Category: मुंबई

Mumbai news

गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली

सर्व कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा गोखले पूल आणि अंधेरी पश्चिम येथे असलेला सी. डी. बर्फीवाला पूल यांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे उर्वरित कामे जलदगतीने करून हा गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांसाठी खुली करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असली तरी अंधेरी पश्चिमेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती. परिणामी, बर्फीवाला पूल बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली. त्यांच्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून पुलाचा काही भाग वर खेचून पातळी समतल करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. महापालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. दोन्ही पूल जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील पातळी वरखाली झाल्यामुळे जे हसे झाले, त्यावरून प्रशासनाने आता बोध घेण्याचे ठरविले आहे. याप्रकरणी सत्यशोधन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची नियुक्ती केली आहे. यापुढे कोणत्याही प्रकल्पाच्या नियोजनात त्रुटी राहू नयेत म्हणून सत्यशोधन करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या चौकशीचा अहवाल प्रलंबित आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत दुसऱ्या गर्डरचे सगळे भाग एकत्र करून येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

इमारतीचे छत कोसळून वडील-मुलाचा मृत्यू

मुंबई: पहिल्याच पावसात विक्रोळी येथे रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून त्यात वडील-मुलाचा मृत्यू झाला. याबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहेत. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे रविवारी रात्री ही घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीजवळ नागेश रेड्डी (३८) हे सुरक्षारक्षकाचे काम करत होते. रविवारी रात्रीही ते नेहमीप्रमाणे कामावर असताना त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा रोहित रेड्डी तेथे गेला होता. त्याचवेळी जोरात पाऊस आल्याने दोघेही तेथील छज्जाखाली उभे होते. त्याचवेळी अचानक छज्जाचा काही भाग दोघांच्या अंगावर कोसळला. काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, दोघाना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. शासनाने घटनेची तत्काळ दखल घेत संबंधित विकासकावर कारवाई करावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

लोकसभेवर निवडून येऊनही नारायण राणे यांना डच्चू

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून येऊनही केंद्रीय मंत्रिमंडळातून नारायण राणे यांना वगळण्यात आले. अडीच वर्षांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत राणे फारसा प्रभाव पाडू न शकल्यानेच त्यांना डच्चू देण्यात आल्याचे…

खुशखबर! मान्सून मुंबईत धडकला

मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. अखेर आज मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्यपणे 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं मुंबईकरांमध्ये आनंदाचे…

सगे सोयरेबाबत तोडगा काढणार-अजित पवार

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आमची एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने सगे सोयरे बाबत निर्णय घेण्याबाबत काय, कुणी बोलायचं हे आमचं ठरलं आहे. आम्ही लक्ष घालून मार्ग…

सच्चाईपणाच खरा कामगार चळवळीचा मूलाधार!

गोविंदराव मोहिते यांचा अमृतमहोत्सवी‌ सोहळ्यात खासदार अरविंद सावंत यांच्याद्वारे गुणगौरव! मुंबई  : तुटता,तुटता वाचलो‌,हा गोविंदराव मोहीते यांच्या बोलण्यातील सच्चाइपणा आणि प्रामाणिकपणा दिसून आला असून,तोच खरा आजच्या कामगार चळवळीचा मूलाधार आहे,असे…

एमएचटी सीईटीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, कृषी यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेच्या निकालाबाबत सीईटी कक्षाकडून वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षकडून पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे तत्कालीन आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर सीईटी कक्षाकडून निकालाची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली. त्यात एमएचटी सीईटीच्या (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) निकालाची संभाव्य तारीख १० जून अशी जाहीर करण्यात आली होती. परंतु सीईटी कक्षाने एमएचटी सीईटीचा निकाल हा १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करणार असल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीईटी कक्षाकडून तारखांवर तारखा जाहीर करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सीईटी कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीला ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम या गटातून तर पीसीबी या गटातून ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

पवई भीमनगरमध्ये पोलिसांची दडपशाही?

बेदम मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट मुंबई : दोन दिवसांपूर्वी पवईयेथील जय भीमनगरमधील झोपडपट्टी मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी ही झोपडपट्टी पाडण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. दरम्यान, आता या भागातील बेघर रहिवाशांना अमानुषपणे मारहाण होत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एक्स या समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी हे आरोप केले. जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत पोलिसांच्या वेशात नसलेली एक व्यक्ती नागरिकांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा अमानुष अत्याचार कुणी का सहन करावा? या व्हिडीओतील रुमाल बांधलेला माणूस कोण आहे. झोपडपट्टी खाली करण्यासाठी केवढी धडपड होते आहे, असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाची चौकशी होणार का? असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला. महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडीओ पवई भीमनगरमधील असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी होऊ शकलेली नाही. तत्पूर्वी शनिवारी (८ जून ) जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील बेघर रहिवाशांची भेट घेतली होती. यावेळी बोलताना एका बिल्डरच्या अथक परिश्रमामुळे महानगर पालिकेच्या काही निवडक अधिकाऱ्यांनी पोलिसांना फसवत, सगळ्यांनाच गंडवत पुढचा-मागचा विचार न करता ८०० कुटुंबांना रस्त्यावर आणले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती याशिवाय जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही. तोपर्यंत येथे कोणतेही काम होऊ देणार नाही, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले होते. मात्र, तिथे पुन्हा काम सुरू झाले असल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तसेच कायदा आणि सुव्यवस्था ही पोलिसांची जबाबदारी आहे. अशाप्रकारे जर पोलीस आपले काम नाकारत असतील तर गोरगरीबांनी कायदा हातात घेतला, तर कोणाला दोष देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला होता.

