Category: मुंबई

Mumbai news

पत्रकारांच्या आरोग्यासाठी सरसावल्या नगरसेविका

रमेश औताडे     मुंबई : पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आरोग्य विम्याचे कवच देण्यासाठी नगरसेविका आशाताई मराठे यांनी पत्रकार आरोग्य विमा अर्ज भरून त्यासाठी लागणारे शुल्क त्यांनी स्वतः भरले. कोरोना काळातही यांनी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न सरकारी योजनेच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले. कोरोणा काळात काही पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. काही पत्रकार मृत पावले. त्यावेळीही त्यांना किराणा सामान व आरोग्य मदत त्यांनी दिली होती. आजही अनेक पत्रकार आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना येत आहेत. पत्रकार कल्याणकारी योजना असावी यासाठी सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे. असे आशाताई मराठे यांनी यावेळी सांगितले. मुंबई उपनगर परिसरातील सर्व पत्रकारांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळावी यासाठी शिबिर आयोजन करून यावेळी अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी लागणारे अर्ज शुल्क आशाताई मराठे यांनी भरले असून तीन दिवसानंतर या योजनेचे स्मार्ट कार्ड पत्रकारांना मिळणार आहे. भाजपा मंडळ महामंत्री गुरुदास पै, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. चेतना कोरगावकर, सावित्रीबाई फुले घरेलु कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मराठे, देविदास वर्मा, पुष्पराज माने, उपनगर पत्रकार असोसिएशन चे सहसचिव समीर कर्णूक, उपाध्यक्ष संध्या श्रीवास्तव, पत्रकार आनंद श्रीवास्तव आदी पत्रकार उपस्थित होते. 00000

रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते. इंडियनऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, बी एस ई -इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड आणि एनकेजीएसबी को ऑपरेटिव्ह बँक  यांचे या कार्यक्रमास सहप्रायोजकत्व लाभले होते. या कार्यक्रमात पार्ल्यातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तीत आयोन एक्सचेंज लिमिटेड चे समूह सीएफओ नंदकुमार रणदिवे, ब्ल्यू क्रॉस लि.चे एमडी भालचंद्र बर्वे, सीए सुनील मोने , बँकर नागेश पिंगे, माजी नगरसेवक अभिजित सामंत, माजी उपमहापौर अरुण देव, उद्योजक राजू रावल, विद्यानिधी शिक्षण संस्थेच्या प्रा.संगीता तिवारी यांचा समावेश होता.…

बुजुर्ग पॉवरलिफ्टर सतीश पाताडे यांचे यश

मुंबई : बुजुर्ग छत्रपती पुरस्कार प्राप्त ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिप्टर, माजी शासकीय अधिकारी सतीश पाताडे यांनी इंदूर, मध्यप्रदेश येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर विभागात घवघवीत यश संपादन केले.…

विधानसभेसाठी काँग्रेस ‘ॲक्शन मोड’वर

मुंबई : आगामी विधानसभेसाठी काँग्रस इन ‘ॲक्शन मोड’वर असून  महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत जागावाटप व्यवस्थित व्हावं, यासाठी पक्षाच्या १० नेत्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये कोणकोणते सदस्य असतील, याबाबतची माहिती काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी आज दिली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या…

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या

मुंबई : मुंबईतीली चाकरमन्यांसाठी एख खुषखबर आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून दोन दिवस आधीच कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होते. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि…

राज ठाकरे महायुतीसोबत येतील- भरत गोगावले

मुंबई : “विधानसभा निवडणुकीला आणखी वेळ आहे. आमचे नेते बसतील, त्यातून मार्ग निघेल. जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग निघेल. बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवण्यसाठी लोक इच्छुक आहेत. परंतु आणखी वेळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन याबाबत…

महसूल सप्ताहात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवा – पी.वेलरासू

अशोक गायकवाड   नवी मुंबई : महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा “महसूल दिन” साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या सात…

२७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ५० हजार प्रकरणे – अमोल शिंदे

अशोक गायकवाड   रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २७ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात…

मुंबईत जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने ५८ व्या जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर, मुंबई…

फेरीवाला भिशी यंत्रणेमुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारची भूमिका शांत

 रमेश औताडे     मुंबई अधिकृत फेरीवाल्यांच्या व पादच्याऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी सरकारची खरडपट्टी काढली. या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले आक्रमक झाले असून, सरकारने जर दहा दिवसात योग्य ती…