Category: मुंबई

Mumbai news

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.दिलीप नेरकर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साडेचार लाख रुपयांना बाळाची विक्री

तृतीयपंथीयांसह सहा जणांना अटक, आरोपींमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश मुंबई : दीड वर्षाच्या मुलाची साडेचार लाख रुपयांना विक्री केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन तृतीयपंथीयांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात भादंवि कलम ३७०, ३४ सह अल्पवयीन न्याय (काळजी व संरक्षण) कायदा कलम ८० व ८१ अंतर्गत सहाजणांविरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सीमा खान (३२) या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तक्रारीनुसार, हुसैन शेख या एक वर्ष सात महिन्यांच्या मुलाची विक्री करण्यात आली. मुलाची आई नाजमीन शेख व वडील मोहम्मद शेख मालाड मालवणी परिसारीतल अब्दुल हमीद रोड परिसरातील वास्तव्यास आहेत. या दाम्पत्याने स्वतः आपल्या बाळाची विक्री केली. त्यासाठी अंधेरी पश्चिम इंदिरा नगर येथील तृतीयपंथी सायबा अन्सारी, त्याच परिसरात राहणारी राबिया अन्सारी व सकीना बानू शेख यांच्या मध्यस्थीने या बाळाची विक्री करण्यात आली. साकीना शेख ही या दाम्पत्याची परिचित आहे. सायबा अन्सारीच्या परिचयातून ठाण्यातील इंद्रदीप ऊर्फ इंदर व्हटवार (४३) याला बाळाची विक्री करण्यात आली. व्हटवार हा चांगल्या कुटुंबातील असून समलिंगी आहे. त्याला मुलगा दत्तक घ्यायचा होता. वैद्यकीय खर्चासह चार लाख ६५ हजार रुपयांना बाळाची विक्री करण्यात आली. आरोपींच्या तावडीतून बाळाची सुटका करण्यात आली असून त्याला सध्या अंधेरी पश्चिम येथील सेंट कॅफरीन सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अपहरणाच्या बनावामुळे बिंग फुलले मुलाची आत्या घरी आली असता मुलगा दिसून आला नाही. अखेर तिने भावाला विचारले असता एका व्यावायिकाने त्याचे अपहरण केल्याची खोटी माहिती सांगितली होती. त्यानंतर मुलाच्या आत्याने तात्काळ भावाला व त्याच्या पत्नीला मालवणी पोलीस ठाण्यात घेऊन गेली होती. त्यावेळी त्यांनी जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी घेऊन गेल्याचे सांगून वेळ मारून नेली. पण त्याने बनवलेल्या कथेमध्ये अनेक चुका दिसू लागल्या त्यातून हा संपूर्ण प्रकार उघड झाला. आई-वडिलांनीच मुलांची विक्री केल्याची ही पहिली घटना नाही.

वाशी विभागात अनधिकृत झोपड्यावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी कार्यालयाअंतर्गत वाशीगांव  व सेक्टर- ३१ येथे बेकायदेशीर / ‍अनधिकृत झोपडपटटया  वसलेल्या आहेत तसेच वाशीगांव परिसरातील नमुंमपा   ‍व सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपडया वसलेल्या आहेत. केरळा भवन ते वाशी हायवे पर्यंत, वाशी येथील उद्यानाकरीता आरक्षीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर, वाशी सायन पनवेल हायवे लगत  तसेच वाशीगांव खाडी  किनारी  लगत उभारण्यात आलेल्या झोपडपटटयांवर तोडक कारवाई  करुन एकूण ६३८ अनाधिकृत झोपड्या निष्कासित  करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी,  सुरक्षा रक्षक, मजूर व जेसीबी च्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

४०० पार घोषणेचा फटका बसला- भुजबळ

मुंबई : देशात सत्तेत येण्यासाठी २७२ जागांचीच गरज असताना भाजप ४०० पारचा नारा देत आहे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हा मुद्दा समोर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग सत्ताधाऱ्यांवर…

राज्यात घटलेल्या मतदानाच फटका कुणाला बसणार ?

48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा? मुंबई : लोकसभेसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होऊनही मतदारांना मतदान पेटीपर्यंत घेऊन जाण्यात सर्वच पक्ष अपयशी ठरले आहेत. राज्यातील ४८ पैकी तब्बल…

मध्ये रेल्वेवर ३६ तासांचा मेगाब्लॅक

मुंबई : मध्य रेल्वेवरून येत्या १ आणि २ जूनला प्रवास करीत असाल तर रेल्वेचा प्रवास टाळा . कारण १ आणि २ जून रोजी मध्य रेल्वेकडून ३६ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या…

खुषखबर !  पाच दिवसात मान्सून केरळमध्ये थडकणार

मुंबई : उन्हाने होरपळून गेलेल्या अवघ्या देशवासीयांसाठी खुषखबर आहे. येत्या पाच दिवसात मान्सून केरळमध्ये थडकणार आहे. अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू पुढे सरकरत असून लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी…

