Category: मुंबई

Mumbai news

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी केले चैत्यभूमीवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन

अशोक गायकवाड   मुंबई :राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचे मंगळवारी मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भीमराव आंबेडकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. 000

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधान परिषदेतील २०१८-१९ मधील उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

‘संविधान जागर यात्रा’ ६ सप्टेंबरला मुंबईत दाखल

रमेश औताडे   मुंबई :संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित ” संविधान जागर यात्रा ” ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या दिवशी सुरुवात करण्यात आली होती. ती संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर ला मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती संविधान जागर समितीचे  संयोजक नितिनभाऊ मोरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संविधान जागर यात्रा आजपर्यंत महाड, रायगड, खेड. रत्नागिरी, पतीत पावन मंदिर, सिंधुदुर्ग, कणकवली, कोल्हापूर शाहू समाधी दर्शन, हातकणंगले, सांगली पेठ नाका. सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट, महात्मा फुले वाडा, वस्ताद लहुजी साळवे समाधी, अहमदनगर, माळशिरस, सोलापूर, तुळजापूर, उमरगा, लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिंगोली, परभणी, केज, बीड, संभाजीनगर, बदनापूर, जालना, चिखली, मेहकर, वाशिम, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, भंडारा, उमरेड, दीक्षाभूमी, नागपूर, वर्धा, अमरावती, दर्यापूर, मुर्तीजापुर, अकोला, भुसावळ या जिल्ह्यामध्ये प्रवास करत सभा बैठका घेत जळगाव मध्ये दखल झाली. जळगाव वरून धुळे नाशिक कल्याण अंबरनाथ उल्हासनगर ठाणे करत संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर रोजी सहा हजार किलोमीटर चा प्रवास करून मुंबईत दाखल होणार आहे. संविधानाबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यात्रा जवळ जवळ यशस्वी झाली आहे असे मोरे यांनी सांगितले. समारोप साठी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 0000

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे अॅथलेट चमकले

मुंबई :  मुंबई शहर जिल्हा जूनियरआणि २३ वर्षांखालील वार्षिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य…

म्हाडाच्या ७९१ घरांवर बिल्डरांचा दरोडा

नवी मुंबईत फ्लॅट घोटाळा हस्तांतर न करता घरे हडपली महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत मुंबई : नवी मुंबईमध्ये म्हाडाच्या तब्बल ७९१ घरांवर बिल्डरांनी दरोडा टाकला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही घरे म्हाडाला हस्तांतरीत…

कल्याण-डोंबिवलीत वाहन कोंडी

कल्याण : गणशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले होते. परंतु, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. या खड्डे मार्गातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आठ ते दहा फूट उंचीचा गणपती नेताना मोठी कसरत…

बृहन्मुंबई दूध योजना केंद्र चालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरीता वरळी डेअरी येथे निदर्शने केली.

 तुझी उंची किती आणि बोलतो किती ?

मुस्लिम बांधवांना मशिदीत घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या नितेश राणेंवर हाजी शाहनवाज खान आक्रमक राज भंडारी   पनवेल :काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांचे धर्मगुरू पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान…

छत्रपती शिवाजी महाराजांना गोपाळ शेट्टी आणि उत्तर मुंबई जिल्हा युवा मोर्चाची विनम्र मानवंदना….

राजेंद्र साळसकर   मुंबई : मालवण येथील शिव पुतळ्या वरून संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण दूषित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी झाल्या प्रकाराची जाहीर माफी मागितली व छत्रपती…

प्रभादेवीचे व्यापारी नगराजजी जैन यांचे निधन

मुंबई: प्रभादेवीतील परळ एस.टी. डेपो जवळील सत्यम रघुवंशी या कपड्याच्या दुकानाचे मालक नगराजजी शेषमलजी श्रीश्रीमालजी (जैन) वय-64 यांचे काल शनिवारी आकस्मिक निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल एल्फिन्स्टन रोड व्यापारी असोसिएशनने तीव्र दु:ख…