Category: मुंबई

Mumbai news

डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकमुक्त सोसायटी अभियान

अशोक गायकवाड नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक असणा-या प्लास्टिकपासून सर्वांना वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ.…

पायाभूत प्रकल्पांमध्ये माध्यमांची भूमिका महत्वाची-देवेंद्र भुजबळ

मुंबई : जगात १९५ देश असून लोकशाही,हुकूमशाही, धर्मशाही, राजेशाही, साम्यवादी, समाजवादी, लष्करशाही अशा विविध शासन व्यवस्था आहेत. पुन्हा या देशांचे विकसित, विकसनशील आणि अविकसित देश असे वर्गीकरण करण्यात आले आहे.…

‘आप’चे विधानसभेसाठी तीन उमेदवार जाहीर

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या आपकडून महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तीन उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेत. आपकडून परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आप उमेदवार लढणार असल्याचे…

मुंबईकरांना यंदा डे-नाईट गणपती बाप्पाचे दर्शन !

मुंबई : मुंबईकरांसाठी खुषखबर आहे. यंदा मुंबईकरांना गणपती बाप्पाचे डे -नाईट दर्शन घेता येणार आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन डे-नाईट गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी ‘बेस्ट’ (BEST) उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला…

जिजामातानगर गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील साळसकर यांची निवड

मुंबई : जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची   सन २०२४ -सन २०२५ ची कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील मनोज साळसकर यांची तर सरचिटणीसपदी मंगेश घेगडे यांची निवड करण्यात आली. जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे  कामगार विभागातील प्रख्यात मंडळ असून या मंडळ आजवर धार्मिक तसेच राष्ट्रीय व विविध सामाजिक  विषयांवर आधारित देखावे सादर करून समाजप्रबोधनाचे  कार्य करण्यासाठी सुपरिचीत आहे. भूकंप , पूर यासारख्या  नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतनिधी देऊन आपल्यापरीने खारीचा वाटा उचलून आपले सामाजिक दायित्व बजावण्याचं कामही हे मंडळ  करीत असते. यंदा मंडळाचे हे ७३ वे वर्ष असून मंडळाची ७२वी वार्षिक सभा मंडळाचे विश्वस्त महेश पावसकर,प्रशांत सुर्वे,राजू नाईक यांंच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या सभेत सन २०२४ ते सन २०२५ या वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे.अध्यक्ष- सुशील मनोज साळसकर  कार्याध्यक्ष – सुनिल जुवळे. उप कार्याध्यक्ष – ऋषिकेश खोत, कल्पेश नागे, अक्षय गोसावी. उपाध्यक्ष -राहूल कदम,वैभव गवस,अभिनय राणे. सरचिटणीस- मंगेश घेगडे  चिटणीस- शुभम घाटगे,सिद्धार्थ कदम,अभिषेक नलावडे. खजिनदार- संदीप मेंगडे.हिशोब तपासणीस- राकेश खानविलकर.

श्रीकांत शिंदे आणि आशिष शेलार यांनी फोडली विधानसभा निवडणुकीच्या विजयाची हंडी

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि आमदार यांनी विजयाची हंडी फोडत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा एल्गार पुकारला. निमित्त होते राहुल नारायण कनल आणि जश वीरा यांच्या…

दहीहंडी बक्षीसाची रक्कम रुग्णांच्या मदतीसाठी

रमेश औताडे मुंबई : दहीहंडी उत्सव एक इव्हेंट झाला आहे. लाखो रुपये खर्च होत आहेत. मात्र हे लाखो रुपये गोरगरीब रुग्णांच्या उपयोगी आले तर ? हा विचार घेऊन दहीहंडी कार्यक्रमाचे अडीच लाख रुपये गोरगरीब रुग्णांच्या उपयोगी आणण्यात येणार आहेत. समाजसेवक तसेच धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख यशवंत विचले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील दहीहंडीच्या पथकाची संख्या १०० वरून २५ करत शिल्लक ७५ पथकाची बक्षीस रक्कम गरीब रुग्णांना देण्यात येणार आहे. अडीच लाख रुपये असणारी ही रक्कम थोडी वाटत असली तरी एक नवा पायंडा आम्ही पाडत आहोत असे सांगत धुळप म्हणाले, असे जर सर्वच दहीहंडी आयोजकांनी केले तर एक चांगले समाज उपयोगी कार्य होईल. २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील दादर मध्ये केशवराव दाते मैदान येथे दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोरबे धरण काठोकाठ भरण्याच्या उंबरठ्यावर

नवी मुंबई : शहराला जलसमृद्धता बहाल करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता 190.890  द.ल.घ.मी. इतकी असून, विसर्ग पाणी पातळी तलांक 88.00 मी. इतकी  आहे. 25 ऑगस्ट  दुपारी  1:00 वाजेपर्यंत मोरबे धरणात  185.151  द.ल.घ.मी.…