Category: मुंबई

Mumbai news

 नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्याचा शासन आदेश निर्गमित 

 खासदार नरेश म्हस्के यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींचे आभार   मुंबई : गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण या तालुक्यांमधील प्रकल्पग्रस्त गेले ४० वर्ष संबंधित प्राधिकरण आणि शासनस्तरावर प्रयत्न करत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देत शासन स्तरावर पाठपुरावा सुरु केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती. आज नगर विकास विभागाने जीआर काढत ही बांधकामे नियमित करण्याचा आदेश काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींचे खासदार नरेश म्हस्के यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत होत्या. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते. खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात 11 सप्टेंबर 2024 रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यात चर्चा झाली. 25 फेब्रुवारी 2022 आणि 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या आदेशामधील त्रुटी दूर करत प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार आदेशात दुरुस्ती करुन नवीन जीआर काढण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय क्रमांक सिआयडी – 3317/प्र.क्र.94/नवि-10 नुसार गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करत असल्याचा आदेश काढला आहे. या शासन निर्णयानुसार 25 फेब्रुवारी 2022  पर्यंतची प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित झाली आहेत. प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, माजी नगरसेवक शिवराम पाटील, किशोर पाटकर, स्थानिक शिवसैनिक आणि भूमिपुत्र यांच्या सहकार्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत. 00000

 पावसाळी अधिवेशनातील आश्वासनाचे घोंगडे भिजत

हिवाळी अधिवेशनची तयारी सुरू झाली असताना रमेश औताडे मुंबई :  मागील पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी  बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन आले तरीही त्या…

 सुरेश पोटे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

 महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ, फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शरद डिचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ कुर्ला येथे संपन्न झाली. सभेची सुरवात श्री. साने गुरुजी यांच्या “खरा तो एकची धर्म” या कवितेने करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सचिव श्री सुरेश पोटे यांनी केले. ज्ञात-अज्ञात दिवंगतांना श्रद्धांजली, वार्षिक जमा-खर्च मंजुरी, लेखा परीक्षकांची नेमणूक करणे इत्यादी कामकाज झाले. सदर सभेत, निवडणूक अधिकारी अनंत भाटे व यशवंत देशपांडे यांनी अलिकडे पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाची २०२४ ते २०२७ पर्यंतची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली ती खाली नमूद केल्याप्रमाणे आहे. अध्यक्ष सुरेश पोटे, उपाध्यक्ष डॉ रेखा भातखंडे, सचिव मुकुंद फडतरे, सह सचिव राजन फणसीकर, कोषाध्यक्ष सुधीर सावंत, कार्यकारणी सदस्य म्हणून प्राचार्य लता पोवार, बबन पाटणकर, बळवंत पाटील व सुरेश सरनोबत यांची निवड झाली. त्याचप्रमाणे, सर्वसाधारण सभेत संपर्क सचिव दिलीप गाडेकर, संघटक सचिव स्वाती फडके, सांस्कृतिक अध्यक्ष म्हणून प्रतीभा सराफ, निमंत्रित सदस्य उज्ज्वल पाठरे, दिलीप धारकर, विनय पाटील व संजय साने यांची निवड करण्यात आली. सल्लागार पदी विजय औंधे यांची निवड एकमताने करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार-यांनी आपला अल्पपरिचय करून दिला. या सभेस पदसिद्ध अध्यक्ष श्री विजय औंधे व व श्री शरद डिचोलकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नूतन कार्यकारिणी सदस्यांना अध्यक्ष शरद डिचोलकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पोटे यांनी सर्वांचे आभार मानताना आपण सर्वांनी एकत्र व एक विचाराने काम करावे असे आवाहन केले. राष्ट्रगीत गायनानंतर अल्पोपहार करून अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात सभा समाप्त झाली.

प्लॅस्टिक द्या, टी शर्ट, पेन घ्या!

 मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम : मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद मुंबई, ता. २१ : सीएसएमटी रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने शक्ती प्लॅस्टिक कंपनीच्या सहकार्याने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये प्लॅस्टिक द्या, टी-शर्ट, पेन अशा वेगवेगळ्या उपयोगी वस्तू मिळवा. या उपक्रमाला रेल्वे प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेकडून कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार मेसर्स शक्ती प्लॅस्टिक कंपनीशी केला आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागातील निवडक स्थानकांवर प्लॅस्टिक कचरा कमी करण्यावर आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन उपायांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करून मेसर्स शक्ती प्लॅस्टिक इंडस्ट्रीजसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून पर्यावरणीय शाश्वततेच्या

 पुरस्कार सुरु करण्याची मागणी                    

विजय वैद्य यांच्या नांवे जमा होणारी सन्मान योजनेची रक्कम यापुढे त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात यावी   मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मिळत आहे. आता विजय वैद्य हे आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची रक्कम यापुढे त्यांच्या पत्नी वैशाली विजय वैद्य यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. त्याचप्रमाणे वैद्य यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष म्हणून केलेली हॅट्ट्रिक, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून केलेली हॅट्ट्रिक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे उभारलेले समाजसेवेचे प्रचंड मोठे कार्य, त्यांचे वाचक आणि ग्रंथालय चळवळीतील मोठे योगदान लक्षात घेऊन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने विजय वैद्य यांच्या नांवाने एखादा पुरस्कार सुरु करावा, अशी सूचना वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत करण्यात आली. मंत्रालयातील पत्रकार कक्षात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली विजय वैद्य यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी एक्स्प्रेस चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार रमेश कीर यांनी विजय वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या शोकसभेस प्रारंभ झाला. अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, वैभव विजय वैद्य, राजन  पारकर,  खंडूराज गायकवाड, योगेश त्रिवेदी, नितीन सावंत, सदानंद खोपकर, अभय देशपांडे, महेश पावसकर, गिरीश वसंत त्रिवेदी, प्रवीण राऊत, अनंत नलावडे,  आदींनी आपल्या भावना व्यक्त करीत विजय वैद्य  यांच्या गौरवपूर्ण कार्याला उजाळा दिला.