विधान परिषद निवडणूकीत युती-आघाडीत धुसफूस

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निवडणूकीत गळ्यातगळे घालून युतीधर्म निभावण्याच्या आणाभाका घेणारी महायुती आणि महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणूकीवरून धुसफूस सुरु झाली आहे. ४ जूनला लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. पण त्यापुर्वीच…

दहावीत ‘कोकण पॅटर्न’ पुन्हा नंबर १

राज्यात निकालांत मुलींनी बाजी मारली १८ विषयांचा १०० टक्के निकाल १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण निकालात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर मुंबई : बारावीपाठोपाठ दहावीतही यंदा ‘कोकण पॅटर्न’ नंबर एक ठरला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…

शाहिद खानच्या शतकाने शास्त्री संघ २२९

ड्रीम एलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा चिन्मय दुखंडेचे ६ बळी मुंबई :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दोन दिवसीय  साखळी लढतीत रवी शास्त्री संघाने शाहिद खानच्या (१०४ धावा) शतकी खेळीमुळे सर्वबाद २२९ धावा केल्या. याच लढतीत  वेंगसरकर संघाच्या लेगस्पिनर  चिन्मय दुखंडे याने ४० धावांत ६ बळी घेण्याची करामत   केली. पहिल्या दिवसाअखेर वेंगसरकर संघाने बिनबाद ८३ धावा करत जोरदार प्रदर्शन केले आहे.  कर्नाटक सपोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत गावस्कर संघाने तेंडुलकर संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिवसाखेर ९ बाद २४९ धावा केल्या आहेत. ओव्हल मैदानावरील लढतीत रवी शास्त्री संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिद खान याने ११५ चेंडूत १२ चौकारांसह १०४ धावा करताना पाचव्या विकेटसाठी पार्थ ठाकूर (२७) यांच्यासह ९८ धावांची भागी रचली. आयांश चित्कारा (२१) आणि वेदांत कडू (१९) यांनीही संघाच्या धावसंख्येत थोडी भर टाकली.  वेंगसरकर संघाच्या चिन्मय दुखंडे याने आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने ४० धावांत ६ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला ६७ षटकांतच २२९ धावांवर रोखण्याची करामत केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अरहाम जैन (खेळात आहे ३५) आणि ईशान पाठक (खेळात आहे ४०) या सलामीवीरांनी २५ षटकांत ८३ धावांची अभेद्य भागी रचत वर्चस्व राखले आहे. कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत सुनील गावस्कर  संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ९ बाद २४९ धावांची मजल मारली आहे. ७ बाद १५९ अशा डळमळीत अवस्थेनंतर  कर्णधार शेन रझा (५२) याच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि त्याने आठव्या विकेटसाठी आयुष गोहो  (२२) यांच्यासह केलेल्या ४२ धावांच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे ही मजल मारली आहे. गावस्कर संघासाठी स्वानंद पालव (२८), स्मित ठाकूर (३१), वेदांग मिश्रा (४८) यांनीही  फलंदाजीत योगदान दिले. तेंडुलकर संघासाठ कर्णधार हर्ष कदम याने ३३ धावांत ४ बळी  तर मोक्ष निकम याने ५७ धावांत ३ आणि हार्दिक गजमल याने ४९ धावांत २ बळी मिळविले आहेत. उद्या सामनाच दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. संक्षिप्त धावफलक –  ओव्हल मैदान =  रवी शास्त्री संघ – ६७ षटकांत सर्वबाद २२९ (आयांश चित्कारा २१, शाहिद खान १०४, पार्थ ठक्कर २७, वेदांत कडू १९; चिन्मय दुखंडे ४० धावांत ६ बळी) वि. दिलीप वेंगसरकर संघ – २५ षटकांत बिनबाद  ८३ (अरहाम जैन खेळत आहे ३५, ईशान पाठक खेळात आहे ४०). कर्नाटक सपोर्टींग = सुनील गावस्कर संघ – ९५ षटकांत ९ बाद २४९ (स्वानंद पालव २८, स्मित ठाकूर ३१, वेदांग मिश्रा ४८, शेन रझा ५२, आयुष गोहो २२; हार्दिक गजमल ४९ धावांत २ बळी, हर्ष कदम ३३ धावांत ४ बळी, मोक्ष निकम ५७ धावांत ३ बळी) वि. सचिन तेंडुलकर संघ.विजय बने – ९८१९०५९६७७ फोटो ओळी –  रवी शास्त्री संघाचा शतकवीर शाहिद खान (१०४ धावा) आणि दिलीप वेंगसरकर संघाचा चिन्मय दुखंडे (४० धावांत ६ बळी).