फ्लेमिंगोच्या मृत्यूची हरित न्यायाधीकरणाकडून दखल

सिडकोसह वनविभाग, प्राधिकरणाला नोटीस नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या प्रधान खंडपीठाने येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाजवळ फ्लेमिंगोच्या मृत्यूची स्वत:हून दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या (एनजीटी) प्रधान खंडपीठाने सिडको, राज्य वनविभाग आणि पाणथळ प्राधिकरण यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये पर्यावरणीय नियमांचे पालन करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत. विशेषत: वेटलँड (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, २०१७ च्या तरतुदींचे पालन; जैविक विविधता कायदा, २००२ आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ बाबत एनजीटीने टिप्पणी केली आहे. एनजीटी अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने फ्लेमिंगोच्या मृत्यूचे प्रकरण पश्चिम विभागाकडे वर्ग केले आणि सुनावणीसाठी १८ जुलैची तारीख निश्चित केली आहे. एनजीटीने नमूद केले की, प्राथमिक निरीक्षणांवर आधारानुसार शहर आणि औद्याोगिक विकास महामंडळाने (सिडको) नव्याने बांधलेल्या उंच रस्त्यांमुळे टी एस चाणक्य तलावातील तीनपैकी दोन तलावांत पाणी येण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे तलावात पाणी साचले होते. फ्लेमिंगो सामान्यत: वाहते पाणी असलेल्या भागात राहतात हे तथ्य. फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर त्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी स्वागत केले आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी निदर्शनास आणून दिले की, सिडकोने नेरुळ येथील वाहतूक जेट्टीच्या अर्थात टर्मिनलच्या कामामुळे आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही असे सिडकोने म्हटले असताना स्वत:च्या कामात नियमांचे उल्लंघन केले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरण मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटींचे हे उल्लंघन आहे. आणि पाण्याचा प्रवाह आणि जीवजंतू अबाधित आहे याची खात्री करण्यासाठी राज्याने दिलेल्या सरकारी आदेशाचेही उल्लंघन केले आहे. जबाब नोंदवण्याचे निर्देश फ्लेमिंगोच्या मृत्यूचे कारण ह्यप्रकाश प्रदूषणह्ण असू शकते, जे त्यांच्या नाजूक डोळ्यांमुळे पक्ष्यांची दृष्टी अंशत: बिघडवते. त्यात असे नमूद केले आहे की, पक्ष्यांना उडताना नवीन स्थापित एलईडी दिवे दिशाभूल करतात, असे एनजीटीने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे एनजीटीने प्रधान मुख्य वनसंरक्षक-नागपूर, महाराष्ट्र वेटलँड प्राधिकरण, सिडको आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पश्चिम विभागीय खंडपीठासमोर जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

आषाढी वारीसाठी खास गाड्या

मुंबई : न्यु सातारा समूहाच्या वतीन २००१ पासून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने मुंबई ते पंढरपूर अशी बस सेवा दिली जाते. यासोबत मोफत चहा, न्याहरी, जेवण, राहण्याची तसेच इतर सोयीसुविधादेखील दिल्या जातात. यंदा १७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ या दिवशी सकाळी दहा वाजता या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः राजेंद्र घाडगे , न्यू सातारा समूह, डॉ. कंपाऊंड, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी पूर्व, मुंबई ४०००११. दूरध्वनी क्र. २३७९१५२०, २३७४९६३८, ९९८७१९९५८७ (वेळ सकाळी ९ ते २, दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३०) यंदा या गाड्या चिंचपोकळी, ना. म. जोशी मार्ग, कांदिवली, मानखुर्द, वाशी, डोंबिवली येथून सोडण्यात येणार आहेत. आषाढी वारीसाठी खास गाड्या मुंबई : न्यु सातारा समूहाच्या वतीन २००१ पासून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने मुंबई ते पंढरपूर अशी बस सेवा दिली जाते. यासोबत मोफत चहा, न्याहरी, जेवण, राहण्याची तसेच इतर सोयीसुविधादेखील दिल्या जातात. यंदा १७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ या दिवशी सकाळी दहा वाजता या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः राजेंद्र घाडगे , न्यू सातारा समूह, डॉ. कंपाऊंड, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी पूर्व, मुंबई ४०००११. दूरध्वनी क्र. २३७९१५२०, २३७४९६३८, ९९८७१९९५८७ (वेळ सकाळी ९ ते २, दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३०) यंदा या गाड्या चिंचपोकळी, ना. म. जोशी मार्ग, कांदिवली, मानखुर्द, वाशी, डोंबिवली येथून सोडण्यात येणार आहेत.