Category: मुंबई

Mumbai news

 दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे

१ सप्टेंबरला तबला वादन स्पर्धा   मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, १ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९.३० वाजता तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहेत. या दिवशी १० ते १५ वर्षे या छोट्या गटात स्पर्धा घेतल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२४३०४१५०, www.dadarmatungaculturalcentre.org ०००००

गिरगावात सामूहिक मंगळागौरीचा महिलांनी लुटला भरघोस आनंद

केतन खेडेकर   मुंबई : गिरगावातील मुगभाट क्रॉस लेन इथल्या विठ्ठल मंदिरत दक्षिण मुंबई दैवज्ञ समाज महिला मंडळच्या वतीने सामूहिक मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या प्रसंगी सकाळी शुभमुहूर्तावर करण्यात आलेल्या मंगळागौरी पूजनाचा मान नुकत्याच लग्न बंधनात बांधल्या गेलेल्या नऊ वधूंना देण्यात आला होता. त्यामुळे नववधूंच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित व गगनात मावेनासा झाला होता.मंदिराचे सभागृह सकाळपासूनच महिलांनी खचाखच भरून गेले होते.ह्या वेळेस ५०० हून अधिक महिलांनी हजेरी लावत ह्या सामूहिक मंगळागौरी कार्यक्रमाचा भरघोस आनंद लुटला. सकाळी मंगळागौरी पूजन आटपल्यानंतर दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यावर सर्व महिला भगिनींची पावले पुन्हा विठ्ठल मंदिराच्या दिशेने वळू लागली होती आणि पहतपहता मंदिराचे संपूर्ण सभागृह महिलांनी पुन्हा गच भरून गेले होते. संध्याकाळी मंगळागौरीचे खेळ सरू होण्यापूर्वी महिलांच्या अंगात नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी आयोजकान तर्फे संध्याकाळच्या सुमारास थालीपीठ, बिरड आणि शिरा अशा प्रकारच्या पौष्टिक नाश्त्याची खास सोय करण्यात आली होती. भेदभाव न करता सर्व जाती-धर्मातील महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे अध्यक्ष कमलाक्षी उसपकर यांनी सांगितले. मंगळागौरीला विविध खेळ खेळत  जागरण करण्याची अगदी पूर्वपार काळापासून परंपरा चालत आलेली आहे. यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्रीच्या वेळेस अनेक विधी आणि जुनी गाणी म्हणत लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळत अनुभवी महिलां सोबत नववधूंनी देखील या कार्यक्रमात सामील होऊन खूपच मज्जा लुटली . नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, दागिने असा पेहराव करत नववधू देखील हौशीने सहभागी झाल्या होत्या. सामूहिक मंगळागौर कार्यक्रम सुरू करून आज ३२ वर्षे उलटली आहेत. मंगळागौरी पूजनाला सकाळी नववधुना पूजनाचा मान दिला जातो. मंगळागौरीचे २५ वे वर्ष मोठ्या थाटामाठात आणि धुमधडाक्यात साजरे करण्यात आले होते त्यावेळेस जवळ जवळ दोन हजारहून जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम एका मोठ्या सभागृहात पार पडला होता. कल्याण, डोंबिवली, विरार, भांडुप,खार,सांताक्रुज, पनवेल येथून महिला मंडळी नववधूंना सोबत घेऊन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. अशा प्रकारचे सामूहिक मंगळागौर पूजन कुठेही होत नाही. आमच्या भगिनी स्टेशन करत असतात अशी माहिती दक्षिण मुंबई दैवज्ञ महिला समाजाचा उपाध्यक्ष कविता साने यांनी दिली.

‘एन व्ही झालटे मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल’ मध्ये मिळणार स्वस्तात उपचार

 डिवाईन विन्सपायर फाउंडेशनच्या मुंबई : खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणे सामान्यांसाठी खर्चिक असल तरी, भांडुप परिसरात अल्प किमतीत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. डिवाईन विन्सपायर फाउंडेशन यांच्या ‘एन व्ही झाल्टे मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल’चे उद्घाटन नुकतच झाले असून, या हॉस्पिटल मध्ये जनरल फिजिशियन, आर्थो, डेंटल सोनोग्राफी, इसिजी सारख्या अनेक गोष्टी चॅरिटेबल दरात करण्याची सोय आहे. भांडुप पश्चिम फरीद नगर, बी पी ई एस शाळे जवळ डिवाईन विन्सपायर फाउंडेशन यांचे एन व्ही झालटे मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल चालू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन श्री किरण खोत यांनी केले तसेच या प्रसंगी स्पिरिच्युअल बिजनेस कोच श्री. शशिकांत खामकर, विनर्स एजुकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौ. ज्योती खामकर, खासदार संजय दिना पाटील, आमदार श्री रमेश कोरगावकर,  माजी आमदार श्री अशोक पाटील,  सिनिअर पोलीस ऑफिसर श्री दत्तात्रय खंडागळे, पराग विद्यालयाचे संस्थापक श्री बाळकृष्ण बने , श्री भास्कर  विचारे, श्री भास्कर विचारे, श्री संदिपभाई जळगावकर, सौ. जागृतीताई पाटील , सौ. प्रांजलताई जाधव आणि ॲड. धनंजय भोसले इ. मान्यवर उपस्थित होते. चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून या हॉस्पिटल मध्ये उपचार केले जाणार आहे. सर्वसामान्यांना स्वस्तात उपचार मिळावेत या एका हेतून हॉस्पिटल चालू करण्यात आले असल्याची माहिती डिवाईन विन्सपायर फाउंडेशन चे संस्थापक डॉ. आशिष दामा,सौ. कविता बागवे, श्री. वैभव बागवे,  श्री. गौतम पटाडे, श्री. अविनाश चौगुले आणि  सौ. राणी कुशारे दिली. हॉस्पिटल मध्ये जनरल फिजिशियन, आर्थो, डेंटल सोनोग्राफी, इसिजी, बालरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, लसी करण आदो अद्यावत सुविधा ठेवण्यात आल्या असून, तज्ञ डॉक्टर या हॉस्पिटल मध्ये रुग्णांवर उपचार करणार आहेत. 0000

