाय केला जाऊ शकेल असे नरेडको सचिव राजेश दोशी यांनी सांगितले. 00000

नवी मुंबईच्या भविष्यातील लोकसंख्येस आवश्यक पाणी पुरवठयासाठी महानगरपालिकेचे गतीमान नियोजन

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास बघता वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्याकरिता महानगरपालिकेने नियोजन सुरु केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाढीव पाणी हे पाताळगंगा नदीतून तसेच भिरा…

 मिठागरांच्या जमिनी देऊन मोदानी अँड कंपनीचा आणखी एक हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा.

 मिठागराची फक्त २५६ एकर जमीन नाही तर सर्व मिठागरे बिल्डर मित्राच्या घशात घालण्याचा डाव – वर्षा गायकवाड. मुंबई : धारावीकरांचा, मुंबईकरांचा आणि पर्यावरणवाद्यांचा प्रखर विरोध असतानाही भाजपा-शिंदे सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून अदानीच्या फायद्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. अदानीला फक्त २५६ एकर मिठागराची जमीन दिलेली नाही तर मुंबईतील सर्व मिठागर जमिनी बिल्डर मित्राच्या घशात घालण्याचा डाव असून यातून मोदानी अँड कंपनीचा आणखी एक हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे असा घणाघाती हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. धारावी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कांजूरमार्ग, मुलुंड व भांडूप येथील मिठागराची जमीन देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सडकून टीका केली, त्या पुढे म्हणाल्या की, शिंदे सरकार अदानीचे एजंट बनून काम करत आहे, त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका या महाभ्रष्ट सरकारची आहे. मुंबईकरांचे हक्क मारायचे, मुंबईचे महत्त्व कमी करायचे आणि मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायच्या, हा या सरकारचा अजेंडा आहे. मुंबईकरांचा विरोध असताना टेंडरमध्ये सोयीस्करपणे बदल करून अदानीला धारावीची जागा दिली आणि नंतर धारावी पुनर्विकासाच्या आडून मुंबईतील जवळपास १५०० एकर जागा अदानींच्या घशात घातली आहे. सरकार पात्र अपात्र असा भेदभाव करत असेल पण धारावीकरांना पात्र-अपात्र मान्य नाही. प्रत्येक धारावी कराने ही धारावी आपल्या रक्त आणि घामाने उभी केली आहे, त्यामुळे पात्र-अपात्रचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व धारावीकरांना धारावीमध्येच घरे मिळाली पाहिजेत. मिठागरांच्या जमिनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी दिल्या जात आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव घेऊन हे केवळ भखंड बळकावण्याचे कारस्थान आहे. हा विकास नाही तर  मुंबईकरांची लूट असून आम्ही ही लूट थांबवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देत राहू असा निर्धार प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. मुंबईत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिठागरे महत्त्वाची भूमिका बजावतात. ही मिठागरे पावसाळ्यात कोट्यवधी लीटर पाणी आपल्या पोटात साठवतात. मुंबईकरांना पुराचा फटका बसण्यापासून वाचवतात. मिठागरांच्या जमिनीवर भराव घालून तिथे इमारती उभारल्या तर मुंबई शहराला भयंकर पुराचा धोका संभवतो. पर्यावरण दृष्ट्या, खारफुटी जमिनींवर सरसकट बांधकाम परवानगी देण्याचे भयंकर परिणाम होतील. असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. 0000

 शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शनिवारी ‘महा नोकरी’ मेळावा

 मुंबई पदविधरचे आमदार आणि पक्षाचे नेते ॲड. अनिल परब यांच्या वचनपूर्तीनिमित्त आयोजन   मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर मराठी तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ‘महा रोजगार’ मेळाव्याचे विलेपार्ले -पूर्व येथे शनिवारी, ५ ऑक्टोबर रोजी आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महा रोजगार’ मेळाव्याचे उद्धघाटन होणार असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मेळाव्याचे संयोजक शिवसेना नेते व मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी मंगळवारी वांद्रे येथील पत्रकार परिषदेत दिली. राज्यात महायुती सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अनेक उद्योग शेजारच्या राज्यात पाठविले गेले. रोजगार निर्माण करण्यात महायुती सरकार पूर्णपणे आपल्याशी ठरली आहे. त्यातच राज्यात रोजगारांची वानवा असतानाच बड्या कंपन्यांनाना महायुतीचे सरकार प्रदूषणाच्या नोटीसा पाठवत आहे. मात्र या नोटीसांचे पुढे काय होते, हे गौडबंगाल आहे, असा आरोप ॲड. अनिल परब यांनी केला. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. आमचे सरकार तरुणांना नोकऱ्या देणे व सरकारी रिक्त जागा भरण्याचे काम वेगाने करेल. राज्यातील बेरोजगारीची परिस्थिती हाताळण्यावर आमचे सरकार लक्ष केंद्रित करेल. शेजारील गुजरातमध्ये स्थलांतर होत असलेले उद्योग रोखले जातील, असे ॲड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. परब यांनी विधान परिषद निवडणुकीत दिलेल्या अशवसानाच्या वचनपूर्तीनिमित्ताने हा महा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. ह्या मेळाव्यात लॉजिस्टीक, बँकींग, इन्शुरन्स, बीपीओ, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, शिक्षण, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील १३० कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ॲमेझॉन, हिंदुजा, एचडीएफसी, एसबीआय, बजाज, टाटा एआयजी, एअरटेल, आयसीसी लोम्बार्ड अशा नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार ॲड. अनिल परब म्हणाले की, या मेळाव्यासाठी १३ हजार युवकांनी नोंदणी केली आहे. सुमारे १६ हजार युवक मेळाव्यात सहभाग घेणे अपेक्षीत असून सुमारे १४ हजार युवकांना या मेळाव्यात रोजगार मिळेल. मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या युवकांनी येताना बायोडेटा, केवायसी कागदपत्रे आणि छायाचित्र सोबत आणावे, असे आवाहन आमदार ॲड. परब यांनी केले आहे. ॲड. अनिल परब पुढे म्हणाले की, विधान परिषद मुंबई पदवीधरच्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती म्हणून हा मेळावा होत आहे. यापुढे दरवर्षी महा नोकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती पहिल्या शंभर दिवसात करण्याचे वचन दिले होते, ते वचन आम्ही या मेळाव्याच्या निमित्ताने पूर्ण करत आहोत. जून मध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब यांनी मुंबई पदधीर मतदारसंघात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा २६ हजार मतांनी पराभव केला होता. ॲड. अनिल परब हे विधान परिषदेचे शिवसेनेचे गटनेते असून त्यांची विधान परिषद आमदारकीची चौथी टर्म आहे.