राज्यात परिवर्तनाची संधी महाविकास आघाडीने गमावू नये

 ‘आंबेडकरवादी भारत मिशन ‘चे आवाहन मुंबई : २०११ च्या जनगणनेत राज्यात जातीची नोंद केलेल्या आणि न केलेल्या बौद्ध बांधवांची एकत्रित लोकसंख्या १ कोटी इतकी आहे. त्याप्रमाणे विधानसभेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकूण २९ जागांपैकी २०  जागांवर बौद्धांचा ‘ हक्क ‘ आहे, असे नमूद करत महाविकास आघाडीकडे तसा दावा करण्याचा निर्णय आंबेडकरवादी भारत मिशनने घेतला आहे. या मुद्द्यावर मुंबईत लवकरच बौद्धांचा एक मेळावा घेण्याचेही ठरवण्यात आले आहे. अनुसूचित जातींमध्ये सर्वाधिक म्हणजे ८० टक्के लोकसंख्या असूनही विधानसभेत सध्या फक्त ८ आमदार बौध्द आहेत, याकडे एका पत्रकाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. पवार, ठाकरे, खारगे यांना भेटणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांना एका निवेदनाद्वारे बौद्ध समाजाचा हा  ‘ दावा ‘ सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी बौद्धांचे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रांतांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ महाविकास आघाडीच्या धुरिणांची भेट घेणार आहे. २० जागांचा फॉर्म्युला विधानसभेच्या १२ जागांवर  शिवसेना ( उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी ( शरद पवार) आणि काँग्रेस यांनी त्यांच्या पक्षातील प्रत्येकी ४ सक्षम बौध्द कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. ८ जागा महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या आंबेडकरवादी संघटनांमधील उमेदवारांसाठी विजयाची क्षमता या निकषावर  सोडाव्यात. तसेच विधान परिषदेच्या ३ जागांवर बौध्द समाजातील विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, कलावंत, माजी सनदी अधिकारी यांना संधी द्यावी, यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे. बौद्ध समाजाची ताकद निर्णायक बौद्ध समाजाची ताकद ही राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १८९  जागांवर निर्णायक आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही हे सिद्ध आलेले आहे. १९९० च्या निवडणुकीत बौद्ध समाजाच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसला हातची सत्ता राखण्यात यश आले होते. तर, रमाबाई कॉलनीतील दलित हत्याकांडानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती सरकारला बौद्ध समाजाने सत्तेतून हद्दपार केले होते, याची आठवण पत्रकातून करून देण्यात आली आहे. आंबेडकरी समाजाची जनभावना काय? १) जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ‘ इबीसी ‘ आणि ‘ ओबीसी ‘ या वर्गांना दिलेली सहा महिन्यांची मुदत अनुसूचित जातींना भाजप आणि मित्र पक्षांनी जाणूनबुजून नाकारली आहे. त्यामुळे सुमारे २ लाख दलित विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुकावे लागले आहे. २) शिष्यवृत्ती, फेलोशीपअभावी एससी विद्यार्थ्यांची नेहमीच ससेहोलपट सुरू आहे. ३) भीमा – कोरेगाव येथे आंबेडकरी समाजाला लक्ष्य करत घेरून करण्यात आलेले हल्ले आणि माजवलेल्या हिंसाचारानंतर फडणवीस सरकारने खोटे गुन्हे दाखल करून दलित बांधवांनाच खटल्यांमध्ये अडकवले आहे. ते खटले त्वरित काढून घेण्याची नितांत गरज आहे. ४) राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात ( ७ मे २०२१ पासून) अनुसूचित जाती – जमातींचे बढती ( प्रमोशन) मधील आरक्षण बंद करण्यात आलेले आहे. ते पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे. ५) भूमिहीनांना जमीन वाटपासाठी राज्यात असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना कागदोपत्री अस्तित्वात आहे. तिची प्रभावी अंमलबावणी करून जमिनींचे वाटप होणे आवश्यक आहे. ६) गायरान जमीन धारकांच्या अतिक्रमणाचे दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. ते तातडीने निकाली काढण्याची गरज आहे. ७) महाराष्ट्राच्या एकूण बजेटपैकी अनुसूचित जातींच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मंजूर करून त्याचा १०० टक्के विनियोग करणे राज्य सरकारला बंधनकारक करण्यात आले पाहिजे. त्यासाठी विधिमंडळात कायदा संमत करण्याची आवश्यकता आहे. दलित समाजात या आणि अशाच अनेक ज्वलंत प्रश्नांवरून कमालीचा असंतोष आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सध्याचे भाजपप्रणीत सरकार हटविण्याशिवाय तरणोपाय नाही, अशी भूमिका आंबेडकरवादी भारत मिशनने घेतली आहे. राज्यात परिवर्तनाचे उद्दिष्ट राज्यातील बौद्ध – आंबेडकरी समाजातही तीच जनभावना प्रखर आणि प्रबळ झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप – मित्र पक्षांना १७ जागांवर रोखण्यात यश आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हटवून राज्यात ‘ परिवर्तन ‘ घडवण्याची संधी हाताशी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आंबेडकरवादी पक्ष – संघटना यांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन आंबेडकरवादी भारत मिशनने केले आहे. त्यासाठीचे हे आवाहन पत्रक राज्यातील खालील आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केले आहे. १) दलित पँथर नेते सुरेश केदारे २) प्राचार्य रमेश जाधव ३) ज्येष्ठ पत्रकार सुनील खोबरागडे ४) ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ…

 1600 हून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी केली खारफुटी परिसर स्वच्छता

 स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत   नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये आज 21 सप्टेंबर या जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये खारफुटी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 1600 हून अधिक एनसीसी व स्काऊटचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वच ठिकाणी खाडीकिना-यांवरील खारफुटी भागातील कचरा साफ केला. बेलापूर विभागात डोलया समुद्रेश्वर मंदीर पाणथळ भाग, नेरूळ विभागात सारसोळे जेट्टी 1 व 2 भाग, वाशी येथील सागर विहार किनारा, कोपरखैरणे येथील धारण तलाव सेक्टर 19 परिसर, घणसोली येथे सेक्टर 12 पामबीच रोड नजिकचा खाडीकिनारा परिसर, ऐरोली सेक्टर 10 येथील जैवविविधता केंद्र कांदळवन परिसर याठिकाणी सागरीकिनारी खारफुटी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थी, नागरिकांनी समुद्राच्या पाण्यातून वाहत आलेला प्लास्टिक, कापड, थर्माकोल, कागद यांचा कचरा संकलित केला. यामध्ये चपलांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मोहीमेच्या विविध ठिकाणी भेट देत मोहीमेत सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत त्या त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी स्वच्छता व प्लास्टिकबंदीची सामुहिक शपथ ग्रहण केली. परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे यांनीही विविध ठिकाणी मोहीमेत सहभाग घेतला. यामध्ये वाशी येथे सागरविहार सेक्टर 8 परिसरात राबविण्यात आलेल्या खारफुटी व परिसर स्वच्छता मोहीमेत 450 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत साधारणत: 2 मेट्रिक टन कचरा संकलित केला. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक यांनी सहभागी होत नागरिक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. वाशी विभागाचे सहा. आयुक्त सागर मोरे, मुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी, स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या खारफुटी स्वच्छता मोहीमेत सागरी सीमा मंच, कर्मवीर ॲकेडमी, मॅनग्रुव्हज मार्शल या संस्थांच्या सदस्यांप्रमाणेच आयसीएल झुनझुनवाला कॉलेज सेक्टर 9, टिळक कॉलेज सेक्टर 28, वेस्टर्न कॉलेज सानपाडा, कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न महाविद्यालय सेक्टर 15 येथील एनएसएसचे विद्यार्थी सहभागी होते.

बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेत स्वाती विजेती    

मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिन्टन निवड चाचणी स्पर्धेमध्ये स्वाती एस. हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. दादर-पश्चिम येथील बीएसएनएल बॅडमिन्टन कोर्टवरील महिलांच्या अंतिम सामन्यात स्वातीने १२-१२ अशा बरोबरी नंतर निर्णायक क्षणी अचूक फटके साधले आणि पूजा मोरेचे जोशपूर्ण आव्हान १५-१२ असे संपुष्टात आणून स्वातीने अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. परिणामी प्रारंभी आघाडी घेणाऱ्या पूजाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरवसे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या महिला बॅडमिन्टन स्पर्धेची उपांत्य लढत देखील अटीतटीमध्ये रंगली. पहिल्या सलग ४ गुणासह डावाच्या मध्यापर्यंत ९-८ अशी आघाडी घेणाऱ्या गरिमा श्रीवास्तवला स्वाती एस. हिने अखेर २१-१३ असे चकवून अंतिम फेरी गाठली. दुसरी उपांत्य लढत जिंकताना पूजा मोरे हिने प्रियांका उपाध्यायचा २२-२० असा निसटता पराभव केला. स्पर्धेमधून महिला विभागात स्वाती एस., पूजा मोरे, गरिमा श्रीवास्तव, प्रियांका उपाध्याय आणि पुरुष विभागात ऋषिकेश शिंदे, हनमंत सुद्रिक, प्रमोद जयस्वाल, ऋग्वेद फराडे यांची मुंबई विभागीय संघात निवड करण्यात आली असून  १७ व १८ ऑक्टोबर रोजी राजकोट येथे होणाऱ्या अखिल भारतीय बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेमध्ये मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रशिक्षक सचिन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पंचाचे कामकाज सिध्देश राऊत, आदित्य कीर, साहिल, चंद्रकांत करंगुटकर, ओमकार चव्हाण, अर्जुन कालेकर, श्रीधर नार्वेकर, अविनाश महाडिक आदींनी पाहिले.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ या दिवशी डॉ. सुचेता परांजपे यांचे ऋग्वेदाचा परिचय या विषयावरील व्याख्यान होईल. शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी त्यांचेच उपनिषदे-कथांमधून तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यान होईल. महोत्सवाचा समारोप कै. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित संगीत नाटकातील भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीगीत गंगा हा रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ या दिवशी होईल. याची संकल्पना आणि मार्गदर्शन शुभदा दादरकर यांची असून धवल भागवत, श्रीया सोंडूर, संगीता चितळे यांचा यात सहभाग असेल. त्यांना केदार भागवत आणि सुहास चितळे यांची साथसंगत असून निवेदन प्रज्ञा लेले यांचे असेल. अधिकाधिक रसिकांनी या अध्यात्मरंग महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

वीजबिल सवलतीपोटी महावितरणला ४२ कोटी

मुंबई, ता. २१ : महावितरणकडून राज्यभरातील कृषीपंपधारकांना वीजपुरवठा केला जातो. अनुसूचित जाती घटकांना या दरात दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी महावितरणला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून ४२ कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे वीजबिल थकबाकीचा सामना करणाऱ्या महावितरणला दिलासा मिळणार आहे. कृषीपंप ग्राहकांना वीजबिलात सवलत योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने ११५ रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार महावितरणही सातत्याने अनुसूचित जाती घटकातील कृषीपंपधारक ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज पुरवते. त्यामुळेच सरकारने या बिलाची रक्कम महावितरणला देण्याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान, महावितरण इतर गटांतील वीज ग्राहकांनाही सवलतीच्या दराने वीजपुरवठा करते; मात्र सवलतीची रक्कम वेळेत मिळत नसल्याची माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.