तर…बदलापूरमध्ये मणिपूरचा ट्रेलर होता का ?- निरुपम

रमेश औताडे मुंबई :बदलापूरची घटना सरकारने संवेदनशीलपणे हाताळली मात्र विरोधकांनी यावर राजकारण केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी महाराष्ट्राचा लवकरच मणिपूर होईल, असे भाकीत केले होते. मग बदलापूरमध्ये मणिपूरचा ट्रेलर होता का…

फडणवीसांच्या राजीनाम्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत त्यांचा राजीनामा मागितला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळं देवेंद्र…

बदलापुरच्या घटनेला राजकारण म्हणणारे विकृतच- उद्धव ठाकरे

मुंबई :  बदलापूरच्या घटनेला राजकारण म्हणणारे विकृत आहेत… दुर्दैवाने जर मुख्यमंत्र्यांनासुद्धा यात राजकारण दिसत असेल तर ते विकृतच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केली…

धक्कादायक ! महाराष्ट्रातून सव्वा लाख महीला गायब

मुंबई : केंद्र सरकारच्या अखत्यारितील राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार धक्कादायक माहीत समोर आली आहे. लाडक्या बहीनींना आर्थिक मदत करण्याचा ढोल पिटला जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात तब्बल सव्वा लाखाहून अधिक महीला…

सरकार, पोलिसांना हायकोर्टची चपराक

शाळेच्या संचालकांवर कारवाई होणार लोक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का? हायकोर्टाचा संतप्त सवाल मंगळवारी काय कारवाई केली याचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने…

बदलापुर आंदोलनाची दुसरी बाजू…

सुहास सावंत मी राजकीय विषयावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण कालचा प्रकार झाला तेव्हा पालक व बदलापूर मधील नागरिकांनी शाळे समोर एकत्र जमून ठिय्या आंदोलन करायचं ठरलं होतं. मी…

अदानी कंपनीतील महाघोटाळ्याची चौकशी ईडी का करत नाही ? वर्षा गायकवाड

खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा.   मुंबई : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून मागील १० वर्षात लाडका उद्योगपती योजना सुरु असून मोदी सरकारच्या आशिर्वादाने अदानी कंपनी देशाची संपत्ती भ्रष्ट मार्गाने लुटत आहे. हिंडनबर्ग अहवालातून अदानीच्या घोटाळ्याचा फुगा फुटला असून भाजपाचे मोदी सरकार अदानीच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे.विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करणारी ईडी अदानी कंपनीच्या घोटाळ्याकडे मात्र डोळे बंद करून पहात आहे. अदानीच्या महाघोटाळ्याची ईडी चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. अदानी महाघोटाळ्याची चौकशी ईडीने करावी या मागणी साठी खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने ईडी ऑफीसवर हजारोंचा मोर्चा काढला. हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण कार्यकर्ते हटले नाहीत, त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, हिंडनबर्गने अदानी कंपनीतील घोटाळा पुराव्यासह उघड केल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्याची जबाबदारी सेबीकडे देण्यात आली होती पण सेबीच्या प्रमुख माधवी बुच याच या घोटाळ्याच्या लाभार्थी असल्याचे समोर आले आहे मग चोरी करणारा चौकशी कसा करेल. शेअर बाजारात सर्वसामान्य व मध्यम वर्गातील लोकांनी आपल्या कष्टाचा पैसा गुंतवलेला आहे, तोही सुरक्षित राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर धडक कारवाई करणारी ईडी अदानी कंपनीचा महाघोटाळा उघड झाला तरी त्यांची चौकशी का करत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. अदानी कंपनीतील महाघोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जेपीसी चौकशी करत नाही. अदानी घोटाळा सेबी व देशाच्या पंतप्रधानांभोवती फिरत असताना चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. केंद्रातील नरेंद्र मोदींचे एनडीए सरकार जेपीसी चौकशीला का घाबरते, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. सेबीने दिली सुट, अदानी करतो लुट व ईडी बसलीय चुप; ईडी सेबी भाई भाई, अदानी लुटतोय देशाची कमाई, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात माजी मंत्री अस्लम शेख, माजी खासदार हुसैन दलवाई, काँग्रेस  प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश यादव, संघटन प्रभारी प्रेनिल नायर, खजिनदार संदीप शुक्ला, जिल्हा अध्यक्ष रवी बावकर, मोहसीन हैदर, कचरू यादव, बाळा सरोदे, अर्शद आजमी, अशोक गर्ग, रोशन शाह, हिना गजाली, सुभाष भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.